Madhurashtakam Lyrics With Meaning In Marathi | मधुराष्टकम मराठी अर्थ

Madhurashtakam Lyrics With Meaning In Marathi : मधुराष्टकम हे एक लोकप्रिय भक्तिगीत आहे. हे सुंदर संस्कृत  भक्तिगीत श्रीपाद वल्लभाचार्य यांनी रचले आहे.

श्रीपाद वल्लभाचार्य हे पंधराव्या शतकातिल महान कवि होते. त्यांनी व्यास सूत्र भाष्य, जैमिनीय सूत्र भाष्य, भागवत टीका सुबोधिनी, पुष्टि प्रवळा, मर्यादा आणि सिद्धान्त, रहस्य संस्कृत यांसह बरीच साहित्य निर्मिती केली.

मधुराष्टकम मराठी मध्ये ८ श्लोक आहेत. मधुराष्टकम श्लोकाचा मराठी अर्थ जाणला तर आपल्याला लक्षात येते की, श्रीकृष्णाशी संबंधित प्रत्येक गोष्ट मधुर आहे. श्रीकृष्ण हे मधुरतेचे स्वामी आहेत.

श्री वल्लभाचार्य यांनी मधुराष्टकम गीताची रचना अतिशय सोप्या पद्धतीने केली आहे.त्यामुळे भक्तांना श्रीकृष्ण च्या दैवी रूपाची कल्पना व अनुभव करणे सहज शक्य आहे

Madhurashtakam Lyrics With Meaning In Marathi
Madhurashtakam Lyrics With Meaning In Marathi

Madhurashtakam Lyrics With Meaning In Marathi | मधुराष्टकम मराठी अर्थ

मधुराष्टक या भक्तिरसपूर्ण रचनेत श्रीकृष्ण बद्दल सगळं कसे मधुर आहे.याचे नितांत सुंदर वर्णन केले आहे.चला तर मग जाणून घेऊ Madhurashtakam Lyrics With Meaning In Marathi काय आहे ते.

अधरं मधुरं वदनं मधुरं नयनं मधुरं हसितं मधुरं ।
हृदयं मधुरं गमनं मधुरं मधुराधिपते रखिलं मधुरं ॥१॥

अर्थ : कृष्णाचे ओठ मधुर आहेत, त्याचा चेहरा गोड आहे, त्याचे डोळे सुंदर आहेत आणि त्याचे हास्य मधुर आहे.

कृष्णाचे हृदय सुंदर आहे आणि त्याचे चालणे सुंदर आहे.हे मधुरतेचे स्वामी श्रीकृष्ण! तुझे सर्व काही सुंदर आहे.

वचनं मधुरं चरितं मधुरं वसनं मधुरं वलितं मधुरं । 
चलितं मधुरं भ्रमितं मधुरं मधुराधिपते रखिलं मधुरं ॥२॥

अर्थ : कृष्णाचे बोलणे गोड आहे, त्याचे चरित्र मधुर आहे, त्याचे वस्त्र सुंदर आहेत आणि त्याची मुद्रा गोड आहे.

कृष्णाच्या हालचाली मधुर आहेत आणि त्याची भटकंती गोड आहे.हे मधुरतेचे स्वामी श्रीकृष्ण! तुझे सर्व काही सुंदर आहे.

वेणुर्मधुरो रेणुर्मधुरः पाणिर्मधुरः पादौ मधुरौ । 
नृत्यं मधुरं सख्यं मधुरं मधुराधिपते रखिलं मधुरं ॥३॥

अर्थ : कृष्णाचे बासरी वाजवणे मधुर आहे, त्याचे फुले सुंदर आहे, त्याचे हात सुंदर आहेत आणि त्याचे पाय हेही सुंदर आहेत.

कृष्णाचे नृत्य गोड आहे आणि त्याची मैत्री गोड आहे.हे मधुरतेचे स्वामी श्रीकृष्ण! तुझे सर्व काही सुंदर आहे.

 गीतं मधुरं पीतं मधुरं भुक्तं मधुरं सुप्तं मधुरं ।
रूपं मधुरं तिलकं मधुरं मधुराधिपते रखिलं मधुरं ॥४॥

अर्थ : कृष्णाचे गाणे गोड आहे, त्याचे पिणे गोड आहे, त्याचे खाणे गोड आहे आणि त्याची झोप सुंदर आहे.

कृष्णाचे सुंदर रूप गोड आहे आणि त्याचे ‘टिळक’ मधुर आहे.हे मधुरतेचे स्वामी श्रीकृष्ण! तुझे सर्व काही सुंदर आहे.

