Ganpati Stotra in Marathi | गणपती स्तोत्र मराठी

Ganpati Stotra in Marathi : गणेश स्तोत्र मराठी याचे पठन केल्याने आपले सगळे संकट नहिशे होतात अशी भक्तांची भावना आहे.म्हणूनच या स्तोत्रला संकट नशनम गणेश स्तोत्र असे देखिल म्हणतात.

गणपती स्तोत्र मराठी याला अनन्यसाधारण महत्व आहे. Ganapati stotram in marathi हा इच्छा पूर्ण करणारा आणि भीती दूर करणारा अत्यंत प्रभावी मंत्र मानला जातो.

Ganpati stotra lyrics in Marathi मधील शेवटच्या श्लोकात सांगितल्याप्रमाणे जो भक्त या स्तोत्रचे पठन करतो त्याला अपेक्षित लाभ प्राप्त होतो आणि तो पूर्ण सिद्धी प्राप्त करू शकतो.

Ganapati stotram in marathi मध्ये गणपतीच्या बारा नावांचा उल्लेख केला गेला आहे.ती नवे म्हणजे वक्रतुंड, एकदंत, कृष्णपिंगाक्ष, गजवक्र, लंबोदर, विकट, विघ्नराजेंद्र, धूम्रवर्णं, भालचंद्र, विनायक, गणपति, गजानन.

आज या लेखात आपण Ganpati stotra in Marathi बद्दल वाचणार आहोत.तसेच Meaning of Ganpati stotra in Marathi काय आहे ते देखील सांगणार आहोत.

गणपती स्तोत्र मराठी संपूर्ण वाचा.

Ganpati stotra in Marathi
Ganpati stotra in Marathi

Ganpati Stotra Marathi Lyrics | गणेश स्तोत्र मराठी

Ganpati stotra lyrics in Marathi खाली दिल्या प्रमाणे

गणपती स्तोत्र संस्कृतGanpati Stotra Marathi Lyrics
(श्री गणपती स्तोत्र मराठी भाषांतर )
प्रणम्यं शिरसा देव गौरीपुत्रं विनायकम ।
भक्तावासं: स्मरैनित्यंमायु:कामार्थ सिद्धये ।।१।।
साष्टांग नमन हे माझे गौरीपुत्रा विनायका ।
भक्तीनें स्मरतो नित्य आयुःकामार्थ साधती ॥ १ ॥
प्रथमं वक्रतुंण्डं च एकदन्तं द्वितीयकम ।
तृतीयं कृष्णपिंगाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम ॥२॥
प्रथम नांव वक्रतुंड दुसरें एकदंत ते ।
तिसरे कृष्णपिंगाक्ष चवथे गजवक्र ते ॥ २ ॥
लम्बोदरं पंचमं च षष्ठं विकटमेव च ।
सप्तमं विघ्नराजं च धूम्रवर्णं तथाष्टमम् ॥३॥
पाचवे श्री लंबोदर सहावें विकट नांव ते ।
सातवे विघ्नराजेंद्र आठवे धुम्रवर्ण ते ॥ ३ ॥
नवमं भालचन्द्रं च दशमं तु गजाननम् ।
एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननम् ॥४॥
नववे श्री भालचंद्र दहावे श्री विनायक ।
अकरावे गणपती बारावे श्री गजानन ॥ ४ ॥
द्वादशैतानि नामामि त्रिसन्ध्यं य: पठेन्नर: ।
न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरं प्रभो ॥५॥
देवनांवे अशी बारा तीन संध्या म्हणे नर ।
विघ्नभीती नसे त्याला प्रभो ! तू सर्व सिद्धिदे ॥ ५ ॥
विद्यार्थी लभते विद्यां, धनार्थी लभते धनम् ।
पुत्रार्थी लभते पुत्रान्-मोक्षार्थी लभते गतिम् ॥६॥
विद्यार्थ्याला मिळे विद्या धनार्थ्याला मिळे धन ।
पुत्रार्थ्याला मिळे पुत्र मोक्षार्थ्याला मिळे गति ॥ ६ ॥
जपेद गणपतिस्तोत्रं षडभिर्मासै: फलं लभेत् ।
संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशय: ॥७॥
जपता गणपती स्तोत्र सहा मासांत हे फळ ।
एक वर्ष पुर्ण होतां मिळे सिद्धी न संशय ॥ ७ ॥
अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा य: समर्पयेत ।
तस्य विद्या भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादत: ॥८॥
नारदांनी रचिलेले झाले संपू्र्ण स्तोत्र हें ।
श्रीधराने मराठींत पठण्या अनुवादिले ॥ ८ ॥
॥इति श्रीनारदपुराणे श्री संकटनाशन गणेशस्तोत्रं सम्पूर्णम ॥॥ श्रीगणपती स्तोत्र संपूर्ण ॥
Ganpati Stotra Lyrics in Marathi

Meaning of Ganpati Stotra in Marathi | गणपती स्तोत्र मराठी अर्थ

नारद उवाच
प्रणम्यं शिरसा देव गौरीपुत्रं विनायकम । 
भक्तावासं: स्मरैनित्यंमायु:कामार्थ सिद्धये ।।१।।

अर्थ – नारद जी म्हणतात,
पार्वती नंदन श्री गणेशाला नतमस्तक व्हा आणि मग तुमच्या जीवनातील इच्छा आणि अर्थाच्या पूर्तठेसाठी दररोज श्री गणपतीचे स्मरण करा.

