Hanuman Chalisa Meaning In Marathi | हनुमान चालीसा मराठी अर्थ

बऱ्याच लोकांना Hanuman chalisa meaning in marathi माहीत नाही.लोकांना hanuman chalisa in marathi lyrics किंवा hanuman chalisa marathi माहीत आहे.

शास्त्रा मध्ये असे म्हटले आहे की जो कोणी दिवसातून एकदाही shri hanuman chalisa marathi स्त्रोताचे पठण करतो. तो व्यक्ति कोणत्याही संकट,विकार आणि भितीवर मात करू शकतो.

हनुमान चालीसा मराठी स्तोत्र किंवा इतर कोणताही स्तोत्र असो,ते अर्थ जाणून वाचल तर त्याच फायदा हा नेहमी जास्तच होतो.आज या लेखात मी Hanuman Chalisa lyrics with meaning in Marathi सांगणार आहे.

एक विनंती हनुमान चालीसा मराठी अर्थ हे संपूर्ण वाचा.

hanuman chalisa meaning in marathi
Hanuman chalisa meaning in marathi

Hanuman Chalisa lyrics with meaning in Marathi | हनुमान चालीसा मराठी अर्थ

हनुमान चालीसा मराठी हे हनुमानाचे एक स्तोत्र आहे. या स्तोत्रात ४० श्लोक आहेत. श्री तुलसीदास यांनी श्री Shri hanuman chalisa marathi ची रचना १६ व्या शतकात केली.

चला तर मग जाणून घेऊ यात hanuman chalisa meaning in marathi काय आहे ते.

|| दोहा ||

श्री गुरु चरन सरोज रज, निज मनु मुकुर सूधारि।
बरनऊं रघुबर बिमल जसु, जो दायकु फल चारि॥

अर्थ – श्री गुरू यांच्या चरण कमळाच्या धुळीने, आपले मन रुपी दर्पण,पवित्र करून श्री राम यांचे निर्मळ यशाचे वर्णन करीत आहे.जे चारही प्रकारचे फळ म्हणजे धर्म, अर्थ,काम आणि मोक्ष देणारे आहे.

बुद्धिहीन तनु जानिके, सुमिरौं पवन-कुमार।
बल बुद्धि बिद्या देहु मोहिं, हरहु कलेस विकार॥

अर्थ – हे पवनकुमार मी आपले स्मरण करीत आहे. माझे शरीर आणि बुध्दी दोन्हीही अशक्त आहे. कृपा करून मला बळ, बुध्दी आणि ज्ञान देऊन माझे सर्व दुःख, दोष, क्लेश यांचा नाश करा.

हनुमान चालीसा मराठी अर्थ

जय हनुमान ज्ञान गुन सागर।
जय कपीस तिहुँ लोक उजागर॥ १ ॥

अर्थ- श्री हनुमानजी तुमचा जयजयकार असो. आपण गुण आणि ज्ञानाचे सागर आहात. हे कपिश्र्वर, आपला जयजयकार असो, तिनही लोकात म्हणजे स्वर्ग लोक,भुलोक, पातळ लोकात आपली किर्ती आहे.

राम दूत अतुलित बल धामा।
अंजनि पुत्र पवनसुत नामा॥ २ ॥

अर्थ – हे पवनसुत अजनी नंदन तुमच्या सारखा दुसरा कोणीच बलवान नाही.

महावीर विक्रम बजरंगी।
कुमति निवार सुमति के संगी॥ ३ ॥

अर्थ – हे महविर विक्रम बजरंग बली, तूम्ही विशेष पराक्रमी आहात. तुम्ही दुर्बुद्धिचा नाश करतात आणि सदबुद्धी ठेवणाऱ्या व्यक्ती सोबत असतात.

कंचन बरन बिराज सुबेसा।
कानन कुंडल कुंचित केसा॥ ४ ॥

अर्थ – आपण सोनेरी रंग, सुंदर वस्त्र, कानात कुंडल, आणि कुरळ्या केसांनी सुशोभित आहात.

हाथ बज्र औ ध्वजा बिराजै।
काँधे मूँज जनेऊ साजै॥ ५ ॥

अर्थ – आपल्या हातात वज्र आणि ध्वजा आहे. खांद्यावर मुंज जनऊ ची शोभा आहे.

