Battleground Mobile India Information In Marathi | बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडिया

Battleground Mobile India information in Marathi: गेल्या वर्षी भारत सरकारने PUBG गेमवर बंदी घातली होती.

तेव्हापासून अनेक जण या गेम पुन्हा सुरु होण्याच्या प्रतीक्षेत आहेत.आता ही प्रतीक्षा संपली आहे. PUBG गेम निर्माता कंपनी क्राफ्टनने (KRAFTON) व्हिडिओ टीझर्स जाहीर करून भारतात नवीन गेम लॉन्च करण्याची घोषणा केली होती.हा गेम नव्या नावासह लवकरच भारतात लाँच केला जाणार आहे.व्हिडिओ टीझरनुसार हा गेम ‘बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडिया’या नावाने लॉन्च होणार आहे. मात्र टीझरमध्ये लॉन्चची तारीख समोर आलेली नाही.त्यामुळे या गेमच्या प्रतीक्षेत असलेल्या गेमर्सच्या उत्सुकता वाढल्या आहेत.

Battleground Mobile India Information In Marathi
Battleground Mobile India Information In Marathi

दक्षिण कोरियन व्हिडिओ गेम डेव्हलपर क्राफ्टनने (KRAFTON) शेअर केले आहे की PUBG चं नवं नाव बॅटलग्राउंड मोबाइल इंडिया (Battlegrounds Mobile India) असं असणार आहे. कंपनी लवकरच हा गेम मोबाइल डिव्हाइसवर लाँच करू शकते.क्राफ्टॉनने म्हटले आहे की, प्रथम भारतीय वापरकर्त्यांसाठी बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडियाच्या पूर्व-नोंदणीची प्रक्रिया सुरू केली जाईल. तरच मोबाईल गेम सुरू होईल. कंपनीने पुढे म्हटले आहे की, बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडिया (Battleground Mobile India) फक्त भारतीय युजर्ससाठी आहे.

बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडिया प्री-रजिस्ट्रेशन सुरु

हा गेम कधी लाँच केला जाणार आहे, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती किंवा तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र कंपनीने या गेमसाठी प्री-रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरु केले आहे. कंपनीने या गेमसाठीची प्री-रजिस्ट्रेशन लिंक लाईव्ह केली आहे. १८ मे २०२१ पासून युजर्स या लिंकवर जाऊन गेमसाठी प्री-रजिस्ट्रेशन करतील. एका प्रेस निवेदनात कंपनीने म्हटले आहे की, यावेळी चाहत्यांसाठी बरेच रिवॉर्ड्स ठेवले जाणार आहेत, परंतु युजर्स या गेमसाठी प्री-रजिस्ट्रेशन करतील तेव्हाच त्यांना याचा फायदा घेता येईल. हे रिवॉर्ड्स केवळ भारतीय युजर्सपुरते मर्यादित असतील. ज्या वापरकर्त्यांना प्री-रजिस्ट्रेशन करायचं आहे त्यांना गूगल प्ले स्टोर वर जाऊन,अॅप डाउनलोड करा व तिथे प्री-रजिस्ट्रेशन बटणवर क्लिक केल्यानंतर नोंदणी करता येईल. गेम लाँच झाल्यानंतर युजर्स रिवॉर्ड्स क्लेम करु शकतील. हा गेम प्ले स्टोरवर प्री-रजिस्ट्रेशन साठी उलब्ध आहे. तसेच हा गेम विनामूल्य असेल.iOS बाबतीत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

पालकांची परवानगी अनिवार्य

ज्या युझर्सचं वय १८ वर्षांपेक्षा कमी आहे त्यांना आपल्या आई-वडिलांचा संपर्क क्रमांक द्यावा लागेल. त्यांच्या फोन क्रमांकाशिवाय तुम्ही साईनअप प्रोसेस करू शकणार नाही. त्यांच्या परवानगीनंतरच १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना हा गेम खेळता येईल असं क्रॉफ्टननं आपल्या प्रायव्हसी पॉलिसी डॉक्युमेंटमध्ये म्हटलं आहे.

