Gudi Padwa Wishes In Marathi हिंदू संस्कृतीच्या विजयाचा हा दिवस.श्री रामचंद्र चौदा वर्षे वनवास संपवून, लंकेच्या रावणाचा वध करून, विजयी होऊन ज्या दिवशी आपल्या अयोध्येला परत आले तो दिवस म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा हा होय.
अयोध्या नगरीतील लोकांनी घरोघरी गुढ्या, तोरणे उभारून आनंद व्यक्त केला. म्हणून गुढीपाडवा हा सण दरवर्षी साजरा केला जातो. यालाच वर्षप्रतिपदा असेही म्हणतात.
आज गुढ्या उभारून आपल्या पूर्वजांची शौर्यगाथा स्मरण करून कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. त्यांनी ज्या सद्गुणांच्या भरवशावर यश मिळविले त्या सद्गुणांच्या गौरवाचा दिवस, तीच परंपरा पुढे चालू ठेवण्याचा दिवस.
गुढीपाडवा हिंदू नववर्षाचा पहिलं दिवस.साडेतीन मुहूर्तांपैकी एक सुमुहूर्त असणाऱ्या गुढीपाडव्याला हिंदू नववर्षाची सुरुवात होते.
गुढीपाडवाच्या दिवशी विधीनुसार पूजा-पाठ केल्याने आपल्या सर्व आकांशा पुर्ण होतात.शिवाय कोणत्याच गोष्टींची कमतरता भासत नाही. सोबतच घरात सुख-शांती आणि समृद्धी येते.
गुढीपाडवा सण संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. यादिवशी लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकजण एकमेकांना शुभेच्छा देत आनंद व्यक्त करतात. असेच काही स्पेशल मेसेज आम्ही घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी.

अनुक्रमणिका
Gudi Padwa Wishes In Marathi | गुढी पाडवा शुभेच्छा संदेश
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणाऱ्या या सणाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.गुढीपाडव्या निमित्त आपल्या प्रियजननांना शुभेच्छा देण्यासाठी खास मराठमोळे संदेश, मेसेजेस.व्हॉट्सअॅप आणि फेसबुकच्या माध्यमातून शेअर करुन साजरा करा नववर्षाचा हा उत्सव.
नक्षीदार काठीवरी रेशमी वस्त्र, त्याच्यावर चांदीचा लोटा, उभारुनी मराठी मनाची गुढी, साजरा करूया हा गुढीपाडवा… नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !
येवो समृद्धी अंगणी, वाढो आनंद जीवनी, तुम्हासाठी या शुभेच्छा, नववर्षाच्या या शुभदिनी… गुढीपाडव्याच्या शुभेच्छा !
शांत निवांत शिशिर सरला, सळसळता हिरवा वसंत आला, कोकिळेच्या सुरवातीसोबत, चैत्र “पाडवा” दारी आला… नूतन वर्षाभिनंदन!
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..! उभारू गुढी सुख-समृद्धीची सुरुवात करूया नववर्षाची..
चंदनाच्या काठीवर, शोभे सोन्याचा करा.. साखरेची गाठी आणि, कडुलिंबाचा तुरा.. मंगलमय गुढी, ल्याली भरजरी खण.. स्नेहाने साजरा करा पाडव्याचा सण… गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
या नव्या वर्षात सुख- समृद्धी व समाधानाची गुढी उभारूया. नववर्षाची सुरुवात आनंदाने करूया. सर्वांना हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
सुरु होत आहे नवीन वर्ष,
मनात असू द्या नेहमी हर्ष..
येणारा नवीन दिवस करेल,
नव्या विचारांना स्पर्श..
हिंदू नव वर्षाच्या आणि
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
गुढीपाडव्याच्या आणि "विलंबी" हिंदू संवत्सराच्या मंगलमय शुभेच्छा.. ! येणारे नवीन वर्ष आपल्यासाठी आरोग्य , मन:शांती , प्रसन्नता , नाविन्य , उत्साह याची पर्वणी ठरो हीच गजानना चरणी प्रार्थना
गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या आपणांस आणि आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.
श्रीखंड पूरी,
रेशमी गुढी,
लिंबाचे पान,
नव वर्ष जाओ छान..
आमच्या सर्वांच्या तर्फे
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
हॅप्पी गुढी पाड़वा…!