प्रथमं वक्रतुंण्डं च एकदन्तं द्वितीयकम । 
तृतीयं कृष्णपिंगाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम ॥२॥

अर्थ – पहिले वक्रतुंड, दुसरे एकदंत, तिसरे कृष्णपिंगाक्ष, चौथे गजवक्र.

  • वक्रतुंड म्हणजे – वाकलेला चेहरा असलेले.
  • एकदंत म्हणजे – एक दात असलेले.
  • कृष्णपिंगाक्ष म्हणजे – काळे आणि तपकिरी डोळे असलेले.
  • गजवक्र म्हणजे – हत्तीचा चेहरा असलेले.
लम्बोदरं पंचमं च षष्ठं विकटमेव च । 
सप्तमं विघ्नराजं च धूम्रवर्णं तथाष्टमम् ॥३॥

अर्थ – पाचवे लंबोदर, सहावे विकट,सातवे विघ्नराजेंद्र, आठवे धूम्रवर्णं.

  • लंबोदर म्हणजे – मोठे पोट असणे.
  • विकट म्हणजे – विराट.
  • विघ्नराजेंद्र म्हणजे – अडथळे नष्ट करणारा राजा.
  • धुम्रवर्ण म्हणजे – राखाडी रंगाचे.
नवमं भालचन्द्रं च दशमं तु गजाननम् । 
एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननम् ॥४॥

अर्थ – नववे भालचंद्र, दहावे विनायक, अकरावे गणपती, बारावे गजानन.

  • भालचंद्र म्हणजे – ज्याच्या कपाळावर चंद्र शोभतो.
द्वादशैतानि नामामि त्रिसन्ध्यं य: पठेन्नर: । 
न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरं प्रभो ॥५॥

अर्थ – जो माणूस या बारा नामांचा तीनही संध्या अर्थात सकाळी, मध्यरात्री आणि संध्याकाळी पठण करतो त्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होण्याची भीती नसते.आशा रीतीने केलेले स्मरण हे सर्व प्रकारची सिद्धी देते.

विद्यार्थी लभते विद्यां, धनार्थी लभते धनम् । 
पुत्रार्थी लभते पुत्रान्-मोक्षार्थी लभते गतिम् ॥६॥

अर्थ – याद्वारे एक विद्याभिलाशी (विद्यार्थी) विद्या, धनर्थी (संपत्तीची इच्छा) संपत्ती, पुत्रार्थी (जो पुत्राची इच्छा करतो) पुत्र आणि मुमुक्षू मोक्ष प्राप्त करतो.

जपेद गणपतिस्तोत्रं षडभिर्मासै: फलं लभेत् । 
संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशय: ॥७॥

अर्थ – जर कोणी या गणपती स्तोत्राचा जप केला, तर इच्छित परिणाम सहा महिन्यात मिळतो आणि एका वर्षात पूर्ण सिद्धी प्राप्त होते.यात शंका नाही.

अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा य: समर्पयेत । 
तस्य विद्या भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादत: ॥८॥

अर्थ – जो व्यक्ती हे लिहितो आणि आठ ब्राह्मणांना समर्पित करतो.गणेशाच्या कृपेने त्याला सर्व जगातील ज्ञान प्राप्त होते.

॥इति श्रीनारदपुराणे श्री संकटनाशन गणेशस्तोत्रं सम्पूर्णम ॥

अर्थ – अशा प्रकारे श्रीनारद पुराणात लिहिलेले, श्री संकट नाशन गणेश स्तोत्र पूर्ण झाले आहे.

Ganapati Stotram in Marathi | Ganpati Stotra Lyrics in Marathi

आम्हाला आशा आहे की  Ganpati Stotra in Marathi हा लेख तुम्हाला आवडला असेल.या लेखात Meaning of Ganpati stotra in Marathi या मध्ये आपल्याला काही शंका असल्यास किंवा त्यामध्ये काही सुधारणा झाली पाहिजे असे आपल्याला वाटत असल्यास, यासाठी आपण आम्हाला ईमेल लिहून सांगू शकता.

आपल्याला हा लेख आवडला असेल किंवा यातून काही नवीन शिकायला मिळाले असेल तर कृपया ही माहिती जास्तीत जास्त इतरांपर्यन्त पोहचवा.फेसबुक,ट्विटर आणि इतर सोशल मीडिया साइट्स वर हे शेअर करा.धन्यवाद.

गणपती स्तोत्र मराठी बद्दल काही प्रश्न (FAQs)

गणपती स्तोत्र का जपले जाते?

दररोज संकटा नाशनम गणपती स्तोत्राचे पठण केल्याने एखाद्या व्यक्तीला अनेक प्रकारच्या अडथळ्यांपासून मुक्तता मिळते आणि सर्व संकटांचा नाश होतो.

गणपती स्तोत्र कोणी लिहिले?

गणपती स्तोत्र नारद पुराणात सांगण्यात आले आहे.

गणपती स्तोत्राचा जप केल्याने काय फायदा होतो?

गणपती स्तोत्राचे नियमित पठण केल्याने मन शांत राहते आणि वाईट गोष्टींना तुमच्या जीवनापासून लांब ठेवते.गणपती स्तोत्र पठण तुम्हाला निरोगी आणि समृद्ध बनवते.

गणपती स्तोत्र जप करण्याची सर्वोत्तम वेळ कोणती आहे?

गणपती स्तोत्र जप करण्याची सर्वोत्तम वेळ ही सकाळची आहे.सकाळी लवकर उठून आंघोळ करून गणपती स्तोत्राचे जप केल्याने चांगले अनुभव येतात.

हे पण वाचा :

प्रतिक्रिया द्या