Marathi Ukhane For Male | बहारदार नवे उखाणे नवरदेव💞

Marathi Ukhane For Male – उखाणा घे,नाव घे. आता कोणता मराठी उखाणा घेऊ ? हा प्रश्न तुम्हाला पडला असेल आणि म्हणून तुम्ही इथे आलात.

तुमची चिंता मिटली. तुम्ही अघडी योग्य ठिकाणी आला आहात.

आज आम्ही खास marathi ukhane नवरदेवासाठी लग्नातील उखाणे सांगणार आहोत. विशेष म्हणजे खालील मराठी उखाणे हे लक्षात ठेवण्यास सोपे व नवीन उखाणे आहेत.

Naav ghene in marathi for male ही प्रक्रिया लग्नात फार गंमत आणते.हल्ली सर्वांना funny, romantic तसेच comedy marathi ukhane for marriage हवे असतात.

तर हे लक्षात घेऊन मराठी कॉमेडी उखाणे नवरदेव साठी देखील आजच्या लेखात सांगितले आहेत.

Navardev ukhane

marathi ukhane for male
Marathi ukhane for male

Marathi Ukhane For Male | मराठी उखाणे नवरदेवासाठी

सोपे उखाणे नवरदेव साठी

 1. हिरवळीवर चरती सुवर्ण हरणी —— झाली आता माझी सहचारिणी.
 2. मनी असे ते स्वप्नी दिसे, ओठी आणू मी हे कसे —— माझी नववधू शब्दात मी हे सांगू कसे.
 3. श्रावण महिन्यात प्रत्येक वारी सन ——ला सुखात ठेवील हा माझा प्रण.
 4. संसाररुपी सागरात पती-पत्नीची नौका —— चे नाव घेतो सर्वजण ऐका.
 5. पार्ले ची  बिस्कीटे बेडेकरंचा मसाला —— चे  नाव घ्यायला आग्रह कशाला. 
 6. हो नाही म्हणता म्हणता लग्नाला संमती दिली आणि देवा ब्राह्मणांच्या साक्षीने —— माझी झाली.
 7. वर्षाकाटचे महिने बारा —— या नावात सामावला आनंद सारा.
 8. फुलासंगे मातीस सुवास लागे —— नि माझे जन्मोजन्मीचे धागे.
 9. काही शब्द येतात ओठातून काही शब्द येतात गळ्यातून ——चं नाव येतं मात्र थेट हृदयातून.
 10. वड्यात वडा बटाटावडा ——नी मारला खडा म्हणून जमला आमचा जोडा.
 11. ती सोबत असली की खराब मूड होतो बरा —— मुळे कळला जगण्याचा आनंद खरा.
 12. प्रेमाच्या चौकात किती पण फिरा, शोधूनही सापडणार नाही  —— सारखा हिरा.
 13. सोन्याची बरणी भरली तुपाने सुख आले घरात —— च्या रूपाने.
 14. माधुरीच्या आधा कत्रिनाचे रूप —— ची प्रत्येक गोष्ट मला भावते खूप.
 15. सोनार त्याची कला दाखवतो सोन्याच्या साखळीवर —— चे नाव लिहिले मी माझ्या हृदयाच्या पाकळीवर..
 16. पैठणीवर शोभे नाजूक मोरांची जोडी —— मुळे आली माझ्या आयुष्याला गोडी.
 17. सोन्याचा मुकुट जरीचा तुरा —— माझी कोहिनूर हिरा.
 18. दोन जीवांचे मीलन जणु शतजन्माच्या गाठी ——चे नाव घेतो तुमच्या आग्रहासाठी.
 19. सूर्यबिंबचा कुंकुम तिलक पृथ्वीच्या भारी ——चे नाव घेतो ——च्या वेळी.
 20. निळे पाणी निळे डोंगर हिरवे हिरवे रान ——चे नाव घेऊन राखतो सर्वांचा मान.

