Marathi Ukhane For Female | मराठी उखाणे नवरी साठी 2022

Marathi Ukhane For Female घेणे हे महाराष्ट्रातील जुनी परंपरा आहे.मराठी उखाणे घेणे ही मजेशीर गोष्ट असते,म्हणूनच आजही या परंपरा चालू आहेत.लग्न म्हणतल तर मराठी उखाणे नवरी साठी घेणे आलेच.यासाठीच नवरी इतर तयारीप्रमाणे उखाण्यांची सुद्धा खास तयारी करते.

आज आम्ही असेच काही Marathi Ukhane For Female, romantic,haldi kunku,sankranti special Marathi ukhane for female for marriage, मुलींसाठी, महिलांसाठी मराठी उखाणे तसेच modern मराठी उखाणे नवरी साठी आपल्यासोबत share करणार आहोत.

marathi ukhane for female
Marathi Ukhane For Female | मराठी उखाणे नवरी साठी

Marathi Ukhane For Female | मराठी उखाणे नवरी साठी

Best ukhane in marathi for female

 • मंगळसूत्रातील दोन वाट्या सासर आणि माहेर,….रावांनी दिला मला सौभाग्याचा आहेर.
 • सर्वांना नमस्कारा साठी जोडते हो हात,….रावांचे नाव घेते पण सोडा माझी वाट.
 • लग्नासारख्या गोड दिनी आज्ञा कशी मोडू,….रावांना घास देताना,मला येई गोड हसू .
 • शुभमंगल प्रसंगी अक्षदा पडतात माथी,….राव माझे जीवनसाथी.
 • अभिमान नाही संपत्तीचा, गर्व नाही रुपाचा,….रावाना घास भरवते वरण-भात-तुपाचा.
 • चंद्राच्या महालात रोहिणीची चाहूल,….रावांच्या जीवनात टाकते मंगलमई पाऊल.
 • आकाशाच्या अंगणात ,ब्रह्मा ,विष्णू आणि महेश,….रावांचे नाव घेऊन करते हो गृहप्रवेश .
 • गर्द आमराई त्यामाध्ये पोपटाचे थवे,….चे नाव माझ्या ओठी यावे.
 • केळीच्या पानावर गाईचं तूप,….रावांचं कृष्णासारखं रुप.
 • केळी देते सोलून पेरू देते चोरून,….रावांच्या जीवावर कुंकू लावते कोरून.
 • दाराच्या चौकटीला गणपतीचं चित्र …. रावांच्या मुळे मिळालं सौभाग्याचं मानपत्र

Marathi Ukhane For Female Romantic | छान छान उखाणे

Latest ukhane in marathi for female

 • डाळिंब ठेवले फोडून, संत्र्याची काढली साल,….रावांच्या नावाने कुंकु लावते लाल.
 • आनंदाने भरला दिन हा लग्नाचा,….ल घास देते,गोड जिलेबीचा.
 • चांदीच्या ताटात हळदी कुंकवाचा काला,….रावांच नाव घ्यायला आजच प्रारंभ केला.
 • मंगलदेवी मंगलमाते वंदन करते तुला,….रावांचे आयुष्य वाढो हीच प्रथना तुला.
 • संसार रुपी वेलीचा, गगनात गेला झुला,….रावांचे नांव घेते, आशीर्वाद द्यावा मला.
 • साजूक तुपात नाजूक चमचा,….रावांचं नाव घेते आशीर्वाद असावा तुमचा.
 • गुलाबाचे फुल दिसायला ताजे,….रावांचे नांव घेते, सौभाग्य माझे.
 • चंदेरी चळिला सोनेरी बटन………..रावांना आवडते तंदूरी चिकन.
 • कुरुंदाची सहन चंदनाचे खोड,….रावांचे बोलणे अमृतापेक्षा गोड.
 • नदीच्या काठावर कृष्ण वाजवितो बासरी,….रावां सोबत आली मी सासरी.

Modern Marathi Ukhane For Female | Ukhane In Marathi For Female

Ukhane marathi female

 • दान दागीण्यापेक्षा शब्द हवा गोड,….रावांच्या संसाराला.…ची जोड.
 • सोन्याचे मंगळ्सूत्र सोनाराने घडविले,….रावांचे नाव घ्यायला सगळ्यांनी मला अडविले.
 • आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा,….चे नाव घ्यायला उखाणा कशाला हवा.
 • ….ची लेक,झाले….यांची सुन,….चे नाव घेते गृहप्रवेश करून.
 • चांदीच्या ताटात अगरबतीचा पुडा,….च्या नावाने भरला हिरवा चूडा.
 • अबोलिच्या फुलाचा गंध काही कळेना,….चे नाव घेण्यास शब्द काही जुळेना.
 • चिवड्यात घालतात खोब्ररयाचे काप,….रावांच समवेत ओलांडते माप.
 • सावित्रीने नवस केला, पती मिळावा सत्यवान,….रावांच्या जीवावर मी आहे भाग्यवान.
 • जशी आकाशात चंद्राची कोर,….हे पती मिळायला माझे नशीब थोर.
 • जन्म दिला मातेने पालन केले पित्याने,….रावांच नाव घेते पत्नी या नात्याने.

