Mahishasura Mardini Stotram Meaning In Marathi | महिषासुर मर्दिनी स्तोत्र मराठी अर्थ

बऱ्याच लोकांना Mahishasura Mardini stotram meaning in Marathi किंवा Aigiri Nandini lyrics in Marathi with meaning माहीत नाही.लोकांना फक्त aigiri nandini lyrics marathi किंवा mahishasura mardini lyrics in marathi माहीत आहे.

शास्त्रा मध्ये असे म्हटले आहे की जो कोणी दिवसातून एकदाही Mahishasura Mardini स्त्रोताचे पठण करतो. त्याच्या आयुष्यात कधीही संकट येत नाही तसेच तो कधीही नरकात जात नाही.

महिषासुर मर्दिनी स्तोत्र मराठी किंवा इतर कोणताही स्तोत्र असो,ते अर्थ जाणून वाचला तर त्याच फायदा हा नेहमी जास्तच होतो.आज या लेखात mahishasura mardini stotram meaning in marathi सांगणार आहोत.एक विनंती Aigiri Nandini lyrics in Marathi with meaning हे संपूर्ण वाचा.

Mahishasura Mardini Stotram Meaning In Marathi
Mahishasura Mardini Stotram Meaning In Marathi

Aigiri Nandini Lyrics in Marathi with Meaning

।।१।।
अयि गिरि नन्दिनी नन्दितमेदिनि विश्वविनोदिनि नन्दिनुते।
गिरिवर विन्ध्यशिरोधिनिवासिनी विष्णुविलासिनि जिष्णुनुते ।।
भगवति हे शितिकण्ठकुटुम्बिनि भूरिकुटुम्बिनि भूरिकृते ।
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ।।

अर्थ – हे पर्वतकन्ये पार्वती ! तू सार्‍या पृथ्वीला आनंदित करणारी व संपूर्ण जगाला रमविणारी आहेस. शिवाचा गण नंदी तुझे स्तवन करतो.

पर्वतश्रेष्ठ विध्याद्रीच्या शिरावर तुझे वास्तव्य आहे. तू भगवान्‌ विष्पूसह्‌ विलास करतेस, व तेही तुला वंदन करतात.हे भगवती ! भगवान्‌ नीलकंठाची तू पत्नी असून सारे प्राणीमात्र आपले कुटुंब मानणारी आहेस. सर्वांना ऐशर्य प्रदान करतेस.

हे गिरिकन्ये! तुझ्या केसांची वेणी रमणीय (सुंदर) आहे. तू महिषासुराचा नाश करणारी आहेस ! तुझा जयजयकार असो.

।।२ ।। 
सुरवरवर्षिणि दुर्धरधर्षिणि दुर्मुखमर्षिणि हर्षरते । 
त्रिभुवनपोषिणि शंकरतोषिणि किल्बिषमोषिणि घोषरते ।। 
दनुजनिरोषिणि दितिसुतरोषिणि दुर्मदशोषिणी सिन्धुसुते । 
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ।। 

अर्थ – नेहमी आनंदात मग्न असणार्‍या हे देवी ! श्रेष्ठ अशा देवांवर तू कृपेचा वर्षाव करणारी आहेस.

भक्तांनी केलेल्या जयघोषात रममाण होणार्‍या हे देवी ! तू दुर्मुब नावाच्या राक्षसाचा नाश करणारी, तसेच दुर्धर अशा राक्षसांना धाकात ठेवणारी आहेस.हे देवी ! तू त्रिभुवनाचे पालनपोषण करणारी, श्रीशंकराला संतोष देणारी आणि पापांचा परिहार करणारी आहेस.

हे समुद्रकन्ये ! तू दैत्यांवर क्रोधित होणारी, राक्षसांना शोषून टाकणारी आणि दुर्मद नावाच्या राक्षसेनापतीचा नाश करणारी आहेस.

हे गिरिकन्ये! तुझ्या केसांची वेणी रमणीय (सुंदर) आहे. तू महिषासुराचा नाश करणारी आहेस ! तुझा जयजयकार असो.

