Marathi Suvichar : जगण्याचं बळ देतात हे 149+ सर्वोत्तम मराठी सुविचार

Marathi Suvichar : तुम्ही काही चांगले प्रेरणादायी मराठी सुविचार शोधत आहात? जर होय, तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. तुम्हाला जीवनात यश मिळवण्यात मदत करण्यासाठी काही वास्तविक जीवनातील प्रेरणादायी चांगले सुविचार आज मी सांगणार आहे.

सुविचार हे आत्म-सुधारणेसाठी शक्तिशाली साधने आहेत. ते आपल्याला आपले ध्येय साध्य करण्यासाठी सकारात्मक ऊर्जा आणि प्रेरणा देतात.

Marathi thoughts आपल्या स्वप्नांवर आणि आकांक्षांवर लक्ष केंद्रित करण्यात मदत करण्यासाठी मार्गदर्शक म्हणून देखील कार्य करतात.

ज्याच्या जवळ सुंदर विचार सुविचार आहेत.तो कधीही एकटा नसतो.आज आपण असेच काही सुंदर विचार वाचणार आहेत.

मला खात्री आहे हे Marathi Quotes आपल्याला नक्की आवडतील.त्यामुळे हा लेख संपूर्ण वाचा.

Marathi Suvichar
Marathi Suvichar

Suvichar Marathi Status | सुविचार मराठी छोटे

Good thoughts हे प्रेरित होण्याचा एक उत्तम मार्ग आहे. जर आपण आपली मानसिकता सुधारू इच्छित असल्यास, तर खाली दिलेले suvichar marathi madhe नक्की तुम्हाला प्रेरित करतील.

मित्र वाढले नाहीत तरी चालेल पण शत्रूची वाढ तरी करू नका.

घराची योग्यता व्यवस्था हीच घराची शोभा, संतुष्टता हीच घराची लक्ष्मी, समाधान हेच घराचे वैभव ,धार्मिकता हाच घराचा कळस ,अतिथ्य हेच घराचे सुख.

माणूस हा काणत्याही धर्माचा नसून तो प्रथम माणूस असतो.माणुसकीने वागणे हाच प्रत्येक माणसाचा धर्म आहे.म्हणून प्रत्येकाने माणुसकीने वागावे.

बघणाऱ्याच्या दृष्टीत सौंदर्य असते.

Marathi Motivational Quotes

फांद्या तोडून झाड मरत नाही, घर सोडून माया तुटत नाही आणि वेष बदलून स्वभाव पालटत नाही, आसक्ती मुळापासून तोडावी लागते.

या भुतलावर, दानासारखा दुसरा धर्म नाही, लोभासारखा दुसरा शत्रू नाही, सौजन्यासारखे दुसरे भूषण नाही. आणि संतोषाएवढे धन नाही.

क्षमेसारखे तप नाही, संतोषापेक्षा मोठे सुख नाही, लोभासारखा रोग नाही, दयेपेक्षा मोठा धर्म नाही.

मनापासून केलेल्या प्रार्थनेला उत्तर मिळतेच.

चिता मेलेत्या माणसांना जाळते तर चिंता जिवंत माणसांना जाळत राहते.

चांगले चरित्र्य हे हिऱ्यासारखे असावे त्यावर कशानेही ओरखडा पडणार नये.

बर्टोल

प्रीतीची वेल, धर्माचं कुंपण मानीत नाही.

चरित्र हाच खरा इतिहास असतो.

दुबळपणा, भीती, एकाकीपणा आणि अज्ञान ही अंधश्रेद्धेची करणे होत.

ह्युम

क्रांति ही तत्वांमुळे घडून येते बंदुकामळे नव्हे, क्रांती प्रथम डोक्यात होते. मग कृतीत उतरते.

मॅझिनी
Suvichar Marathi Status
Suvichar Marathi Status

अचूकता पाहिजे असेल तर सराव महत्त्वाचा आहे.

कृती हे ज्ञानाचे उत्तम फळ आहे.

खूप हुशारी पेक्षा चिमूटभर विवेक श्रेष्ठ असतो.

जगातील सर्व विचारी डोक्यांपेक्षा एक प्रेमळ अंतकरण श्रेष्ठ असते.

मनाची शांतता म्हणजे सुखी जीवन आहे.

गरजेच्या वेळी उपयोगी पडतो तोच खरा मित्र.

‘डॉक्टर रोग्यांना जगवतात’ असे म्हणण्यापेक्षा ‘रोगी डॉक्टरांना जगवतात’ असे म्हणणे अधिक योग्य आहे.

बर्नाड शॉ

दृष्टिकोण हा मनाचा आरसा आहे तो नेहमी विचारच परावर्तीत करतो.

प्रखर बुद्धिमत्तेपेक्षा शुद्ध चारित्र्य हे श्रेष्ठ आहे.