Battleground Mobile India Information In Marathi

युजर्सचा डेटा सुरक्षेची घेणार काळजी

कंपनीने म्हटले आहे की, युजर्सची गोपनीयता आणि डेटा सुरक्षा ही आमची पहिली प्राथमिकता आहे. गेमरचा डेटा कुठेही पाठवला जाणार नाही आणि तो पूर्णपणे सुरक्षित असेल. आम्ही डेटा संरक्षित करण्यासाठी इतर कंपन्यांसह काम करत आहोत. त्याचबरोबर कंपनी सरकारच्या सर्व महत्त्वपूर्ण मार्गदर्शक सूचनांचे पालन करेल. यात डेटा गोपनीयता आणि युजर्सच्या सुरक्षेचा समावेश असेल. कारण गेल्या सप्टेंबरमध्ये याच कारणास्तव या गेमवर भारतात बंदी घालण्यात आली होती.

पूर्वीपेक्षा जास्त जबरदस्त गेमप्ले

या गेमची स्वतःची एसपोर्ट इकोसिस्टम असेल जी टुर्नामेंट आणि लीगसह सुसज्ज असेल.हा गेम युजर्सना जास्तीत जास्त सुरक्षा आणि जबरदस्त गेम प्ले प्रदान करेल.भारतीय प्लेअर्सना अधिक चांगला अनुभव प्रदान करण्यासाठी PUBG कॉर्पोरेशनने त्यांचा गेमिंग कॉन्टेंट अपडेट आणि अधिक अॅडव्हान्स केला आहे. भारतीय प्लेअर्सच्या इच्छेनुसार आणि मागणीनुसार नवा गेम कस्टमाईज करण्यात आला आहे. हा गेम मोबाईल डिव्हाइसवर फ्रूी टू प्ले उपलब्ध असेल. दरम्यान, असे म्हटले जात आहे की, बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडिया सध्या केवळ भारतीय बाजारातच लाँच केला जाईल. म्हणजेच हा गेम खास भारतीयांसाठीच असणार आहे. हा गेम लॉन्च होण्यापूर्वी प्री रजिस्ट्रेशनसाठी उपलब्ध असेल. निर्मात्यांनी यामध्ये ट्राय कलर (तिरंगी) थीम दिली आहे, जेणेकरुन भारतीय युजर्स याकडे आकर्षित होतील.

पबजी गेम कसा बनला (Battleground Mobile India information in Marathi)

एक जपानी चित्रपट ‘बॅटल रोयाल’ पासून प्रेरणा घेऊन Pubg हा गेम बनवण्यात आला आहे. या चित्रपटात सरकार विद्यार्थ्यांच्या एका ग्रूपला बळजबरी करून मृत्यूशी लढायला पाठवतं. त्याच गोष्टीला धरून हा गेम बनवण्यात आला आहे.
हा गेम दक्षिण कोरियाची व्हीडिओ गेम कंपनी ब्लूहोलनं विकसित केला आहे. या कंपनीनं या गेमचं डेस्कटॉप व्हर्जन तयार केलं होतं. परंतु, चीनची कंपनी Tenncent ने काही बदल करून या गेमचं मोबाईल व्हर्जन लाँच केलं. डेस्कटॉप व्हर्जनपेक्षा मोबाईल व्हर्जनला जगभरात खूप प्रसिद्धी मिळाली.

FAQ’s

बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडिया प्री-रजिस्ट्रेशन प्रोसेस कधी सुरु होणार ?

बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडिया प्री-रजिस्ट्रेशन प्रोसेस १८ मे २०२१ सुरु झाल आहे.

बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडिया प्री-रजिस्ट्रेशन मधे कोणती माहिती द्यावी लागते ?

आपले नाव, वय, ईमेल व मोबाइल डिवाइस कंप्याटीबिलिटी चेक केली जाते.

बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडिया ह्या गेम साठी पालकांची परवानगी आवश्यक आहे का ?

हो ,ज्या युझर्सचं वय १८ वर्षांपेक्षा कमी आहे त्यांना आपल्या आई-वडिलांचा संपर्क क्रमांक द्यावा लागेल.

बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडिया हा गेम कधी लॉंच होणार ?

गेमच्या लॉंच बाबत कोणतीही अधिकृत माहिती किंवा तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.

बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडिया iOS साठी प्री-रजिस्ट्रेशन कसे करावे ?

iOS बाबतीत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

हे पण वाचा :  फुटबॉल खेळाची संपूर्ण माहिती

प्रतिक्रिया द्या