Kabaddi Information In Marathi : कबड्डी खेळाचा इतिहास, मैदान,नियम व इतर संपूर्ण माहिती (Rules, History, Ground)
दक्षिण आशियातील एक प्रसिद्ध खेळ म्हणून कबड्डी ची ओळख आहे.महाराष्ट्राच्या गावोगावी खेळला जाणारा कबड्डी हा अस्सल देशी खेळ आहे.जो देशात सर्वत्र खेळला जातो.
कबड्डी बद्दल लोकांचे आकर्षण वाढत चालले आहे. हा खेळ अधिक लोकप्रिय होत आहे. ह्याच पार्श्वभूमीवर आम्ही वाचकांना कबड्डीची संपूर्ण माहिती (kabaddi mahiti in marathi) देणार आहोत.
भारतात कबड्डी हा खेळ खूपच प्राचीन काळापासून केला जातो.पूर्वी मातीत खेळला जाणारा हा खेळ सध्या मॅटवर पण खेळला जातो.
कुस्ती प्रमाणे अस्सल मर्दानी खेळ म्हणून कबड्डीची ओळख आहे. आज महिलादेखील कबड्डी हा खेळ अतिशय उत्स्फूर्तपणे खेळत आहे.
भारतात कबड्डी हा खेळ तालुका, जिल्हा, राज्य आणि राष्ट्र अशा विविध पातळींवर खेळला जातो.अतिशय रंजक रित्या आणि उत्स्फूर्तपणे खेळला जाणारा हा खेळ आता आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील खेळला जात आहे.

Kabaddi Information In Marathi – कबड्डी खेळाची प्रस्तावना
खेळ कोणताही असो तो खेळणे खूप उपयोगी असते.खेळ खेळल्यामुळे आपण तंदुरुस्त आणि ताजेतवाने राहतो.मैदानी खेळ खेळणे आरोग्यासाठी चांगले असते.
एकीकडे क्रिकेट फुटबॉल, टेनिस, व्हॉलिबॉल इत्यादि game वीदेशी आहेत.त्या खेळासाठी लागणारे साहित्य आपल्याला विकत घ्यावे लागते तर दुसरीकडे कोणताही खर्च न येता खेळले जाणारे खेळ कबड्डी, खो-खो, कुस्ती इत्यादी देशी खेळ आहेत.
कबड्डी खेळ खेळण्यासाठी कमी जागा लागते.लहान मैदानात मधोमध एक रेखा मारली जाते.खेळाडूंचे दोनसंघ केले जातात.
प्रत्येक संघामध्ये बारा खेळाडू असतात त्यापैकी सात खेळाडू मैदानात खेळण्यासाठी उतरतात. खेळ सुरू होण्यापूर्वी सर्वप्रथम नाणेफेक केली जाते.
नाणेफेक जिंकल्यास संघामधून खेळाडू कबड्डी कबड्डी म्हणत विरोधी संघाच्या अंगणात(कोर्ट) जातो. विरोधी संघातील खेळाडूंना स्पर्श करून दम न सोडता तो खेळाडू परत आला तर विरोधी संघाच्या जितक्या खेळाडूंना त्याने स्पर्श केला ते खेळाडू बाद समजले जातात.
बाद झालेल्या खेळाडूंची गुण विजयी संघाला मिळतात.कबड्डी हा महाराष्ट्राच्या मातीतील खेळ आहे.हा खेळ खेळण्यासाठी चातुर्य आणि ताकत याची गरज असते.
कबड्डीचा इतिहास – History Of Kabaddi In Marathi
कबड्डीचा उल्लेख फार प्राचीन काळातही सापडतो.अगदीच सांगायचं झालं तर आपल्या संत तुकारमांनी देखील त्यांचा एका अभंगात कबड्डीचा उल्लेख केलेला आहे.आपले आराध्य श्री कृष्ण कबड्डी हा खेळ खेळत असे,असं त्यांनी म्हणतले आहे.
भारतात अनेक गोष्टींची सुरुवात झाली आहे.तसेच काही जाणकारांच्या मते सुमारे ४००० वर्षापूर्वी तमिळनाडू या राज्यात कबड्डीची सुरवात झाली म्हणे.कबड्डी असे नाव तामिळ शब्द काई-पिडी यावरून पडले आहे.काई-पिडी या शब्दाचा अर्थ “हात पकडणे” असा आहे.