Marathi Ukhane For Female Sankranti Special | संक्रांती सणासाठी खास उखाणे

Unique ukhane in marathi for female

 • आज मकरसंक्रांत म्हणून , जेवण केले आहे गोड,….रावांची आहे, मला फार ओढ.
 • आज मकर संक्रांत म्ह्णून, मी आले नटून,…. आणि …. ची जोडी दिसते, सर्वात उठून.
 • महालक्ष्मीच्या देवीला, अलंकाराचा साज,…. रावांचे नाव घेते, संक्रांत आहे आज.
 • ऊसापासून बनवतात साखर आणि गूळ,….रावांचे नाव घेते मैत्रिणींना वाटत तिळगूळ.
 • तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला,…रावांचे नाव घेण्याचे सौभाग्य लाभले मला.
 • गोकुळ सारखा संसार सगळे कसे हौशी,….रावांचे नाव घेते संक्रांतीच्या दिवशी.
 • तिळगुळाच्या देवघेवीने दृढ प्रेमाचं जुळतं नात,….रावंच नाव घेते आज आहे मकरसंक्रांत.
 • तिळगुळ घ्या आली संक्रांत,….शी झाले लग्न जे स्वभावाने फारच शांत.
 • निसर्ग निर्मिती च्या वेळी सुर्यनारायण झाले माळी,….चे नाव घेते संक्रांतीच्या वेळी.
 • तिळासोबत गुळाचा गोडवा किती छांन,….रावांचे नाव घेऊन देते संक्रांतीचे वाण.

Marathi Ukhane For Bride | नवरीसाठी नवीन उखाणे

Ukhane in marathi for girl

 • शंकराचा सोमवार, गणपतीची चतुर्थी,माझ्या ह्रुदयांत कोरली,….रावांची सुंदर मूर्ती.
 • अत्तराचा सूगंध दरवळला चहुकडे,….रावांच्या नामाचा लौकिक होउ दे सगळिकडे.
 • मंगल दिनी, सोनेरी क्षणी हार घालते एकामेका,….रावांच्या सौभाग्याने नाव घेते ऐंका.
 • नवे घर ,नवे लोक, नवी नवी नाती संसार होईल मस्त …. राव असता सोबती.
 • हिमालय पर्वतावर, बर्फाच्या राशी,….रावांच नाव घेते गृहप्रवेशाच्या दिवशी.
 • हळद घेतली,कूंकु घेतलं,घेतली निरंजन आणी काडेपेटी,….रावांचे नाव घेते तुमच्या आग्रहा पोटी.
 • महादेवाच्या पिंडीला बेल वाहते वाकुन,….रावांचे नाव घेते तुमचा मान राखून.
 • लावित होते कुंकु, त्यात पडला मोती,….रावां सारखे पती मिळाले, भाग्य माझे किती.
 • हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी,….रावांच नांव घेते,….दिवशी.
 • लग्नात लागतात हार आणि तुरे,….च्या नाव घेण्याचा आग्रह आता पुरे.
 • दारी होती तुळस ,तिला घातले होते पाणी ,आधी होते आई बाबांची तान्ही,आता झाले ….ची राणी .

Marathi Ukhane For Female Haldi Kunku | हळदी कुंकू उखाणे

 • जीवन म्हणजे, सुख दुःखाचा खेळ,….रावांचे नाव घेते, आहे हळदीकुंकवाची वेळ.
 • हळदी कुंकूचे, निमंत्रण आले काल,….रावांचे नाव घेऊन, कुंकू लावते लाल.
 • हळद असते पिवळी, कुंकू असते लाल,….रावांची मिळाली साथ झाले जीवन खूशहाल.
 • कपाळाचं कुंकु, जसा चांदण्यांचा ठसा,….चे नाव घेते, सार्‍या जणी बसा.
 • गणपतीला आवडतात दुर्वा, कृष्णाला आवडते तुळशी,….रावांच नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी.
 • जास्वदांच्या फुलांचा हार, गणपती बाप्पाच्या गळ्यात,….रावांचे नाव घेते, स्त्रियांच्या मेळ्यात.
 • हिरव्या हिरव्या रानात, चरत होते हरण,….रावांचे नाव घेते, हळदी कुंकाचे कारण.
 • दशरथ राजाने पुत्रासाठी केला नवस, ……रावांचे नाव घेते,आज आहे हळदी कुंकवाचा दिवस.
 • हळदी कुंकवाला जमला, सुवासिनींचा मेळ,….रावांचे नाव घेण्याची हीच ती खरी वेळ.
 • अथांग वाहे सागर,संथ चालते होडी,परमेश्वर सुखी ठेवो,….नी माझी जोडी.

हे पण वाचा : Marathi ukhane for male

निष्कर्ष : Ukhane in Marathi For Female Marriage

आम्हाला आशा आहे की Marathi Ukhane For Female हा लेख तुम्हाला आवडला असेल.या लेखात मराठी उखाणे नवरी साठी,lagnache ukhane marathi female बद्दल आपल्याला काही शंका असल्यास किंवा त्यामध्ये काही सुधारणा झाली पाहिजे असे आपल्याला वाटत असल्यास, यासाठी आपण कमेन्ट लिहून आम्हाला सांगू शकता.

आपल्याला हा लेख आवडला असेल किंवा यातून काही नवीन शिकायला मिळाले असेल तर कृपया ही माहिती जास्तीत जास्त इतरांकडे पोहचवा. फेसबुक , ट्विटर आणि इतर सोशल मीडिया साइट्स वर हे शेअर करा.धन्यवाद !!

हे पण वाचा : मराठी म्हणी संग्रह व अर्थ | Marathi Mhani With Meaning

प्रतिक्रिया द्या