।।३।।
अयि जगदम्बमदम्बकदम्ब वनप्रियवासिनि हासरते ।
शिखरिशिरोमणि तुङ्गहिमालय शृंगनिजालय मध्यगते ।।
मधुमधुरे मधुकैटभगन्जिनि कैटभभंजिनि रासरते ।
 जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ।।

अर्थ – जगन्माते ! माझे आई! हास्यरसाचा स्वाद घेणार्‍या हे देवी ! तुला कदंबवनात राहणे फार आवडते. सर्व पर्वतात अत्यंत उंच अशा हिमालयाच्या शिरावर तुझे स्वतःचे निवासस्थान आहे.

मधाहून मधुर स्वभाव व रूप असणार्‍या देवी ! मधु व कैटभ़ राक्षसांना तू पराभूत केले आहेस. आणि कैटभ राक्षसाचा तर नाशच केलास. रासक्रीडेमध्ये देखील तू रममाण होतेस.

हे गिरिकत्ये! तुझ्या केसांची वेणी रमणीय (सुंदर) आहे. तू महिषासुराचा नाश करणारी आहेस ! तुझा जयजयकार असो.

।।४।।
अयि शतखण्ड विखण्डितरुण्ड वितुण्डितशुण्ड गजाधिपते ।
रिपु गजगण्ड विदारणचण्ड पराक्रम शुण्ड मृगाधिपते ।।
निजभुज दण्ड निपतित खण्ड विपातित मुंड भटाधिपते ।
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ।।

अर्थ – मोठी सोंड असलेल्या तुझ्या प्रचंड हत्तीने युद्धात शेकडो तुकडे करून छिन्न-भिन्न झालेली राक्षसांची घडाशिवाय मस्तके व मस्तकाशिवाय धडे आपल्या पायाखाली तुडवून टाकली आहेत.

शत्रूंच्या हत्तींची विशाल गंडस्थले फोडण्याचे कौशल्य असलेल्या पराक्रमी सिंहाची तू स्वामिनी आहेस. तू स्वतः आपल्या भुजदंडांनी चंड नावाच्या राक्षसांच्या सेनापतीस जमिनीवर पाडून ठार मारलेस. तसेच मुंड नावाच्या दैत्याची रणांगणात चिरफाड केलीस.

हे गिरिकन्ये! तुझ्या केसांची वेणी रमणीय (सुंदर) आहे. तू महिषासुराचा नाश करणारी आहेस ! तुझा जयजयकार असो.

।।५।।
अयि रणदुर्मद शत्रुवधोदित दुर्धरनिर्जर शक्तिभृते ।
चतुरविचारधुरीणमहाशिव दूतकृत प्रथमाधिपते ।।
दुरितदुरीह दुराशयदुर्मति दानवदूत कृतान्तमते ।
 जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ।।

अर्थ – युद्धात दैत्यांशी प्रसंग आला असताना युद्धाचा मद चढलेल्या शत्रूचा वध करण्यासाठी तू कधीही क्षीण न होणारी शक्‍तीधारण करतेस.

(युद्धाच्या अगोदर) विवेकशील, चतुर अशा थोर मनाच्या शंकराला (प्रथम गणांच्या अधिपतीला) तू आपला दूत म्हणून नेमलेस, पण (दैत्यांनी) दुर्वर्तनी, दुष्ट वासनेचे दुष्ट संकल्पाचे, आणि कुत्सित मनाचे असे दैत्य आपले दूत म्हणून पाठविले. परंतु तुझ्या दूतांनी त्यांची मती कुंठित करून टाकली.

हे गिरिकन्ये! तुझ्या केसांची वेणी रमणीय (सुंदर) आहे. तू महिषासुराचा नाश करणारी आहेस ! तुझा जयजयकार असो.