पूर्वीच्या काळी राजे,राजकुमार व इतर मर्द गडी कबड्डी हा खेळ आपले कसदार शरीर आणि शक्तिचे प्रदर्शन करण्यासाठी खेळत असे.असे म्हणतात हे पाहून राजकुमारी,कुमारी व महिला आकर्षित होत असे.
महाभारताच्या काळात देखील कबड्डी हा प्रसिद्ध खेळ होता.कबड्डी खेळ मनोरंजनापेक्षा वेग, तंदुरुस्ती, रोमांच या साठी अधिक खेळला जात असे.
१९९०च्या दशकात बीजिंग आशियाई क्रीडा स्पर्धेत कबड्डीचा समावेश करण्यात आला.
आत्ताची कबड्डी – Kabaddi Game Information in Marathi
कबड्डीला बांगलादेश आणि पूर्व भारतात HA-DO-DO, पश्चिम भारतात HU-TU-TU, उत्तर भारतात कौनबाडा आणि दक्षिण भारतात चेडुगुडू या नावांनी देखील ओळखले जाते.
जस जसा काळ बदलत गेला तस तसा कबड्डी हा खेळ विकसित आणि सुधारत गेला.कबड्डी हा खेळ विविध प्रांतात विविध नावाने खेळला जातो.जसे की दक्षिण भारतात वीरा विलातु या नावाने कबड्डी खेळ खेळला जातो.
कबड्डी भारतात लोकप्रिय खेळ झाला.काही वर्षानंतर जगभरातील ६५ हून अधिक राष्ट्रांमध्ये कबड्डीचा झपाट्याने प्रसार झाला. आज कबड्डी हा बांगलादेशचा राष्ट्रीय खेळ आहे.
कबड्डी भारत, पाकिस्तान, नेपाळ, जपान, मलेशिया, थायलंड, अर्जेंटिना, चीन, इराण, कॅनडा आणि इतर राष्ट्रांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे.
कबड्डी मैदान – Kabaddi Ground Information In Marathi
कबड्डी खेळासाठी लागणारे क्रीडांगणाची तीन गटात वर्गवारी केली जाते.
- पुरुष व कुमार गटाच्या मुलांसाठी १३ मीटर बाय १० मीटर
- महिला व कुमारी गटाच्या मुलींसाठी १२ मीटर बाय ०८ मीटर
- किशोर व किशोरी गटाच्या मुला मुलींसाठी ११ मीटर बाय ०८ मीटर असे आयताकृती क्रीडांगण बनवतात.
क्रीडांगण बनवताना बारीक चाळलेली माती व शेणखत यांचा वापर केला जातो.एकसारखे सपाट मैदान बनवले जाते.पूर्वी फक्त खुल्या मैदानावर होणारा हा खेळ आता बंदिस्त जागेत व मॅटवर देखील खेळला जात आहे.

क्रीडांगणा वीषयी माहिती – कबड्डी ग्राउंड माप
पुरुष व कुमार गट मुले यांचा साठी
- क्रीडांगणाची रुंदी १० मीटर व लांबी १३ मीटर असते.
- मध्यरेषा ६.५० मीटरवर असते. राखीव क्षेत्र क्रिडांगणाच्या दोन्ही बाजूस १ मीटरवर असते.
- निदान रेषा क्रिडांगणाच्या मध्य रेषेपासून ३.५० मीटर अंतरावर असते.
- निदान रेषेपासून १ मीटर अंतरावर अंतिम रेषेच्या बाजूस एक रेषा बोनस रेषा म्हणून आखली जाते.
- सीटिंग बॉक्स ८ मीटर बाय एक मीटर असून तो अंतिम रेषेपासून २ मीटरवर असतो.
महिला व कुमारी यांचा साठी
- क्रीडांगणाची रुंदी ०८ मीटर व लांबी १२ मीटर असते.
- मध्यरेषा ०६ मीटरवर असते. राखीव क्षेत्र क्रिडांगणाच्या दोन्ही बाजूस १ मीटरवर असते.
