Chia seeds in marathi : चिया सीड्स म्हणजे नक्की काय? चिया सीडचा आपल्या आरोग्याला कसा फायदा होतो? चिया बियांचे फायदे काय आहेत? ह्या प्रश्नांची उत्तरे आज आपण जाणून घेणार आहोत.
चिया बिया हे लहान काळे किंवा तपकिरी रंगाचा बिया असतात जे तीळासारखे दिसतात. ते साल्विया हिस्पॅनिका (Salvia hispanica) नावाच्या वनस्पतीपासून निर्माण होतात, ज्याची लागवड प्राचीन काळापासून परदेशात केली जात आहे.
चिया बियाणे मध्ये Omega 3 fatty acids, fiber, protein, calcium, लोह, जस्त, तांबे, manganese, magnesium, phosphorous, potassium, sodium, vitamin B, thiamine, riboflavin, niacin आणि folate असते.
या छोट्या बियाण्यांमध्ये मोठ मोठे आजार बरे करण्याची क्षमता आहे.चिया बियाण्यांना उर्जेचा भंडार देखील म्हणतात. त्याला कारण म्हणजे यात आढळणारी अमाप ऊर्जा.
चिया बियाणे म्हणजे काय | Chia Seeds In Marathi
चिया बियाणे (Chia Seeds in marathi) हे इतर खाद्य बियाणे प्रमाणेच असतात. त्यांचात असलेल्या पोषक व औषधी तत्वानमुळे खाण्यात त्यांचा वापर करण्यात येतो.
भारतात अनेक प्रकारचे औषधी बियाणे आढळतात.म्हणूनच चिया बियाणे हे देखील भारतीय बियाणे आहे,अशी मान्यता आहे.तर असे नाही.खरंतर भारत चिया बियाणे हे परदेशातून आयात करतो.
आज चिया बियाण्यांचा उपयोग हा बहुतेक वेळा आरोग्य संबंधित समस्या दूर करण्यासाठी केलं जातो. संशोधकांनी देखील मान्य केले आहे की चिया बियाण्यांमध्ये अशी बरीच पोषक तत्व आहेत,जी बर्याच गंभीर आजारांशी लढू शकतात.
चिया बिया कशा दिसतात | Chia Seeds Meaning In Marathi
चिया बियांचा आकार हा खूप बारीक असतो. ते दिसायला खूप सुंदर दिसतात. चिया बियाण्यांचा रंग हा पांढरा ,तपकिरी किंवा काळा असतो.
पाणी शोषण्याची मुख्य क्षमता चिया बियाण्यांमध्ये आढळते. चिया बियाण्यां कीड लागत नाही. याचे कारण म्हणजे त्यांना काहीच चव नसते.Chai Seeds Meaning In Marthi आपल्याला समजला असेल.
चिया बियाण्यांबद्दल गैरसमज

चिया बियाणे आणि तुळशीचे बियाणे हे साधारण एक सारखेच दिसतात.त्यामुळे बरीच लोकं चिया बियाण्यां,तुळशीच बियाणे मानतात.मात्र असे नाही,ते दोन्ही वेग वेगळे बियाणे आहेत.
भारतातील बऱ्याच राज्यात चिया बियाणे हे सबजा, तुकमलंग आणि तकमारिया या नावाने देखील ओळखले जातात.परंतु हे देखील बरोबर नाही.सबजा, तुकमलंग आणि तकमारिया हे तुळशीच्या बियांचे नावे आहेत.
इंग्रजी मधे त्यांना Basil seeds असे म्हणतात. तुळशीचे बियाणे हे Lamiaceae या प्रजातीचे बियाणे आहे. त्याचे वैज्ञानिक नाव Ocimum Basilicum असे आहे.
चिया बियाणे (chia seeds marathi name) हे दुसऱ्या प्रजातीचे बियाणे आहेत.
चिया बियाण्याचे वैज्ञानिक नाव काय आहे | Chia Seeds Scientific Name
चिया बियाण्याचे वैज्ञानिक नाव साल्व्हिया हिस्पॅनिका (Salvia hispanica) आहे.
ज्या झाडापासून हे बियाणे घेतले जातात. त्याचे नाव देखील साल्विया हिस्पॅनिका आहे .
चिया बियाणे हे मेक्सिकन चिया आणि सब्जा चिया म्हणून देखील ओळखले जातात.चिया बियाणे हे मूळत: पुदीना प्रजातीचे बियाणे आहे.
चिया बियाणे लागवड
बहुतेक चिया बियाणे(chia seeds in marathi) हे अमेरिकेत उत्पादित केली जातात. म्हणून त्यांचे मूळ हे अमेरिकन मानले जाते.
