Directions In Marathi | दिशा व उपदिशा

Directions In Marathi तुम्हाला ह्या दिशा माहीत आहेत का ? नसेल तर एकूण १० दिशा उपदिशा माहीती करून घ्या.

आपल्यापेकी बहुसंख्य लोकांना मुख्य ४ दिशा माहिती आहे.या मुख्य ४ दिशांची इंग्रजी नाव माहिती आहे.

मराठीत दिशांची नावं क्वचित माहीत असतील.या मुळे होतं काय की  जेव्हा कोणी आपल्याला दिशांची नाव मराठीत सांगतो, तेव्हा आपला गोंधळ उडून जातो.

तुमची अशी कधी फजिती होऊ नये. म्हणून आज मी तुम्हाला directions in marathi सांगणार आहे.

या लेखात आपण मुख्य दिशा सोबत इतर सगळ्या उपदिशांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

directions in marathi
Directions in Marathi

मुख्य दिशांची नावे | 4 Direction Names in Marathi

होकायंत्र (compass) दिशा शोधण्याचे यंत्र आहे.होकायंत्राचा उपयोग करून तुम्ही मुख्य चार दिशा शोधू शकता.

इंग्रजीमध्ये या चार दिशांना कार्डिनल डायरेक्शन्स किंवा कार्डिनल पॉइंट्स असे संबोधले जाते.

होकायंत्रावर या ४ दिशा (compass directions in Marathi) E, W, N आणि S या अक्षरांनी दर्शवले जातात.

दिशा आपल्या कोणत्याही जागा,स्थळ,ठिकाण नेमके कुठे आहे? हे सांगत.दिशेची माहिती घेऊन आपण त्या ठिकाणी असलेल्या हवामानाचा अंदाज घेऊ शकतो.म्हणूनच दिशेची अचूक माहिती असणे फायदेशीर ठरते.

चला तर जाणून घेऊयात Direction Names In Marathi And English

Directions Name in EnglishDirections Name in Marathi
North (N)उत्तर
South (S)दक्षिण
East (E)पूर्व
West (W)पश्चिम
4 directions in Marathi

East west north south in marathi

  1. उत्तर दिशा – इंग्रजी मध्ये उत्तर दिशेला नॉर्थ (North) दिशा असे म्हणतात. भारताच्या उत्तर दिशेला हिमालय स्थित आहेत.
  2. दक्षिण दिशा – इंग्रजी मध्ये दक्षिण दिशेला साऊथ (South) दिशा असे म्हणतात. भारताच्या दक्षिणेला कन्याकुमारी स्थित आहे.
  3. पूर्व दिशा – इंग्रजी मध्ये पूर्व दिशेला ईस्ट (East) दिशा असे म्हणतात. भारताच्या पूर्व दिशेला अरुणाचल प्रदेश हे राज्य स्थित आहे.
  4. पश्चिम दिशा – इंग्रजी मध्ये पश्चिम दिशेला वेस्ट (West) दिशा असे म्हणतात. भारताच्या पश्चिम दिशेला आपले महाराष्ट्र राज्य स्थित आहे.

दिशा या नेहमी जमिनीला समांतर असतात.म्हणून नकाशा नेहमी स्थानिक दिशांनुसार जिमनीवर ठेवावा. नंतर त्याचे वाचन केले तर ते अचूक होते.

उपदिशा यांची नावे | 8 Direction Names in Marathi

दिशा व उपिदशा या माणसाने ठरवल्या आहेत. त्यासाठी त्याने निसर्गाची मदत घेतली आहे. सूर्य उगवणे-मावळणे, हा त्यांचा मुख्य आधार आहे.

मुख्य ४ दिशा (direction meaning in marathi) आपण जाणून घेतल्या.या मुख्य दिशा आपल्याला बऱ्याच गोष्टी सांगतात.जसे पृथ्वी आपले परिभ्रमण पूर्व ते पश्चिम करते.सूर्य पूर्वेला उगवतो आणि पश्चिमेला मावळतो.

उत्तर आणि दक्षिण दिशा सुद्धा बरीच माहिती देत असतात.

मुख्य ४ दिशा व्यतिरिक्त अतिरिक्त ४ उपदिशा आहेत.या उपदिशा ऑर्डिनल किंवा इंटरकार्डिनल उपदिशा म्हणून ओळखले जातात.

होकायंत्रावर या ४ उपदिशा NE, NW, SE आणि SW या अक्षरांनी दर्शविले जातात.