- निदान रेषा क्रिडांगणाच्या मध्य रेषेपासून ३ मीटर अंतरावर असते.
- निदान रेषेपासून १ मीटर अंतरावर अंतिम रेषेच्या बाजूस एक रेषा बोनस रेषा म्हणून आखली जाते.
- सीटिंग बॉक्स ६ मीटर बाय एक मीटर असून तो अंतिम रेषेपासून २ मीटरवर असतो.
किशोर व किशोरी गटाच्या मुला मुलींसाठी
- क्रिडांगणाची रुंदी ०८ मीटर व लांबी ११ मीटर असते.
- मध्यरेषा ५.५० मीटरवर असते. राखीव क्षेत्र क्रिडांगणाच्या दोन्ही बाजूस १ मीटरवर असते.
- निदान रेषा क्रिडांगणाच्या मध्य रेषेपासून २.५० मीटर अंतरावर असते.
- निदान रेषेपासून १ मीटर अंतरावर अंतिम रेषेच्या बाजूस एक रेषा बोनस रेषा म्हणून आखली जाते.
- सीटिंग बॉक्स ४ मीटर बाय ०१ मीटर असून तो अंतिम रेषेपासून २ मीटरवर असतो.
कबड्डी खेळाचे नियम – Kabaddi Rules In Marathi
कबड्डी हा एक सोपा खेळ आहे.ज्यामध्ये प्रत्येक संघातील एक खेळाडू “कबड्डी…कबड्डी…कबड्डी…” असे ओरडतो आणि विरोधी संघाच्या अर्ध्या भागामध्ये (court) प्रवेश करतो.त्याच्या संघाकडे परत येण्यापूर्वी कमीतकमी एका विरोधी खेळाडूला स्पर्श करण्याचा प्रयत्न करतो.
दुसरीकडे, सर्व सात खेळाडू त्या प्रतिस्पर्ध्याच्या खेळाडूला त्याच्या अर्ध्या भागात(court) सुरक्षितपणे परत जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करतात आणि त्याला पकडतात आणि तो बाहेर जाईपर्यंत त्याला आपल्या नियंत्रणाखाली ठेवतात
जर एखाद्या खेळाडूने प्रतिस्पर्ध्याला स्पर्श केला आणि त्याच्या अर्ध्या भागात सुरक्षितपणे परत आला, तर त्याने स्पर्श केलेला खेळाडू बाद ठरतो आणि त्याच्या आधी आऊट झालेल्या त्याच्या स्वतःच्या खेळाडूला देखील परत आणतो.
सन १९३४ मध्ये भारतात कबड्डीचे नियम तयार करण्यात आले.
सर्वसाधारण नियम – Kabaddi Khelachi Mahiti
नानेफेक जिंकणारा संघ अंगण(court) किंवा चढाई (raid) यापैकी एक निवड करतो. दुसऱ्या डावात अंगण बदलून अगोदर असतील तेवढेच खेळाडू घेऊन डाव सुरू करण्यात येतो.त्यावेळी प्रथम ज्या संघाने चढाई केलेली नसते तो संघ चढाई करतो.
- एका कबड्डी संघात १२ खेळाडू असतात आणि एकावेळी फक्त ७ खेळाडू मैदानात खेळतात.
- कबड्डी खेळात वीस वीस मिनिटांचे दोन डाव खेळवले जातात.त्यामध्ये ५ मिनिटांचा ब्रेक आहे. पहिल्या २० मिनिटांनंतर दोन्ही संघ आपले अंगण(court) बदलतात.
- महिलांसाठी १५-१५ मिनिटांच्या २ डाव घेतले जातात.
- हा खेळ नियमांतर्गत खेळला जाण्यासाठी पंचांचा निर्णय अंतिम ठरवले जातात.
- सामना सुरू झाल्यानंतर लॉबी परिसरही मैदानाचा भाग बनतो.
- जेव्हा बचाव करणाऱ्या संघाचा खेळाडू मागच्या ओळीच्या बाहेर जातो तेव्हा तो खेळाडू बाद होतो.
- आक्रमण (Raider) करणारा खेळाडू सतत कबड्डी-कबड्डी बोलतो, तो मध्येच बोलायचं थांबला तर तो खेळाडू बाद समजला जातो.