चिया बियाण्यांच्या रोपाची प्रथम उत्पत्ती ही मेक्सिको आणि ग्वाटेमाला येथे झाली असे म्हणतात.संशोधकांचे ही असे म्हणणे आहे की चिया बियाण्यांची पहिली लागवड ही मेक्सिको आणि ग्वाटेमाला मध्येच केली असणार.
चिया बियाण्यांची पहिली लागवड ही अॅझटेक लोकांनी केली होती. सध्या अमेरिका, मेक्सिको, ऑस्ट्रेलिया इत्यादी देशात चिया बियाण्यांचे उत्पादन होत आहे.आपला भारत देश चिया बियाणे मेक्सिको मधून आयात करतो.
चिया बियाण्यांचे पौष्टिक गुण | Chia Seeds Nutrition In Marathi
वेगवेगळ्या लोकांच्या शरीरात वेगवेगळ्या गोष्टींचा अभाव असतो.म्हणून वेगवेगळ्या लोकांची पौष्टिक तत्त्वांची आवश्यकता ही वेगळी असते.
कोणत्याही गोष्टीचे सेवन करण्याआधी त्यामध्ये असलेले पोषक तत्व जाणून घेणे आवश्यक आहे. तर चिया बियांमद्धे कोणते पौष्टिक गुण आहेत. ते जाणून घेऊयात.
चिया बियाण्यांमधे (chia seeds in marathi) सर्वाधिक ओमेगा ३ फॅटी अॅसिड असतं. या शिवाय चिया बियाण्यांमधे पोटॅशियम, फायबर, कार्बोहायड्रेट, प्रोटीन , जस्त, तांबे, ओमेगा ६ , फॅट, सोडियम, फॉस्फरस,कॅल्शियम, मॅंगनीज इत्यादी पोषक तत्व मुबलक प्रमाणात आढळतात.
या सह यात अँटीसेप्टिक, अँटीफंगल आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म देखील असतात.या वरुण स्पष्ट होते की चिया बियांचे सेवन केल्याने शरीराला बरेच फायदे chia seeds benefits in marathi मिळतात.
चिया बियाणे 100 ग्रॅम मध्ये असलेले पोषक तत्व
पोषक तत्व | प्रमाण |
---|---|
कॅलरीज (Calories) | ४८६ |
पाणी (Water) | ६ % |
प्रथिने (Protein) | 16.५ ग्राम्स |
कार्ब्स (Carbs) | ४२.१ ग्राम्स |
साखर (Sugar) | ० ग्राम |
फायबर (Fiber) | ३४.४ ग्राम्स |
फॅट (Fat) | ३०.७ ग्राम्स |
संतृप्त फॅट (Saturated Fat) | ३.३३ ग्राम्स |
मोनोअनसॅच्युरेटेड फॅट (Monounsaturated Fat) | २.३१ ग्राम्स |
बहुअसंतृप्त फॅट (Polyunsaturated Fat) | २३.६७ ग्राम्स |
ओमेगा -३ फॅटी अॅसिड (Omega-3 Fatty Acid) | १७.८३ ग्राम्स |
ओमेगा -६ फॅटी अॅसिड (Omega-6 Fatty Acid) | ५.८४ ग्राम्स |
ट्रान्स फॅट (Trans Fat) | ०.१४ ग्राम्स |
चिया बियाण्याचे फायदे | Chia Seeds Benefits In Marathi
आपण मूर्ती लहान ,पण कीर्ती महान ही म्हण नक्कीच ऐकली असेल.ही म्हण चिया बियाण्यां एकदम शोबते.चिया बिया हे दिसायला जारी बारीक असले,तरी त्यांचे फायदे chia seeds benefits हे खूप मोठे आहेत.
चला तर मग जाणून घेऊया चिया बियाण्यांच्या फायद्यांविषयी.Chia seeds benefits in marathi
पचन प्रक्रिया | Chia Seeds Benefits
शरीर निरोगी राहण्यासाठी पचन प्रक्रिया ही सुरळीत राहणे महत्वाचे असते.जर आपली पचन प्रक्रिया ही सुरळीत नसेल तर आपले शरीर हे बऱ्याच रोगांना बळी पडू शकते. म्हणून सुरळीत पचन प्रक्रिया असणे महत्वाचे आहे.
चिया बियाण्यांमधे फायबरची मात्रा भरपूर असते, ज्यामुळे पचन प्रक्रिया सुरळीत सुरू राहते.म्हणून सुरळीत पचन प्रक्रिया साठी चिया बियाण्यांचा समावेश आपण आपल्या आहारात केला पाहिजे.
