Mahatma Gandhi Information In Marathi | महात्मा गांधी यांची माहिती

Mahatma Gandhi Information In Marathi – महात्मा गांधी हे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामतील प्रमुख नेते आणि तत्वज्ञ होते.त्यांनी देशहितासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढा दिला. स्वातंत्र्य चळवळीतील ते असे नेते होते ज्यांनी अहिंसेचा मार्ग अवलंबून ब्रिटीश राज्यकर्त्यांना थक्क केले होते. 

महात्मा गांधींना राष्ट्रपिता म्हणूनही संबोधले जाते. मार्टिन ल्यूथर किंग आणि नेल्सन मंडेला यांच्यावरही त्यांच्या सत्य आणि अहिंसेच्या विचारसरणीचा खूप प्रभाव होता. 

महात्मा गांधींनी आफ्रिकेत सलग २१ वर्षे अन्याय आणि वर्णद्वेषाविरुद्ध अहिंसक लढा दिला, ज्याची किंमत केवळ आफ्रिकेतच नव्हे तर भारतातही ब्रिटिशांना भोगावी लागली.

महात्मा गांधी यांच्या विषयी माहिती मराठीत आज आपण जाणून घेणार आहोत.

mahatma gandhi information in marathi
Mahatma gandhi information in marathi

अनुक्रमणिका

महात्मा गांधी यांच्या विषयी माहिती | Mahatma Gandhi Marathi Mahiti

महात्मा गांधी यांची माहिती थोडक्यात

नावमोहनदास करमचंद गांधी
वडिलांचे नावकरमचंद उत्तमचंद गांधी
आईचे नावपुतळीबाई करमचंद गांधी
जन्मतारीख२ ऑक्टोबर १८६९
जन्म ठिकाणपोरबंदर,गुजरात
राष्ट्रीयत्वभारतीय
धर्महिंदू
जातगुजराती
शिक्षणबॅरिस्टर
व्यवसायवकील, राजकारणी, कार्यकर्ते, लेखक
पत्नीचे नावकस्तुरबा गांधी
मुलांचे नावहरिलाल, मणिलाल, रामदास, देवदास (४ पुत्र)
मृत्यू३० जानेवारी १९४८
मृत्यूचे ठिकाणदिल्ली, भारत

Mahatma Gandhi Information In Marathi | महात्मा गांधी यांची माहिती

mahatma gandhi quotes in marathi
Mahatma gandhi quotes in marathi

बालपण आणि प्रारंभिक जीवन | Mahatma Gandhi Information Marathi

मोहनदास करमचंद गांधी यांचा जन्म २ ऑक्टोबर १८६९ रोजी पश्चिम भारतातील सध्याच्या गुजरातमधील पोरबंदर शहरामध्ये झाला.त्यांचे वडील करमचंद गांधी हे सनातन धर्मातील पानसारी जातीचे होते.ब्रिटिश राजवटीत ते काठियावाडच्या एका छोट्या संस्थानाचे (पोरबंदर) दिवाण होते.आई पुतलीबाई या धार्मिक स्त्री होत्या.

महात्मा गांधी यांचा विवाह मे १८८३ मध्ये वयाच्या १३व्या वर्षी कस्तुरबा माखनजी यांच्याशी झाला.कस्तुरबा त्या वेळी १४ वर्षांच्या होत्या.हा विवाह त्यांच्या पालकांनी आयोजित केलेला बालविवाह होता जो त्या काळात प्रचलित होता.

नोव्हेंबर १८८७ मध्ये महात्मा गांधी मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले.पुढे त्यांनी पदवी प्राप्त केली.४ सप्टेंबर १८८८ रोजी गांधीजी लंडन येथे कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी इंग्लंडला गेले आणि बॅरिस्टर झाले.

महात्मा गांधींचे दक्षिण आफ्रिकेतील कार्य

गांधीजी १८९३ मधे एक हिन्दी कंपनीचे वकील म्हणून दक्षिण आफ्रिकेत गेले होते.दक्षिण आफ्रिकेत गांधीजींना गौरेतर लोकांबद्दल असलेल्या भेदभावाला सामोरे जावे लागले,तेथील भारतीयांना दिली जाणारी असमान वागणूक अनुभवली.

