Kalonji in marathi काय आहे. ते आपण आज वाचणार आहोत.आपल्या किचनमध्ये असे अनेक पदार्थ असतात जे केवळ पदार्थाचा स्वाद वाढविण्यासाठीच नव्हे तर त्यात औषधी गुणधर्मही असतात. यापैकीच एक म्हणजे कलौंजी.
अनुक्रमणिका
Kalonji Mhanje Kay Marathi | कलौंजी म्हणजे काय मराठीत सांगा | कलौंजी चा मराठी अर्थ काय
कलौंजी म्हणजे मराठीत काळे बियाणे(Kalonji in marathi). हे काळे बियाणे नाइजेला या औषधी वनस्पती चे बियाणे असतात. याच कारणाने त्यांना नाइजेला बियाणे असेही म्हणतले जाते.
नाइजेला बद्दल असे म्हणतात की ही कलियुगातील संजीवनी औषधी वनस्पती आहे. त्यामुळेच कलौंजी म्हणजे काळे बियाणे यांचा जर योग्य प्रकारे उपयोग केला तर ते भयंकर आजार सुद्धा बरे करू शकतात.
Kalonji Plant In Marathi | कलौंजी चे झाड

कलौंजी हे नाइजेला वनस्पती चे बियाणे आहे.नायजेला सॅटिवा असे कलौंजी चे साइंटिफिक नाव आहे.लॅटिन शब्द निजार (म्हणजेच काळा ) याचावार आधारित ते नाव पडले आहे.
ही वनस्पति दक्षिण-पश्चिम आशिया,भूमध्य सागर चे पूर्वेकडचे कोस्टल देश आणि उत्तर आफ्रिकेच्या देशांमध्ये पाहायला मिळतात. त्यांची ऊंची २० ते ३० सेंटिमिटर इतकी दिसून येते.आकाराने हे झाड लांब आणि पातळ असतं.
फुलांचा रंग पांढरा किंवा हलका निळसर पाहायला मिळतो. त्याचे फळ काळ्या रंगाचे आणि मोठे गोल आकाराचे असतं.त्या फळामध्ये आपल्याला त्रिकोणी आकाराचे साधारण ३ मिमी. लांब काळ्या बियान्यानि(Kalonji in marathi) भरलेली पेशी आढळतात. म्हणजेच कलौंजी (काळे बियाणे,नाइजेला बियाणे,नायजेला सॅटिवा ) त्या पेशीमद्धे मिळतात .
Kalonji Nutritional Value In Marathi | कलौंजी मधील पोषक तत्व
USDA न्यूट्रिएंट डेटाबेस नुसार, १००ग्रा. कलौंजी मध्ये खालील पोषक तत्व आहेत.
पोषक तत्व | मूल्य प्रति 100 ग्रॅम |
---|---|
Water | ८.०६ ग्राम |
Energy | ३७५ किलो कॅलरीज |
Protein | १७.८१ ग्राम |
Fats | |
Carbohydrate | ४४.२४ ग्राम |
Fiber | १०.५ ग्राम |
Sugar | २.२५ ग्राम |
Minerals | |
Calcium | ९३१ मिलिग्राम |
Iron | ६६.३६ मिलिग्राम |
Magnesium | ३६६ मिलिग्राम |
Phosphorus | ४९९ मिलिग्राम |
Potassium | १७८८ मिलिग्राम |
Sodium | १६८ मिलिग्राम |
Zinc | ४.८० मिलिग्राम |
Vitamins | |
Vitamin A | ६४ मायक्रोग्राम |
Vitamin B-6 | ०.४३५ मिलिग्राम |
Vitamin C | ७.७ मिलिग्राम |
Vitamin E | ३.३३ मिलिग्राम |
Vitamin K | ५.४ मायक्रोग्राम |
Fatty acids | |
Saturated | १.५३५ ग्राम |
Monounsaturated | १४.०४० ग्राम |
Polyunsaturated | ३.२७९ ग्राम |
Kalonji Uses In Marathi | कलौंजी चे फायदे

कलौंजीच्या बीमध्ये औषधी गुणधर्म असतात
कलौंजी सेवन केल्यास,शरीराला लोह, सोडियम, पोटॅशियम, फायबर आणि बरेच खनिजे (Minerals)चा पुरवठा होतो. याचे आपण नित्य सेवन भाज्या, कोशिंबीरी, पीठ, पुलाव आणि इतर अनेक पदार्थांमध्ये वापरुन करू शकतो.भारतात लोणचे बनवण्यासाठी याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.
केस गळतीवर घरगुती उपाय
केसगळतीवर सर्वात उत्तम आहे कलौंजीचे तेल. केसगळती रोखायची असल्यास कलौंजीच्या तेलाचा वापर केल्यास फायदा होतो. यासाठी एक चमचा कलौंजीच्या तेलात दोन चमचे कस्टर्ड ऑईल आणि बदामाचे तेल मिसळा. या मिश्रणाने केसांच्या मुळांशी मसाज करा. काही दिवसांतच तुमची केसगळती थांबेल
मधुमेह घरगुती उपाय
मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठीही कलौंजीच्या तेलाचा वापर होतो. चहामध्ये कलौंजीचे तेल टाकून प्यायल्यास मधुमेह रुग्णांची शुगर नियंत्रणात राहते.