सर विल्यम अर्ल

संकटात सापडल्यावरच माणूस स्वतःला ओळखतो.

शहाण्याला शब्दांचा मार असतो.

रिकामे डोके सैतानाचे घर असते.

जाळणाऱ्या मोठ्या अग्नीपेक्षा उब देणारा लहान अग्नी चांगला असतो.

ज्याचा अंत गोड ते सर्वच गोड असते.

Suvichar in Marathi | आत्मविश्वास सुविचार मराठी

माशांसाठी हवा आणि पाणी जितके आवश्यक आहे तितकेच मानवी जगण्यासाठी आत्मविश्वास आवश्यक आहे.

आत्मविश्‍वास असल्याशिवाय माणसाला यश मिळू शकत नाही. आत्मविश्वास ही अशी उर्जा आहे जी एखाद्या व्यक्तीला आव्हाने, अडचणी आणि यशासह येणार्‍या अडथळ्यांना तोंड देण्यास धैर्य देते.

तुमचा आत्मविश्वास वाढो या साठी हे विशेष आत्मविश्वास सुविचार मराठी.

Marathi Thoughts

आत्मविश्वास सुविचार मराठी
Suvichar in Marathi

‘मदतीचा हात कुठे मिळेल?’ याच्या शोधात तुम्ही आहात काय? तर माझे ऐका, तो हात तुमच्या मनगटाजवळ आहे.

हेन्रीफोर्ड

ज्ञान ही वारसा हक्काने मिळणारी इस्टेट नव्हे ते अभ्यास व कष्ट करूनच मिळवावे लागते.

जॉन गे

तुम्हाला तुमच्या आवडीचे काम मिळालेले नसले तरी मिळालेले काम आवडीने करा.

आशेचे बी पेरले व प्रयत्नांचे खतपाणी योग्यवेळी दिले तर यशाचे पीक पदरात पडणारच.

अपमान व गोळ्या दातांनी चावता येत नाहीत.त्या सरळ पोटात गिळणेच चांगले.

आळसासारखा शत्रु नाही आणि आत्मविश्वासासारखा मित्र नाही.

आपल्या गुप्त गोष्टी इतरांना सांगणे ही मूर्खपणाची चुक आहे.तर दुसऱ्याने आपल्याला विश्वासात घेऊन सांगितलेली गुपिते इतरांना सांगणे विश्वासघाताचा गुन्हा आहे.

जॉन्सन

आचाराच्या उंचीवर विचारांची भव्यता अवलंबून असते.

जीवाचे रान केल्याशिवाय विद्येचे उद्यान फुलत नाही.

ध्येय्याच्या नौकेत बसून प्रयत्नांची वल्ही मारली असता, यशाचा किनारा दुर राहत नाही.

स्वतःचं व्यक्तिमत्व असं बनवा की , लोक तुमचे चाहते झाले पाहिजे.

आपला जन्म गर्दीत उभा राहिला नाही, तर गर्दी करायला झालाय.

अहिंसेत भित्रेपणाला किंवा दुबळेपणाला मुळीसुद्धा स्थान नाही, हिंसक माणूस कधीकाळी अहिंसक होऊ शकेल पण भित्रा माणूस कधीही अहिंसक होऊ शकणार नाही.

महात्मा गांधी

आळस नावाची गोष्ट नसती तर सगळे यशस्वी असते.

तुमच्या अपयशाला कवटाळून बसू नका त्याच्यापासून शिका आणि पुन्हा सुरुवात करा.

हे जग त्याचाच पुढे झुकटं जो परिस्थिती समोर झुकलेला नसतो.

कोणी कौतुक करो व टिका लाभ तुमचाच,कौतुक प्रेरणा देते तर टीका सुधारण्याची संधी.

दुनिया जिंकायची असेल तर दुनियादारी ओळखायला शिका.

चुकणं ही प्रकृती, मान्य करणं ही संस्कृती आणि सुधारणा करणं ही प्रगती आहे.

आलेले अपयश विसरा,येणाऱ्या यशावर लक्ष केंद्रित करा.

मी नंतर करेल असा कोणताच श्रीमंत व्यक्ती म्हणत नाही.

जिंकायच्या उद्देशाने सुरुवात केली तर हारायचा प्रश्नच येत नाही.

लोक तुमच्या हरण्याची वाट पाहत आहेत, त्यांना जिंकून दाखवा.

प्रत्येक समस्येच्या आत एक संधी आहे.

जिंकण्याची मजा तेव्हाच येते, जेव्हा सर्वजण तुमची हारण्याची वाट पाहत असतात.

जिंकणारे जिंकण्यासाठी, खूप वेळा हारलेले असतात.

Suvichar in Marathi Text | सुंदर सुविचार मराठी

मराठीतील सर्वोत्तम जीवन बदलणारे प्रेरणादायी विचार, स्टेटस येथे वाचा.