वजन कमी करण्यास उपयुक्त | Chia Seeds For Weight Loss In Marathi
सध्याच्या काळात लठ्ठपणा ही मूलभूत समस्या बनली आहे, तीनपैकी जवळजवळ दोन लोक लठ्ठपणाच्या समस्येने त्रस्त आहेत. जर वेळेवर लठ्ठपणा नियंत्रित केला नाही तर तो गंभीर आजारांना जन्म देतो.
हेच कारण आहे की बहुतेक लोक लठ्ठपणाबद्दल चिंता करतात आणि तणावग्रस्त असतात.लोक लठ्ठपणा कमी करण्यासाठी सर्व शक्य प्रयत्न करतात परंतु तरीही त्यांचे वजन कमी होत नाही.
वजन कमी करण्यासाठी योग्य आहाराचे सेवन करणे देखील आवश्यक आहे.जर आपण वजन कमी करत असाल आणि योग्य आहार घेत नाही तर आपले वजन कधीही कमी होणार नाही.
चिया बियाणे (Chia seeds in marathi) पौष्टिक गुणधर्मांनी परिपूर्ण आहेत. त्यामध्ये फायबर मुबलक प्रमाणात आढळते.
फायबर एक असा घटक आहे जो वजन कमी करण्यास तसेच वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करतो. जर आपल्याला वजन कमी करायचे असेल तर आपल्या आहारात नक्कीच चिया बियाणे समाविष्ट करा.
हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर
जर आपल्याला हृदयाशी संबंधित कोणताही आजार असेल तर तो शरीरासाठी अत्यंत घातक सिद्ध होतो.कधीकधी हृदयाशी संबंधित आजार एखाद्या व्यक्तीचे मृत्यूचे कारण बनतो.म्हणून हृदय निरोगी ठेवणे फार महत्वाचे आहे.
आपल्याला हृदयाशी संबंधित कोणताही आजार असल्यास किंवा आपण आपले हृदय निरोगी ठेवू इच्छित असल्यास, आजपासून चिया बिया आपल्या आहारात समाविष्ट करा.
चिया बियामध्ये फायबर, ओमेगा ३ , अँटीऑक्सिडेंट गुणधर्म असतात ज्यामुळे केवळ हृदय निरोगीच होत नाही तर हृदयविकाराच्या धोक्यापासून संरक्षण मिळते.
हृदयाच्या चांगल्या आरोग्यासाठी Grapefruit In Marathi चे सेवन देखील उपयोगी ठरते.
हाडांच्या आणि दांतानच्या आरोग्यासाठी
हाडांची आणि दातांची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. आजकाल बहुतेक लोक बाहेर मिळणाऱ्या खाद्यपदार्थांना प्राधान्य देतात.
आजच्या धावपळीच्या काळात लोकांना घरी जेवण बनवण्यासाठी वेळ मिळत नाही, म्हणून ते बाजारात उपलब्ध असलेले खाद्यपदार्थ सेवन करतात.आपण जे जेवतो त्यात आवश्यक पोषक तत्व असणे गरजेचे असते.
बाहेरील खाद्यपदार्थांमध्ये आवश्यक पोषक नसते.हाडे आणि दात मजबूत ठेवण्यासाठी कॅल्शियमबरोबरच इतरही अनेक पौष्टिक आवश्यक असतात.
चिया बियाण्यांमध्ये दुधापेक्षा कॅल्शियम जास्त प्रमाणात आढळते. म्हणून त्याचे (chia seeds in marathi) सेवन केल्याने हाडे आणि दात मजबूत होतात.
मधुमेह वर फायदेशीर
आजच्या काळात मधुमेह (डायबेटीज) हा एक सामान्य रोग झाला आहे. हा असा आजार आहे ज्याचा संपूर्ण उपचार शक्य नाही. परंतु एखादी व्यक्ती आपल्या आहारामध्ये बदल करून मधुमेह वर नियंत्रण ठेवू शकते.
यासाठी, चिया बियाणे आहारात समाविष्ट केले जाऊ शकते.चिया बियाणे मधुमेहामध्ये रक्तदाब सुधारतो.
त्यामध्ये आढळणारे ओमेगा ३ फॅटी अॅसिड साखरेची पातळी सामान्य करतात, ज्यामुळे मधुमेहाची समस्या बर्याच प्रमाणात नियंत्रित होते.
त्वचा सुंदर बनवा
त्वचा सुंदर असणे ही प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते. म्हणूनच त्वचा सुंदर बनविण्यासाठी, लोक पार्लरमध्ये जातात.अनेक प्रकारचे उपचार घेतात.