शंकर सुवन केसरी नंदन।
तेज प्रताप महा जग बंदन॥ ६ ॥

अर्थ – हे भगवान शंकराचे अवतार , हे केशरी नंदन अपल्या पराक्रम आणि यशाचे गुणगान संपूर्ण विश्व करत आहे.

विद्यावान गुनी अति चातुर।
राम काज करिबे को आतुर॥ ७ ॥

अर्थ – आपण प्रचंड विद्यावन, गुणवान, अत्यंत कार्य कुशल असुन श्रीरामाचे कार्य करण्यास आतुर असतात.

प्रभु चरित्र सुनिबे को रसिया।
राम लखन सीता मन बसिया॥ ८ ॥

अर्थ – आपल्याला श्री रामाचे चरित्र ऐकण्यास आनंद प्राप्त होतो. श्री राम, सीता आणि लक्ष्मण तुमच्या हृदयात सहवास करतात.

सूक्ष्म रूप धरी सियहिं दिखावा।
बिकट रूप धरि लंक जरावा॥ ९ ॥

अर्थ – आपण अती क्षुष्म रुप सीता मातेला दाखवले, तर भयंकर रुप धारण करुन लंकेचे दहन केले.

भीम रूप धरि असुर सँहारे।
रामचन्द्र के काज सँवारे॥ १० ॥

अर्थ – आपण भिमकाय रुप धारण करून राक्षसांचा नाश केला. आणि श्री रामाचे उद्दिष्ट यशस्वी केले.

लाय सँजीवनि लखन जियाए।
श्रीरघुबीर हरषि उर लाए॥ ११ ॥

अर्थ – तुम्ही संजीवनी बुटी आणून लक्ष्मनाला जीवनदान दिले. त्यामुळे प्रभु श्रीरामानी आनंदित होऊन तुम्हाला आलिंगन दिले.

रघुपति कीन्हीं बहुत बड़ाई।
तुम मम प्रिय भरतहि सम भाई॥ १२ ॥

अर्थ – श्री रामचंद्र यांनी तुमची खूप प्रशंसा केली आणि म्हणाले की तुम्ही भरत सार सारखे माझे प्रिय भाऊ आहात.

सहस बदन तुम्हरो जस गावैं।
अस कहि श्रीपति कंठ लगावैं॥ १३ ॥

अर्थ – श्री राम आलिंगन देतात आणि म्हणतात की तुझे यश हजार मुखांनी उल्लेखनीय आहे.

सनकादिक ब्रह्मादि मुनीसा।
नारद सारद सहित अहीसा॥ १४ ॥

अर्थ – श्री सनक, श्री सनंदन, श्री सनतकुमार, श्री सनातन,मुनी ब्रम्हा, नारद मुनी, शेषनाग , सरस्वती जी सर्व तुमचे गुण गातात.

जम कुबेर दिक्पाल जहाँ ते।
कबी कोबिद कहि सकैं कहाँ ते॥ १५ ॥

अर्थ – यमराज, कुबेर इ. सर्व दिशांचे रक्षक, कवी विद्वान, पंडित किंवा कोणीही आपल्या कीर्तीचे पूर्ण वर्णन करू शकत नाही.

तुम उपकार सुग्रीवहिं कीन्हा।
राम मिलाय राजपद दीन्हा॥ १६ ॥

अर्थ – तुम्ही सुग्रीव आणि श्री राम यांची भेट करुन सुग्रीव जिन वर उपकार केले. सुग्रीवला राजपद मिळवून दिले.

तुम्हरो मन्त्र बिभीषन माना।
लंकेश्वर भए सब जग जाना॥ १७ ॥

अर्थ – बिभीषण ज्यानी आपल्या उपदेशाचे पालन केले. त्यामुळे ते लंकेचे राजा बनले.हे सर्व जगाला माहित आहे.

जुग सहस्र जोजन पर भानू।
लील्यो ताहि मधुर फल जानू॥ १८ ॥

अर्थ – जो सुर्य इतक्या योजन लांब आहे, की त्याच्याजवळ पोहचायला हजारो युग लागतील. दोन हजार योजन लाबिवर असलेल्या सूर्याला तूम्ही एक गोड फळ समजून गिळून घेतल.

प्रभु मुद्रिका मेलि मुख माहीं।
जलधि लाँघि गये अचरज नाहीं॥ १९ ॥

अर्थ – तुम्ही श्री रामाची अंगठी तोंडात धरून संपूर्ण समुद्र पार केला, यात काहीही आश्चर्य नाहि.