सुंदर सुविचार मराठी
Suvichar in marathi text

घोड्यावरून पडलात तर पुन्हा सावरले जाल, मनातून उतरलात तर सावरू शकणार नाही.

माणसाच्या उच्चारावरून त्याची विद्वत्ता, आवाजावरून नम्रता आचराणावरून शील समजते.

पं. जवाहरलाल नेहरू

विसरणे हा मानवाचा धर्म आहे, पण लक्षात ठेवणे हे त्याचे कर्तव्य आहे.

शत्रु आणि मित्र, मान आणि अपमान, सुख आणि दु:ख यांची ज्याला जाणीव होते, तोच जीवनात यशस्वी होतो.

ध्येयाचा नंदादीप अखंड तेवत ठेवा, म्हणजे कर्तृत्वाचा प्रकाश पडेल.

आपल्या नशिबाचे मालक व्हा,परिस्थितीचे गुलाम नाही.शून्यातून सुरुवात करणाऱ्याला हरण्याची भीती नसते.

संयम हा सोन्याचा लगाम आहे. त्याने पशुचा माणूस आणि माणसाचा देव होतो.

हास्य हे जीवनाचे फूल आहे, परंतु अश्रु हे त्याचे फळ आहे.

अवघड आहे कठीण आहे म्हणून सोडून दिलं असतं तर शिवरायांचे स्वराज्य कधीच उभं राहिलं नसतं.

सोबत किती लोक असू द्या,शेवटी संघर्ष स्वतःलाच करावा लागतो. म्हणून अडचणीत आधार शोधू नका.स्वतःलाच भक्कम बनवा.

खूप कठीण आहे त्या माणसाला हरवणं.जो माणूस कठीण परिस्थितीत चालायला शिकला आहे.

जीवनात गरुडझेप घ्यायची असेल, तर कावळ्यांची संगत सोडावी लागेल.

डोळेतर जन्मतःच देवाने आपल्याला दिलेले असतात.कमवायची असते ती नजर.चांगल्यातलं वाईट आणि वाईटातलं चांगलं ओळखायची.

ज्याला दुःखातून सुटका पाहिजे असेल त्याला लढावे लागेल आणि ज्याला लढायचे असेल त्याला अगोदर शिकावे लागेल, कारण ज्ञानाशिवाय लढाल तर पराभव निश्चित आहे.

त्या व्यक्तीच्या जीवनात आनंद आणि शांतता कित्येक पटीने वाढते ज्याना कौतुक आणि निंदा एक समान वाटतात.चांगल्या भावनेने सर्व काही करा आणि काहीही अपेक्षा करू नका तुम्ही कधीही निराश होणार नाही.

खोटं बोलणाऱ्या व्यक्ती सर्वांना आवडतात.खरं बोलणारा व्यक्ती सर्वांनाच खटकतात.माणसाची सवय अशी आहे.जो उपयोगाला येईल त्याला धरून चालायचं ज्याची गरज संपली त्याला सोडून द्याच.

कुणी आपलं वाईट केलं की त्याचाही वाईट व्हावं ही भावना आपल्याला संपवून टाकते.यातून मुक्त होऊन स्वतःला शांत करण्याचा मार्ग एकच,क्षमाशील राहणं.

माणसाला जिंकायचे ते केवळ आपुलकीने.कारण वेळ, पैसा,सत्ता आणि शरीर एकादे वेळेस साथ देणार नाही ,पण माणुसकी ,प्रेमळ स्वभाव आणि आत्मविश्वास आयुष्यात कधीही तुम्हाला एकटे पडू देणार नाही.

शरीर आणि मनाचे नाते एकदम घट्ट आहे.शरीराने दुर्बल झालेला माणूस मनाने बरा होऊ शकतो, पण मनाने दुर्बल झालेला माणूस शरीराने बरा होऊ शकत नाही.

आयुष्यात नेहमी लहान होऊन जगण्याचा प्रयत्न करा, कारण जेव्हा तुम्ही लहान होता तेव्हा इतरांना समजून घेता आणि मान ही ठेवता.लहान होणे याचा अर्थ कमीपणा घेणे असं नव्हे तर लहान होणं म्हणजेच महान होणं असतं.

जर शेतात बी पेरलं नाही तर,निसर्ग शेती गवताने भरून टाकतो.तसेच जर डोक्यात सकारात्मक विचार भरले नाही तर नकारात्मक विचार स्वतःची जागा बनवतात म्हणून सकारात्मक व्हा.

परिस्थिती कशी ही असो वाईट काळात चांगले लोक आणि चांगले विचार सोबत असले की मेहनतीचं फळ हे नक्कीच चांगले मिळते.

Life Suvichar Marathi | नविन मराठी सुविचार

जीवनाचे सत्य सांगणारे हे जीवनावरील नवीन मराठी सुविचार संग्रह.

life suvichar marathi
life suvichar marathi

‘त्याग’ हा जीवनमंदिराचा कळस होय.

