Flax Seeds ला Marathi मध्ये जवस किंवा आळशी असे म्हणतले जाते. जवस किंवा आळशी बियांचा वापर अनेक घरगुती पदार्थांमध्ये केला जातो.या बियांचा आकार लहान असला,तरी त्यांचातले गुणधर्म हे फार मोठे आहेत.
बऱ्याच लोकांना याची माहिती नाही.तुम्हाला माहीत आहे का ? तुम्ही ज्या जवस बियांचा वापर फक्त अन्नपदार्थ म्हणून करता, त्याद्वारे रोगांवरही उपचार करता येतो.होय, जवस/आळशी चे असे अनेक फायदे आहेत.
जवस/आळशी बियांचा उपयोग करून आपण अनेक रोगांना रोखू शकता.आपले कुटुंब निरोगी बनवू शकता.हे लक्षात घेऊन आज आपण या लेखात आळशी किंवा जवस खाण्याचे फायदे वाचणार आहोत.तसेच जवस बियांचा वापर व त्यात असलेले गुणधर्म देखील माहीत करून घेणार आहोत.
या लेखात दिलेले flax seeds benefits in Marathi संपूर्ण वाचा.

जवस/आळशी म्हणजे काय ? | Flax Seeds In Marathi
जवस किंवा आळशी हे औषधी वनस्पती आहे.ठिकाणांच्या वातावरणानुसार जवस बियांच्या रंग,रूप आणि आकारात फरक पाहायला मिळतो.आपल्याकडे सहसा आळशी बियाणे पांढरे, पिवळे, लाल किंवा किंचित काळे रंगात मिळतात.
उष्ण हवामानात वाढलेले जवस बियाणे(flax seeds in marathi) हे सर्वोत्तम मानले जातात.बरीच लोक जवस तेलाचा वापर करतात.जवस बियांचा उपयोग श्वास,घसा,कफ, जखमांसह पचनप्रक्रियेचे विकार, कुष्ठरोग इत्यादी रोगांमध्ये औषधी म्हणून केला जातो.
Flax Seeds Benefits In Marathi | जवस खाण्याचे फायदे
जवस किंवा आळशी बियांचा औषधी म्हणून खालील प्रकारे वापर करण्यात येतो.
निद्रानाश वर उपयोगी | जवस तेलाचे फायदे | Insomnia Remedy in Marathi
झोपेच्या समस्यासाठी आळशीचे सेवन फायदेशीर ठरते. यासाठी आळशी आणि एरंडेल तेल समान प्रमाणात मिसळा.त्यांना कांस्य प्लेटमध्ये चांगले बारीक करा.आता हे मिश्रण डोळ्याला काजलसारखे लावल्याने चांगली झोप येण्यास मदत मिळते.
डोळ्यांच्या आजारावर उपयोगी | आळशी चे फायदे | Eye Disease Remedy in Marathi
जवसचे गुणधर्म डोळ्यांच्या आजारांमध्ये खूप फायदेशीर आहेत.डोळ्यांचे आजार जसे की डोळे येणे,डोळे सतत लाल होणे इत्यादी वर उपचार म्हणून आळशीचे बियाणे पाण्यात भिजवा.हे पाणी डोळ्यात टाका.या मुळे तुमच्या डोळ्यांना नक्कीच फायदा मिळेल.
वेदना आणि सूज कमी करण्यास उपयुक्त | Flaxseed Oil In Marathi
जवस बियांचा उपयोग केल्याने वेदना आणि सूज बऱ्या प्रमाणात कमी होते.यासाठी तुम्ही जवस तेलाचा वापर करा.किंवा चार वाट्या उकलत्या पाण्यात एक चमचा ठेचलेले जवस बियाणे घ्या.ते हळूहळू मिसळा.वेदनादायक किंवा सूजलेल्या भागावर तेलाप्रमाणे हळूवारपणे लावा.हे सूज आणि वेदना कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते.
कानातील जळजळ,सूज बारी करण्यासाठी उपयोगी | Ear Pain Remedy In Marathi
आळशी बियांचे चे गुणधर्म कानातील सूज बरी करण्यासाठी उपचार म्हणून खूप उपयुक्त आहेत. यासाठी कांद्याच्या रसामध्ये जवस बियाणे शिजवा व गाळून घ्या.कानात १-२ थेंब टाका.असे केल्याने कानातील वेदना कमी होते.
डोकेदुखीसाठी उपयुक्त आळशी | Head Pain Remedy In Marathi
डोकेदुखी ची समस्या हल्ली फार वाढली आहे.या समस्यावर घरगुती उपाय म्हणजे जवस. जवस चे बियाणे थंड पाण्यात बारीक करा व हा लेप डोक्याला लावा.असे केल्याने डोके दुखणे आणि इतर डोक्याची व्याधी वर नक्कीच फरक पडतो.
सर्दीसाठी उपयोक्त | Flaxseed Powder In Marathi
जर तुम्ही सर्दीने त्रासले असाल तर जवस तुमच्या कामी येईल.यासाठी जवस बियाणे स्वच्छ करा आणि ते मंद आचेवर भाजून घ्या.बियाणे चांगले भाजल्यानंतर त्यांना बारीक करा.यामध्ये त्याच प्रमानाचे खडी साखर मिसळून घ्या.आता हे मिश्रण सकाळ आणि संध्याकाळ प्रत्येकी ५ ग्राम गरम पानी सोबत घायावे.सर्दीवर हे परिणाम कारक ठरते.