पहिल्या वर्गाचे तिकिट असतानासुद्धा त्यांना पीटरमारित्झबर्ग मध्ये रेल्वे अधिकाऱ्यांनी तृतीय वर्गाच्या डब्यात बसण्यास सांगितले.गांधीजींनी नकार देताच त्यांचा अपमान करून रेल्वे डब्यातून ढकलून देण्यात आले.ती संपूर्ण रात्र गांधीनी फलाटावरील गेस्टरूम मध्ये काढली.

भारतीयांबद्दलच्या वंशभेद, असमानता यांना सामोरे गेल्यावर गांधींनी या अन्याया विरूद्ध आवाज उठवण्यास व समाजात स्वत:चे स्थान निर्माण करण्यास सुरुवात केली.

भारतीयांचा मतदानाचा हक्क काढून घेणारा कायदा लागू करण्यात येणार होता, या कायद्याला विरोध करणाऱ्या भारतीयांना मदत करण्यासाठी गांधींनी आपले दक्षिण आफ्रिकेतील वास्तव्य काही काळासाठी वाढवले.हा कायदा रद्द करण्यात जरी ते अयशस्वी ठरले तरी यामुळे भारतीयांवरील अन्यायाकडे लक्ष वेधण्यात त्यांची चळवळ यशस्वी झाली.

१८९४ मध्ये दक्षिण आफ्रिका भारतीय काँग्रेसची स्थापना केली व याद्वारे दक्षिण आफ्रिकेतील विखुरलेल्या भारतीयांना त्यांनी एका राजकीय पक्षात परावर्तित केले.१९०६ मध्ये ट्रान्सवाल सरकारने एका नवीन कायद्याची घोषणा केली.या कायद्यानुसार तेथील प्रत्येक भारतीयाला स्वतःची नोंदणी करणे बंधनकारक झाले होते.

याला विरोध करण्यासाठी बोलवलेल्या सभेमध्ये, त्या वर्षीच्या ११ सप्टेंबर ला, गांधींनी, पहिल्यांदाच आपल्या अजूनही विकसित होत असलेल्या सत्याग्रहाच्या किंवा अहिंसात्मक कार्यप्रणालीला आपलेसे केले.त्यांनी भारतीय बांधवांना अहिंसक पद्धतीने या कायद्यास विरोध करण्यास सांगितले व असे करतांना झालेले अत्याचार सहन करण्यास सांगितले.

सरकारने भारतीय आंदोलकांचा हा विरोध यशस्वीरीत्या मोडून काढला तरी पण या अहिंसक चळवळीची व लोकक्षोभाची नोंद घेण्यास आणि गांधींशी वाटाघाटी करण्यास स्वतः तत्त्वज्ञ असलेल्या दक्षिण आफ्रिकेतील नेता जॉन क्रिस्तिआन स्मट्स याला भाग पडले.

शांततामय मार्गाने निदर्शने करणाऱ्या निदर्शकांवरील दक्षिण आफ्रिकेच्या सरकारने केलेल्या कठोर कारवायांमुळे लोकक्षोभ निर्माण झाला होता.गांधींच्या कल्पनांनी आकार घेतला आणि सत्याग्रहाची संकल्पना या संघर्षादरम्यान परिपक्व झाली.

गांधीजी भारतात परतले | Gandhiji Information In Marathi

इ.स. १९१५ मध्ये गांधीजी कायम स्वरूपी भारतात परत आले.एक प्रमुख भारतीय राष्ट्रवादी, थिओरिस्ट आणि संघटक अशी त्यांची आंतरराष्ट्रीय ख्याती होती.ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अनेक संमेलनांतून बोलले. खऱ्या अर्थी भारताचे राजकारण व समस्या यांचा परिचय त्यांना गोपाळ कृष्ण गोखले यांनी करून दिला.

गोपाळ कृष्ण गोखले हे तेव्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रमुख नेते होते. गोखले त्यांच्या संयम, संतुलन आणि व्यवस्थेच्या आतमध्ये राहून काम करण्याच्या आग्रहाबद्दल ओळखले जात.ते गांधीजींचे राजकीय गुरू म्हणून ओळखले जातात.