दुर्गम काज जगत के जेते ।
सुगम अनुग्रह तुम्हरे तेते॥ २० ॥

अर्थ – या जगात जितके काठीनाहून कठीण काम आहे,ते तुमच्या कृपेने सहज होतात.

राम दुआरे तुम रखवारे।
होत न आज्ञा बिनु पैसारे॥ २१ ॥

अर्थ – तुम्ही श्री रामचंद्रजींच्या दरवाज्याचे रक्षक आहात, ज्यामध्ये तुमच्या परवानगीशिवाय कोणालाही प्रवेश मिळत नाही, म्हणजेच राम कृपा तुमच्या आनंदाशिवाय दुर्मिळ आहे. तुमच्या प्रशांशेशिवाय श्री राम कृपा दुर्लभ आहे.

सब सुख लहै तुम्हारी शरना।
तुम रक्षक काहू को डरना॥ २२ ॥

अर्थ – जो तुम्हाला शरण येतो,त्या सर्वांना आनंद प्राप्त होतो. तूम्ही रक्षक असताना कुठल्याच प्रकारचे भय राहत नाही.

आपन तेज सम्हारो आपै।
तीनौं लोक हाँक ते काँपे॥ २३ ॥

अर्थ – तुमच्याशिवाय, तुमचा वेग कोणीही रोखू शकत नाही.तुमच्या गर्जनाने तिन्ही लोकात थरकाप होतो.

भूत पिशाच निकट नहिं आवै।
महाबीर जब नाम सुनावै॥ २४ ॥

अर्थ – जेथे महावीर हनुमान यांचे नाव उच्चारले जाते, तेथे भूत पिशाच जवळपासही भटकत नाही.

नासै रोग हरै सब पीरा।
जपत निरंतर हनुमत बीरा॥ २५ ॥

अर्थ – वीर हनुमान तुमचे निरंतर जप केल्याने सर्व रोग निघून जातात आणि सर्व त्रास नष्ट होतात.

संकट तें हनुमान छुड़ावै।
मन क्रम बचन ध्यान जो लावै॥ २६ ॥

अर्थ – हे हनुमान विचारात, कृती करण्यात, बोलण्यात ज्यांचे लक्ष नेहमी तुमच्यात असते, त्यांना सर्व संकटापासून तुम्ही सोडवतात.

सब पर राम तपस्वी राजा।
तिन के काज सकल तुम साजा॥ २७ ॥

अर्थ – तपस्वी राजा श्री राम सर्वात श्रेष्ठ आहेत, तूम्ही त्यांची सर्व कामे सहज केले.

और मनोरथ जो कोई लावै।
सोहि अमित जीवन फल पावै॥ २८ ॥

अर्थ – ज्याच्यावर तुमची कृपा आहे, त्यानें कुठलीही इच्छा व्यक्त केली तर त्याला असे फळ मिळते की त्याची आयुष्यात काही सीमा नाही.

चारों जुग परताप तुम्हारा।
है परसिद्ध जगत उजियारा॥ २९ ॥

अर्थ – आपली किर्ती चारही युगात, सत्युग, त्रेतायुग, द्वापार, कली युगात पसरली आहे. आपली किर्ती जगात सर्वत्र प्रकाशित आहे.

साधु संत के तुम रखवारे।
असुर निकंदन राम दुलारे॥ ३० ॥

अर्थ- हे श्री रामाचे प्रिय, तुम्ही सज्जनांचे रक्षण करता आणि दुष्टांच्या नाश करतात.

अष्ट सिद्धि नौ निधि के दाता।
अस बर दीन्ह जानकी माता॥ ३१ ॥

अर्थ – तुम्हाला श्री जानकी माते कडून अस वरदान भेटला आहे, ज्याद्वारे तूम्ही कोणालाही आठ सिद्दी आणि नऊ निधी देऊ शकता.

राम रसायन तुम्हरे पासा।
सदा रहो रघुपति के दासा॥ ३२ ॥

अर्थ – तुम्ही निरंतर रघुनाथांच्या आश्रयमध्ये राहतात. तुम्हाला म्हातारपण आणि असाध्य रोगाचे निर्मूलन करण्यासाठी राम नामाचे औषधी आहे.

तुम्हरे भजन राम को पावै।
जनम जनम के दुख बिसरावै॥ ३३ ॥

अर्थ – तुमची पूजा केल्याने श्री रामांची प्राप्ती होते. जन्म- जन्मांतराचे दुःख दूर होते.

