बीरेंद्र लकरा : आदिवासी कुटुंबातील स्टार हॉकिपटू | Birendra Lakra Information In Marathi

आज आम्ही आपल्याला बीरेंद्र लकरा बद्दल माहीत,Birendra lakra Information In Marathi सांगत आहोत. ज्याने बरेच अडचणी असूनही हॉकीमध्ये आपले मानाचे स्थान मिळवले आहे.

रांची झारखंडने अनेक स्टार खेळाडू भारताला दिले आहेत. मग ते क्रिकेट असो किंवा हॉकी किंवा तिरंदाजी. झारखंडच्या खेळाडूंनी खेळाच्या प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटविला आहे. यातील काही खेळाडू इतके प्रसिद्ध होते की त्यांनी झारखंडला एक नवीन ओळख दिली. यातील काही खेळाडू असेही आहेत ज्यांना फारशी ओळख मिळाली नाही. या खेळाडूंपैकी एक झारखंडचा हॉकीपटू बीरेंद्र लकरा आहे.बीरेंद्रचा मोठा भाऊ बिमल हा हॉकीपटूही आहे आणि धाकटी बहीण असुंता लाक्रा देखील हॉकीपटू आहे.

Birendra lakra Information In Marathi

Birendra lakra Information In Marathi

झारखंडच्या सिमडेगा येथे जन्मलेल्या बीरेंद्र लकरा हा आदिवासी कुटुंबातील आहे.त्यांचा जन्म ३ फेब्रुवारी १९९० रोजी झाला. लहानपणापासून बीरेंद्र आपल्या भावाला हॉकी खेळताना पहायचे. हे पाहत असतानाच त्यांना हॉकि खेळण्यात रस निर्माण झाला .सुर्वतीचा काही काळ त्यांनी घरीच सराव केलं . पुढे त्यांनी सेल हॉकी एकेडमी मध्ये प्रवेश घेतला आणि उत्तम सराव सुरू झाला.यानंतर, त्यांनी व्यावसायिक हॉकीमध्ये खेळण्यास सुरुवात केली . २००७ मध्ये ज्युनियर हॉकी संघासह ते सिंगापूर दौर्‍यावर गेले होते. ऑलिम्पिक पात्रतेच्या अंतिम सामन्यात त्यांनी फ्रान्सविरुद्ध आपल्या कारकिर्दीतील पहिला गोल केला होता.

बिरेंद्रचा भाऊ बिमल हा मिडफिल्डर म्हणून भारतीय हॉकी संघात होता, तर बहिण असुंता लाक्रा भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार होती.बिरेंद्रचा भाऊ बिमल हा कुटुंबातील पहिला सदस्य होता ज्याची निवड भारतीय हॉकी संघात करण्यात आली होती.असुंता लाक्रा आतापर्यंत हॉकीशी संबंधित या कुटुंबातील शेवटची सदस्य आहे. सहा भावंबहिणीच्या या कुटुंबातील इतरही सदस्य हॉकीचा सराव करतात.असुंता खेळातून निवृत्त झाली असून हॉकि खेळाच्या विकासासाठी सामाजिक काम करते.

बिरेंद्र सध्या हॉकी इंडिया लीगमध्ये रांची रायनोज कडून खेळत आहे. रांची रायनोज हा संघ नुकताच हॉकी इंडिया लीगमध्ये सामील झाला आहे. या संघाच्या मालकांमध्ये भारताचा स्टार क्रिकेटर महेंद्रसिंग धोनीचेही नाव आह.

हे पण वाचा : Share Market In Marathi

प्रतिक्रिया द्या