विविध घरगुती उपचारांचा अवलंब देखील करतात. पण तरीही त्वचा चमकत नाही. चिया बियाणे त्वचेला ओलावा प्रदान करतात तसेच त्वचेला अनेक आजारांपासून संरक्षण देतात.
चिया बियाणे त्वचेला निरोगी बनवते.चिया बियामध्ये अँटीऑक्सिडेंट असतात ज्याचमुळे बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध लागतो.
चिया बियामध्ये अँटीफंगल गुणधर्म आहेत जे त्वचा बर्याच काळासाठी निरोगी आणि सुंदर बनविण्यास मदत करतात. यामुळे त्वचेला चमक येते.(chia seeds meaning in marathi)
कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत होते
कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे शरीरात अनेक गंभीर आजार होण्याचा धोका असतो. एखाद्या व्यक्तीमध्ये कोलेस्टेरॉलची पातळी वाढत गेली तर त्याला हृदयविकाराचा झटका, हृदयाशी संबंधित आजार, थकवा, मूत्रपिंडाशी संबंधित आजार, अर्धांगवायूसारखे अनेक आजार होऊ शकतात.
म्हणून, शरीरात कोलेस्टेरॉल संतुलित ठेवणे खूप महत्वाचे आहे.कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी चिया बियाणे अत्यंत फायदेशीर आहे.
चिया बियामध्ये ओमेगा ३ फॅटी अॅसिड असतात, ज्यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होतो आणि हृदय निरोगी होते. कोलेस्टेरॉल नियंत्रित करण्यासाठी चिया बियाणे वापरण्याबरोबरच तेलकट पदार्थांचे सेवन करणे पण थांबवावे.कारण कोलेस्ट्रॉल तेलकट पदार्थांमुळे वाढतो.
रोगप्रतिकार शक्ती वाढते
जेव्हा एखाद्या व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असते, तेव्हा त्या व्यक्तीस कोणत्याही आजार किंवा कोणत्याही हवामानाचा परिणाम इतर कोणत्याही व्यक्तीपेक्षा लवकर होतो.
जेव्हा एखादा रोग पसरतो, तेव्हा कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेले लोक घाबरू लागतात कारण त्यांना हा आजार होण्याची भीती वाटते.
चीय बियाणे (Chia seeds in marathi) रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यात मोठा हातभार लावतात कारण चिया बियामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि फायबरचे गुणधर्म आढळतात.
फायबर पाचन तंत्र मजबूत करते, जेणेकरून आपल्या शरीराला आपण जे काही खातो त्याचे योग्य पोषण मिळते.अँटीऑक्सिडंट्स शरीर निरोगी ठेवतात, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.
झोप सुधारण्यास मदत होते
आजच्या व्यस्त जीवनात प्रत्येक माणूस अनेक प्रकारच्या तणावांशी झगडत आहे. काहीजण नोकरीची चिंता करतात, काही शिक्षणासाठी, काही ऑफिससाठी आणि काही लग्नासाठी.
या चिंतेमुळे, जेव्हा त्यांना संपूर्ण रात्री झोप येत नाही, तेव्हा ते झोपेची औषध घेऊ लागतात जे अत्यंत हानिकारक आहे. चिया बियाणे हा एक घरगुती उपाय आहे ज्याचा उपयोग विविध समस्या सोडविण्यासाठी केला जातो.
चिया बियाण्यामध्ये ट्रायटोफन नावाचा घटक आढळतो, जो झोपेची समस्या दूर करण्यास उपयुक्त आहे.
चिया बियांचे सेवन कसे करावे | How to Eat Chia Seeds In Marathi
जेव्हा कोणतीही वस्तू योग्य मार्गाने सेवन केली जाते, तरच त्याचा फायदा होतो. म्हणूनच छोट्या पण उर्जायुक्त समृद्ध चिया बियाण्यांबद्दल बरीच माहिती दिल्यानंतर आता या बियांचे सेवन कसे करावे ते जाणून घेऊयात.
- चिया बियाणे ओट्स (oats) मधे किंवा फ्रूट सलाड मधे मिसळून सकाळी नाशट्याला खाऊ शकतो.
- चिया बियांची पाऊडर बनवा. एक चमचा पावडर कोमट दूध किंवा पाण्यात टाकून खाऊ शकतो.
- एक चमचा चिया बियाणे दही किंवा सूपमध्ये मिसळून जेवताना खाऊ शकतो.
- चिया बियाणे खाण्यापूर्वी तीन ते चार तास पाण्यात भिजवा. भिजल्या नंतर बियाणे चिकट जेल सारखे होतील.आपण या जेलला शेक, दुध किंवा ज्यूस मध्ये मिसळून ह्याचे सेवन करू शकतो.