करणं मधुरं तरणं मधुरं हरणं मधुरं रमणं मधुरं ।
वमितं मधुरं शमितं मधुरं मधुराधिपते रखिलं मधुरं ॥५॥

अर्थ : कृष्णाचे कार्य सुंदर आहेत, त्याचा विजय गोड आहे, त्याची चोरी सुंदर आहे आणि त्याचे प्रेम-खेळ मधुर आहे.

कृष्णाचा उत्साह सुंदर आहे आणि त्याची विश्रांती मधुर आहे. हे मधुरतेचे स्वामी श्रीकृष्ण! तुझे सर्व काही सुंदर आहे.

गुञ्जा मधुरा माला मधुरा यमुना मधुरा वीची मधुरा ।
सलिलं मधुरं कमलं मधुरं मधुराधिपते रखिलं मधुरं ॥६॥

अर्थ : कृष्णाचा गुंजा-बेरी हार सुंदर आहे, त्याची माला मधुर आहे, त्याची यमुना नदी सुंदर आहे आणि त्याच्या यमुनेच्या लाटा मधुर आहेत.

कृष्णाचे यमुनेचे पाणी गोड आहे आणि त्याची कमळाची फुले सुंदर आहेत.हे मधुरतेचे स्वामी श्रीकृष्ण! तुझे सर्व काही सुंदर आहे.

गोपी मधुरा लीला मधुरा युक्तं मधुरं मुक्तं मधुरं।
दृष्टं मधुरं सृष्टं मधुरं मधुराधिपते रखिलं मधुरं ॥७॥

अर्थ : कृष्णाच्या ‘गोपी’ सुंदर आहेत, त्याची खेळ लीला गोड आहे, त्याचे मिलन सुंदर आहे आणि त्याचा उद्धार मधुर आहे.

कृष्णाची दृष्टी सुंदर आहे आणि त्याचे शिष्टाचार मधुर आहे. हे मधुरतेचे स्वामी श्रीकृष्ण! तुझे सर्व काही सुंदर आहे.

गोपा मधुरा गावो मधुरा यष्टिर्मधुरा सृष्टिर्मधुरा ।
दलितं मधुरं फलितं मधुरं मधुराधिपते रखिलं मधुरं ॥८॥

अर्थ : कृष्णाचे ‘गोप’ सुंदर आहेत, त्याच्या गायी मधुर आहेत, त्याची काठी सुंदर आहे आणि त्याची निर्मिती सुंदर आहे.

कृष्णाचे विनाश करणे सुंदर आहे आणि त्याचे वर देणे गोड आहे.हे मधुरतेचे स्वामी श्रीकृष्ण! तुझे सर्व काही सुंदर आहे.

Madhurashtakam Benefits In Marathi | मधुराष्टकम महत्व मराठी

मधुराष्टकम हे एक महान भक्तिगीत आहे.ह्या भक्तीगीत मध्ये भक्ताला भगवान श्रीकृष्णाच्या अधिक जवळ आणण्याची दिव्य क्षमता आहे.

मधुराष्टकम याचे नित्य वाचान केल्याने आपल्या मनातील भक्तीभाव हा अधिक वाढतो.भक्तांना श्रीकृष्णाचा दैवी रूप,कृष्णलीला आणि सुंदरतेचा अनुभव मिळतो.

याचा मुळे भक्त आणि श्रीकृष्ण एकमेकांच्या खूप जवळ येतात आणि त्यांचे नाते हे घट्ट व अतूट राहते.

हे पण वाचा : Pandurangashtakam meaning in marathi

मधुराष्टकम मराठी अर्थ | Madhurashtakam Lyrics With Meaning In Marathi

मला आशा आहे की Madhurashtakam Lyrics With Meaning In Marathi  हा लेख तुम्हाला आवडला असेल.या लेखात मधुराष्टकम मराठी अर्थ या मध्ये आपल्याला काही शंका असल्यास किंवा त्यामध्ये काही सुधारणा झाली पाहिजे असे आपल्याला वाटत असल्यास, यासाठी आपण आम्हाला ईमेल लिहून सांगू शकता.

आपल्याला हा लेख आवडला असेल किंवा यातून काही नवीन शिकायला मिळाले असेल तर कृपया ही माहिती जास्तीत जास्त इतरांपर्यन्त पोहचवा.फेसबुक,ट्विटर आणि इतर सोशल मीडिया साइट्स वर हे शेअर करा.धन्यवाद.

हे पण वाचा :

प्रतिक्रिया द्या