मराठी म्हणी संग्रह व अर्थ | मराठी म्हणी ओळखा

मराठी भाषा ही खूप गोड भाषा आहे.तसेच मराठी म्हणी सुद्धा खूप रंजक आणि मजेशीर आहे.मराठी म्हणी संग्रह व अर्थ आपल्याला काही न काही शिकवतात.अस्सल मराठी गावरान, जुन्या, नवीन, विनोदी, लग्नाच्या, खादाड, टोमणे मराठी म्हणी ओळखा व अर्थ वाचा.

मराठी म्हणी संग्रह व अर्थ जाणून घेतल्यावर मराठी म्हणी ओळखा.आपल्याला जीवनातील अनुभव,चांगल्या वाईट प्रवृत्ती,आचार-विचार,चालीरीती व इतर ज्ञान म्हणी मधून शिखण्यास मिळते.म्हणी समाजाचा आरसाच समजले जातात.

मराठी म्हणी या वर अवलंबून बरेच प्रश्न स्पर्धा परीक्षा मधे विचारले जातात. ‘मराठी व्याकरण’ या विषयामध्ये मराठी म्हणी ओळखा,ऐतिहासिक मराठी म्हणी,मराठी म्हणी व वाक्प्रचार आणि म्हणी व त्याचे अर्थ व वाक्यात उपयोग या स्वरूपात प्रश्न विचारले जातात.

जर आपण खाली दिलेल्या सर्व म्हणी व त्याचे अर्थ वाचून काढले,तर त्याचा आपल्याला स्पर्धा परीक्षेत नक्कीच उपयोग होईल.

मराठी म्हणी संग्रह व अर्थ (Marathi Mhani with meaning)
Marathi Mhani With Meaning | मराठी म्हणी संग्रह व अर्थ

मराठी म्हणी ओळखा

 1. आलीमिळी गुपचिळी – आपले गुपित किंवा रहस्य उघडकीसयेऊ नये म्हणून गप्प बसने .
 2. संगोसंगी वडाला वांगी – एखादी विशिष्ट गोष्ट एकाने दुसरयाला ,दुसरयाने तिसरयाला सांगताना शेवटी मूळगोष्ट बाजूला राहून तिसरेच काहीतरी निर्माण होणे.
 3. एकाने गाय मारली म्हणून दुसरयाने वासरू मारू नये – समोरच्या माणसाने आपल्याशी बेजबाबदार वर्तन केल्यास आपणही त्याचेच अनुकरण करू नये .
 4. असेल माझा हरी, तर देईल खाटल्यावरी – स्वतः आळशी पनाणे काहीही उद्योग नं करता दैवावर विसंबून सर्व सुखे मिळण्याची अपेक्षा धरणे.
 5. पी हळद हो गोरी – अति उत्साही होणे.
 6. मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही – कोणतीही गोष्ट अनुभव आल्याशिवाय समजत नाही.
 7. बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर – कोणताही एक पर्याय निवढा.
 8. खायला काळ भुईला भार – कामी न येणारा माणूस हा ओझं असतो.
 9. वारा पाहून पाठ फिरवावी – वातावरण पाहून वागावे.
 10. दगडावरची रेघ – न बदलणारी गोष्ट.
 11. असतील शिते तर जमतील भूते – फायदा असेल तर त्या माणसाच्या आजूबाजूला फिरणे.
 12. अर्थी दान महापुण्य – गरजूंना दान करणे हे पुण्य काम आहे.
 13. आवळा देऊन कोहळा काढणे – स्वार्थासाठी छोटी वस्तु देऊन मोठा फायदा करून घेणे.
 14. असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ – दुर्जन माणसाची संगत जीवाला धोका निर्माण करू शकते.
 15. अति तेथे माती – कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा नुकसान कारक ठरतो.
 16. अंधारात केले पण उजेडात आले – कितीही लपून केलेले काम असो शेवटी ते नजरेसमोर येताच.
 17. काप गेले नी भोके राहिली – सारे ऐश्वर्या गेले आणि आता फक्त आठवणी राहिल्या.
 18. जानवे घातल्याने ब्राह्मण होत नाही – बाह्य देखाव्याने माणूस हुशार होत नाही.
 19. तळे राखील तो पाणी चाखील – सोपावलेले काम पूर्ण करून आपला फायदा करून घेणे.
 20. काकडीची चोरी फाशीची शिक्षा – अपराध खूप लहान पण त्याची शिक्षा मात्र खूप मोठी.

