Ghalin Lotangan Lyrics Meaning In Marathi : घालीन लोटांगण ही प्रार्थना आहे.आपण ही प्रार्थना कोणतीही आरती झाल्यावर करतो.
घालीन लोटांगण ही गणपतीची आरती आहे,असा बऱ्याच जणांचा समज आहे.तर तसे नाही, ही प्रार्थना आहे देवाला केलेली.त्यात सगळे देव आले.म्हणूनच बघा कोणत्याही देवाची आरती असो,शेवटी आपण घालीन लोटांगण ही प्रार्थना करतोच.आणि असे का करतो ह पुढे सांगितले आहे
घालीन लोटांगण ही प्रार्थना कोणी एकाने लिहिले नाही. तर तो संच आहे काही वेग वेगळ्या ओळींचा. ह्या ओली वेग वेगळ्या श्लोकातून घेण्यात आल्या आहेत.
घालीन लोटांगण मधील सुर्वतीचा ४ ओल्या या संत नामदेव यांनी लिहिल्या आहेत.तसेच त्या नंतरच्या ओली या शंकराचार्यांच्या गुरुस्तोत्र, श्रीमदभगवत पुराण आणि शंकराचार्यांच्या अच्युताकष्टम मधील आहेत.
तुम्ही इथे Ghalin Lotangan Lyrics Meaning In Marathi वाचायला आला आहेत. हो मी तुम्हाला घालीन लोटांगण मराठी अर्थ सांगणारच आहे,परंतु घालीन लोटांगण बद्दल गैरसमज असू नाही म्हणून वरील माहिती सांगितली .
चला आता आपण सविसतर घालीन लोटांगण वंदीन चरण याचा मराठी अर्थ जाणून घेऊयात.

अनुक्रमणिका
Ghalin Lotangan Lyrics Meaning In Marathi | घालीन लोटांगण मराठी अर्थ
घालीन लोटांगण वंदीन चरण lyrics मराठी अर्थासहित खाली वाचा.
घालीन लोटांगण, वंदीन चरण । डोळ्यांनी पाहीन रुप तुझें । प्रेमें आलिंगन, आनंदे पूजिन । भावें ओवाळीन म्हणे नामा ।।१।।
अर्थ : हे देवा ! मी दंडवत घालून तुझ्या चरणी नमन करतो.तुझे सुंदर रूप माझ्या डोळ्यांनी पाहतो.
हे देवा ! मी तुला प्रेम भक्तीने घट्ट मिठी मरतो.मी तुझे अतिशय आनंदाने पूजन करतो.
संत नामदेव (नामा) म्हणतात, मी तुझे मनापासून,भक्ती भावाने वंदन करतो.
वरील ४ ओल्या ह्या संत नामदेव यांनी लिहिल्या आहेत.
त्वमेव माता पिता त्वमेव। त्वमेव बन्धु: सखा त्वमेव । त्वमेव विध्या द्रविणं त्वमेव । त्वमेव सर्वं मम देवदेव ।।२।।
अर्थ : हे देवा ! तू माझी आई आहेस, तूच माझे पिता आहेस.तुम्ही माझे भावंड आणि माझे सखा आहात.
हे देवा तूच ज्ञान आहेस.मला हवी असलेली संपत्ती पण तूच आहेस.तू माझे सर्वस्व आहेस. तूच माझा सर्वशक्तिमान देव आहेस.
वरील ४ ओल्या ह्या शंकराचार्य यांनी लिहिलेल्या गुरुस्तोत्र मधील आहेत.
कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा । बुध्यात्मना वा प्रकृति स्वभावात् । करमि यद्यत् सकलं परस्मै । नारायणायेती समर्पयामि ।।३।।
अर्थ : माझे शारीरिक कार्य माझ्या मर्यादित बुद्धी आणि इंद्रियांच्या सहाय्याने.
तसेच बुद्धी, स्वभावाने आणि वागणुकीद्वारे.या सर्व गोष्टीं जाणून मी जे काही करतो.
हे सर्व मी तुला अर्पण करतो. देवा नारायणा !!
वरील ४ ओल्या ह्या श्रीमदभगवत पुराण मधील आहेत.
