Fennel seeds in Marathi : Badishep हा घटक जवळजवळ प्रत्येक घरात असतो.जेवणानंतर विशेषत: मांसाहारानंतर मुखशुद्धीकरिता बडीशेप खावीशी वाटते.
बडीशेप मुख्यतः माऊथ फ्रेशनर अर्थात मुखवास म्हणून वापरली जाते. बडीशेपच्या या छोट्या छोट्या दाण्यांमध्ये भरपूर प्रमाणात औषधी गुणांचा साठा आहे.
बडीशेप विविध पदार्थांची चव वाढवण्यासोबतच औषध (Badishep Benefits In Marathi) म्हणून देखील वापरली जाते
Calcium, phosphorus, potassium, vitamins A and C ही तत्त्वे बडीशेपमध्ये आहेत.यात असलेले फायबर आणि बरेच पौष्टिक घटक आपल्या पोटाच्या आरोग्यासाठी गुणकारी आहे.

Benefits Of Fennel Seeds in Marathi
बडीशेप(fennel seeds) ही अतिशय पौष्टिक, स्वस्त व सहज उपलब्ध होणारी आहे.बडीशेप त्यांच्या औषधी गुणधर्मांसाठी ओळखली जाते.
बडीशेप मध्ये असलेले पोषक घटक आपल्या आरोग्यासाठी आवश्यक आहेत.जे लोक हर्बल उपचार घेत आहेत,त्यांनी बडीशेपचा विचार करायला हवा.
बडीशेप खाण्याचे अनेक फायदे आहेत.चला तर, पाहूया बडीशेपचे इतरही काही आरोग्यदायी फायदे.(Fennel seeds Benefits In Marathi)
वजन नियंत्रित करण्यासाठी प्रभावी
जे लोकं बऱ्याच काळापासून वजन कमी करण्याकरिता प्रयत्न करत आहेत. त्यांनी आजपासून बडीशेप खायला सुरूवात करावी.
बडीशेप खाल्ल्याने शरीरातील मेटाबॉलिजम वाढते.कॅलरी वेगाने बर्न होतात. यामुळे वजन कमी व्हायला मदत होते.
दोन कप पाण्यात एक चमचा बडीशेप घालून उकळून घ्या आणि हे पाणी दिवसातून दोन ते तीन वेळा प्या. यामुळे तुमचं अपचन दूर होईल आणि तसंच वजन कमी होण्यासही मदत होईल.
पोटाच्या समस्या दूर करण्यात फायदेशीर ठरते
आयुर्वेदात पोटाचे विकार हेच अऩेक आजारांचे कारण आहे, असे सांगितले आहे.बडीशेपमध्ये असणाऱ्या नैसर्गिक तेलामुळे अपचन, आतड्यांची सूज आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यास मदत होते.
पचनविकाराशी संबंधित विविध आजार बडीशेप खाल्ल्याने बरे होतात. यात असलेल्या अॅस्ट्रॅगल आणि अॅनिथोलमुळे, हे गॅस, वेदना आणि जठरासंबंधी विकार यांसारख्या पोटाच्या आजारांसाठी एक प्रभावी औषध मानले जाते.
नियमित बडीशेप खाल्ल्याने डायजेशन सिस्टिम सुधारते.जळजळ आणि आतड्यांची सूज कमी करण्यासाठी बडीशेप प्रभावीपणे कार्य करते.
मासिक पाळीच्या वेळी काही महिलांना पोटदुखीचा खूप त्रास होतो. अशावेळी बडीशेपचे पाणी प्यावे. यामुळे पोटदुखी बरी होऊन गॅसेसची समस्याही सुटते.
अनिद्रेचा त्रास दूर करण्यात फायदेशीर
काही जणांना शांत झोप लागत ऩाही, अनिद्रेचा त्रास असतो. चांगल्या झोपेकरिता मेलाटोनीन हार्मोनची गरज असते. बडीशेपमुळे मेलाटोनीन स्त्राव शरीरात स्त्रवायला सुरुवात होते आणि शांत झोप लागते.
हृदयाचे आरोग्य सुधारते
बडीशेपमध्ये पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते यामुळे उच्च रक्तदाब आणि हार्ट रेट नियंत्रणात राहतो.
यातील फायबर, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम हृदयरोगाचा धोका देखील कमी करते. तसेच, बडीशेप शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी देखील खूप प्रभावी आहे
टॉक्सिक घटक निघून जातात
बडीशेपमधील फायबरमुळे पोटाचे आजार दूर होऊन शरीरातील टॉक्सीन (विषद्रव्ये) शरीराबाहेर टाकली जातात.
यात असलेले आवश्यक तेले आणि फायबर सारखी पोषक तत्त्वे आपल्या शरीरातून टॉक्सिक घटक काढून टाकण्यास मदत करतात, म्हणूनच बडीशेप रक्त शुद्धिकरणासाठी देखील उपयुक्त आहेत.
दृष्टी वाढवण्यात मदत करते
बडीशेप नियमित खालली तर दृष्टी चांगली होते. जर आपल्याला कमी दिसत असेल किंवा आपले डोळे अशक्त झाले असतील, तर मूठभर बडीशेप आपल्यासाठी वरदान ठरू शकते.
रोज जेवून झाल्यानंतर एक चमचा बडीशेप खा. याशिवाय अर्धा चमचा बडीशेपची पूड, एक चमचा खडीसाखरसोबत दुधात घालून प्यायल्यास दृष्टी सुधारायला मदत होते.
बडीशेपमध्ये व्हिटामिन ए असते, जे डोळ्यांच्या दृष्टीस उपयुक्त आहे.
केसांची समस्या
कोंडा, केसांमध्ये खाज सुटणे, केसगळती या समस्यांपासून सुटका हवी असल्यास बडीशेपचा वापर करावा.
यासाठी बडीशेप पूडचं पाणी करून केसांवर लावा. यामुळे केसगळतीची समस्या कमी होते.
पचनक्रियेसाठी उत्तम
जेवणानंतर बडीशेप खाल्ली तर पचन चांगले होते.काळे मीठ, जीरे, बडीशेप एकत्र चूर्ण करून कोमट पाण्यात घ्यावे.
पचनक्रियेसाठी उत्तम चूर्ण आहे. उलटीचा त्रास होत असल्यास बडीशेप खावी. तात्काळ आराम मिळतो.
चेहरा चमकदार बनवते
बडीशेप नियमितपणे सेवन केल्याने आपल्या शरीरास झिंक, कॅल्शियम आणि सेलेनियमसारखे खनिजे मिळतात जे शरीरात हार्मोन्स आणि ऑक्सिजनचा पुरवठा संतुलित राखण्यास मदत करतात. त्याचा कूलिंग इफेक्ट चेहऱ्यावरही चमक आणतो.
यामध्ये अँटी- इन्फ्लेमेटरी, अँटी-मायक्रोबिअल आणि अँटी-एलर्जिक गुणधर्म आहेत. ज्यामुळे आपली त्वचा सुंदर आणि निरोगी राहण्यास मदत मिळते.
लक्ष द्या –
या लेखात दिलेल्या माहितीवर, आम्ही दावा करीत नाही की ही पूर्णपणे सत्य आणि अचूक आहेत आणि त्यांचे अवलंब केल्याने अपेक्षित निकाल मिळेल. त्यांचा अवलंब करण्यापूर्वी, कृपया संबंधित क्षेत्राच्या तज्ञांचा सल्ला घ्या.
हे पण वाचा : Kalonji Meaning In Marathi