मराठी म्हणी संग्रह व अर्थ

 1. गर्जेल तो पडेल काय – नुसता बोलणं कृती काही नाही.
 2. आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे – अपेक्षेपेक्षा जास्त प्राप्ती होणे.
 3. उंटावरचा शहाणा – मूर्ख सल्ला देणारा.
 4. नाचता येईना अंगण वाकडे – स्वतःला काही येत नसताना दुसऱ्यात दोष काढणे.
 5. उंटावरून शेळ्या हाकणे -आळस, हलगर्जीपणा करणे.
 6. घोडामैदानजवळ असणे – परीक्षा लवकरच होणे.
 7. कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही – क्षुद्र माणसांच्या निंदेने थोरांचे नुकसान होत नाही.
 8. डोंगर पोखरून उंदीर कढणे – जास्त श्रम करून कमी फायदा होणे.
 9. भरवशाच्या म्हशीला टोणगा – पूर्ण निराशा करणे.
 10. पाण्यात राहून माशाशी वॆर – बलवानाशी शत्रुत्व काय कामाची.
 11. अन्नछत्री जेवणे वर मिरपूड मागणे – इतरांकडून आवश्यक ती मदत घ्यायची आणि वर आणखी काही गोष्टी मागून मिजास दाखवणे.
 12. कांदा पडला पेवात पिसा हिंडे गावात – चुकीच्या मार्गाने शोध घेण्याचा मूर्खपणा करणे.
 13. जीत्या हुळहुळे आणि मेल्या कानवले – जीवंतपणी दुर्लक्ष करायचे आणि मेल्यावर गोड कौतुक करायचे.
 14. तरण्याचे कोळसे म्हातार्‍याला बाळसे – उलट गुणधर्म असणे.
 15. आंधळं दळतं कुत्रं पिठ खातं – एकाने काम करावे दुसऱ्याने त्याचा फायदा घ्यावा.
 16. अती खाणे मसणात जाणे – अति खाणे नुकसानकारक असते.
 17. राईचा पर्वत करणे – मूळ गोष्ट लहान पण ती उगाचच मोठी करून सांगणे.
 18. लग्नाला गेली आणि बारशाला आली – खूप उशिराने पोहोचणे.
 19. वळणाचे पाणी वळणावर जाणे – ज्या गोष्टी घडायच्या त्या घडतच राहणार.
 20. विशी विद्या तिशी धन – योग्य वेळेत योग्य कामे केली की त्यावरून कर्तुत्वाचा अंदाज बांधता येतो.

Marathi Mhani With Meaning

 1. अंथरूण पाहून पाय पसरावे – ऎपत पाहून खर्च करवा.
 2. वासरात लंगडी गाय शहाणी – अडाणी लोकात अल्प ज्ञान असणारा शहाणा ठरतो.
 3. छत्तीसाचा आकडा – विरुद्ध मत असणे.
 4. नव्याचे नऊ दिवस – नवेपणा असतानाचे कौतुक नंतर टिकत नही.
 5. तेरड्याचा रंग तीन दिवस – एखादे कार्य थोडे दिवस जोरात चालून एकदम बंद पडणे.
 6. पायीची वहाण पायी बरी – योग्यतेप्रमाणे वागवावे.
 7. आई जेवू घालीना बाप भीक मागू देईना – दोन्ही बाजूंनी अडचण.
 8. झाकली मूठ सव्वा लाखाची – दुर्गुण असले तरी प्रकट करू नयेत.
 9. नाकाचा बाल – अत्यंत प्रिय व्यक्ती.
 10. अति शहाणा त्याचा बैल रिकामा – अति शहाणपणाने नुकसान होते.
 11. अंगाला सुटली खाज हाताला नाही लाज – गरजवंताला बुद्धी नसते.
 12. कुत्र्याची शेपूट नळीत घातले तरी वाकडे – मूळचा स्वभाव बदलत नाही.
 13. जो गुळाने मरतो त्याला विष कशास – जिथे गोड बोलून काम होते तिथे हिंसचारची गरज नसते.
 14. तट्टाला टूमणी तेजीला इशारत – जी गोष्ट मूर्खाला शिकवून समजत नाही ती शहाण्याला इशाऱ्याने समजते.
 15. अडली गाय फटके खाय – एखादा माणूस अडचणीत सापडला की त्याला त्रास दिल जातो.
 16. अवचित पडे, नि दंडवत घडे – स्वतःची चूक झाकण्याचा प्रयत्न करणे.
 17. राज्याचे घोडे आणि खासदार उडे – वस्तू एकाची मिजास दुसऱ्याची.
 18. लंकेत सोन्याच्या विटा – दुसरीकडे असलेल्या फायद्याच्या गोष्टीचा आपल्याला उपयोग नसतो.
 19. वरातीमागून घोडे – योग्य वेळ निघून गेल्यावर काम करणे.
 20. विचाराची तूट तेथे भाषणाला उत – मूर्खांच्या गर्दीत नेहमी नुसती बडबड असते.

