Information Of Football In Marathi : सर्वांचा आपआपला आवडत खेळ असतो.काहींना क्रिकेट आवडतो तर काहींना कबड्डी खेळायला आवडत.फुटबॉल हा खेळ सुद्धा बऱ्याच लोकांना आवडतो.
जसे क्रिकेट जगभरात लोकप्रिय आहे.त्याचप्रमाणे,football देखील एक लोकप्रिय खेळ आहे.फुटबॉलमध्ये काहीं महान खेळाडू आहेत. ज्यांनी फुटबॉलकडे प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे.
फुटबॉलपटूच्या उत्तम कामगिरीमुळे आणि मेहनतीमुळे आज football प्रचंड लोकप्रिय खेळ झाला आहे.हेच कारण आहे की लोकांना फुटबॉल बद्दल माहिती जाणून घेण्याची उत्सुकता आहे.म्हणून आज आम्ही तुम्हाला फुटबॉल खेळाची संपूर्ण माहिती देणार आहोत.

अनुक्रमणिका
फुटबॉल या नावाचा उगम – Football Information in Marathi
फुटबॉल या नावाचा उगम कसा झाला याचा विचार केला,तर लोकांमध्ये बरीच वेग वेगळी मते आहेत.FIFA च्या म्हणण्यानुसार, फुटबॉल हा चिनी खेळाच्या सुझूचा विकसित प्रकार आहे, म्हणजेच चीनमध्ये खेळल्या गेलेल्या खेळाला सुझू असे म्हणतात.
हा खेळ चीनमध्ये हूण वंशाच्या काळात विकसित झाला होता. जपानमध्ये असुका राजवटीच्या कारकिर्दीत फुटबॉलचा खेळ कॅमरी नावानेही ओळखला जात असे.नंतर १५८६ मधे जॉन डेव्हिस जो एक जहाजाचा कॅप्टन होता.त्याने व त्याचा कामगारांनी ग्रीनलँड मध्ये हा खेळ खेळला.
१५ व्या शतकात हा खेळ फुटबॉलच्या नावाखाली Scotland मध्ये खेळला गेला. अशाप्रकारे, फुटबॉल या शब्दाचे मूळ सांगितले गेले आहे.म्हणजेच football पूर्वी खूप खेळला गेला होता परंतु वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या नावांनी ओळखला जात असे.
फुटबॉल खेळाचा इतिहास – Football History in Marathi
आधी सांगितल्याप्रमाणे की यापूर्वी फुटबॉल खेळ खेळला गेला, परंतु नंतर त्याचे नाव फुटबॉल ठेवले गेले.ब्रिटनचा राजकुमार हेनरी चौथा इ.स. १४०८ मध्ये इंग्रजीमध्ये फुटबॉल हा शब्द वापरला.
१५२६ मध्ये इंग्लंडचा राजा हेनरी आठवा यांनी फुटबॉल खेळण्यात रस दाखवला आणि एक खास प्रकारचे बूट बनविला. सर फिलिप सिडनी यांनी १५८० मध्ये एका कवितेत महिला फुटबॉल खेळताना वर्णन केले होते.
१६ व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि १७ व्या शतकाच्या प्रारंभात प्रथमच गोलची कल्पना विकसित झाली.याचामुळे फुटबॉल खेळामध्ये स्पर्धेची भावना निर्माण झाली.खेळाडूंनी शेताच्या दोन विरुद्ध बाजूस झाडे लावून गोलपोस्ट बांधले. १७ व्या शतकात ८ किंवा १२ गोलांचा सामना खेळला जात असे.
फुटबॉल खेळ प्रसिद्ध कसा झाला – Football Mahiti Marathi
१९ व्या शतकात इंग्लंडच्या सार्वजनिक शाळांमध्ये विविध प्रकारांसह फुटबॉल मोठ्या प्रमाणात खेळला जात असे.इतिहासकारांच्या म्हण्यानुसार, फुटबॉल क्लबची सुरूवात एडिबर्गमध्ये १८२४ मध्ये झाली होती.