Gudi Padwa Status | गुढीपाडवा स्टेटस

सर्वांना गुढीपाडव्याच्या व मराठी नववर्षाच्या मराठमोळ्या शुभेच्छा अपणा सर्वांस हे वर्ष आनंददायी, शुभदायी, आरोग्यदायी आणि मांगल्यदायी जावो.
मराठी नविन वर्षाच्या आणि गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्या मराठी नविन वर्ष आपणास व आपल्या परिवारास सुखाचे , समृद्धिचे जावो.
वसंत ऋतूच्या आगमनी,
कोकिळा गाई मंजुळ गाणी..
नव वर्ष आज शुभ दिनी,
सुख समृद्धी नांदो जीवनी..
गुढी पाडव्याच्या आणि
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
संस्कतीच्या क्षितिजावर, पहाट नवी उजळून आली, आयुष्यात पुन्हा नव्याने, क्षण मोलाचे घेऊन आली, वेचून घेऊ ते क्षण सारे,आनंदे करू नवं वर्ष साजरे, नववर्षाच्या शुभेच्छा…!!!
हिंदूनुतनवर्षाभिनंदन ! आपणांस आणि आपल्या कुटुंबियांस हे नवीन वर्ष सुखाचे, समृद्धीचे, आणि भरभराटीचे जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना!! गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !
जल्लोष नववर्षाचा.. मराठी अस्मितेचा.. हिंदू संस्कृतीचा.. सण उत्साहाचा.. मराठी मनाचा.. हिंदूनुतनवर्षाभिनंदन !
तुम्हाला व कुटूंबियांना,
गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या
हार्दिक शुभेच्छा!
प्रसन्नतेचा साज घेऊन,
यावे नववर्ष!
आपल्या जीवनात नांदावे,
सुख, समाधान, समृद्धी आणि हर्ष !!
गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा…!
शांत निवांत शिशिर सरला. सळसळता हिरवा वसंत आला. कोकिळेच्या सुरवाती सोबत, चैत्र "पाडवा" दारी आला. "नूतन वर्षाभिनंदन"
हे नववर्ष, आनंद, सुख, समृद्धीचे जावो,
हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो…
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
Padwa Quotes In Marathi | गुढी पाडवा शुभेच्छा कोट्स

गुढी नव्या विचारांची नव्या स्वप्नांची नव्या नात्यांची नव्या उमेदीने स्वप्न साकार करण्याची "नूतन वर्षाभिनंदन"
नविन दिशा, खुप आशा,
नविन सकाळ, सुंदर विचार,
नविन आनंद, मन बेधुंद,
आज सुरु होते, शुभ नविन वर्ष…
Happy Gudi Padwa !
वसंताची पहाट, आली आनंदाची लाट, सोनेरी दिवस हा, आली नवचैतन्याची पहाट, आनंद व्यक्त करूया चला समाधान, समृद्धी अन् आरोग्याची गुढी उभारूनी नव वर्षाच्या सर्वांना आनंदमय शुभेच्छा!!
हे नववर्ष सर्वांना सुखाचं, समाधानाचं आणि समृद्धीचं जावो. चला, कास धरू आधुनिक विकासाची, गुढी उभारू पुरोगामी विचारांची! सर्वांना 'गुढीपाडव्या'च्या आणि मराठी नववर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
मराठी नुतन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! नवीन वर्ष आपणांस भरभराटीचे आनंदाचे आणि सुख समृद्धीचे जावो हीच सदिच्छा!
गुढी उभारून आकाशी,
बांधून तोरण दाराशी,
काढून रांगोळी अंगणी,
हर्ष पेरुनी मनोमनी,
करू सुरुवात नव वर्षाची…
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा!
साडेतीन मुहूर्तांपैकी एक गुढीपाडवा या मंगलमय दिनाच्या आणि नूतन वर्षाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!
वर्षामागून वर्ष जाती,
बेत मनीचे तसेच राहती,
नव्या वर्षी नव्या भेटी,
नव्या क्षणाशी नवी नाती,
नवी पहाट तुमच्यासाठी,
शुभेच्छांची गाणी गाती…
Happy Gudi Padwa!
जगावरील संकट टळुन सर्वांना निरोगी आरोग्य लाभो हिच सदिच्छा आपणास. आपल्या संपुर्ण परीवारास मराठी नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.