गांधीनी गोखल्यांचा ब्रिटिशांच्या व्हीगीश परंपरांवर आधारित उदार दृष्टिकोन अनुसरला, आणि तो पूर्णपणे भारतीय दिसण्यासाठी बदलला.१९२० मध्ये काँग्रेस नेते बाळ गंगाधर टिळक यांच्या निधनानंतर गांधीजी काँग्रेसचे प्रमुख नेते बनले.

mahatma gandhi vichar in marathi
Mahatma gandhi vichar in marathi

महात्मा गांधींचे कार्य

गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतले आणि नंतर आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी पावले उचलली.गांधीजींचे संपूर्ण जीवन एका चळवळीसारखे होते.गांधीजींनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक चळवळी सुरू केल्या.

गांधीनी काही चळवळी संपूर्ण देशात चालवल्या आणि त्या खूप यशस्वी झाल्य.या मुळे संपूर्ण देशात लोक त्यांना ओळखू लागले.गांधीजींनी चालवलेल्या चळवळी थोडक्यात जाणून घेऊयात.

चंपारण्य सत्याग्रह (१९१७)

बिहारमधील चंपारण्य येथील युरोपीय निळीच्या मळेवाल्यांकडून तीन काथिया पद्धतीमार्फत गरीब शेतकऱ्यांवर अत्याचार होत असे.

चंपारण, बिहारमधील जमीनदार, जे प्रामुख्याने ब्रिटिश होते, स्थानिक शेतकऱ्यांना सक्तीने नीळ उत्पादन करावयास लावत असत.त्यांना योग्य मोबदला पण मिळत नसे.यामुळे ते सतत गरिबीत राहत.

शेतकऱ्यांची गावे अत्यंत घाणेरडी आणि आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक ठेवली जात.यावर भर म्हणजे तेथील दुष्काळ, पण इंग्रजानी तरीही अनेक जाचक कर लादले होते आणि ते वाढतच होते.

यावर गांधीजींनी अहिंसक चळवळ सुरू केली.हा सत्याग्रह ब्रिटिश जमीनदाराच्या विरोधात सुरू करण्यात आला होता. गांधीजी यशस्वी झाले आणि इंग्रजांना त्यांचे पालन करावे लागले.

खेडा सत्याग्रह (१९१८)

सन १९१८ मध्ये गुजरातमधील खेडा जिल्ह्यामध्ये दुष्काळ पडला होता.दुष्काळामुळे पिके बुडाली असताना शासकीय अधिकारी शेतकऱ्यांकडून जबरदस्तीने शेतसारा वसूल करत असत.

मोहनलाल पांडे नावाच्या नेत्याने गांधीजींना आमंत्रित केले.गांधीजींनी साराबंद चळवळ(असहकार) सुरू केली.शासनाने गांधीजींच्या चळवळीची दखल घेऊन दुष्काळी कालखंडा मध्ये जमीन महसूल वसुलीला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला.

खेडा येथील सत्याग्रहामध्ये गांधीजींना सरदार वल्लभभाई पटेल, डॉ. राजेंद्र प्रसाद, विठ्ठलभाई पटेल आदी कार्यकर्त्यांचे सहकार्य लाभले.

रौलट अक्ट (१९१९)

भारतातील राष्ट्रीय आंदोलन व क्रांतिकारी चळवळीला प्रतिबंध घालण्याकरिता ब्रिटिश शासनाला नवीन कायद्याची आवश्यकता भासत होती. या कायद्याचा अहवाल तयार करण्याकरिता शासनाने सर सिडने रौलेट यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली.

या समितीने तयार केलेला अहवाल एप्रिल १९१८ मध्ये अनारकिकल अँड रिव्हॉल्युशनरी क्राइम अॅक्ट पास केला.या कायद्यातील तरतुदींनुसार कोणत्याही व्यक्तीला विना चौकशी अटक करण्याचा अधिकार शासनास मिळणार होता.अटक करण्यात आलेल्या व्यक्तीची तीन न्यायधीशांच्या चौकशी मंडळापुढे चौकशी करून शिक्षा करण्याचा अधिकार शासनास मिळाला होता.

गांधीजींनी १९१९ मध्ये रौलेट कायद्याच्या निषेधार्थ सभा घेतली.६ एप्रिल १९१९ हा संपूर्ण भारतभर सत्याग्रहाचा दिवस म्हणून पाळण्याचा निर्णय घेण्यात आला.या दिवशी हरताळ, उपवास, निषेध मिरवणुकी आणि निषेध सभा असा कार्यक्रम जाहीर करण्यात आला.