।।६।।
अयि शरणागत वैरिवधूवर वीरवराभय दायकरे ।
त्रिभुवनमस्तक शुलविरोधि शिरोऽधिकृतामल शूलकरे ।।
दुमिदुमितामर धुन्दुभिनादमहोमुखरीकृत दिङ्मकरे ।
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ।।

अर्थ – युद्धात शरण आलेल्या शत्रूंच्या स्त्रियांच्या श्रे्ठ अशा वीरपतींना अभयदान देणारा असा तुझा हात आहे. तुझ्या एका हातात स्वच्छ दिव्य असा शूल आहे. तो जगाच्या मस्तकावर शोभत आहे.

त्याच्याशी जे विरोध व स्पर्धा करतात त्यांची छाटलेली मस्तके तुझ्या तळ हातावर आवळ्याप्रमाणे शोभतात. तुझा विजय झाला असताना देवगण आपली दुंदुभी वाजवून आनंदोत्सव साजरा करतात. त्यावेळी त्या नादाने दाही दिशा दुमदुमून जातात.

हे गिरिकन्ये! तुझ्या केसांची वेणी रमणीय (सुंदर) आहे. तू महिषासुराचा नाश करणारी आहेस ! तुझा जयजयकार असो.

।।७।।
अयि निजहुङ्कृति मात्रनिराकृत धूम्रविलोचन धूम्रशते ।
समरविशोषित शोणितबीज समुद्भवशोणित बीजलते।।
शिवशिवशुम्भ निशुम्भमहाहव तर्पितभूत पिशाचरते ।
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ।।

अर्थ – आपल्या नुसत्या हुंकारानेच तू सैन्यासह आलेल्या धूम्रलोचन राक्षसाचे भस्म करून त्याचे निराकरण केलेस.

समरांगणात नुसत्या रक्‍तबीज राक्षसाचेच नव्हे त्याच्या रक्तकणरूप बीजापासून उत्पन्न झालेल्या अनेक रक्‍तबीज राक्षसांना गिळून टाकून तू जणू काय रक्‍तबीजलताच बनलीस.

महायुद्धात शुंभ व निशुंभ या राक्षसांना मारून तू त्यांच्या रक्‍तासाठी आसुसलेल्या भूतपिशाच्चांमध्ये येऊन त्यांना त्या दैत्यांच्या रक्‍ताने तृप्त केलेस.

हे गिरिकन्ये! तुझ्या केसांची वेणी रमणीय (सुंदर) आहे. तू महिषासुराचा नाश करणारी आहेस ! तुझा जयजयकार असो.

।।८।।
धनुरनुषङ्ग रणक्षणसङ्ग परिस्फुरदङ्ग नटत्कटके ।
कनकपिशङ्ग पृषत्कनिषङ्ग रसद्भटशृङ्ग हताबटुके ।।
कृतचतुरङ्ग बलक्षितिरङ्ग घटद्बहुरङ्ग रटद्बटुके ।
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ।।

अर्थ – युद्धाच्या क्षणी तू धनुष्याच्या दोरीला बाण लावून शरवर्षाव करतेस, त्यावेळी तुझ्या तैत्यातील वीरांचे बाहू स्फुरण पावतात व ते उत्साहाने नाचू लागतात.

त्या युद्धात तुझ्या सोनेरी पिंगट भात्यातील पंबरयुक्त बाणांनी ओरडणारे, गर्जणारे शत्रूवैत्यातील योद्धे घायाळ होऊन पडतात.

दैत्यांच्या चतुरंग सैन्या च्या नाशा मुळे रणभूमी रक्ताने भरून जाते. आणि तुला गराडा घालणारे दैत्य किंकाळ्या फोडू लागतात.

हे गिरिकन्ये! तुझ्या केसांची वेणी रमणीय (सुंदर) आहे. तू महिषासुराचा नाश करणारी आहेस ! तुझा जयजयकार असो.

।।९।। 
सुरललना ततथेयि तथेयि कृताभिनयोदर नृत्यरते । 
कृत कुकुथः कुकुथो गडदादिकताल कुतूहल गानरते ।। 
धुधुकुट धुक्कुट धिंधिमित ध्वनि धीर मृदंग निनादरते । 
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ।। 

अर्थ – हे देवी ! तू तात-था थेई-थी इत्यादी शब्दांचा समावेश असलेल्या भावपूर्ण नृत्यामध्ये मग्न राहते.