Ukhane In Marathi for Male | उखाणे मराठी नवरदेव

 1. आपल्या देशात करावा हिंदी भाषेचा सन्मान —— चे नाव घेतो ऐका देऊन कान.
 2. देऊळाला खरी शोभा कळशाने येते —— मुळे माझे गृहसौख्य गुणावते.
 3. देवाजवळ करतो मी दत्ताची आरती —— माझ्या जीवनाची सारथी.
 4. आकाशाच्या पोटात चंद्र सूर्य तारांगणे —— चे नाव घेतो तुमच्या म्हणयाप्रमाणे.
 5. प्रेम म्हणजे दोन मनांना जोडणारा पूल —— च्या बोलक्या डोळ्यांनी घातली मला भूल.
 6. लहानसहान गोष्टींनी आधी व्हायचो त्रस्त —— आल्यापासून झाले आयुष्य खूपच मस्त.
 7. गोऱ्या गोऱ्या गालावर तीळ काळा काळा —— च्या गोड हास्याचा मला लागलाय लळा.
 8. अंगावरच्या शेलारीला बांधुनी त्यांचा शेला ——चे नाव घेण्यास आज शुभारंभ केला.
 9. रिमझिम जलधारा बरसतात धरतीच्या कलशात ——चे नाव घेतो असु द्या लक्षात.
 10. वसंतात दरवळतो फुलांचा सुवास सौ —— सोबत सुरू केला जीवनाचा प्रवास.
 11. नवग्रह मंडळात शनीचे आहे वर्चस्व ——- आहे माझे सर्वस्व.
 12. मनी माझ्या आहे सुखी संसाराची आस —— तू फक्त मस्त गोड हास.
 13. पाण्याने भरलेला कलश त्यावर आंब्याची पाने फुले —— चे नाव घेतल्यावर चेहरा माझा फुले.
 14. हृदयात दिले स्थान तेव्हा दिला हातात हात —— च्या जीवनात लावली मी प्रीतीची फुलवात.
 15. नभांगणी दिसते शरदाचे चांदणे —— चे रुप आहे अत्यंत देखणे.
 16. भारत देश स्वतंत्र झाला इंग्रज गेले पळून —— चे नाव घेतो जरा पहा मागे वळून.
 17. बहरली फुलांनी निशिगंधाची पाती —— चे नाव घेतो लग्नाच्या राती
 18. चंद्राला पाहून भरती येते सागराला —— ची जोड मिळाली माझ्या जीवनाला.
 19. देवाला भक्त करतो मनोभावे वंदन —— मुळे झाले संसाराचे नंदन.
 20. दोन शिंपले एक मोती, दोन वाती एक ज्योती माझी आणि सौ —— ची अखंड राहो प्रीती.

हे पण वाचा : Marathi Ukhane for female

Groom Marathi Ukhane for Marriage | Navardevache ukhane

 1. रुपयाचे ताट त्यावर सोन्याचे ठसे —— चे रूप पाहून चंद्रसूर्य हसे.
 2. निळ्या निळ्या आकाशात चमकतात तारे —— चे नाव घेतो लक्ष द्या सारे.
 3. खिशात माझ्या प्रेमाची लेखणी —— माझी सगळ्यात देखणी.
 4. गणपतीच्या दर्शनाला लागतात लांबच लांब रांगा —— चे नाव घ्यायला कधीही सांगा.
 5. यमुनेच्या काठी कृष्ण वाजवितो बासरी —— ला घेऊन जातो तिच्या सासरी.
 6. माझ्या —— चा चेहरा आहे खूपच हसरा, टेन्शन प्रॉब्लेम सगळे क्षणांमध्ये विसरा.
 7. पाटावर बसून ताटात तांदूळ पसरले, त्यावर सोन्याच्या अंगठीने ——चे नाव लिहिले.
 8. ज्ञानेश्वरांच्या प्रतिभेने डोळे दिपले जगाचे —— संसारात सुखी होण्यासाठी मागणे आहे तुमच्या आशीर्वादाचे.
 9. उगवला रवी मावली रजनी ——चे नाव सदैव वसे माझ्या मनी.
 10. उभा होतो मळ्यात नजर गेली खळ्यात, नवरत्नांचा हात ——च्या गळ्यात.
 11. एका वर्षात महिने असतात बारा —— च्या नावात सामावला आनंद सारा.
 12. फुलात फुल जाईचे फूल —— ने  घातली मला भूल.
 13. निर्मळ मंदिर पवित्र मूर्ती माझं प्रेम फक्त —— वरती.
 14. गरगर गोल फिरतो भवरा —— चे नाव घेतो मी तिचा नवरा.
 15. चांदीच्या पैठणीला सोन्याची काठ —— च नाव घेतो पुढचं नाही पाठ.
 16. कावळा करतो काव काव चिमणी करते चिऊ चिऊ —— च नाव घेतो बंद करा टीव टीव.
 17. माझ्या गुणी —— ला पहा सगळ्यांनी निरखून, जणू कोहिनूर हिरा आणलाय आम्ही पारखून.
 18. रुक्मिणीने केला वर श्रीकृष्णाला सुवरीन —— च्या साथीने आदर्श संसार करील.
 19. जशी आकाशात चंद्राची कोर —— सारखी पत्नी मिळायला नशीब लागते थोर.
 20. फुल उमलेल मोहरुन येईल सुगंध ——च्या सोबतीत गवसेल जीवनाचा आनंद.