वि.स.खांडेकर

ज्याची बुद्धी आणि शरीर ही उद्योगात गढलेली असतात त्याला चिंता स्पर्श करीत नाही.

जॉन्सन

गर्व’ म्हणजे क्षुद्र मनोवृत्तीचे लक्षण गर्विष्ठ माणसाने कितीही भपकेदार पोशाख केला तरी वागण्यातून त्याच्या मनाचे दारिद्र्य दिसून येते.

वर्डस्वर्थ

ज्या दिवशी जबाबदारीचं ओझं खांद्यावर येतं ना, त्या दिवसापासून थकायचा आणि रूसायचा अधिकार संपतो.

आज माझ्याच सावलीला मी विचारलं, का चालते तू माझ्यासोबत अविरत, सावलीने पण हसत उत्तर दिलं, कोण आहे दुसरं तुझ्यासोबत.

आयुष्य मिळणे हा नशिबाचा भाग आहे.मृत्यू येणे हा काळाचा भाग आहे.पण लोकांच्या मनात जिवंत राहणं हा कर्माचा भाग आहे.म्हणून नेहमी चांगले कर्म करा,हजारो वर्षे जगाल.

नेहमी मन निर्मळ ठेवा व प्रामाणिक रहा.कोणी कितीही फसवले तरी एक लक्षात ठेवा,प्रामाणिक माणसाच्या पाठीशी देव असतो.

आयुष्यात खूप सारेजण येतात जातात. प्रत्येकालाच लक्षात ठेवायचं नसतं.पण जे आपल्या सुख दुःखात सामील होतात त्यांना मात्र शेवटच्या श्वासापर्यंत विसरायचं नसतं.

जेव्हा आपण गप्प राहून सर्व सहन करत असतो तेव्हा आपण सगळ्यांसाठी खूप चांगले असतो.पण एकदा तरी सत्य बोलण्याचा प्रयत्न केला तर अचानक आपण सर्वात वाईट व्यक्ती ठरतो.

आजकाल सरड्यासारखे पटकन रंग बदलतात माणसं.आधाराचा हात देताना विश्वासघात करतात माणसं.जखमेवर फुंकर मारण्या ऐवजी त्यावर मीठ चोळतात माणसं.रामाचे रूप घेऊन रावणा सारखे वागतात माणसं.

मी,मला समजून घेणं प्रत्येकाला जमणार नाही.कारण, मी असं एक पुस्तक आहे ज्यात शब्द कमी आणि भावना जास्त आहेत.

अपमान करणं स्वभावात असू शकतं पण सन्मान करणं संस्कारात असावं लागतं.दुसऱ्यांच्या दोषांचे वर्णन तुमच्याकडे करणारे लोक, तुमच्या दोषांचे वर्णन तिसऱ्या कडे करतात.हे लक्षात ठेवा.

आयुष्यभर सुखी होण्याच्या नादात जीवनभर दुःखी राहतो त्याचे नाव आहे मानव. आपल्या आयुष्याची दोरी दुसऱ्यांच्या हातात देऊ नका.स्वतःचे निर्णय स्वतःघ्या.

कौतुकाची तुम्ही जितकी जास्त अपेक्षा धरल. तितके निंदेचे भय तुम्हाला जास्त वाटेल.विरोधक एक असा गुरू आहे.जो तुमच्या कमतरता परिणामांसह दाखवून देतो.

ज्याच्या स्वतःच्या मनावर ताबा असतो तो सर्व जगाचा मालक होऊ शकतो. पण ज्याचं स्वतःच्या मनावर ताबा नसतो तो आयुष्यभर गुलामगिरीतच राहतो.

आपल्याकडे समोरच्या व्यक्तीला देण्यासाठी काहीच नाही असं वाटत असेल तर चेहऱ्यावर एक स्मित हास्य असू द्या खरच हा उपहार इतर कोणत्याही वस्तूपेक्षा मौल्यवान आहे.

लोकांचे कान भरून किंवा काड्या करून तुमचं अस्तित्व क्षणभर टिकतं. आयुष्यभर जगावर राज्य करण्यासाठी मनाचा मोठेपणा आणि नीती साफ लागते.

एकाच अवयावर ताबा मिळवला तर ज्ञान आणि कर्म त्यांना जिंकता येणे सहज शक्य आहे.असा एकमेव अवयव म्हणजे जीभ.

Marathi Suvichar Good Morning | शुभ सकाळ सुविचार

Marathi Suvichar Sangrah

marathi suvichar good morning
शुभ सकाळ सुविचार

सकाळचे जाग आल्यावरचे क्षण नेहमी शुद्ध असतात.निर्लेप असतात,दिवसाच्या कटकारस्थानांचा, कपाटांचा, खोटेपणाचा थर त्यावर चढलेला नसतो.

