ब्लॅक फंगस लक्षणे आणि उपाय | Mucormycosis Symptoms In Marathi

Black Fungus Infection In Marathi : देशात गेल्या तीन-चार दिवसात कोरोना रुग्णांच्या संख्येत काहीशी घट झाल्याचं पाहायला मिळत असलं तरी रुग्णवाढ आणि मृत्यूचं प्रमाण चिंताजनक आहे.

करोना विषाणूनं बाधित होऊन बऱ्या झालेल्या रुग्णांमध्ये त्यानंतरही हृदय, फुफ्फुसं, मूत्रपिंडं, मेंदू अशा महत्त्वाच्या अवयवांच्या कार्याशी निगडीत अनेक शारीरिक व्याधी उद्भवत असल्याचं लक्षात आलं आहे. त्यातच म्युकरमायकोसिस अर्थात काळी बुरशी या आजाराने देशासह राज्यात शिरकाव केलाय.

आजपर्यंत तसा दुर्मिळ असा हा विकार सर्वसामान्य जनतेला परिचित नसल्यानं त्याबाबत एक सर्वव्यापी उत्सुकता आणि अकारण भय निर्माण झालं आहे.राज्यात सध्या म्युकरमायकोसिसचे १ हजार ५०० पेक्षा जास्त रुग्ण असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयानेदेखील या आजाराबाबत चिंता व्यक्त केल्या आहेत.

अनिर्बंधपणे अज्ञान आणि भय पसरवणाऱ्या सोशल मीडियामध्ये हा (Mucormycosis information in marathi) एक नवा आजार सुरू झाला असल्याचं सांगितलं जात आहे, त्यामुळे याबाबत काही मूलभूत शास्त्रीय माहिती जाणून घेणं आवश्यक ठरतं. दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयानेदेखील या आजाराबाबत चिंता व्यक्त केल्या आहेत. तसेच या आजारापासून संरक्षण व्हावं, यासाठी काही उपायदेखील सुचवले आहेत.

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी काळ्या बुरशीची लक्षणे लवकर ओळखून त्यापासून स्वतःचं संरक्षण करा, असा सल्ला नागरिकांना दिला आहे. हर्षवर्धन यांनी आपल्या ट्विटर हँडलवरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, जागरूकता आणि सुरुवातीलाच लक्षणे ओळखून काळ्या बुरशीचा धोका टाळता येतो.

Black Fungus infection In Marathi
Black Fungus infection In Marathi

म्युकरमायकोसिस किंवा काळी बुरशी हा काय प्रकार आहे |Black Fungus Infection In Marathi | Mucormycosis in marathi

जगाच्या पाठीवर डोळ्यांनी न दिसणारे अनेक प्रकारचे सूक्ष्म जंतू असतात. विषाणू (व्हायरस), जिवाणू (बॅक्टेरिया) यांच्या प्रमाणेच बुरशी (फंगस/ मोल्ड्स) हेही सूक्ष्म जीवजंतूंमध्ये येतात. विषाणू आणि जिवाणूंप्रमाणेच बुरशीच्याही असंख्य जाती आणि प्रजाती असतात. ‘म्युकॉरमायकोसिस’ हा बुरशीजन्य गंभीर आजार असून, ‘म्युकॉरमायसेटीस’ या गटातल्या बुरशीजन्य सूक्ष्मजंतूंमुळे होतो.हा संसर्ग सामान्यत: नाकातून सुरू होतो. जे हळूहळू डोळ्यांपर्यंत पसरतो. म्हणूनच, संक्रमण होताच त्यावर उपचार करणे फार महत्वाचे आहे.

कुणाला होतो हा म्युकॉरमायकोसिस ? | काळ्या बुरशीचा सर्वाधिक धोका कोणाला ?

सध्या जे रुग्ण दिसून येत आहेत, त्यात आधीपासून मधुमेह असलेल्या करोनाबाधित व्यक्तींना त्यांच्या आजाराच्या गांभीर्यावर मात करण्यासाठी उपचारादरम्यान स्टीरॉइड्सचा वापर मोठ्या प्रमाणात केला गेला असेल, तर काही रुग्णात ‘म्युकॉरमायकोसिस’ (Black Fungus Infection In Marathi) उद्भवत असल्याचं दिसून येतं.मात्र, प्रत्येक करोनाबाधित व्यक्तीला हा होत नाही; तसंच प्रत्येक करोनाबाधित मधुमेही व्यक्तींना स्टीरॉइड्स दिलेले असले, तरी होत नाही.कोणत्याही कारणानं ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी झाली आहे, अशा व्यक्तींना हा बुरशीजन्य जंतूंचा संसर्ग होतो. अनियंत्रित मधुमेह, स्टिरॉइड्समुळे प्रतिकारशक्ती कमकुवत होणे, दीर्घकाळ आयसीयू किंवा हॉस्पिटलमध्ये अडमिट राहणे, इतर कोणताही रोग, पोस्ट प्रत्यारोपण (ऑर्गेन ट्रान्सप्लांट) किंवा कर्करोग झाल्यास काळ्या बुरशीचा धोका वाढू शकतो.