ऐतिहासिक मराठी म्हणी

 1. शेरास सव्वाशेर – प्रतिपक्षापेक्षा श्रेष्ठ.
 2. तेल गेले, तूप गेले, हाती धुपाटणे आले – मुर्खपणामुळे कामाच्या गोष्टी हातातून जाणे.
 3. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नही – कष्ट केल्याशिवाय यश प्राप्त होत नाही.
 4. कुंपणानेच शेत खाणे – सुरक्षा करणाऱ्यानेच घात करणे.
 5. चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे – वेळ सगळ्यांवर येते.
 6. अडला हरी गाढवाचे पाय धरी – अडचणीच्या काळात मूर्खांलापण मान द्यावा लागतो.
 7. तोंड दाबून बुक्क्यांचा मार – कारण नसताना अन्या सहन करणे.
 8. नावडतीचे मीठ अळणी – न आवडणाऱ्या व्यक्तीची प्रत्येक गोष्ट न आवडणे.
 9. दुष्काळात तेरावा महिना – एक संकट अस्ताणे अजून संकट येणे
 10. एका हाताने टाळी वाजत नाही – प्रत्येक कार्यात दोनी बाजूचा सहभाग असावा.
 11. अंगावरचे लेणे, जन्मभर देणे – दागिन्याकरिता कर्ज घेणे आणि ते जन्मभर फेडने.
 12. कुडी तशी फोडी – देहा प्रमाणे आहार मिळणे.
 13. झाकली मूठ सव्वा लाखाची – व्यंग नेहमी झाकून ठेवावे.
 14. ताकापुरते रामायण – कामापूर्ती खुशामत करणे.
 15. अंगठा सुजला म्हणून डोंगराएवढा होईल का – प्रत्यक गोष्टीला ठराविक मर्यादा असते.
 16. अवसबाई इकडे पुनवबाई तिकडे – एकमेकांच्या अगदी विरुद्ध बाजू.
 17. रोज मरे त्याला कोण रडे – रोजच्या होणाऱ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करणे.
 18. लाज नाही मला कोणी काही म्हणा – निर्लज्ज मनुष्य दुसऱ्याच्या टीकेची पर्वा करत नाही.
 19. वासरात लंगडी गाय शहाणी – मूर्ख माणसांमध्ये थोडे ज्ञान असणारा श्रेष्ठ असतो.
 20. विश्वासही ठेवला घरी चारी सुना गरवार करी – विश्वासघात करणे.

मराठी म्हणी व वाक्प्रचार

 1. पालथ्या घड्यावर पाणी – सगळे प्रयत्न अपयशी होणे.
 2. रात्र थोडी सोंगे फार – कमी वेळात जास्त काम करणे.
 3. कामापुरता मामा – स्वार्तासाठी गोड बोलणे.
 4. आधी पोटोबा मग विठोबा – पहिले पोट भरणे नंतर देवाचे पूजन करणे.
 5. काखेत कळसा गावाला वळसा – स्वतःकडे असून सगळीकडे शोधणे.
 6. मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये – चांगुलपणाचा गैरफायदा घेऊ नये.
 7. नाव मोठे लक्षण खोटे – कार्य मोठे पण प्रत्येक्ष कृती काहीच नाही.
 8. हपापाचा माल गपापा – छळाने मिळवलेली संपत्ती जास्त काळ टिकत नाही.
 9. कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ – आपल्याच माणसाचे आपल्या हातून वाईट होणे.
 10. गाढवाला गुळाची चव काय – मूर्ख माणसाला ज्ञानाचे महत्व माहित नसते.
 11. अंत काळापेक्षा मध्यान्हकाळ कठीण – मरण्याच्या वेदनांपेक्षा भुकेच्या वेदना अधिक दुःखदायक असतात.
 12. कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ – स्वार्थासाठी दुष्ट बुद्धीने शत्रूला मदत करून आपल्याच माणसाचे नुकसान करणे.
 13. डोळ्यात केर आणि कानात फुंकर – रोग एकीकडे आणि उपचार दुसरीकडे.
 14. कानात बुगडी, गावात फुगडी – कमी संपत्तीचे मोठे प्रदर्शन करणे.
 15. अवशी खाई तूप आणि सकाळी पाही रूप – अतिशय उतावळेपणाची कृती करणे.
 16. अंगापेक्षा भोंगा मोठा – मूळ गोष्टींपेक्षा इतर गोष्टींचा बडेजाव मोठा असणे.
 17. लकडी दाखविल्या शिवाय मकडी वळत नाही – धाका शिवाय शिस्त नाही.
 18. लेकी बोले सुने लागे – एकाला उद्देशून पण दुसऱ्याला लागेल असे बोलणे.
 19. विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर – गरजेपुरते गोष्टी घेऊन फिरणे.
 20. शहाण्याला शब्दाचा मार – शहाण्या माणसाला त्याच्या चुकी बाबत शब्दांनी समज दिली तर ती पुरेसे असते.
 21. संग तसा रंग – संगती प्रमाणे वर्तन असणे

हे पण वाचा : Marathi Suvichar

हे पण वाचा : Marathi Ukhane For Female

प्रतिक्रिया द्या