विनम्रवृत्ती हे सर्व दैवी गुणाचे मुळ आहे.

गौतम बुद्ध

निगेटिव्ह विचार माणसाला कमजोर बनतात तर पॉझिटिव्ह विचार माणसाला नेहमी बलवान बनवतात.

जे कोणी धार्मिकपणाचा डौल आणून, अज्ञानी लोकांस नवग्रहांची पीडा दाखवून त्यांस भोंदाडून खात नाहीत अथवा तत्संबंधी पुस्तके लिहून आपली पोटे जाळीत नाहीत त्यांस सत्यवर्तन करणारे म्हणावे.

म. ज्योतीबा फले

आपल्यापाशी जे आहे त्यात समाधान मानून राहणे योग्य आहे पण आपण जसे आहोत त्यात समाधान मानून तसेच राहणे योग्य नव्हे.

जेम्स मॅकिंटॉश

खरा मोठेपणा हा उच्चपद दिल्यामुळे वाढत नाही. किवा मानचिन्हे, पदके आणि पदव्या काढून घेतल्यामुळे कमी होत नाही.

मॅसिजर

एक वेळ शरीराने कमजोर असेल तर चालेल पण मनाने कधीच कमजोर होऊ नका.

यश त्यांना मिळते ज्यांची इच्छा शक्ती प्रबळ असते व आत्मविश्वास मजबूत असतो.

‘मी’ बोलाल तर एकट्याने काम करायची वेळ येते.‘आपण’ बोलल तर लोक आपलं समजून तुमच्यासाठी काम करतील.

यशाच्या प्रवासात कष्टाची मोठी वाट चालावी लागते त्यात कोणता ही पळवाट नसते.

यशस्वी व्हायचे असेल तर आतीविचार, न्यूनगंड, नकारात्मकता, आळस, भीती, सबबी, राग, द्वेष, चिडचिडेपणा या गोष्टीपासून सदैव दूर राहा.

उत्तम नेतृत्वासाठी कल्पकता, सर्जनशीलता, प्रयोगशीलता, गतिशीलता, सत्यवचनी, नीतिमान, विश्वासार्हता, कृतज्ञता, हजरजबाबी, जिज्ञासू, धैर्यशील, संयमी, दूरदृष्टी, साहसी असे गुण आवश्यक असतात.

ज्यांच्याजवळ उमेद आहे तो कधीच अयशस्वी होत नाही.स्वयंशिस्त हा महत्त्वाचा गुण आहे याची सुरुवात तिथूनच होते.

स्वतःवरील आत्मविश्वास तुम्हाला यशापर्यंत पोहोचवतो आणि अतिविश्वास अपयशापर्यंत.

स्वतःचा स्वतःवर विश्वास असणे हा यशाच्या मार्गातील पहिला टप्पा आहे.आवड व आत्मविश्वास असेल तर कुठलीही गोष्ट अवघड नाही.

तुम्ही कितीही हुशार असाल पण जर, तुम्हाला माणसांशी कसं वागायचं ते माहीत नसेल तर तुमच्या हुशारीचा काहीच उपयोग नाही.

यशाजवळ पोहोचण्यासाठी कधीही शॉर्टकट नसतो.मोठी स्वप्ने पहा कारण तीच माणसाचं रक्त ढवळू शकतात.

अपयशाच्या कठीण खडकाखालीच यशाच्या पाण्याचा झरा असतो.कोणत्याही परिस्थितीत माघार न घेणे हाच आपल्या यशाचा पासवर्ड आहे.

योजना तयार करण्यासाठी खर्च केलेला एक मिनिट,योजना अमलात आणतांना आपली दहा मिनिटे वाचवतो.म्हणून कामाचे नियोजन करा.

जोपर्यंत कोणी एखाद्या मोठ्या द्यायला प्राप्त करीत नाही,तोपर्यंत ते मोठे ध्येय अशक्य वाटते.

Success Marathi Suvichar | मराठी स्टेटस प्रेरणादायी

तुम्हाला यश मिळविण्यासाठी प्रेरणा देणारे काही Success Marathi Suvichar कोणते आहेत? यश मिळवण्यासाठी प्रेरणा ही गुरुकिल्ली आहे. तुमचा स्वतःवर विश्वास नसेल तर इतर कोणीही करणार नाही.

आपल्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी प्रेरणादायी चांगले सुविचार हे खूप उपयोगी पडतात.

काही नवीन विचार खाली दिले आहेत. जे तुम्हाला यशस्वी होण्यास प्रवृत्त करतील.

success marathi suvichar
मराठी स्टेटस प्रेरणादायी

माणसाचे भवितव्य त्याच्या तळाहातावरील रेषांवर अवलंबून नसून त्याच्या मनगटातील शक्तीवर अवलंबून असते.

स्वातंत्र्यवीर सावरकर

सगळ्यात मोठा सूड म्हणजे प्रचंड यश.