म्युकरमायकोसिस किंवा काळ्या बुरशीचे लक्षणे | Mucormycosis symptoms in marathi

Symptoms Of Black Fungus : काळ्या बुरशीमध्ये बर्‍याच प्रकारची लक्षणे दिसतात.तसं पाहता ‘म्युकॉरमायकोसिस’चे सहा प्रकार आहेत. नाकामधून मेंदूकडे जाणारा, ‘ऱ्हायनोसेरेब्रल’ हा प्रकार सर्वांत जास्त आढळतो. सध्या याच प्रकारातले रुग्ण जास्त आहेत.यात दिसून येणारी काही प्रमुख लक्षणे (Mucormycosis symptoms in marathi) खालील प्रमाणे

  • चेहऱ्याच्या एका बाजूला, गालांच्या हाडांवर सूज येणे
  • डोळे लाल होणं किंवा डोळे आणि आसपास वेदना होणे
  • डोकं कमालीचं दुखणे
  • ताप व खोकला येऊ लागणे
  • नाक चोंदल्यासारखं वाटून नाकानं श्वास घ्यायला त्रास होणे
  • उलट्या होणे आणि त्यावाटे रक्त पडणं
  • मानसिक स्थितीत बदल होणे

म्युकरमायकोसिस किंवा काळ्या बुरशीचा कसा होतो संसर्ग | Mucormycosis transmission in marathi

. हॉस्पिटलमधून – करोनाचा रुग्ण इस्पितळात दाखल झाल्यावर त्याला ऑक्सिजन लावला जातो. सिलिंडरमधून येणारा ऑक्सिजन हा अतिशय कोरडा असतो, तो फुफ्फुसांना आणि श्वासमार्गाच्या आत असलेल्या पातळ अस्तराला इजा पोहोचवू शकतो. त्यामुळे तो एका पाण्याने भरलेल्या नळीतून बुडबुड्याच्या स्वरूपात आर्द्र केला जातो. या पाण्याच्या नळीला ‘ह्युमिडीफायर’ म्हणतात. यात खरं तर जंतुविरहित असलेले ‘डिस्टील्ड वॉटर’ भरणं आवश्यक असतं; पण क्वचित काही ठिकाणी कामाच्या दबडघ्यात कर्मचाऱ्यांकडून त्यात नळाचं साधं पाणी भरलं जात असावं आणि ते पाणी वरचेवर बदललं जात नसावं; त्यामुळे त्यातून बुरशीजन्य जंतू रुग्णाच्या नाकात प्रविष्ट होत असावेत, असा तज्ज्ञांचा कयास आहे.

हॉस्पिटलमधील एअरकंडीशनर्सचे डक्ट्स वेळोवेळी स्वच्छ आणि निर्जंतुक न केल्यास त्यातूनही ‘म्युकॉरमायकोसिस’च्या जंतूंचा प्रादुर्भाव होत असावा असाही अंदाज आहे. मात्र, कोव्हिडच्या काळातही रुग्णालयातील, त्यातील आयसीयूमधील निर्जंतुकतेबाबत असलेली मार्गदर्शक तत्त्वं सर्व रुग्णालयं कटाक्षानं पाळत असल्यानं हा संसर्ग या पद्धतीने क्वचितच होत असावा.

. रुग्णांच्या घरातून – करोनाचा रूग्ण इस्पितळातून घरी आणल्यावर त्याला घरातील एसी, पडदे, गालिचे किंवा दमट भिंतीमधूनही हा प्रादूर्भाव होऊ शकतो.

म्युकरमायकोसिस किंवा काळी बुरशी उपचार पद्धत | Mucormycosis treatment in marathi

करोनापश्चात रुग्णाची लक्षणं पाहूनच डॉक्टरांना या आजाराची कल्पना येते. त्यानंतर त्याच्या रक्ताच्या तपासण्या, आजार असलेल्या भागाचे सिटीस्कॅन/ एमआरआय केले जातात. ‘म्युकॉरमायकोसिस’मुळे नाकात निर्माण होणाऱ्या द्रावाची किंवा राखाडी रंगाच्या पापुद्र्याची शक्य असल्यास सूक्ष्मदर्शकाखाली तपासण्या (Mucormycosis treatment in marathi) केल्या जातात आणि निदान पक्कं केलं जातं. रुग्णाला अ‍ॅम्फोटेरीसिन-बी हे इंजेक्शन शिरेतून दिलं जातं.