६ एप्रिल १९१९ रोजी हा सत्याग्रहाचा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.हा काँग्रेस मार्फत पाळण्यात आलेला अखिल भारतीय बंद होता.

जालियनवाला बाग हत्याकांड (१९१९)

सरकारने स्थानिक नेते डॉ. सफुद्दीन किचलू व सत्यपाल या दोन नेत्यांना अटक केल्यामुळे पंजाबमधील अमृतसर शहरात एक निषेध सभा बोलावण्यात आली.लोकांमधील असंतोष लक्षात घेऊन सरकारने जमावबंदी व सभाबंदी आदेश लागू केला, परंतु सरकारी आदेशाला न जुमानता स्थानिक लोकांनी १३ एप्रिल १९१९ रोजी जालियनवाला बागेत निषेध सभा बोलाविली.

या सभेला मोठय़ा संख्येने लोक जमले.सरकारच्या आदेशाविरूद्ध इतक्या मोठय़ा संख्येने लोक एकत्र आल्याचे पाहिल्यावर तेथे बंदोबस्तासाठी उपस्थित असलेला जनरल डायर हा इंग्रज अधिकारी संतप्त झाला.त्याने नि:शस्त्र लोकांना चहूबाजूंनी घेरले आणि जमावाला कोणतीही पूर्वसूचना न देता गोळीबार करण्याचा आदेश आपल्या सैनिकांना दिला.

या घटनेच्या निषेधार्थ गांधीजींनी कैसर-ए-हिंद या पदवीचा त्याग केला.  

खिलाफत चळवळ (१९२०)

जगभराचे मुस्लिम लोक तुर्कस्थानच्या खलिफाला आपला धर्मगुरु मानत असत.भारतीय मुस्लिम जनतेची निष्ठा तुर्कस्थानच्या खलिफासोबत निगडित होती.तुर्कस्थानच्या खलिफाने पहिल्या महायुद्धाच्या काळात जर्मनीच्या बाजूने युद्धात प्रवेश केला.

युद्धाच्या समाप्ती नंतर तुर्कस्थानच्या खलिफाच्या सत्तेला कोणताही धोका पोहोचणार नाही, असे आश्वासन ब्रिटिश शासनाने भारतातील मुस्लिम नेत्यांना दिले होते.या आश्वासनास प्रमाण मानून भारतीय मुस्लिमांनी ब्रिटिशांनी युद्धात मदत केली होती.युद्ध समाप्ती नंतर ब्रिटिश शासन तुर्कस्थानची सत्ता नष्ट करून खलिफाची गादी नष्ट करणार अशी बातमी सर्वत्र पसरली होती.

तेव्हा भारतीय मुस्लिम नेत्यांनी तुर्कस्थानच्या खलिफाची सत्ता टिकविण्याकरिता व धर्मक्षेत्राचे रक्षण करण्याकरिता ब्रिटिश शासनाविरूद्ध चळवळ करण्याचा निर्णय घेतला.ही चळवळ खिलाफत चळवळ म्हणून ओळखली जाते.

खिलाफतचा प्रश्न सोडविण्याकरिता राष्ट्रीय काँग्रेसमधील महात्मा गांधीजी, लोकमान्य टिळक, डॉ. राजेंद्र प्रसाद आदी नेत्यांनी या चळवळीस पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला.

mahatma gandhi slogan in marathi
Mahatma gandhi slogan in marathi

असहकार चळवळ (१९२०)

रौलेट कायदा, जालियनवाला बागेतील हत्याकांड, खिलाफत चळवळ, देशात सर्वत्र सरकारने चालवलेले दडपशाहीचे सत्र या कारणांमुळे भारतीय जनतेत फार मोठा संताप निर्माण झाला होता.देशातील वातावरण पूर्णपणे सरकारच्या विरोधात गेले होते.

देशातील जनतेच्या या भावना लक्षात घेऊन महात्मा गांधीनी असहकार चळवळ सुरू करण्याचा निर्णय घेतला.१० मार्च १९२० रोजी त्यांनी असहकारचा जाहीरनामा प्रसिद्ध केला.