अंत काल रघुबर पुर जाई।
जहाँ जन्म हरिभक्त कहाई॥ ३४ ॥

अर्थ – अंत काळी श्री रघुनाथ धामाला जातात.आणि जर पुन्हा जन्म घेतला तरी पण भक्ती करतील, रामभक्त म्हणुन ओळखले जातील.

और देवता चित्त न धरई।
हनुमत सेइ सर्व सुख करई॥ ३५ ॥

अर्थ – हे हनुमान, तुमची सेवा केल्याने सर्व प्रकारचे सुख मिळतात. मग दुसऱ्या कुठल्या देवतांची सेवा करण्याची आवश्यकता नाही.

संकट कटै मिटै सब पीरा।
जो सुमिरै हनुमत बलबीरा॥ ३६ ॥

अर्थ – हे वीर हनुमान,जो तुमचे एकत राहतो,त्याची सर्व संकट दूर होतात.सर्व त्रास नाहीसे होतात.

जय जय जय हनुमान गोसाईं।
कृपा करहु गुरुदेव की नाईं॥ ३७ ॥

अर्थ – हे हनुमान स्वामी, तुमचा जयजयकार असो. जय हो, जय हो, कृपाळू होऊन माझ्यावर कृपा करा.

जो शत बार पाठ कर कोई।
छूटहि बंदि महा सुख होई॥ ३८ ॥

अर्थ – जो कोणी या हनुमान चालीसा चे शंभर वेळा पठण करेल,तो सर्व बंधनातून मुक्त होईल आणि त्याला परम आनंदाची प्राप्ती होईल.

जो यह पढ़ै हनुमान चालीसा।
होय सिद्धि साखी गौरीसा॥ ३९ ॥

अर्थ – भगवान शंकर साक्षी आहे की जो कोणी याचे वाचन करेल त्याला नक्की यश भेटेल.

तुलसीदास सदा हरि चेरा।
कीजै नाथ हृदय महँ डेरा॥ ४० ॥

अर्थ – हे नाथ, हनुमान जी, तुलसीदास सदैव श्री रामाचा सेवक आहे. म्हणून तुम्ही त्याच्य हृदयात निवास करा.

|| दोहा ||

पवनतनय संकट हरन मंगल मूरति रूप।
राम लखन सीता सहित हृदय बसहु सुर भूप॥

अर्थ – हे संकट मोचन पवन कुमार, आपण आनंद मंगलाची प्रतिमा आहात.हे देवराज, तूम्ही श्री राम, सीता आणि लक्ष्मण सहित माझ्या ह्रदयात निवास करा.

हे पण वाचा : Maruti stotra in marathi

हनुमान चालीसा मराठी अर्थ | Hanuman Chalisa Meaning In Marathi

मला आशा आहे की Hanuman Chalisa lyrics with meaning in Marathi हा लेख तुम्हाला आवडला असेल.या लेखात हनुमान चालीसा मराठी अर्थ या मध्ये आपल्याला काही शंका असल्यास किंवा त्यामध्ये काही सुधारणा झाली पाहिजे असे आपल्याला वाटत असल्यास, यासाठी आपण आम्हाला ईमेल लिहून सांगू शकता.

आपल्याला हा लेख आवडला असेल किंवा यातून काही नवीन शिकायला मिळाले असेल तर कृपया ही माहिती जास्तीत जास्त इतरांपर्यन्त पोहचवा.फेसबुक,ट्विटर आणि इतर सोशल मीडिया साइट्स वर हे शेअर करा.धन्यवाद.

हे पण वाचा :

4 thoughts on “Hanuman Chalisa Meaning In Marathi | हनुमान चालीसा मराठी अर्थ”

  1. अप्रतिम शब्दांकन.
    ज्या ज्या व्यक्तीने ” हनुमान चालीसा ” अर्थासह पठण केली त्यास हनुमंत राया प्रचिती देतातच…
    कलियुगात तरण्याचे हे अमृत आहे…

    उत्तर
  2. जय श्री राम ; पवनपुत्र हनुमान कि जय , पवन पुत्र हानुमान कि जय… शंकराचे अवतार , महाबली, महापराक्रमी हनुमान कि जय …. आणि आपल्या अमुल्य प्रस्तुतीबद्दल खूप खूप आभार ,,,,,,,

    उत्तर

प्रतिक्रिया द्या