पुन्हा एक नविन वर्ष,
पुन्हा एक नवी आशा, तुमच्या कर्तॄत्वाला पुन्हा
एक नवी दिशा,
नवी स्वप्ने,
नवी क्षितीजे,
सोबत माझ्या नव्या शुभेच्छा
*गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा*
Gudi Padwa SMS In Marathi | गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

येवो समृद्धी अंगणी,वाढो आनंद जीवनी, तुम्हासाठी या शुभेच्छा,नववर्षाच्या या शुभदिनी… गुढीपाडव्याच्या शुभेच्छा!
उभारा गुढी सुखसमृद्धीची
सुरुवात करूया नववर्षाची
विसरू ती स्वप्ने भूतकाळाची
वाटचाल करूया नवआशेची…..
माझ्या सर्व मित्र आणि मैत्रीणीना व त्यांच्या परिवाराला
गुडी पाडव्याच्या आणि
मराठी नवीन वर्ष्याच्या हार्दिक शुभेच्छा. . . .
शिखरे उत्कषार्ची सर तुम्ही करत राहावी!! कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी!! तुमच्या इच्छा आकांक्षाचा वेल गगनाला भिडू दे!! आई भवानीच्या कृपेने तुमच्या जीवनात मनासारखे घडू दे!! सर्वांना गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!!
आशेची पालवी, सुखाचा मोहर, समृद्धीची गुढी, समाधानाच्या गाठी, नववर्षाच्या शुभेच्छा, तुमच्यासाठी, गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
निळ्या निळ्या आभाळी,
शोभे उंच गुढी..
नवे नवे वर्ष आले,
घेऊन गूळसाखरेची गोडी…
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा!
तिघेजण तुमचा नंबर मागत आहेत,
मी नाही दिला, पण तुमच्या घरचा पत्ता दिलाय.
ते येत्या गुढीपाडव्याला,
तुमच्या घरी येतील..
त्यांची नावे आहेत,
सुख,
शांती,
समृद्धी!!!
गुडीपाडव्याच्या शुभेच्छा !
नेसून साडी माळून गजरा उभी राहिली गुढी, नव वर्षाच्या स्वागताची ही तर पारंपारिक रूढी, रचल्या रांगोळ्या दारोदारी नटले सारे अंगण, प्रफुल्लीत होवो तुमचे जीवन सुगंधीत जसे चंदन… तुम्हा सर्वांना नूतनवर्षाभिनंदन !! गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !!
उभारून आनंदाची गुढी दारी, जीवनात येवो रंगात न्यारी, पूर्ण होवोत आपल्या सर्व इच्छा-आकांशा, नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
चंदनाच्या काठीवर, शोभे सोन्याचा करा साखरेची गाठी आणि, कडुलिंबाचा तुरा मंगलमय गुढी, ल्याली भरजरी खण, स्नेहाने साजरा करा पाडव्याचा सण गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
प्रसन्नतेचा साज घेऊन, यावे नववर्ष! आपल्या जीवनात नांदावे, सुख, समाधान, समृद्धी आणि हर्ष!! गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा !
Gudi Padwa Message Marathi | गुढीपाडवा शुभेच्छा

जल्लोष नववर्षाचा मराठी अस्मितेचा हिंदू संस्कृतीचा सण उत्साहाचा मराठी मनाचा तुम्हाला व कुटूंबियांना, गुडीपाडवा व मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हे नववर्ष, आनंद, सुख, समृद्धीचे जावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो माज्या सर्व मित्रांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
गुढी उभारून आकाशी,
बांधून तोरण दाराशी,
काढून रांगोळी अंगणी,
हर्ष पेरुनी मनोमनी,
करू सुरुवात नव वर्षाची
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा!
उभारा गुढी आपल्या दारी सुख समृद्धी येवो घरी पाडव्याची नवी पहाट घेऊन येवो सुखाची लाट गुडी पाडवाच्या हार्दिक शुभेच्छा
तुमची सारी स्वप्न पूर्ण होवो मनात घेऊन हि इच्छा पाठवत आहे तुम्हाला आज गुडी पाडव्याच्या शुभेच्छा.
उभारा गुडी सुख समृद्धीची सुरवात करूया नव वर्षाची .. विसरू ती स्वप्ने भूतकाळाची वाटचाल करूया नव आशेची गुडी पाडवाच्या हार्दिक शुभेच्छा
पालवी चॆत्राची
अथांग स्नेहाची ,
जपणुक परंपरेची ,
ऊंच उंच जाऊ दे गुढी
आदर्शाची ,सम्पन्न्तेची ,
उन्नतीची आणि स्वप्न्पुर्तिची !