४ सप्टेंबर १९२० रोजी कलकत्ता येथे लाला लजपतराय यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसचे विशेष अधिवेशन भरविण्यात आले होते.या अधिवेशनात असहकाराच्या कार्यक्रमाला मान्यता देण्यासंबंधीचा ठराव प्रचंड बहुमताने संमत करण्यात आला.

चौरीचौरा दुर्घटना (उत्तर प्रदेश, १९२२)

डिसेंबर १९२१ मध्ये अहमदाबाद येथे राष्ट्रसभेचे अधिवेशन झाले.हजारो कार्यकर्ते तुरूंगात असतानाही असहकार चळवळ जोमाने चालू ठेवण्याचा निर्णय या अधिवेशनात घेण्यात आला.५ फेब्रुवारी १९२२ रोजी यूपीतील गोरखपुर जिल्हय़ात चौरीचौरा गावी जमावाने पोलीस चौकी जाळली.त्यात २२ पोलीस ठार झाले.

या बातमीने गांधीजींनी व्यतीत होऊन चळवळ हिंसक बनत चालली म्हणून असहकार चळवळ स्थगित केल्याचे १२ फेब्रुवारी १९२२ रोजी जाहीर केले.१० मार्च १९२२ला गांधींना अटक होऊन ६ वर्षांची शिक्षा झाली.

मिठाचा सत्याग्रह (१९३०) | दांडी यात्रा

गांधींनी मार्च १९३० मध्ये मिठावर कर लावण्याच्या विरोधात नवा सत्याग्रह सुरू केला.जो १२ मार्च ते ६ एप्रिल या काळात मिठाच्या आंदोलनाच्या स्मरणार्थ अहमदाबाद ते दांडी, गुजरात असा ४०० किमीचा पाई प्रवास(दांडी यात्रा) करण्यात आला. मीठ आपण स्वतः निर्मित करू शकतो हे स्पष्ट झाले.

समुद्राच्या दिशेने निघालेल्या या प्रवासात हजारो भारतीय सहभागी झाले होते. भारतातील इंग्रजांची पकड तोडण्यासाठी ही सर्वात यशस्वी चळवळ होत.ज्यामध्ये ब्रिटिशांनी 80,000 हून अधिक लोकांना तुरुंगात पाठवले.

हरिजन चळवळ (१९३३)

गांधींनी अस्पृश्यांचे जीवन सुधारण्यासाठी मोहीम राबवली.गांधीजींनी या अस्पृश्यांना हरिजन असे नाव दिले ज्यांना ते देवाची मुले मानत.

८ मे १९३३ रोजी गांधीजींनी हरिजन चळवळीला मदत करण्यासाठी २१ दिवसांचे आत्मशुद्धीचे उपोषण केले.

दुसरे महायुद्ध आणि भारत छोडो आंदोलन (१९३९)

१९३९ मध्ये दुसरे महायुद्ध सुरू झाले तेव्हा नाझी जर्मनीने पोलंडवर आक्रमण केले.सुरुवातीला गांधीजींनी ब्रिटीशांच्या प्रयत्नांना अहिंसक नैतिक पाठबळ दिले.

इतर काँग्रेस नेत्यांनी लोकप्रतिनिधींचा सल्ला न घेता युद्धात एकतर्फी सहभाग घेण्यास विरोध केला.काँग्रेसच्या सर्व निवडक सदस्यांनी एकत्रितपणे आपल्या पदांचा राजीनामा दिला.

दीर्घ चर्चेनंतर, गांधींनी घोषित केले की भारताला स्वातंत्र्य नाकारले असताना भारत कोणत्याही युद्धाचा भाग होणार नाही.जसजसे युद्ध वाढत गेले, तसतसे गांधींनी ब्रिटिशांना भारत छोडो आंदोलन नावाचे विधेयक देऊन स्वातंत्र्याची मागणी तीव्र केली.

अशाप्रकारे, गांधीजींनी त्यांच्या हयातीत सुरू केलेल्या सर्व चळवळींनी आपल्या देशाच्या स्वातंत्र्याला पाठिंबा दिला.