सुरवातीला क्लबची स्थापना विद्यार्थ्यांनी केली.त्यातील एक शेफील्ड फुटबॉल क्लब आहे जो एक इंग्रजी फुटबॉल क्लब आहे.त्याची स्थापना २४ ऑक्टोबर १८५७ रोजी झाली.
हा जगातील सर्वात जुना सक्रिय फुटबॉल क्लब आहे. इंग्लिश क्लब नोट्स काउंटी १८६२ मध्ये स्थापन झाला.खेळाचा प्रसार होऊ लागला आणि व्यापाऱ्यांनी फुटबॉलमध्ये रस दर्शविला.
प्रथम फुटबॉल स्पर्धा १८७२ मध्ये इंग्लंड आणि स्कॉटलंड यांच्यात खेळली गेली होती.हा खेळ पाहण्यासाठी ४००० लोक आले होते. गेम 0-0 च्या बरोबरीत झाला.१८८३ मध्ये जगातील पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला गेला, ज्यात आयर्लंड, इंग्लंड, स्कॉटलंड आणि वेल्सच्या संघांनी भाग घेतला.
अशाप्रकारे इंग्लंडमध्ये फुटबॉलची भरभराट झाली आणि लवकरच युरोपियन खंडात ती पसरली. हा खेळ सर्वप्रथम अर्जेंटिनामध्ये युरोपच्या बाहेर खेळला गेला.
फिफा वर्ल्ड कपची सुरुवात
१९०४ मध्ये पॅरिसमध्ये आंतरराष्ट्रीय फुटबॉल संघ फिफाची स्थापना झाली आणि फुटबॉल संघटनेचे नियम पाळावे लागतील अशी घोषणा करण्यात आली.
फिफाच्या कायद्यावर फ्रान्स, बेल्जियम, डेन्मार्क, नेदरलँड्स, स्पेन, स्वीडन आणि स्वित्झर्लंडच्या प्रतिनिधींनी सही केली होती.सुरुवातीला इंग्लंड व इतर ब्रिटिश देश यात समविषट झाले नव्हते.
१९१३ मध्ये फिफा आंतरराष्ट्रीय फुटबॉल असोसिएशन बोर्डाच्या प्रतिनिधीत्व कार्यामुळे जगात फुटबॉलची लोकप्रियता वाढली.
त्यानंतर हळूहळू हा खेळ जगभर पसरला आणि फुटबॉलबद्दल लोकांची आवड वाढू लागली. यात सध्या फिफाचे चार प्रतिनिधी आणि चारही ब्रिटीश असोसिएशनचे प्रतिनिधी मंडळ आहे.
जगभरात फुटबॉल खेळला जात आहे.कोट्यावधी लोक नियमितपणे त्यांच्या आवडत्या संघांचे सामने पाहण्यासाठी फुटबॉलच्या मैदानावर जातात.लाखो लोक टेलिव्हिजनवर मोठ्या आवडीने फुटबॉल पाहतात.
तुम्ही फुटबॉल प्रशिक्षण आणि मैदानी उपकरणे शोधत असाल, तर या Amazon India फुटबॉलला नक्की भेट द्या.
भारतात फुटबॉलची सुरुवात | Indian Football History In Marathi Language
भारतात क्रिकेट हा प्रसिद्ध खेळ आहे.मात्र फुटबॉल ही मागे नाही.भारतात देखील फुटबॉलप्रेमींची संख्या दिवसंदिवास वाढत आहे.पश्चिम बंगाल आणि ईशान्येकडील राज्यात फुटबॉल जास्त खेळला जातो.
भारत ब्रिटनची वसाहत आहे, म्हणून ब्रिटीश खेळांनाही भारतात मान्यता मिळाली.भारतात फुटबॉल लोकप्रिय झाला असेल तर यात नागेंद्र प्रसाद सरबाधिकारी यांचे योगदान हे खूप मोलाचे आहे.त्यांना भारतीय फुटबॉलचा जनक देखील म्हटले जाते.