वसंताची पाहाट घेउन आला , नव चैतन्याचा गोडवा … समृद्धिची गुढी उभारू , आला चॆत्रचा पाडवा. “शुभ गुढी पाडवा”
उंच आकाशी उभारू गुढी जपुया नाती, जपुया रूढी वाढवू मैत्री स्ने्हाने मने जिंकुया प्रेमाने ! नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !
चंदनाच्या काठीवर शोभे सोन्याचा करा , साखरेची गाठी आणि कडुलिंबाचा तुरा , मंगलमय गुढी ल्याली भरजरी खण स्ने्हाने साजरा करा पाडव्याचा सण.
एक नवी पहाट, एक नवी आशा, तुमच्या कर्तुत्वाला, एक नवी दिशा ! नवे स्वप्न, नवी क्षितिजे, सोबत एक माझी नवी शुभेच्छा ! शुभ पाडवा !
Whatsapp Gudi Padwa Wishes Marathi

स्वागत नव वर्षाचे, आशा आकांक्षाचे, सुख समृद्धिचे, पड़ता द्वारी पाऊल गुढीचे…! “नव -वर्षाची ” गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
सण मराठी मन मराठी उभारली गुढी आज हर्षाची, साद मनाची हाक प्रेमची, भेट अशी ! “नव -वर्षाची ” गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.!!!
चैत्र पालवी फुलू दे , नवी स्वप्ने उमलू दे , गुढी पाडव्याच्या निमित्ताने सुख-स्वप्ने सकारू दे ! पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा ! समतेचे बांधू तोरण, गुढी उभारू ऐक्याची ! स्वप्न आपुले साकारण्यासाठी हार्दिक शुभेच्छा आजच्या शुभदिनी ! गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा..!!!
गुढी तोरणे उभारुनी दारी,
करू नव्या संकल्पाची वारी
मंगल दिनी मंगल समयी
सुख, समृद्धि येईल घरी !
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !
निळ्या निळ्या आभाळी
शोभे उंच गुढी
नवे नवे वर्ष आले
घेऊन गुळासारखी गोडी…
नवे वर्ष नवी सुरवात
नव्या यशाची नवी रुजवात
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !
सोनपिवळ्या किरणांनी आले नवीन वर्ष,
मनोमनी दाटे नवं वर्षाचा हर्ष….
मंद वारा वसंताची चाहूल घेऊन आला,
पालवी मधल्या प्रत्येक पानात नवंपण देऊन गेला..
त्याने नवीन वर्षाची सुरुवात ही अशीच केली,
नाविन्याच्या आनंदासाठी तो मंगल गुढी घेऊन आला..
नववर्ष म्हणजे चैतन्याचा नवा नवा स्पर्श, प्रत्येक क्षणी लाभू दे न संपणारा हा हर्ष… हर्षाने होऊ दे हे जीवन सुखी, आणि गजबजुन उठू दे आयुष्याची पालखी…
नवीन वर्षानिमित्त अनेक विचार, संकल्प, स्वप्न आणि इच्छा प्रत्येकाच्या मनात असतात. या मनोकामना पूर्ण होण्यासाठी नवं वर्ष नवीन उमेद घेऊन येतं. या नववर्षात आपणही आपल्या स्वप्नपूर्तीसाठी प्रयत्न करु.
तात्पर्य – Marathi Gudi Padwa Wishes
नवचैतन्याला प्रेरक ठरणाऱ्या, मरगळलेल्या, अनुत्साहित मनांना जागवणाऱ्या या सणानिमित्त नवचैतन्याची गुढी उभारुन नववर्षाचे स्वागत करुया.
माझ्याकडून तुम्हा सर्वांना नूतनवर्षाभिनंदन.
मला आशा आहे की Gudi padwa marathi wishes हा लेख तुम्हाला आवडला असेल.या लेखात आपल्याला काही शंका असल्यास किंवा त्यामध्ये काही सुधारणा झाली पाहिजे असे आपल्याला वाटत असल्यास, यासाठी आपण ईमेल लिहून आम्हाला सांगू शकता.
आपल्याला हा लेख आवडला असेल किंवा यातून काही नवीन शिकायला मिळाले असेल तर कृपया ही माहिती जास्तीत जास्त इतरांकडे पोहचवा. फेसबुक , ट्विटर आणि इतर सोशल मीडिया साइट्स वर हे शेअर करा.धन्यवाद !!
हे पण वाचा : Birthday Wishes in Marathi