विविध स्वर्गीय ताल ऐकण्यात तू लीन असतेस.मृदंगच्या धू- धुकुट, धिमि-धिमि इत्यादी गंभीर ध्वनि ऐकत तू लिप्त होतेस.

हे गिरिकन्ये! तुझ्या केसांची वेणी रमणीय (सुंदर) आहे. तू महिषासुराचा नाश करणारी आहेस ! तुझा जयजयकार असो.

।।१०।।
जय जय जप्य जयेजयशब्द परस्तुति तत्परविश्वनुते ।
झणझणझिञ्झिमि झिङ्कृत नूपुरशिञ्जितमोहित भूतपते ।।
नटित नटार्ध नटी नट नायक नाटितनाट्य सुगानरते ।
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ।।

अर्थ – तुझ्या नावाचा जप केल्याने संतुष्ट होणार्‍या हे देवी ! जयजयकाराने युक्‍त असे तुझे स्तवन जेव्हा भक्‍त करतात, त्यावेळी जणू सारे जगच तुझी स्तुती करत आहे असे वाटते.

कधी पूर्ण तर कधी अर्धवट रंगलेल्या नटनटींनी युक्‍त अशा नृत्यात मग्न होऊन तू नृत्य करतेस, तेव्हा ‘झण झण्‌ झिम झिम्‌’ अशा तुझ्या नूपुरांच्या मधुर ध्वनीने तू भूतनाथ शंकराला मोहित करतेस.

हे गिरिकन्ये! तुझ्या केसांची वेणी रमणीय (सुंदर) आहे. तू महिषासुराचा नाश करणारी आहेस ! तुझा जयजयकार असो.

।।११।।
अयि सुमनःसुमनःसुमनः सुमनःसुमनोहरकान्तियुते ।
श्रितरजनी रजनीरजनी रजनीरजनी करवक्त्रवृते ।।
सुनयनविभ्रमर भ्रमरभ्रमर भ्रमरभ्रमराधिपते।
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ।।

अर्थ – हे देवी ! विकाररहित, स्वच्छ, पवित्र, देव व पवित्र सज्जन यांच्यासारखी व प्रसन्न असलेल्या फुलाप्रमाणे मन हरण करणारी तुझी कांती आहे.

आश्रित भक्तांना पोर्णिमेच्या रात्रीप्रमाणे सुख देणारी तू. तुझे रजनी म्हणजे दुर्गा हे नाव आहेच नीलवर्णाची व पीतवर्णाची अशी मिश्रित तेजाची तू असून रजनीकर चंद्राप्रमाणे तुझे मुखमंडल आल्हाददायक आहे.

तुझ्या काळ्याभोर डोळ्यातील हालणाऱ्या बाहुल्यां भोवती भ्रमित होऊन घिरट्या घालणाऱ्या भुंग्यांच्या त्रासामुळे अस्वस्थ झालेली अशी तू . तुझ्या विलासामुळे अधिक शोभायमान दिसतेस.

हे गिरिकन्ये! तुझ्या केसांची वेणी रमणीय (सुंदर) आहे. तू महिषासुराचा नाश करणारी आहेस ! तुझा जयजयकार असो.

।।१२।।
सहितमहाहव मल्लमतल्लिक मल्लितरल्लक मल्लरते ।
विरचितवल्लिक पल्लिकमल्लिक झिल्लिकभिल्लिक वर्गवृते ।।
शितकृतफुल्ल समुल्लसितारुण तल्लजपल्लव सल्ललिते ।
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ।।

अर्थ – हे देवी ! महान योद्ध्यांशी लढाईत तू नेहमी एखाद्या कोमल पुष्प सारखी असतेस. तुझ्या सेविका असलेल्या भिल्ल स्त्रिया, तुझ्यभोवती कोळंबीच्या कळपासारखे वेढलेले असतात.