हा खेळ सर्वप्रथम भारतातील शाळेच्या मैदानात सुरू झाला. नागेंद्र प्रसाद यांनी फुटबॉलच्या संवर्धनात संपूर्ण सहकार्य केले, त्यांनी बॉयज क्लबची स्थापना केली.१८८० पर्यंत कोलकातामध्ये अनेक फुटबॉल क्लब तयार झाले.
१९५० मध्ये भारत फुटबॉल वर्ल्डकप साठी पात्र ठरला.पण विश्वचषकात जाण्यासाठी भारतीय संघाकडे पैसे नव्हते.त्या काळात विश्वचषकांपेक्षा भारताने ऑलिम्पिकला अधिक महत्त्व दिले.भारताने पुढे फुटबॉलमध्ये भाग घेतला.
१९५६ आणि १९५८ च्या ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघ चौथ्या स्थानावर होता.या काळाला भारतीय फुटबॉलचा सुवर्णकाळ म्हणतात. या नंतर भारतातील फुटबॉल खेळाची लोकप्रियता वाढली.
फुटबॉल खेळाचे स्वरूप
फुटबॉलचा खेळ पायांनी खेळला जातो ज्यामध्ये खेळाडू पायांनी गोल करतात.हा खेळ एका गोल बॉलने खेळला जातो. हा खेळ पायांनी खेळला जात असल्याने त्याला फुटबॉल म्हणतात.
११ खेळाडूंचे दोन संघ आहेत.एका संघातील खेळाडू बॉलला दुसर्या संघाच्या गोलपोस्टमध्ये टाकण्याचा प्रयत्न करतात.ज्या संघाचा खेळाडू दुसर्या संघाच्या गोलपोस्टमध्ये बॉल टाकतो,त्याला गोल हा पॉइंट भेटतो.ज्या संघाचे जास्त गोल तो संघ विजयी ठरतो.
हा खेळ ९० मिनिटांचा असतो.यात ४५ मिनिटानंतर १५ मिनिटांचा एक ब्रेक घेतला जातो.
फुटबॉल ची साइज
आताच्या काळात फुटबॉल अधिक चांगल्या रीतीने बनवले जात आहेत.नावाजलेल्या फुटबॉल कंपन्या स्थापित झाल्या आहेत.
या कंपन्या खेळाडूंचे वय, मैदान कोणते इत्यादी गोष्टी लक्षात घेऊन फुटबॉलची निर्मिती करीत आहेत.एक सॉकर बॉल ५८ सेमी ते ६१ सेमी दरम्यान परिघाचा गोलाकार बॉल असतो.
फूटबॉल खेळाचे मैदान | फुटबॉल मैदानाची आकृती
फुटबॉल मैदानाच्या लांबीला साइडलाइन आणि रुंदीला गोल लाइन म्हणतात. मैदान ५० गज, १०० ते १३० यार्ड आयताकृती आकाराचे असतं.
खेळण्याच्या मैदानाच्या मध्यभागी एक ओळ असते जी क्षेत्राला दोन समान भागांमध्ये विभाजित करते.मध्यवर्ती भागातून दहा यार्डचे वर्तुळ काढले जाते.याला आरंभ कालावधी म्हणतात.
मैदानाच्या दोन्ही टोकांवर ८ यार्ड रुंद गोल फील्ड असतात.गोल क्षेत्राच्या दोन्ही बाजूला १८.१८ यार्डचे आयताकृती पेनळटी क्षेत्र असतं.
फुटबॉल मैदानाची लांबी | Football Ground Information In Marathi
आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी खेळपट्टीची लांबी ११० मीटर आणि रुंदी ६४ ते ७५ मीटर असतं.तर इतर खेळांमध्ये त्याची लांबी ९१ ते १२० मीटर आणि रुंदी ४५-९१ मीटर असतं. सहसा जाळे गोलच्या मागे ठेवले जाते.परंतु असे कोणते नियम नाही.
फुटबॉल खेळाची माहिती मराठी नियम
फुटबॉलच्या इतिहासाबद्दल जाणून घेतले.आता फुटबॉल कसा खेळला जातो त्याचे नियम काय आहेत हे देखील जाणून घेणे फार महत्वाचे आहे.फुटबॉलचे नियम आणि फुटबॉल कसे खेळले जाते याबद्दल सविस्तर जाणून घ्या.