अच्युतं केशवं राम नारायणम् । कृष्णदामोदरं वासुदेवं भजे । श्रीधरं माधवं गोपिकावल्लभम् । जानकीनायकं रामचंद्र भजे ।।४ ।।
अर्थ : मी तुझी उपासना करतो हे अच्युता (अच्युत).मी तुझी उपासना करतो हे केशवा (जो सर्वांवर नियंत्रण ठेवतो, ज्याच्याकडे सुंदर केस आहेत आणि ज्याने केशी राक्षसाचा वध केला आहे).मी तुझी पूजा करतो हे नारायणाचा अवतार राम.
मी तुझी उपासना करतो हे कृष्ण (जे त्याच्या दैवी गुणांनी आणि सौंदर्याने इतरांना आकर्षित करतात) ज्याला दामोदरा म्हणून देखील ओळखले जाते.मी तुझी पूजा करतो हे वासुदेव (जो वासुदेवाचा पुत्र होता).
मी तुझी पूजा करतो हे श्रीधरा (ज्याने श्री आपल्या छातीवर धारण केले आहे).मी तुझी पूजा करतो हे माधवा.मी तुझी पूजा करतो जो गोपिकांचा लाडका आहे.
हे देवी जानकीचे भगवान रामचंद्र मी तुझी पूजा करतो.
वरील ४ ओल्या ह्या शंकराचार्य यांनी लिहिलेल्या अच्युताकष्टम मधील आहेत.
हरे राम हर राम, राम राम हरे हरे । हरे कृष्ण हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे ।
अर्थ : प्रभु श्रीरामाचा श्रीकृष्णचा जय जयकार असो.
हे पण वाचा : Hanuman Chalisa Meaning In Marathi
आपण आरती झाल्यावर घालीन लोटांगण का म्हणतो ?
बऱ्याच लोकांना असा प्रश्न पडत असेल की घालीन लोटांगणनेच आपण आरतीचा शेवट का करत असू ? Why is Ghalin lotangan sung after Aarti ?
तर त्याच कारण असे आहे की, आपण देवची आरती करतो आणि आरती झाल्यावर देव आपल्यावर प्रसन्न व्हावे त्यासाठी केलेली ही प्रार्थना आहे.
आपण घालीन लोटांगण प्रार्थना करताना का गोल फिरतो (प्रदीक्षणा घालतो)?
हा पण प्रश्न की आपण घालीन लोटांगण बोलताना गोल का फिरतो ? किंवा Why we should turn around during ghalin lotangan Aarti? बरीच जन विचारतात.
प्रदक्षिणा घालण्याचे विशेष महत्व आहे. आपण जेव्हा मंदिरात जातो किंवा कोणत्याही पवित्र ठिकाणी जातो तेव्हा आपण तिथे प्रदक्षिणा घालतो.प्रदक्षिणा आपण त्या जागेतील सकारात्मक ऊर्जा आपल्याला प्राप्त व्हावी म्हणतून घालतो.
ज्या ठिकाणी आपल्याला प्रदक्षिणा घालता येत नाही.कोणतेही कारण असो जागे अभावी किंवा इतर.तर तिथे आपण स्वतः भवति दक्षिणावर्ती दिशेने गोल फिरावे असे सांगण्यात आले आहे.
हेच कारण आहे की आरती झाल्यावर आपल्याला जर प्रदक्षिणा घालायला जागा नसेल तर आपण स्वतः भवति दक्षिणावर्ती दिशेने गोल फिरतो.
Ghalin Lotangan Lyrics PDF | घालीन लोटांगण वंदीन चरण PDF
जर तुम्हाला घालीन लोटांगण वंदीन चरण pdf हवी असेल तर तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर जाऊन डायरेक्ट download करू शकता.
Ghalin Lotangan lyrics Marathi Meaning | घालीन लोटांगण वंदीन चरण मराठी अर्थ
मला आशा आहे की Ghalin Lotangan Lyrics Meaning In Marathi हा लेख तुम्हाला आवडला असेल.या लेखात घालीन लोटांगण मराठी अर्थ या मध्ये आपल्याला काही शंका असल्यास किंवा त्यामध्ये काही सुधारणा झाली पाहिजे असे आपल्याला वाटत असल्यास, यासाठी आपण कमेन्ट लिहून आम्हाला सांगू शकता.
आपल्याला हा लेख आवडला असेल किंवा यातून काही नवीन शिकायला मिळाले असेल तर कृपया ही माहिती जास्तीत जास्त इतरांकडे पोहचवा. फेसबुक , ट्विटर आणि इतर सोशल मीडिया साइट्स वर हे शेअर करा.धन्यवाद !!
हे पण वाचा :
wow