ज्यांना स्वत:च काही करावयाची इच्छा नाही त्यांना मदत करण्यात अर्थ नाही. ज्याला वर जायची इच्छाच नाही त्याला तुम्ही शिडीवर चढवू शकणार नाही.

अंड्रयु कार्नेजी

माणूस हा नशिबाच्या हातचे बाहुले आहे असे म्हणण्यपेक्षा नशीब हे माणसाने बनविलेले बुजगावणे आहे असे म्हणा.

रॉमस कालीईल

अशक्य असे या जगात काहीच नाही त्यासाठी फक्त तुमच्या ठायी जबरदस्त इच्छाशक्ती असली पाहिजे.

संयम ठेवला आणि प्रयत्न करीत राहिलात तर कितीही वाईट परिस्थिती असो मार्ग निघतोच.

आंतरिक मनामध्ये जेव्हा भयंकर युद्ध चालू होते ते थांबवण्यासाठी योग्य साधन म्हणजे संगीत.

चारित्र्य हे पांढऱ्या शुभ्र कागदाप्रमाणे असते त्यावर एकदा काळा डांग पडला की तो कधीही पूर्णपणे पुसून जात नाही.

जे. हॉवेज

कधी कोण कुठे कसं उपयोगाला येईल हे सांगता येत नाही हेच अडथळ्यांवर मात करून यशस्वी व्यवसाय निर्माण करण्याचं महत्त्वाचं गुपित आहे म्हणून माणसं जोडत रहा.

कुठलाही बदलण्याचा खटाटोप माणसाने करू नये,असह्य झालं तर अलिप्त व्हावं उपदेशक होऊ नये.

आयुष्याच्या वाटेवर अडचणी येणारच आणि अडचणी आल्या तरी निराश होऊ नका.याच वेळेत आपल्या सामर्थ्याची आणि आपल्या भोवती असणाऱ्या लोकांची खरी ओळख होते.

स्वतःला कमी समजू नका तुमचा जन्म इतिहास रचण्यासाठी झाला आहे.

ज्याला धन कमवायचे आहे त्याने कणसुद्धा वाया घालवू नये आणि ज्याला ज्ञान कमवायचे आहे त्याने क्षणसुद्धा वाया घालू नये.

मनाचा आवाज ऐका अंतर्ज्ञान नेहमीच तुम्हाला योग्य मार्ग दाखवण्याचे काम करीत असते.

नवीन संकल्पनांवर काम करायला मुळीच घाबरू नाक.स्वतःच्या यशस्वी होण्याच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास ठेवा.

कठोर परिश्रमासाठी नेहमी तयार राहा, वादविवाद टाळा, तडजोडीची भूमिका स्वीकारा, नेहमी सकारात्मक मानसिकता ठेवा.

अपयशाला घाबरून उद्दिष्टपूर्ती आधीच माघार घेऊ नका.कामाचा कंटाळा न करता सतत कार्यरत व प्रयत्नशील राहा.

तुमच्या आवडीच्या क्षेत्रात काम करा आणि नेहमी मोठी स्वप्ने बघा.काम आणि आपले आयुष्य यात संतुलन राखण्याचे कौशल्य मिळवा.

कुठल्याही संकटाला तोंड देताना जो व्यक्ती शांत, संयमी व अविचलित असतो तो नेहमीच यशस्वी होतो.

Inspirational Marathi Suvichar | मराठी प्रेरणादायी सुविचार

Marathi Inspiring Quotes

inspirational marathi suvichar
मराठी प्रेरणादायी सुविचार

दसऱ्यांवर अन्याय करू नका. आपल्यांवर अन्याय झाला तर प्रतिकार करा.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

विकार पुढच्या दाराने आत शिरला की शहाणपण मागच्या दाराने निघून जाते.

टॉमस फुलर

यशस्वी व आनंदी जीवनासाठी जीवनात यश संपादन करण्यासाठी प्रेरणादायी सुविचार नक्की वाचा.

ज्याला हरण्याची भीती आहे तो माणूस कधीच जिंकू शकत नाही.

एक विजेता तोच हारणारा असतो, ज्याने अजून एकदा प्रयत्न केलेला असतो.

विजय मिळवण्याआधी तुम्ही स्वतःला विजेता म्हणून पहिलं पाहिजे.

आपण जिंकणारच याच विचाराने कामाला सुरुवात करा.

प्रयत्न सोडणारे जिंकत नाहीत आणि जिंकणारे प्रयत्न सोडत नाही.

विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही, ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात.

लढायला शिका म्हणजे गुलामीची वेळ येत नाही.

आपली वेळ आपल्याच हातात असते काटे तर फक्त घड्याळाचे फिरतात.

मोठी साम्राज्य फक्त मेहनतीने स्थापित होतात,कारणांनी नाही.

भूतकाळाचे कैदी बनू नका, भविष्याचे निर्माते बना.