तुझ्या चेहऱ्यावर नेहमी आनंद आहे.पहाटचा सूर्य आणि फुलणारा लाल फुलासारखा तुझे स्मितहास्य आहे.

हे गिरिकन्ये! तुझ्या केसांची वेणी रमणीय (सुंदर) आहे. तू महिषासुराचा नाश करणारी आहेस ! तुझा जयजयकार असो.

।।१३।।
अविरलगण्ड गलन्मदमेदुर मत्तमतङ्गजराजपते ।
त्रिभुवनभूषण भूतकलानिधि रूपपयोनिधि राजसुते ।।
अयि सुदतीजन लालसमानस मोहन मन्मथराजसुते ।
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ।।

अर्थ – नेहमी मदाचा स्राव करणार्‍या व त्यामुळे धुरकट कांतीच्या मदोन्मत्त तरूण हत्तीप्रमाणे तुझी गती डौलदार आहे.त्रैलोक्याला भूषणाप्रमाणे असणार्‍या सोळा कलांनी पूर्ण चंद्रासारख्या आनंददायक क्षीरसागराची तू श्रेष्ठ कन्या आहेस.

शुभ्र व सुंदर दंतपंक्‍्तींनी युक्‍त, सुंदर तरुणींची मने मोहित करणार्‍या जीव जगतावर सत्ता गाजविणाऱ्या मदनाला तू जीवदान देणारी वत्सल माता आहेस.

हे गिरिकन्ये! तुझ्या केसांची वेणी रमणीय (सुंदर) आहे. तू महिषासुराचा नाश करणारी आहेस ! तुझा जयजयकार असो.

।।१४।।
कमलदलामल कोमलकान्ति कलाकलितामल भाललते ।
सकलविलास कलानिलयक्रम केलिचलत्कल हंसकुले ।।
अलिकुलसङ्कुल कुवलयमण्डल मौलिमिलद्बकुलालिकुले ।
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ।।

अर्थ – श्वेत कमळाच्या स्वच्छ पाकळीप्रमाणे कोमल व कांतीमान असलेले चंद्रकोरीने युक्‍त असे तुझे कपाळ शोंभायमान दिसत आहे.

सर्व विलास विभ्रम आणि वेगवेगळ्या कला यांचे आश्रयस्थान असलेल्या, मंदगती हंसाच्या गतीप्रमाणे तुडौलदार गती दिसत आहे.

भुंग्यांच्या थव्याप्रमाणे व कृष्णकमळांच्या समूहासारख्या काळ्याभोर अशा तुझ्या केशकलापावर बकुळीची फुले असल्यामुळे, भुंग्यांचा समुदायच तेथे एकत्रित झाला आहे असे वाटते.

हे गिरिकन्ये! तुझ्या केसांची वेणी रमणीय (सुंदर) आहे. तू महिषासुराचा नाश करणारी आहेस ! तुझा जयजयकार असो.

।।१५।।
करमुरलीरव वीजितकूजित लज्जितकोकिल मञ्जुमते ।
मिलितपुलिन्द मनोहरगुञ्जित रञ्जितशैल निकुञ्जगते ।।
निजगणभूत महाशबरीगण सद्गुणसम्भृत केलितले ।
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ।।

अर्थ – हे राघा देवी ! तुझ्या हातातील मुरलीच्या प्रेरणेने निर्माण झालेल्या गोड स्वरामुळे लाजलेल्या कोकिळ तुझ्याभोवती जमल्या की तुझे मन रमते.

आसपास एकत्रित झालेल्या भुंग्यांच्या मनोहर गुंजनाने नादित झालेल्या पर्वतावरील वेलींच्या मंडपात तुझे वास्तव्य असते.

तुझ्या सेविका असलेल्या भिल्ल स्त्रियांचा मोठा जमाव तुझ्याभोवती फेर धरून क्रीडा करतो त्यावेळी तू त्यात रमतेस.

हे गिरिकन्ये ! तुझ्या केसांची वेणी रमणीय (सुंदर) आहे.तू महिषासुराचा नाश करणारी आहेस ! तुझा जयजयकार असो.