- पंचांनी रेडरला कोणत्याही नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल चेतावणी दिल्यानंतर, त्याने पुन्हा नियमाचे उल्लंघन केल्यास, १ गुण विरोधी संघाला दिला जातो परंतु रेडरला आउट केले जात नाही.
- जर एकापेक्षा जास्त आक्रमणकर्ते (raider) विरोधी भागात(court) गेले तर पंच परत त्यांना त्यांचा भागात पाठवून त्यांना बाद ठरवतात.
- जर एखाद्या संघाचे एक किंवा दोन खेळाडू खेळताना उरले तर कर्णधाराला त्याच्या संघातील सर्व खेळाडूंना बोलावण्याचा अधिकार आहे. त्या बदल्यात, विरोधी संघाला तेवढेच गुण मिळतात आणि २ बोनस गुण (लोना) मिळतात.
- जर रेडरने बोनस रेषा ओलांडली तर त्याला १ गुण दिला जातो.
- कबड्डी कोर्टाबाहेर खेळाडूच्या शरीराचा कोणताही भाग जमिनीला स्पर्श केला तर तो बाद ठरतो.
- असभ्य वर्तनासाठी, पंच खेळाडूला चेतावणी देऊ शकतो, विरोधी पक्षाला गुण देऊ शकतो किंवा खेळाडूला तात्पुरते किंवा कायमचे अपात्र घोषित करू शकतो.
- स्पर्धेत एका वेळी एक रेफ्री, दोन पंच, एक गुण लेखक आणि दोन सहायक गुण लेखक असतात.
- काही विशिष्ट परिस्थितीत, कर्णधार दोन टाइम आउट घेऊ शकतो, ज्याचा कालावधी ३०-३० सेकंद असतो, परंतु या कालावधीत खेळाडू आपली जागा सोडू शकत नाहीत.
- कोणताही रेडर किंवा विरोधी खेळाडू एखाद्याला सीमारेषेच्या बाहेर ढकलण्याचा प्रयत्न करू शकत नाही.
- जेव्हा एखादा संघ दुसऱ्या संघातील सर्व खेळाडूंना बाद करतो तेव्हा त्यांना २ बोनस गुण (लोना) मिळतात.
- एकदा बदललेल्या खेळाडूला पुन्हा गेममध्ये समाविष्ट करता येत नाही.
- जर शेवटी दोन्ही संघांचे गुण समान असतील, तर अशा वेळेस दोन्ही संघांना ५-५ अतिरिक्त आक्रमण संधी (Raid) दिली जातात. जो संघ आक्रमण (raid) मारून जास्तीत जास्त गुण मिळवेल,तो संघ विजयी होतो.
जगभरातील कबड्डीचे महासंघ – Federations of Kabaddi From Around The World
- हौशी कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया – AKFI (Amateur Kabaddi Federation of India)
- आशियाई हौशी कबड्डी महासंघ – AAKF (The Asian Amateur Kabaddi Federation)
- इराणचा हौशी कबड्डी फेडरेशन – IAKF (The Iran’s Amateur Kabaddi Federation)
- आशियाई कबड्डी महासंघ – AKF (The Asian Kabaddi Federation)
- भारतीय कबड्डी महासंघ – KFI (The Kabaddi Federation of India)
- इंग्लंड कबड्डी फेडरेशन UK – EKF (The England Kabaddi Federation UK)
- पाकिस्तान कबड्डी फेडरेशन – PKF (Pakistan Kabaddi Federation)
- बांगलादेश हौशी कबड्डी फेडरेशन -BAKF (The Bangladesh Amateur Kabaddi Federation)
चायनीज,तैपेई, नेपाळ, मलेशिया, दक्षिण कोरिया, थायलंड, न्यूझीलंड आणि कॅनडा हे कबड्डी लोकप्रिय असलेल्या देशांमध्ये आहेत.
कबड्डीचे संस्थापक कोणाला मानले जाते?
हरजीत ब्रार बाजाखाना (५ सप्टेंबर १९७१ – १६ एप्रिल १९९८) हे कबड्डीचे संस्थापक म्हणून ओळखले जातात. ते एक व्यावसायिक कबड्डीपटू होते जे रेडर म्हणून सर्कल कबड्डीमध्ये पारंगत होते. त्यांचा जन्म बजाखाना या पंजाब राज्यातील गावात झाला.