फुटबॉल सामना दोन संघांदरम्यान खेळला जातो. ज्यामध्ये दोन्ही संघात ११-११ खेळाडू असतात.एकूण ९० मिनिटांचा हा खेळ असतो.हा गेम गोल करणे आणि विरुद्ध संघ काढून गोल वाचवणे असा रीतीने खेळला जातो.
ज्याप्रमाणे क्रिकेटच्या खेळात पंच असतात, त्याचप्रमाणे फुटबॉलमध्येही सर्व अधिकार रेफरीकडे असतात. रेफरीचा निर्णय वैध असतो. रेफरीबरोबर सहाय्यक रेफरी असतो जो रेफरीला सहाय्य करतो.
नाणेफेक खेळ सुरू होण्यापूर्वी केला जातो ज्यामध्ये विजयी कर्णधार असा निर्णय घेतो की त्याच्या टीमला गोलपोस्टवर अटॅक करायचा आहे. किंवा चेंडूला किक ऑफ मारायची आहे.
फुटबॉल गेममधील सर्वात मनोरंजक गोष्ट अशी आहे की जेव्हा जेव्हा सामन्यात गोल होते तेव्हा चेंडू पुन्हा मध्य रेषेवर ठेवला जातो व सामना पुढे खेळला जातो.
फुटबॉलच्या गेममध्ये एक स्ट्रायकर असतो ज्याचे काम हे गोल करणे असतं. विरुद्ध संघातील जे खेळाडू समोरच्याल गोल करण्यापासून रोखतात त्यांना डिफेंडर्स म्हणतात.
जो खेळाडू विरोधी संघाकडून चेंडू पायाने खेचून घेतो आणि आपल्या सह खेळाडूंना चेंडू पास करतो त्यांना मिडफिल्डर्स म्हणतात.
गोलकीपरचे काम हे गोल होण्यापासून रोखणे असतं.हे काम गोल पोस्टसमोर उभे राहून करावे लागते.
फुटबॉल किक बद्दल देखील जाणून घ्या
- किक ऑफ – खेळाची वेळ किक सह सुरू होते, त्याला किकऑफ म्हणतात.
- थ्रो-इन किक – जेव्हा बॉल संपूर्णपणे मैदानाबाहेर जातो,जो खेळाडू बॉलला शेवटी स्पर्श करतो त्याचा विरोधी संघास ही किक मिळते.
- इनडायरेक्ट फ्री किक – जेव्हा एखाद्या विशिष्ट फाऊल मुळे चेंडू मैदाना बाहेर जातो आणि खेळ थांबविला जातो तेव्हा संघाला इनडायरेक्ट फ्री किक मिळते.
- कॉर्नर किक – जेव्हा चेंडू गोलशिवाय गोल रेषा पूर्णपणे पार करतो तेव्हा डिफेंस विरुद्ध संघाला कॉर्नर किक दिली जाते.
- गोल किक – जेव्हा बॉल गोल रेषा ओलांडतो,गोलशिवाय स्कोर होतो तेव्हा डिफेंस संघाला गोल किक दिली जाते.
फुटबॉल खेळामध्ये पेनल्टी
- ड्रॉप्ड बॉल – जेव्हा खेळाडूला गंभीर दुखापत होते व इतर काही कारणास्तव रेफरी खेळ थांबवतो तेव्हा त्याला ड्रॉप बॉल असे म्हणतात.
- रेड कार्ड – गेममध्ये दुसर्या वेळी यलो कार्ड मिळणे म्हणजे रेड कार्ड मिळणे झाले.रेड कार्ड मिळाल्यामुळे त्या खेळाडूला मैदानाबाहेर जावं लागतं.दुसरा कोणताही खेळाडू त्याचा जागी येऊ शकत नाही.