त्वचेचे विकार उपाय
कलौंजी चे बियांचे चूर्ण नारळ तेलामध्ये मिसळून त्वचेवर मालिश केल्यास त्वचेचे विकार दूर होतात.
Chia Seeds In Marathi (हृदयाच्या आरोग्यासाठी ,मधुमेह वर चिया बियाणे फायदेशीर जाणून घ्या माहिती)
Side Effects Of Kalonji In Marathi | कलौंजीचे दुष्परिणाम
कलौंजीच्या बियांमद्धे अनेक औषधी गुणधर्म आहेत,हे तर आपण पहिलं.परंतु या बियांचे काही तोटे देखील आहेत. कोणत्याही औषधाचा अति वापर हा नुकसानकारी,दुष्परिणाम देणार असतो .म्हणूनच कलौंजीच्या बियांचे तोटे जाणून घेणे महत्वाचे आहे.
- तज्ञांचे मते गर्भवती महिलांनी व स्तनपान देण्याऱ्या मातेने कलौंजी चे सेवन टाळले पाहिजे, या मागचे मुख्य कारण असे की ह्याचे सेवन करणे ही किती सुरक्षित आहे याचे पुरावे नाही तसेच यावर ठोस असे कोणते संशोधन देखील नाही.म्हणून, डॉक्टरांचा सल्ला घेतल्या नंतरच ह्याचे सेवेन करावे असे सांगितले जाते.
- ज्या महिलांना मासिक पाली ही उशिरा येते ,तसेच ज्याना मासिक पाली ही जास्त वेळा येते त्यांनी कलौंजी चे सेवन करणे टाळावे . अगदीच गरज असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
- ज्या व्यक्तींना पित्ताचा त्रास होतो. ज्याना अति उष्णता सहन होत नाही . आशा लोकानी पण कलौंजी चे सेवन कमी करावे.
- कलौंजिची काही लोकांना ऍलर्जी असू शकते त्यामुळे कलौंजि खाल्ल्याने अंगावर पुरळ उठणे,उलटी, पोटात बिघाड होणे, बद्धकोष्ठता हे त्रास होऊ शकतात. म्हणूनच आशा लोकांनी कलौंजिचे सेवन न करावे.
- काही लोकांना अती प्रमाणात कलौंजी घेतल्यास चक्कर येण्याचा धोका असतो.
- कलौंजी मधे बायोएक्टिव कंपाउंड असतात . कलौंजिचा अति वापर हा आपल्या शरीरात बायोएक्टिव कंपाउंडचे प्रमाण वाढवतो. त्यामुळे आपल्या शरीरातील साखरेच प्रमाण अनियंत्रित होते व त्यामुळे रक्ताशी निघडीत बरीच समस्या निर्माण होऊ शकतात.
- कलौंजीचे सेवन केल्यानंतर कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवत असेल,तर त्वरित कलौंजीचे सेवन बंद करावे आणि डॉक्टरांकडे जाणे.
कलौंजीबाबत काही प्रश्न (FAQs)
हो , कलौंजी ला इंग्रजी मधे ब्लॅक सीड (Black Seed) असे म्हणतात.
कलौंजीचे तेल त्याच्या बियांमधून काढले जाते आणि बरीच औषधे तयार करण्यासाठी वापरले जाते. अनेक रोग आणि विकारांवर उपचार म्हणून याचा उपयोग केला जातो.
होय, ते कच्चे खाऊ शकतात.आवडीनुसार तुम्ही ते मध किंवा पाण्यात मिसळून देखील खाऊ शकता.
१. एका ग्लास कोमट पाण्यात थोडे लिंबाचा रस घाला.
२. या पाण्यासोबत कलौंजी औषधासारखं घ्याव.
हो,कलौंजी बियांमधे अॅंटी-सोरायसिस (Antipsoriatic) तसेच अॅंटी-इनफ्लेमेटरी(Anti-inflammatory) गुण असतात.म्हणून कलौंजीचे तेल सोरायसिस संबंधित सूज आणि खाज कमी करण्यास उपयोगी ठरतात.
लक्ष द्या –
या लेखात दिलेल्या माहितीवर, आम्ही दावा करीत नाही की ही पूर्णपणे सत्य आणि अचूक आहेत आणि त्यांचे अवलंब केल्याने अपेक्षित निकाल मिळेल. त्यांचा अवलंब करण्यापूर्वी, कृपया संबंधित क्षेत्राच्या तज्ञांचा सल्ला घ्या.
वाचा – Benefits of Flax Seeds In Marathi
कलौंजी म्हणजे काळे तीळ का ..?
कलोंजीच्या बिया नायजेला सॅटिवा वनस्पतीच्या फळांपासून काढल्या जातात.ह्या बिया काळे तिळा सारखे दिसतात म्हणून त्यांना काळे तीळ म्हणूनही ओळखले जाते.