Directions Name in EnglishDirections Name in Marathi
North – East (NE)ईशान्य
North – West (NW)वायव्य
South – East (SE)आग्नेय
South – West (SW)नैऋत्य
All 8 directions in Marathi
  1. ईशान्य दिशा – ईशान्य दिशा म्हणजे उत्तर व पूर्व या मुख्य दिशांच्या मध्यभागी ४५ अंशावर असलेली उपदिशा.
  2. वायव्य दिशा – वायव्य दिशा म्हणजे उत्तर व पश्चिम या मुख्य दिशांच्या मध्यभागी ४५ अंशावर असलेली उपदिशा.
  3. आग्नेय दिशा – आग्नेय दिशा म्हणजे दक्षिण व पूर्व या मुख्य दिशांच्या मध्यभागी ४५ अंशावर असलेली उपदिशा.
  4. नैऋत्य दिशा – नैऋत्य दिशा म्हणजे दक्षिण व पश्चिम या मुख्य दिशांच्या मध्यभागी ४५ अंशावर असलेली उपदिशा.

ज्योतिषशास्त्र दिशा नवे | 10 Directions Name In Marathi

आपल्या भारतीय संस्कृति मध्ये ज्योतिष शास्त्राला खूप महत्व आहेत.याच ज्योतिष शास्त्रा प्रमाणे अजून २ दिशा सांगितल्या गेल्या आहेत.

मुख्य दिशा ४, उपदिशा ४ आणि ह्या २ दिशा मिळून आपल्या भारतीय संस्कृतीत एकूण १० दिशा सांगितल्या जातात.

ज्योतिष शास्त्रा प्रमाणे २ दिशा आहेत ऊर्ध्व दिशा आणि अधर दिशा.

  1. ऊर्ध्व दिशा – ऊर्ध्व दिशा म्हणजे वरची दिशा. जिथे आकाश स्थित आहे.
  2. अधर दिशा – अधर दिशा म्हणजे खालची दिशा. जिथे पातळ स्थित आहे.

दिशा ओळखायची कशी? | How To Find Directions In Marathi

पूर्व, पश्‍चिम, उत्तर व दक्षिण या चार मुख्य दिशा आहेत.त्या कशा ओळखायच्या?

  • सूर्य ज्या बाजूने उगवतो, ती पूर्व दिशा. सूर्य ज्या बाजूला मावळतो, ती पश्‍चिम दिशा.
  • पूर्व व पश्‍चिम दिशा एकमेकींच्या समोरासमोर असतात.
  • पूर्व दिशेकडे तोंड करून उभे राहिले,तर पश्‍चिम दिशा आपल्या मागे असते.
  • त्याच वेळेस आपल्या डाव्या बाजूला उत्तर दिशा येते, तर उजव्या बाजूला दक्षिण दिशा येते.

होकायंत्रामधील चुंबकसुई नेहमी उत्तर-दक्षिण दिशा दाखवते.

तात्पर्य – Directions in Marathi

मला आशा आहे की तुम्हाला Directions in Marathi and english हा लेख आवडला असेल. या पुढे तुमचा दिशांबद्दल गोंधळ होणार नाही याची मला खात्री वाटते.

या लेखात आपल्याला काही शंका असल्यास किंवा त्यामध्ये काही सुधारणा झाली पाहिजे असे आपल्याला वाटत असल्यास, यासाठी आपण आम्हाला कमेन्ट किंवा ईमेल लिहून सांगू शकता.

काळजी घ्या.धन्यवाद.

हेही वाचा : Marathi suvichar

Motivational quotes in marathi

Marathi barakhadi

Directions in marathi बद्दल सतत विचारले जाणारे प्रश्न (FAQ’s)

दक्षिण दिशेच्या विरुद्ध दिशेला कोणती दिशा आहे?

दक्षिण दिशेच्या विरुद्ध दिशेला उत्तर दिशा आहे.

पश्चिम व दक्षिण दिशेदरम्यान असणारी उपदिशा कोणती?

पश्चिम व दक्षिण दिशेदरम्यान नैऋत्य उपदिशा आहे.

सप्तर्षी तारकासमूह कोणत्या दिशेला उगवतो?

सप्तर्षी तारकासमुहातील प्रमुख सात प्रमुख तार्‍यांपैकी पहिल्या दोन तार्‍यांना जोडून सरळ रेषा आखल्यास ती रेषा सरळ उत्तर ध्रुवतार्‍याकडे जाईल.

सूर्य कोणत्या दिशेला उगवतो?

सूर्य पूर्व दिशेला उगवतो.

1 thought on “Directions In Marathi | दिशा व उपदिशा”

प्रतिक्रिया द्या