कारण देण्यापेक्षा झालेल्या चुका मान्य करायला शिका.

माणूस जेवढा आजाराने थकत नाही,त्यापेक्षा जास्त तो विचाराने थकतो.

माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात, एक म्हणजे वाचलेले पुस्तक आणि दुसरी भेटलेली माणसं.

काही स्वप्न वयावर नाही तर जिद्दीवर अवलंबून असतात.

जगायचं असेल तर स्वताचं वर्चस्व निर्माण करा.

Marathi Suvichar For Students | शैक्षणिक सुविचार मराठी

तुम्हाला अभ्यास करण्यास काय प्रेरणा देते? चांगली नोकरी किंवा कदाचित पदोन्नतीची शक्यता आहे? किंवा कदाचित तुम्हाला एखाद्या प्रतिष्ठित विद्यापीठात प्रवेश घ्यायचा आहे?

तुमची प्रेरणा काहीही असो, हे शालेय सुविचार मराठी तुम्हाला तुमच्या संपूर्ण अभ्यासात लक्ष केंद्रित आणि प्रेरित राहण्यासाठी उपयुक्त ठरतील.

मराठी शालेय सुविचार संग्रह

marathi suvichar for students
सोपे मराठी सुविचार

जो विद्यार्थी परिक्षेच्या वेळी कॉपी करतो तो विद्यादेविच्या पवित्र मंदिरात निंद्य आचरण करतो. तो पापीच होय.

ग्रंथ आणि मित्र थोडेच असावेत पण ते चांगले असावेत.

सिसेरो

सत्याला शपथांचा आधार लागत नाही.

सिसेरो

मोती होऊन सोन्याच्या संगतीत राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन एखादया चातकाची तहान भागविणे अधिक चांगले.

साने गुरूजी

हल्ला करणाऱ्या शत्रुला भिऊ नकोस, पण स्तुती करणाऱ्या मित्रापासून सावध रहा.

नेपोलियन

उथळ विचारांची माणसे देवावर विश्वास ठेवतात, शहाणी आणि समर्थ माणसे कार्य-कारभारावर विश्वास ठेवतात.

इमर्सन

माझ्या देशातील प्रत्येक तरूणतरूणीने कोणते पुस्तक वाचावे, कोणते वाचू नये हे ठरविण्याचे अधिकार मला द्या. मी तुम्हाला देशाच्या प्रगतीची हमी देतो.

बेकन

शहाणे लोक निरोगी राहण्यासाठी डॉक्टरांपेक्षा व्यायामावर अधिक विश्वास ठेवतातं.

ट्रयडेन

निर्भयता हे नैतिकतेचे अधिष्ठान आहे. भित्रा माणूस कधीही नीतिमान होऊ शकत नाही.

महात्मा गांधी

जगात दुसऱ्याला हसण्याइतके सोपे व दुसऱ्यासाठी रडण्याइतके कठीण काम दुसरे कोणते नाही.

साने गुरूजी

आपले राष्ट्र महान व्हावे अशी जर तुमची इच्छा असेल तर प्रत्येकाने स्वयंशिस्त पाळणे आवश्यक आहे. नागरिकांच्या शिस्तीशिवाय राष्ट्राची प्रगती होऊ शकणार नाही.

महात्मा गांधी

असत्य हे कच्च्या पायावर उभारलेल्या इमारतीसारखे धोकादायक असते. तिला बाहेरून टेकू द्यावे लागतात.असत्य बोलणे हे शेवटी फार महाग पडते. पहिल्यापासून सत्याच्या पक्क्या पायावर उभारलेल्या इमारताला धोका नसतो.

-अॅडिसन

अभ्यासाचा कंटाळा म्हणजे भाग्याचा टाळ.

घडावे असे वाटते पण घडत नाही ते घडवण्याचे सामर्थ्य शिक्षणात असते.

जो माणूस चांगली पुस्तके वाचत नाही व  ज्याला वाचता येत नाही यात काही फरक नाही.

स्वतः तुम्ही उशिरा उठला म्हणून सूर्य उशिरा उगवणार नाही.

एकदा शिकवणे म्हणजे दोनदा शिकणे.

शिस्तीशिवाय जीवन म्हणजे सुकाणू शिवाय जहाज.

सुंदर सकाळ पाहण्या आधी काळोखाची रात्र जावे लागते.

मौन हा रागाला जिंकण्याचा सोपा उपाय आहे.

शब्दात भाव असेल तर शब्दांना भाव मिळेल.

भीती ही नकारात्मक बाबींची अंधारकोठडी असते.

स्वतःला जिंकायची असेल तर डोक्याचा उपयोग करा इतरांना जिंकायचे असेल तर हृदयचा उपयोग करा.

सज्जन म्हणून जन्माला येणे हा योगायोग पण सज्जन म्हणून मरणे ही आयुष्यभराची कमाई होय.

वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार व पीक जळून गेल्यावर पडलेला पाऊस याची किंमत सारखीच.

तुमच्या कार्यावर प्रेम कार्यातील तुमच्यावर नको.

आपल्यामधील एकही दोष लक्षात न येणे हाच सर्वात मोठा दोष आहे.

Good Night Marathi Suvichar | शुभरात्री सुविचार

good night marathi suvichar
शुभरात्री सुविचार

युद्धात निर्धार,औदार्य व शांततेत सदिच्छा हवी.

हृदयाने हृदयाला ओळखणे हाच सर्वश्रेष्ठ धर्म होय.

कोणत्याही गोष्टी पूर्वी तयार होणे हे यशाचे रहस्य आहे.

आत्मसंयम, आत्मजाणीव आणि आत्मसुधारणा हे तीन गुण ज्याच्यापाशी आहेत त्यांनी जग जिंकले असे समजावे.

विज्ञानात आत्मज्ञान असेल तर सर्वोदय होईल.

जगाचा कधी काळी उद्धार झाला तर तो शिक्षकांकडूनच होईल.

अंधश्रद्धेने मूर्ख बनण्यापेक्षा नास्तिक परवडला.

संदेहाणे सत्याचे दर्शन होते.

माणसाचे मोठेपण त्याने किती माणसे मोठी केली यावरून सिद्ध होते.

ज्याची कसलीही मागणी नसते तो सम्राट असतो.

दीर्घकाळ धुमसत राहण्यापेक्षा क्षणभरच का होईना प्रज्वलित होणं.

एखाद्या गोष्टीची गप्प अवस्था म्हणजे तिच्या नाशाची सुरुवात.

अंधाराची चिंता सोडा आणि प्रकाश उजळा.

विनोद हे दोष दर्शनाचे प्रखर व प्रभावी साधन आहे.

सभ्य माणसाचं लक्षणं हे की तो दुसऱ्याला दुखवीत नसतो.

Whatsapp Suvichar Marathi | मराठी सुविचार स्टेटस

मराठी सुविचार स्टेटस
मराठी सुविचार स्टेटस

चुका करीत नाही जो काहीच करत नाही.

सर्वात जास्त आनंद कोणत्या गोष्टीत असेल तर दुसऱ्यांना आनंद देण्यात.

मित्राच्या मृत्यूपेक्षा मैत्रीचा मृत्यू अधिक दुःखदायक असतो.

मानसिक स्वातंत्र्य हेच खरं स्वतंत्र आहे.

प्रत्येक व्यक्तीत काही ना काही सामर्थ्य असतेच.

माणसाला सुख हवं असतं पण सुख देणारे पदार्थ नको असतात.दुःख देणारे पदार्थ हवे असतात पण दुःख नको असतं.

वृक्षनाश म्हणजे संस्कृतीचा नाश.

साधुसंत मानवा इतकेच वृक्षाशीही हितगुज करणे श्रेयस्कर समजतात.

विचार केल्याशिवाय लिहिता येत नाही.

बुद्धी आणि भावना यांचा समन्वय साधता येणं ही जीवनकला आहे.

ईश्वराचा आवाज ऐकण्यासाठी प्रत्येकानं मौन पाळलं पाहिजे.

छटाकभर प्रेम शेरभर ज्ञानापेक्षा वरचढ असतं.

जो जिभेच्या अंकित आहे आणि झोपेच्या अधीन आहे तो अध्यात्माचा केव्हाही अधिकारी होऊ शकणार नाही.

आत्मचिंतन करीत राहणं हा महान शिक्षक होण्याचा मार्ग आहे.

अपयश हेच दर्शविते की आणखी साधनेची आवश्यकता आहे.

पशूंना द्रव्याची इच्छा नसते पण तिची इच्छा मनुष्याला पशु बनवते.

आत्मा जिंकला की सर्वकाही जिंकले.

मराठी सुविचार  | Marathi Suvichar

मला आशा आहे आज या लेखात सांगितलेले Marathi Suvichar तुम्हाला आवडले असतील.हयातून तुम्ही नक्कीच प्रेरणा घ्याल व आपलं आयुष्य छान जगाल हीच अपेक्षा करतो.

या लेखात आपल्याला काही शंका असल्यास किंवा त्यामध्ये काही सुधारणा झाली पाहिजे असे आपल्याला वाटत असल्यास, यासाठी आपण आम्हाला कमेन्ट किंवा ईमेल लिहून नवीन सुविचार सांगू शकता.

यातून काही नवीन शिकायला मिळाले असेल तर कृपया ही माहिती जास्तीत जास्त इतरांपर्यन्त पोहचवा.फेसबुक,ट्विटर आणि इतर सोशल मीडिया साइट्स वर हे शेअर करा.धन्यवाद

हे पण वाचा :

प्रतिक्रिया द्या