महात्मा गांधी यांचे वय आणि मृत्यू

३० जानेवारी 19४८ रोजी नथुराम गोडसेनी महात्मा गांधींची हत्या केली होती. त्यांना 3 गोळ्या झाडण्यात आल्या आणि त्याच्या तोंडातून शेवटचे शब्द बाहेर पडले ते म्हणजे ‘हे राम’. 

गांधींच्या मृत्यूनंतर त्यांची समाधी दिल्लीतील राजघाट येथे बांधण्यात आली. वयाच्या ७९व्या वर्षी महात्मा गांधींनी तमाम देशवासीयांचा निरोप घेतला.

mahatma gandhi suvichar in marathi
Mahatma gandhi suvichar in marathi

महात्मा गांधी पुस्तके

महात्मा गांधी एक उत्तम लेखक सुद्धा होते. त्यांनी आपल्या जीवनावर आणि इतर महत्वपूर्ण विषयांवर पुस्तके लिहिली. खाली प्रसिद्ध महात्मा गांधी पुस्तके दिली आहेत. माझा आग्रह आहे,की ही पुस्तके तुम्ही एकदा तरी वाचावी.

  1. सत्याचे प्रयोग – आत्मकथा
  2. माझ्या स्वप्नातील भारत
  3. हिंद स्वराज
  4. आरोग्याची गुरुकिल्ली
  5. भगवद्‌गीता गांधींच्या मते

गांधीजींबद्दल काही तथ्ये | Information About Mahatma Gandhi In Marathi

  • गांधीजींचा जन्मदिवस (2 ऑक्टोबर) जगभरात आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो.
  • गांधींचे शालेय शिक्षण राजकोटच्या अल्फ्रेड हायस्कूलमध्ये झाले.
  • महात्मा गांधींची मातृभाषा गुजराती होती.
  • गांधीजी घरात सर्वात लहान होते.त्यांना २ भाऊ आणि १ बहीण होती.
  • गांधींचे वडील धर्माने हिंदू आणि जातीने मोद बनिया होते.
  • रवींद्रनाथ टागोर यांनी गांधीजींना महात्मा ही उपाधी दिली
  • सुभाष चंद्र बोस यांनी इ.स. १९४४ मध्ये पहिल्यांदा “राष्ट्रपिता” असे संबोधले.
  • पूर्वीच्या बिर्ला हाऊसच्या बागेत मोहनदास करमचंद गांधी यांची हत्या झाली.
  • महात्मा गांधींनी अनेक नामवंत लोकांशी पत्राद्वारे संवाद साधला. टॉल्स्टॉय, आइनस्टाईन, हिटलर आणि चार्ली चॅप्लिन हे अनेक जण होते.
  • गांधीजींनी सत्याग्रहातील त्यांच्या सहकार्‍यांसाठी दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्गपासून २१ मैलांवर ११०० एकर जागेवर टॉल्स्टॉय फार्म नावाची छोटी वसाहत उभारली.
  • भारतात ५३ मोठे रस्ते (लहान रस्ते वगळून) आहेत आणि भारता बाहेरील ४८ रस्त्यांना महात्मा गांधींची नाव आहेत. 
  • गांधींनी केवळ स्वातंत्र्यासाठीच लढा दिला नाही तर अस्पृश्य, खालच्या जातीतील लोकांना न्याय्य वागणूक देण्याची मागणी केली आणि त्यांच्या समर्थनार्थ अनेक उपोषणही केले. त्यांनी अस्पृश्य हरिजनांना “देवाची मुले” असेही संबोधले.
  • १९८२ मधील गांधी हा मोहनदास करमचंद गांधी यांच्यावर आधारित एक महाकाव्य ऐतिहासिक नाटक चित्रपट आहे जो सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी शैक्षणिक पुरस्कार जिंकला आहे.
  • १९३० मध्ये गांधीजी टाइम मॅगझिन मॅन ऑफ द इयर होते. ते एक महान लेखक होते आणि महात्मा गांधींच्या संग्रहित पुस्तकं मध्ये ५०,००० पाने आहेत.
  • विन्स्टन चर्चिल हे महात्मा गांधींचे सर्वात स्पष्ट राजकीय टीकाकार होते.
  • गांधी आणि त्यांच्या पत्नीला ते १६ वर्षांचे असताना त्यांचे पहिले मूल झाले. त्या मुलाचा काही दिवसांनंतर मृत्यू झाला.
  • महात्मा गांधींना ५ वेळा नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते, परंतु त्यांना कधीही पुरस्कार मिळाला नाही.
  • ग्रेट ब्रिटनने त्यांच्या मृत्यूच्या २१ वर्षांनंतर त्यांचा सन्मान करणारे स्टॅम्प जारी केले. ग्रेट ब्रिटन हा तो देश होता ज्याच्या विरोधात त्यांनी स्वातंत्र्यासाठी लढा दिला. 
  • मोहनदास करमचंद गांधी महात्मा ही पदवी घेऊन जन्माला आले नव्हते. काही लेखकांच्या मते त्यांना नोबेल पारितोषिक विजेते बंगाली कवी रवींद्रनाथ टागोर यांनी ही पदवी दिली होती.
  • जवाहरलाल नेहरू जेव्हा स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करण्यासाठी भाषण देत होते, तेव्हा गांधीजी उपस्थित नव्हते.
  • महात्मा गांधींच्या अंत्ययात्रेत हजारो लोक सामील झाले होते.लोकांची रांग ही ८ किलोमीटर लांब होती.
  • रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने १९९६ मध्ये महात्मा गांधींचे पोर्ट्रेट प्रदर्शित करून गांधी सीरीजच्या नोटा जारी केल्या. १९९६ मध्ये जारी करण्यात आलेली मालिका १० आणि ५०० ​​रुपयांच्या नोटांची आहे.
  • गांधीजींचा जन्म शुक्रवारी झाला, भारताला स्वातंत्र्य शुक्रवारी मिळाले आणि गांधीजींची हत्याही शुक्रवारी झाली.