स्कॅनवरील निदानाप्रमाणे या आजारानं व्याप्त असलेल्या नाकाच्या हाडांची, सायनसेसची आणि डोळ्याची शस्त्रक्रिया करून अंतर्गत भागात निर्माण झालेली बुरशी साफ केली जाते. आजार जास्त पसरलेला असल्यास आणि हाडांमध्ये गेला असल्यास ती हाडं शस्त्रक्रियेदरम्यान काढून टाकली जातात. डोळ्याच्या बाबतीतही आजार डोळ्यामध्ये पसरला आहे असे दिसल्यास डोळाही खोबणीतून काढला जातो. या रुग्णावर नाक-कान-घशाच्या आणि डोळ्याच्या विशेषज्ञ डॉक्टरांची टीम शस्त्रक्रिया आणि उपचार करते.

बहुतेकदा एकापेक्षा जास्तवेळा शस्त्रक्रिया करावी लागते. जर रुग्णाला उपचारासाठी वेळेवर रुग्णालयात न आणल्यास हा आजार वाढून मेंदूमध्ये तसेच शरीरात अन्यत्र पसरू शकतो. कोणताही आजार काही पाऊलखुणा सोडून जात असतो. तशा पद्धतीचाच हा आजार आहे. एकूण बाधित व्यक्तींच्या प्रमाणाकडे पाहिल्यास त्याचं प्रमाण अत्यल्प आहे.

म्युकरमायकोसिस किंवा काळी बुरशी पासून बचाव कसा करायचा | Mucormycosis Precautions in marathi

काळ्या बुरशीपासून बचाव (Mucormycosis precautions in marathi) करण्यासाठी धुळीच्या ठिकाणी मास्क घाला. माती किंवा खत यांसारख्या गोष्टींच्या संपर्कात येत असाल तर शूज, ग्लोव्हज, फुल स्लीव्ह शर्ट आणि ट्राऊझर घाला. स्वच्छतेची विशेष काळजी घ्या. मधुमेहावर नियंत्रण मिळवा, इम्यूनोमोड्युलेटिंग औषधे किंवा स्टिरॉइड्सचा वापर टाळा.तसेच कोरोनातून बरे झाल्यानंतर रक्तातील ग्लुकोजच्या पातळीवर लक्ष ठेवा.

केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच स्टिरॉइड्स वापरा. ऑक्सिजन थेरपीच्या वेळी, ह्यूमिडिटीफायरसाठी फक्त स्वच्छ पाणी वापरा. आवश्यकतेनुसार अँटीबायोटिक्स किंवा अँटीफंगल औषधे वापरली पाहिजेत.

महाराष्ट्राव्यतिरिक्त इतर राज्यातही म्युकरमायकोसिसची प्रकरणे आढळून येत आहेत. सध्या गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाणा, छत्तीसगड, झारखंड आणि राजस्थानमध्ये काळ्या बुरशीचे प्रकार दिसून आले आहेत. यामुळे रुग्णाच्या डोळ्याला, नाकातील हाडांना आणि जबड्यालाही मोठ्या प्रमाणात हानी पोहोचू शकते. त्यामुळेच वेळेवर उपचार करणे महत्वाचे आहे.

FAQ‘s

म्युकरमायकोसिस किंवा काळी बुरशीचे रोग कधीपासून सुरू झाला ?

कोरोना विषाणूच्या दुसर्‍या लाटेत या रोगाचा प्रारंभ झाला.

ब्लॅक फंगस रोगाच्या संक्रमित रूग्णांना कशाचा धोका असतो ?

डोळे गमावण्याचा आणि मृत्यू होण्याचा देखील धोका असतो.

काळी बुरशीजन्य आजार केवळ कोरोना संक्रमित रूग्णांना होत आहे ?

दोन्ही कोरोना-संक्रमित रुग्ण आणि जे त्यातून बरे झाले आहेत त्यांना होताना दिसत आहे.

काळी बुरशीजन्य रोग जीवघेणा आहे का ?

होय, हा आजार अत्यंत प्राणघातक असून देशात संक्रमणाची संख्या हळूहळू वाढत आहे.

काळ्या बुरशीच्या आजारावर उपचार काय आहेत ?

जागरूकता आणि सुरुवातीलाच लक्षणे ओळखून काळ्या बुरशीचा धोका टाळता येतो.

हे पण वाचा – Benefits Of Badishep In Marathi

2 thoughts on “ब्लॅक फंगस लक्षणे आणि उपाय | Mucormycosis Symptoms In Marathi”

  1. माझा डोळा लाल झाला आहे आणि डोके 3 दिवसांपासून दुखत आहे तर मला डॉक्टरन कडे जावे लागेल का?

    उत्तर

प्रतिक्रिया द्या