- उपमा, पोहा किंवा इडली बनवताना त्यात थोडे चिया बियाणे घाला आणि सकाळी नाशट्यासाठी खा.
चिया बियाण्यांचे तोटे | Chia Seeds In Marathi Side Effects
जर एखाद्या गोष्टीचे फायदे असतील तर त्याचे काही तोटे देखील असतात. म्हणून, कोणतीही वस्तू वापरण्यापूर्वी त्याबद्दल संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे.
आम्ही आपल्याला चिया बियाण्यांचे काही फायद्यांविषयी सांगितले आहे.तर आता आपण चिया बियाण्यांचे (chia seeds in marathi) काही तोटे याबद्दल देखील माहिती जाणून घेऊयात.
- प्रोस्टेट कर्करोगाने ग्रस्त असलेल्या रुग्णांनी चिया बियाण्यांचे सेवन करू नये.
- चिया बियाण्यांचा अति प्रमाणात सेवन केल्यास एलर्जि , उलट्या, अतिसार, खाज सुटणे यासारखे आजार उद्भवू शकतात.
- चिया बियाणे योग्य प्रकारे सेवन न झाल्यास,त्याचे बियाणे घशात अडकू शकतात. त्याचामुळे श्वास घेण्यास अडचण येऊ शकते.
- चिया बियाणे जास्त रक्तस्त्राव किंवा शस्त्रक्रिया करताना खाऊ नये.
- जर आपण रक्त पातळ करण्यासाठी औषध घेत असाल तर आपण चिया बियाणे सेवन करू नये.
- गर्भवती महिला आणि इतर आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच चिया बियाणे सेवन करावे.
तात्पर्य – Chia Seeds In Marathi Name
चिया बियांमध्ये अनेक पोषक तत्व असतात, ज्यामुळे ते उत्तम अहराचा एक उत्कृष्ट पर्याय आहे.
आम्हाला आशा आहे की Chia seeds in marathi हा लेख तुम्हाला आवडला असेल.या लेखात chia seeds meaning in marathi आणि चिया बियाणे बद्दल आपल्याला काही शंका असल्यास किंवा त्यामध्ये काही सुधारणा झाली पाहिजे असे आपल्याला वाटत असल्यास, यासाठी आपण आम्हाला ईमेल लिहून सांगू शकता.
आपल्याला हा लेख आवडला असेल किंवा यातून काही नवीन शिकायला मिळाले असेल तर कृपया ही माहिती जास्तीत जास्त इतरांपर्यन्त पोहचवा. फेसबुक,ट्विटर आणि इतर सोशल मीडिया साइट्स वर हे शेअर करा.धन्यवाद !!
चिया बियांबाबत काही प्रश्न (FAQs)
चिया बियाणे हे भारतीय बियाणे नाही.हे बियाणे परदेशात उगम पावले आहे. त्यामुळे या मराठी किंवा इतर भारतीय नाव नाही. त्याला सर्वत्र चिया बियाणे असंच म्हंटले जाते.
चिया बियाणे आणि सबजा हे साधारण एक सारखेच दिसतात.त्यामुळे बरीच लोकं चिया बियाण्यां,सबजा मानतात.मात्र असे नाही,ते दोन्ही वेग वेगळे बियाणे आहेत.
चिया बियानं विषयी सामान्य दुकानात अजून नीट माहिती उपलब्ध नाही. ते सबजा आणि चिया बियाणे एकच समजतात. त्यामुळे चिया बियाणे हे ऑनलाइन घेणेच योग्य.
चिया बियाण मधे नैसर्गिक अँटीऑक्सिडंट्स असतात,त्यामुळे ते सामान्य तापमानात देखील बराच काळ चांगले राहतात. बंद कंटेनरमध्ये चिया बियाणे ठेवल्यास ते उत्तम.
नाही,असे आवश्यक नाही.
टीप : वरील सर्व बाबी मराठी डिजिटल केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून मराठी डिजिटल कोणताही दावा करत नाही.त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
हे पण वाचा : कलौंजी चे फायदे
चिया बियाणांच्या सेवनाने पुरुषत्वात काही फायदे किंवा नुकसान,?
चिया बियाणे मध्ये ओमेगा -3 ,व्हिटॅमिन ई आणि इतर अँटिऑक्सिडंट्स असतात जे शुक्राणूंचे प्रमाण आणि गुणवत्ता सुधारण्यास मदत करतात.कोणत्याही गोष्टीचा अतिवापर हा नुकसानदाई ठरतो.तज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.धन्यवाद.