खोकला आणि दमा वर फायदेशीर | Benefits Of Flax Seeds In Marathi
जर तुम्ही हवामनानुसार सतत खोकला आणि दम्याने त्रस्त असाल तर तुम्ही आळशी बियांचा योग्य वापर करून त्याचा पूर्ण फायदा घेऊ शकता.जवस बिया खोकला आणि दम्यसाठी फायदेशीर ठरते.जवस बियांचा काढा बनवा.सकाळ आणि संध्याकाळ ते प्यायल्याने खोकला आणि दम्यामध्ये फायदा होतो.थंडीच्या दिवसात मधा बरोबर आणि उन्हाळ्यात खडी साखरे सोबत सेवन करावे.
वात-कफ वर उपयोगी | Cough Home Remedy In Marathi
वात-कफ च्या उपचारासाठी देखील आळशीचा उपयोग होतो.या साठी ५० ग्रॅम भाजलेले जवस बियाणे पावडर आणि एक चतुर्थांश खडी साखर समान प्रमाणात मिसळा.हे सकाळी ३-५ ग्रॅम मधात घेतल्याने वात-कफ दोष विकार बरे होतात.
मूळव्याध वर उपयोगी | Piles Remedy In Marathi
मुळव्याधांसाठी ५-७ मिली जवस तेल घ्या . हे बद्धकोष्ठता दूर करते आणि मूळव्याधात फायदेशीर आहे.
टिबी साठी उपयोक्त जवस | जवस भिजवून खाण्याचे फायदे
टिबीसाठी २५ ग्रॅम अलसीचे दाणे बारीक करा.त्यांना रात्रभर थंड पाण्यात भिजवा.सकाळी हे पाणी गरम करा,त्यात लिंबाचा रस मिसळा आणि प्या.टिबी झालेल्या रुग्णांना हे फार उपयुक्त ठरतं.
सांधेदुखीपासून आराम | Arthritis Remedy In Marathi
आळशी /जवस औषधी वनस्पती सांधेदुखी वर चांगले कार्य करते. अलसीचे तेल किंवा अलसीचे बिया इसबगोल सोबत दळा व लावा.याने सांधेदुखीपासून आराम मिळतो.त्याचप्रमाणे अलसीचे तेल गरम करा आणि त्यात सुंठची पावडर मिसळा. याची मालिश केल्याने पाठदुखी आणि संधिवात वर आराम मिळतो.
जवस चटणी | जवसाची चटणी कशी बनवायची
जवस चटणी बनवणे अगधी सोपे आहे.याला लागणारे साहित्य खालील प्रमाणे
- १/२ कप जवस
- १ टेबलस्पून जीरे
- १ टेबलस्पून लाल तिखट
- ५-६ लसणाच्या पाकळ्या
- चवीनुसार मीठ
- १/४ टीस्पून हिंग
जवसाची चटणी कशी बनवायची याची प्रक्रिया खालील प्रमाणे
- सर्व साहित्य एकत्र जमा करा.
- कढईत मिडीयम गॅसवर जवस चांगले खरपूस भाजून घ्या.
- जीरे भाजून घ्या व लसूण भाजून घ्या.
- भाजलेले साहित्य एका ताटात काढून घ्या.
- त्यात लाल तिखट, मीठ, हिंग घालून मिक्स करा व थंड झाल्यावर मिक्सरमधून बारीक वाटून घ्या.
- मिक्सर बंद चालू करत वाटावे. जवस चटणी तयार
आशा प्रकारे आपण झटपट मस्त खमंग खरपूस जवस चटणी तयार करू शकतो.
Flaxseed Meaning In Marathi | Alsi Seeds Benefits In Marathi
आम्हाला आशा आहे की Flax seeds in marathi हा लेख तुम्हाला आवडला असेल.या लेखात Benefits of flax seeds in marathi आणि आळशी /जवस बियाणे बद्दल आपल्याला काही शंका असल्यास किंवा त्यामध्ये काही सुधारणा झाली पाहिजे असे आपल्याला वाटत असल्यास, यासाठी आपण आम्हाला ईमेल लिहून सांगू शकता.
आपल्याला हा लेख आवडला असेल किंवा यातून काही नवीन शिकायला मिळाले असेल तर कृपया ही माहिती जास्तीत जास्त इतरांपर्यन्त पोहचवा. फेसबुक,ट्विटर आणि इतर सोशल मीडिया साइट्स वर हे शेअर करा.धन्यवाद !!
जवस बद्दल सतत विचारले जाणारे प्रश्न (FAQs)
Flax Seeds ला Marathi मध्ये जवस किंवा आळशी बियाणे म्हणतात. ही एक औषधी वनस्पती आहे.
जवस मध्ये शरीर उपयोगी ओमेगा ३ फॅटी अॅसिड,फायबर, प्रथिने (Proteins),लिग्नन(Lignans),जीवनसत्त्वे(Vitamins), खनिजे(Minerals) आणि अमीनो अॅसिड असतात.
जवस बियाणे खाण्याचे बरेच मार्ग आहेत.जसे की सॅलड,ज्यूस, प्रोटीन शेक,जवस चटनी इत्यादि.यातून तुम्हाला ज्या पद्धतीत खायला आवडेल तसे खावे.
सुरवातीला १ चमचा बियाणे रोज खाण्याचा सल्ला तज्ञ देतात.तुम्ही तुमच्या तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.
टीप : वरील सर्व बाबी मराठी डिजिटल केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून मराठी डिजिटल कोणताही दावा करत नाही.त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
हे पण वाचा –