निष्कर्ष (Mahatma Gandhi Information In Marathi)

देशाच्या स्वातंत्र्यात गांधीजींचे योगदान शब्दात मोजता येणार नाही.त्यांनी इतर स्वातंत्र्यसैनिकांसह इंग्रजांना भारत सोडण्यास भाग पाडले.

गांधीजी एक महान व्यक्ती होते.गांधीजींनी आपल्या आयुष्यात अनेक महत्त्वाची कामे केली.त्यांची शक्ती ‘सत्य आणि अहिंसा’ होती. आजही आपण त्यांची तत्त्वे पालन करून समाजात महत्त्वाचे बदल घडवून आणू शकतो.

या लेखात Mahatma gandhi information in marathi या मध्ये आपल्याला काही शंका असल्यास किंवा त्यामध्ये काही सुधारणा झाली पाहिजे असे आपल्याला वाटत असल्यास, यासाठी आपण आम्हाला कमेन्ट किंवा ईमेल लिहून सांगू शकता.

यातून काही नवीन शिकायला मिळाले असेल तर कृपया ही माहिती जास्तीत जास्त इतरांपर्यन्त पोहचवा.फेसबुक,ट्विटर आणि इतर सोशल मीडिया साइट्स वर हे शेअर करा.धन्यवाद

महात्मा गांधीजिंबद्दल सतत विचारले जाणारे प्रश्न (FAQ’s)

लहानपणी गांधीजींना काय म्हणत?

मोनिया.

गांधीजींच्या मतानुसार स्वराज्य म्हणजे काय?

गांधीजींच्या मतानुसार स्वराज्य म्हणजे देशवासीयांसाठी स्वातंत्र्य आणि लोकांनी बहुमताने स्थापन केलेले राज्य.

महात्मा गांधींचे राजकीय गुरू कोण होते?

गोपाळ कृष्ण गोखले.

गांधीजींच्या आश्रमाचे नाव काय आहे?

साबरमती आश्रम,अहमदाबाद.

महात्मा गांधी यांच्या दक्षिण आफ्रिकेतील आश्रमाचे नाव काय?

टॉल्स्टॉय फार्म.

महात्मा गांधी यांच्या आत्मचरित्राचे नाव काय?

सत्याचे प्रयोग(मराठी).

राजद्रोहाच्या आरोपाखाली गांधीजींना पहिल्यांदा कोठे अटक झाली?

महात्मा गांधींना १० मार्च १९२२ रोजी साबरमती आश्रम अहमदाबाद येथे राजद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली.

प्रतिक्रिया द्या