Mahatma Jyotiba Phule Karj Mukti Yojana (mjpsky) | महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजना

मा. उद्धव ठाकरे यांचे सरकार स्थापने नंतर २१ डिसेंबर २०१९ रोजी महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजना २०२१ सुरू करण्यात आली. Mahatma Jyotiba Phule Karj Mukti Yojana(mjpsky) अंतर्गत ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत राज्यातील ज्या शेतकऱ्यांनी पिकासाठी कर्ज घेतले आहे ,ते कर्ज राज्य सरकार माफ करणार आहे. आज आम्ही आपल्याला या योजनेशी संबंधित सर्व माहिती जसे की अर्ज प्रक्रिया, कागदपत्रे, पात्रता इत्यादी माहिती देणार आहोत.

mjpsky marathi

महात्मा जोतिबा फुले कर्ज माफी योजना | mjpsky

या योजनेंतर्गत महाराष्ट्र सरकार राज्यातील शेतकऱ्यांचे २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करणार आहे. या महात्मा जोतिबा फुले कर्ज माफी योजना चा लाभ गरीब शेतकऱ्यांना तर होणारच आहे. तसेच याचा फायदा उस ,फळे आणि इतर पारंपारिक शेती करणार्‍या राज्यातील अनेक शेतकऱ्यांना देखील होणार आहे. महाराष्ट्राचे अर्थमंत्री जयंत पाटील म्हणाले की, शेतकर्‍यांना कर्ज माफ करण्याची कोणतीही अट राहणार नाही आणि त्याचा संपूर्ण तपशील काही दिवसात मुख्यमंत्री कार्यालया मार्फत जाहीर करण्यात येईल.

महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी यादी | mjpsky

या योजनेंतर्गत लाभार्थ्यांची तिसरी यादी लवकरच जाहीर केली जाईल. राज्यातील ज्या शेतकऱ्यांचे नावे अगोदरच्या दोन याद्यांमध्ये आली नाहीत, त्यांना आता त्यांची नावे तिसर्‍या यादीमध्ये तपासता येतील आणि शासनाकडून देण्यात येणाऱ्या मदतीचा लाभ घेता येईल.यादीमध्ये ज्यांची नावे असतील,केवळ त्यानंच या योजनेचा लाभ मिळेल. यादी पाहण्यासाठी आपण आपल्या बँक, ग्रामपंचायत किंवा आपल्या सरकारी सेवा केंद्राला भेट द्या.

महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजना कार्यपद्धत

 • आपला आधार क्रमांक बँकेच्या, विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या कर्जखात्याशी संलग्न करावा.
 • मार्च २०२० पासून बँकांनी आधार क्रमांकासह आणि कर्ज खात्याच्या रकमेसह तयार केलेल्या याद्या सूचनाफलक तसेच चावडीवर प्रसिद्ध केल्या जातील.
 • या याद्यांमध्ये शेतकऱ्याच्या कर्जखात्याला विशिष्ट ओळख क्रमांक दिलेला असेल.
 • शेतकऱ्यांनी आधार कार्डासोबत आपल्याला दिलेला विशिष्ट ओळख क्रमांक घेवून ‘आपले सरकार सेवा’ केंद्रात जावून आपल्या आधार क्रमांकाची आणि कर्ज रकमेची पडताळणी करावी.
 • पडताळणी नंतर शेतकऱ्यांना कर्ज रक्कम मान्य असल्यास नियमानुसार कर्जमुक्तीची रक्कम कर्जखात्यात जमा होईल.
 • कर्ज रकमेबाबत व आधार क्रमांकाबाबत शेतकऱ्यांचे वेगळे म्हणणे असल्यास ते जिल्हाधिकाऱ्यांच्या समितीसमोर मांडले जाईल. समिती त्याबाबत निर्णय घेऊन अंतिम कार्यवाही करेल.

हेही वाचा – Post office schemes in Marathi

Mahatma Jyotiba Phule Karj Mukti Yojana या योजनेचा लाभ यांना मिळणार नाही

 • आजी व माजी मंत्री, आजी व माजी आमदार आणि खासदार
 • केंद्र व राज्य शासनाचे अधिकारी, कर्मचारी (मासिक २५ हजार पेक्षा जास्त वेतन असणारे) (चतुर्थश्रेणी वगळून)
 • महाराष्ट्र शासनाचे अंगीकृत उपक्रमाचे अधिकारी, कर्मचारी (मासिक २५ हजार पेक्षा जास्त वेतन असणारे) (चतुर्थश्रेणी वगळून)
 • सहकारी साखर कारखाने,कृषीउत्पन्न बाजार समिती, सहकारी दूध संघ, नागरी सहकारी बँका, सहकारी सूत गिरणी यांचे संचालक मंडळ व या संस्थांमध्ये मासिक २५ हजार पेक्षा जास्त वेतन असणारे अधिकारी
 • २५ हजार रु. पेक्षा जास्त निवृत्तीवेतन घेण्याऱ्या व्यक्ती
 • शेती उत्पन्नाव्यतिरिक्त आयकर भरणाऱ्या व्यक्ती

महात्मा जोतिबा फुले कर्ज माफी योजना कागदपत्रे

 • अर्जदाराचे आधार कार्ड
 • पत्ता पुरावा
 • बँक खाते पासबुक
 • मोबाइल नंबर
 • पासपोर्ट आकाराचा फोटो
 • कर्जाचे तपशील कागदपत्रे

महात्मा फुले कर्ज माफी योजना link | mjpsky portal

या योजनेची सर्व अद्ययावत माहिती महाराष्ट्र शासनाने,महात्मा फुले कर्ज माफी योजना साठी तयार केलेल्या अधिकृत संकेत स्थळावर मिळेल.
महात्मा फुले कर्ज माफी योजना link इथे क्लिक करा

महात्मा फुले कर्ज योजना gr | mjpsky maharashtra gov in

महात्मा फुले कर्ज माफी योजना या योजने बद्दलचा GR,योजनेच्या अधिकृत संकेत स्थळावर उपलब्ध आहे.
GR पाहण्याकरीत इथे क्लिक करा

हे पण वाचा : Share Market In Marathi

प्रतिक्रिया द्या