- ऑफ साइड – या नियमात, पुढाकार घेणारा खेळाडू चेंडूचा बचाव केल्याशिवाय दुसर्या खेळाडूच्या पुढे जाऊ शकत नाही, विशेषत: विरोधी संघाच्या गोलरेषेच्या अगदी जवळ जाऊ शकत नाही.
- पेनाल्टी शूटआऊट – लीग गेममध्ये खेळ ड्रॉ होऊन संपू शकतो.परंतु काही नॉकआउट खेळांमध्ये असे करता येत नाही.आशा परिस्थितीत, पेनल्टी शूटआउट नियम वापरला जातो, या नियमानुसार पहिल्या पेनल्टी पॉईंटपासून किक मारण्यास सांगितले जाते.
- पेनल्टी क्षेत्र – पेनल्टी क्षेत्र हे गोलच्या समोर असलेले क्षेत्र आहे. हे क्षेत्र वर्तुळ रेषेद्वारे ओळखले जाऊ शकते. हे गोलपोस्टपासून १६.५ मीटर अंतरावर असतं.
- पेनल्टी किक – जर गोलरक्षकाची पोजीशन किंवा डिफेंस संघाने फाउल केला तर शिक्षा म्हणून पेनल्टी किक दिली जाते.
World Top Ten Football Clubs Name In Marathi
फुटबॉल क्लब | फुटबॉल लीग | देश |
---|---|---|
बार्सिलोना (Barcelona) | ला लीगा | स्पेन |
रियल माद्रिद (Real Madrid) | ला लीगा | स्पेन |
बायर्न म्यूनिच (Bayern Munich) | बुंडेस्लिगा | जर्मनी |
मँचेस्टर युनायटेड (Manchester United) | प्रीमियर लीग | इंग्लंड |
लिव्हरपूल (Liverpool) | प्रीमियर लीग | इंग्लंड |
मॅनचेस्टर सिटी (Manchester City) | प्रीमियर लीग | इंग्लंड |
चेल्सी (Chelsea) | प्रीमियर लीग | इंग्लंड |
आर्सेनल (Arsenal) | प्रीमियर लीग | इंग्लंड |
पीएसजी (PSG) | लिग १ | फ्रान्स |
टोटेनहॅम (Tottenham) | प्रीमियर लीग | इंग्लंड |
Football Game Information In Marathi
आम्हाला आशा आहे की Information Of Football In Marathi हा लेख तुम्हाला आवडला असेल.या लेखात फुटबॉल खेळा बद्दल आपल्याला काही शंका असल्यास किंवा त्यामध्ये काही सुधारणा झाली पाहिजे असे आपल्याला वाटत असल्यास, यासाठी आपण कमेन्ट लिहून किंवा ईमेल करून आम्हाला सांगू शकता.
आपल्याला हा लेख आवडला असेल किंवा यातून काही नवीन शिकायला मिळाले असेल तर कृपया ही माहिती जास्तीत जास्त इतरांपर्यन्त पोहचवा. फेसबुक,ट्विटर आणि इतर सोशल मीडिया साइट्स वर हे शेअर करा.धन्यवाद !!
हे पण वाचा : Kabaddi information in marathi
Kho Kho Information In Marathi
फुटबॉल खेळा बद्दल काही प्रश्न (FAQs)
फुटबॉल संघात ११ खेळाडू असतात.
फुटबॉल हा ब्राजील देशात फार लोकप्रिय आहे.
फुटबॉल हा फ्रांस, हैती, इस्राइल, इटली, मॉरीशस आणि पोलंड या देशांचा राष्ट्रीय खेळ आहे.
आधुनिक फुटबॉल या खेळाची सुरवात इंग्लंड देशात झाली.
आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामन्याची सामान्य वेळ ही ९० मिनिट असते.
भारताचा सर्वात जून फुटबॉल कप Durand Cup (ड्युरंड कप) आहे.ही पहिली भारतीय फुटबॉल स्पर्धा १८८८ मध्ये शिमल्यात खेळली गेली होती. ह्या कपची सुरुवात सर Mortimer Durand (मॉर्टिमर ड्युरंड) यांनी केली होती.