।।१६।।
कटितटपीत दुकूलविचित्र मयुखतिरस्कृत चन्द्ररुचे ।
प्रणतसुरासुर मौलिमणिस्फुर दंशुलसन्नख चन्द्ररुचे ।।
जितकनकाचल मौलिमदोर्जित निर्भरकुञ्जर कुम्भकुचे ।
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते  ।।

अर्थ – हे देवी तूझ्या अंगावरील रेशमी पिवळा शालू आपल्या उज्ज्वल किरणांच्या प्रकाशाने, प्रखरपणे प्रकाशणार्‍या सूर्यालाही तुच्छ करीत आहे.

सुवर्णमय मेरू पर्वतालाही जिंकणार्‍या तुझ्या सोनेरी कांतियुक्‍त, सिंहाने गंडस्थळावर झडप घातल्याने चीत्कार करणार्‍या मदमत्त हत्तींच्या गंडस्थळाप्रमाणे तुझी विशाल स्तनमंडले शोभत आहेत.

देव आणि असुर तुझ्या चरणी नम्र झाले असता त्यांच्या डोक्यावरील मुकुटातील रत्नांच्या चमकणाऱ्या किरणांनी तुझ्या चरणांच्या नखांची प्रभा अधिक शोभत आहे.

हे गिरिकन्ये ! तुझ्या केसांची वेणी रमणीय (सुंदर) आहे.तू महिषासुराचा नाश करणारी आहेस ! तुझा जयजयकार असो.

।।१७।।
विजितसहस्रकरैक सहस्रकरैक सहस्रकरैकनुते।
कृतसुरतारक सङ्गरतारक सङ्गरतारक सूनुसुते।।
सुरथसमाधि समानसमाधि समाधिसमाधि सुजातरते।
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ।।

अर्थ – हजारो किरणांनी युक्‍त असलेल्या सूर्याचे हजारो समूह व त्या समूहांचे असंख्य समूह ज्याने आपल्या सहस्र किरणांनी जिंकले आहेत तो भगवन्‌ विष्णू तुझे स्तवन करतो.

देवगणांच्या रक्षणाकरिता प्रचंड युद्ध करणार्‍या कार्तिकेयाला तारकासुराशी युद्ध करण्यात यश मिळाले म्हणून तो तुझा मुलगा तुझी स्तुती करीत आहे.

सुरथ राजाने व समाधि वैश्याने आपापले इष्ट साध्य व्हावे म्हणून दोघांनीही चित्त एकाग्र करण्याचा सारखाच उद्योग केला आणि चांगली फळे मिळविली त्यामुळे तू त्यांच्यावर प्रसन्न आहेस.

हे गिरिकन्ये ! तुझ्या केसांची वेणी रमणीय (सुंदर) आहे.तू महिषासुराचा नाश करणारी आहेस ! तुझा जयजयकार असो.

।।१८।।
दकमलं करुणानिलये वरिवस्यति योऽनुदिनं सुशिवे ।
अयि कमले कमलानिलये कमलानिलयः स कथं न भवेत् ।।
तव पदमेव परम्पदमित्यनुशीलयतो मम किं न शिवे ।
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ।।

अर्थ – हे मंगलमयी, करूणानिधान भगवती, जो तुझ्या पादपद्यांची प्रतिदिन पूजा करतो, हे कमले ! हे कमलानिवासिनी ! तो स्वतः साक्षात लक्ष्मीच्या निवासस्थानी राहणारा कसा होणार नाही अर्थात विष्णूरूप कसा होणार नाही ? अवश्य होईल

तुझे चरण हे परमपद आहे असे मानणार्‍या मला त्याची प्राप्ती का होणार नाही ? अवश्य होईल !

हे गिरिकन्ये ! तुझ्या केसांची वेणी रमणीय (सुंदर) आहे.तू महिषासुराचा नाश करणारी आहेस ! तुझा जयजयकार असो.