कबड्डीमध्ये सुपर १० म्हणजे काय?
एकाच सामन्यात १० किंवा त्याहून अधिक गुण मिळवणाऱ्या रेडरला सुपर १० असे संबोधले जाते. हे गुण बोनस तसेच टचपॉइंट असू शकतात. तथापि, हे गुण संपूर्ण संघाला कधीही दिले जाऊ शकत नाहीत. (उदाहरणार्थ, टेक्निकल पॉईंट्स)
कबड्डी ऑलिम्पिक खेळाचा भाग का नाही?
अजूनही ऑलिम्पिकमध्ये कबड्डी खेळाचा समावेश न होण्यामागे व्यावसायिक कबड्डी संघटना आणि लीगचा अभाव हे प्रमुख कारण आहे. त्याशिवाय, ऑलिम्पिकसाठी पात्र होण्यासाठी एक खेळ चार खंडांमधील ७५ देशांमध्ये खेळला जाणे आवश्यक आहे. या अटीमुळे कबड्डीला ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळण्याची शक्यता कमी होते.
कबड्डी सामन्याचा कालावधी किती असतो?
पुरुष आणि महिलांच्या सामन्यांचा कालावधी वेगवेगळा असतो.
कनिष्ठ मुले आणि पुरुषांसाठी
सामना एकूण ४० मिनिटे चालतो. २० मिनिटाचे २ डाव खेळले जातात. डावाच्या मध्यंतरी ५ मिनिटांचा ब्रेक असतो.
मुली, कनिष्ठ मुली, सब-ज्युनियर मुले आणि महिला
सामना एकूण ३० मिनिटे चालतो. १५ मिनिटाचे २ डाव खेळले जातात. डावाच्या मध्यंतरी ५ मिनिटांचा ब्रेक असतो.
कबड्डी खेळण्यासाठी किमान वय किती आहे?
कबड्डी खेळण्यासाठी वयोमर्यादा दिले गेलेली आहे.
ज्येष्ठ पुरुष आणि महिलांसाठी: या गटाला वयोमर्यादा निश्चित केलेली नाही. सर्वांचे स्वागत आहे.
कनिष्ठ मुले आणि मुली: स्पर्धेच्या अंतिम तारखेला खेळाडूचे वय २० वर्षे किंवा त्यापेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
सब-ज्युनियर मुले आणि मुली: स्पर्धेच्या अंतिम तारखेला खेळाडूचे वय १६ वर्षे किंवा त्यापेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
तात्पर्य – Information About Kabaddi In Marathi
कबड्डी खेळताना तुम्ही जो उत्साह अनुभवता तो केवळ शब्दांपेक्षा अधिक आहे. हा खेळ माणसातील शिस्त, आज्ञाधारकपणा आणि खिलाडूपणा वाढवतो.मला आशा आहे हा लेख तुम्हाला आवडला असेल.
या लेखात kabaddi sports information in marathi मध्ये आपल्याला काही शंका असल्यास किंवा त्यामध्ये काही सुधारणा झाली पाहिजे असे आपल्याला वाटत असल्यास, यासाठी आपण आम्हाला कमेन्ट किंवा ईमेल लिहून सांगू शकता.
यातून काही नवीन शिकायला मिळाले असेल तर कृपया ही माहिती जास्तीत जास्त इतरांपर्यन्त पोहचवा.फेसबुक,ट्विटर आणि इतर सोशल मीडिया साइट्स वर हे शेअर करा.धन्यवाद.
हे पण वाचा : Birendra Lakra Information In Marathi
Kabaddi Information In Marathi बद्दल सतत विचारले जाणारे प्रश्न (FAQ’s)
बांग्लादेश
प्रत्येक संघामध्ये १२ खेळाडू असतात.०७ खेळाडू मैदानात खेळण्यासाठी उतरतात व ५ राखीव असतात.
श्वासावर नियंत्रण ठेवणे,शारीरिक आणि मानसिक क्षमता,चपळता हे फायदे आहेत.