।।१९।।
कनकलसत्कलसिन्धुजलैरनुषिञ्चति तेगुणरङ्गभुवम् ।
भजति स किं न शचीकुचकुम्भतटीपरिरम्भसुखानुभवम् ।
तव चरणं शरणं करवाणि नतामरवाणि निवासि शिवम् ।
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ।।

अर्थ – प्रकाशाने झळकणार्‍या सोन्याच्या कलशातील जलांनी जो तुझ्या अंगणातील सुंदर भूमीवर सिंचन करतो, तो भक्‍त स्वर्गातील अप्सरांच्य सहवासाचा आनंदानुभव घेणार नाही काय? घेईलच.

हे मृडानी, शिवपत्नी ! तुझ्या पायी मी शरण आहे. माझ्यावर नेहमी कल्यांणकारक गोष्टींचा वर्षव होऊ दे.

हे गिरिकन्ये ! तुझ्या केसांची वेणी रमणीय (सुंदर) आहे.तू महिषासुराचा नाश करणारी आहेस ! तुझा जयजयकार असो.

।।२०।।
तव विमलेन्दुकुलं वदनेन्दुमलं सकलं ननुकूलयते।
किमु पुरुहूतपुरीन्दु मुखीसु मुखीभिरसौ विमुखीक्रियते।
ममतु मतं शिवनामधने भवती कृपया किमुतक्रियते।
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ।।

अर्थ – तुझ्या मुखचंद्राचा प्रकाश कलंरहित चंद्रप्रकाशाला देखील निष्प्रभ करतो !

एवढेच काय ! इंद्राच्या नगरीतील लावण्यवती अप्सरासुद्धा त्याच्यापुढे बजील होऊन तोंड लपवितात !

भगवान शंकराचे नाम हेच जिचे धन सर्वस्व आहे अशा हे देवी ! तुझ्या कृपेने काय होणार नाही !हेच माझे ठाम मत आहे.

हे गिरिकन्ये ! तुझ्या केसांची वेणी रमणीय (सुंदर) आहे.तू महिषासुराचा नाश करणारी आहेस ! तुझा जयजयकार असो.

।।२१।।
अयि मयि दीन दयालु-तया कृपयैव त्वया भवितव्यमुमे।
अयि जगतो जननी कृपयासि यथासि तथानुमितासिरते।।
यदुचितमत्र भवत्युररीकुरुतादुरुतापमपाकुरुते।
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते।।

अर्थ – हे उमे ! तू दीनांवर दया करणारी असल्याने, माझ्यावर नेहमी कृपा करावीस. हे रमे ! तू सर्व जगाची कृपावती माता, हे सर्वश्र सर्वांनीच मानले आहे.

आता तुला हेच योग्य की आमचा भार घेऊन तू आमचे भयंकर कष्ट दूर कर.

हे गिरिकन्ये ! तुझ्या केसांची वेणी रमणीय (सुंदर) आहे.तू महिषासुराचा नाश करणारी आहेस ! तुझा जयजयकार असो.

हे पण वाचा : Madhurashtakam lyrics with meaning in Marathi

Mahishasura Mardini Stotram Meaning In Marathi | Aigiri Nandini Lyrics in Marathi with Meaning

आम्हाला आशा आहे की  Mahishasura Mardini stotram meaning in Marathi हा लेख तुम्हाला आवडला असेल.या लेखात Aigiri Nandini lyrics in Marathi with meaning या मध्ये आपल्याला काही शंका असल्यास किंवा त्यामध्ये काही सुधारणा झाली पाहिजे असे आपल्याला वाटत असल्यास, यासाठी आपण आम्हाला ईमेल लिहून सांगू शकता.

आपल्याला हा लेख आवडला असेल किंवा यातून काही नवीन शिकायला मिळाले असेल तर कृपया ही माहिती जास्तीत जास्त इतरांपर्यन्त पोहचवा.फेसबुक,ट्विटर आणि इतर सोशल मीडिया साइट्स वर हे शेअर करा.धन्यवाद.

हे पण वाचा :

प्रतिक्रिया द्या