Funny Ukhane in Marathi For Male | उखाणे मराठी कॉमेडी नवरदेव

मराठी उखाणे नवरदेवासाठी funny

 1. मैदानात खेळत होतो क्रिकेट —— ला पाहून पडली माझी विकेट.
 2. कोरा कागद काळी शाई —— ला देवळात जायची रोजच घाई.
 3. एक बाटली दोन ग्लास —— आहे माझी फर्स्ट क्लास.
 4. कापला टोमॅटो कापला कांदा —— ला पाहून झालाय माझा वांदा.
 5. गावरान अंडी तळी तुपात काहीतरी जादू आहे —— चा रूपात.
 6. कोल्हापुरला आहे महालक्ष्मीचा वास मी भरवतो —— ला जिलेभिचा घास.
 7. पुरणपोळीत तुप असावे साजूक —— आहेत माझ्या फार नाजुक.
 8. गाडीत गाडीत डेक्कन क्वीन —— माझी ब्युटी क्वीन.
 9. नाशिकची द्राक्षे नागपुरची संत्री —— झाली आज माझी गृहमंत्री.
 10. आग आग —— खिडकीवर आला बघ काऊ, घास भरविते जिलेबिचा बोट नको चाऊ.
 11. पुढे जाते वासरू मागून चाली गाय —— आवडते नेहमी दुधावरची साय.
 12. मातीच्या चुली घालतात घरोघर —— झालीस माझी आता चल बरोबर.
 13. हा दिवस आहे आमच्या करिता खास —— ला देतो गुलाबजामचा घास.
 14. अभिमान नाही संपत्तीचा गर्व नाही रूपाचा —— ला घास घालतो वरण भात तुपाचा.
 15. आंबा गोड ऊस गोड —— चे नाव आहे अमृतापेक्षाही गोड.
 16. काश्मीरच्या नंदनवनात फुलतो निशीगंध —— सोबत जीवनात मला आहे आनंद.
 17. संसाराच्या सागरात पती-पत्नी नावाडी —— मुळे लागली मला संसाराची गोडी.
 18. प्रेमाच्या रानात नाचतो मोर —— शी केले लग्न लग्‍न नशीब माझे थोर.
 19. जंगलात पसरला मोगर्‍याचा सुहास —— बरोबर करील प्रेमाचा प्रवास.
 20. फुलांच्या तोरणात आंब्याचे पान —— ला पाहून झालो मी बेभान.

Navardev Ukhane | Lagnachi Ukhane | Marathi Ukhane Male

 1. सूर्यदयाचे सुंदर आहे दृश्य —— आली जीवनात सुंदर झाले आयुष्य.
 2. स्वतंत्र भारताची तिरंगी ध्वजाने वाढवली शान —— चे नाव घेतो ठेवून सर्वांचा मान.
 3. पिवळं सोनं पांढरीशुभ्र चांदी —— ने काढली माझ्या नावाची मेहंदी.
 4. विठोबा माझा विटेवरी उभा —— ने वाढवली घराची शोभा.
 5. मंगळसूत्र घालून कुंकू लावेल तुझा माती कितीही संकटे आली तरी —— लाच करीन माझी जीवन साथी.
 6. गर्द आमराई त्यामध्ये पोपटांचे थवे ——चे नाव माझ्या ओठी यावे.
 7. आकाशात उडतोय पक्षांचा थवा —— चे नाव घ्यायला उखाणा कशाला हवा.
 8. आई-वडील भाऊ-बहीण जणू गोकुळासारखे घर —— च्या आगमनाने पडली त्यात भर.
 9. आम्र वृक्षाच्या छायेत कोकिळा करते गुंजन —— सोबत करतो मी सत्यनारायण पूजन.
 10. काय जादू केली जिंकला मला एका क्षणात, प्रथम दर्शनीच भरली —— माझ्या मनात.
 11. भल्यामोठ्या समुद्रात छोटीशी होडी —— ची आणि माझी लाखात एक जोडी.
 12. स्वराज्यासाठी मावळ्यांनी सांडले होते त्यांचे रक्त —— चे नाव घेतो शिवरायांचा भक्त.
 13. अबोलीच्या फुलांचा गंध काही कळेना —— चे नाव घेण्यास शब्द काहि जुळेना.
 14. लक्ष लक्ष दिव्यासारखे उजळत राहते एकनिष्ठ प्रेम ——ची माझ्या हृदयात कोरली गेली फ्रेम.
 15. अजिंठा-वेरूळची शिल्पे आहेत सुंदर —— माझी सर्वांपेक्षा सुंदर.
 16. सनई चौघडा वाजतो सप्तसुरात —— चे नाव घेतो —— च्या घराला.
 17. चांदीच्या ताटात रुपया वास्तू खणखण —— चे नाव घेऊन सोडतो कोकण.
 18. क्रुष्णाच्या बासरीचा राधेला लागला ध्यास —— ला देतो मी लाडवाचा घास.
 19. सगळ्या रुढी परंपरेत आहे विज्ञानाचे धागेदोरे —— सह घेतले मी सप्तपदीचे फेरे.
 20. कोल्हापुरला आहे महालक्ष्मीचा वास —— ला देतो मी श्रीखंडाचा घास.

Marathi Ukhane For Male Romantic | नवरदेवाचे उखाणे

 1. गणपतीच्या मंदिरात संगीताची गोडी सुखी ठेव गजानना —— आणि माझी ही जोडी.
 2. सीते सारखे चरित्र लक्ष्मी सारखं रूप —— मला मिळाली आहे अनुरूप.
 3. दुर्वांची जुडी वाहातो गणपतीला —— सारखी पत्नी मिळाली आनंद झाला मला.
 4. मोह नाही माया नाही, नाही मत्सर हेवा —— चे नाव घेतो नीट लक्ष ठेवा.
 5. मोहमाया स्नेहाची जाळी पसरली घनदाट —— चे बरोबर बांधली जीवनगाठ.
 6. जन्म दिला मातेने पालन केले पित्याने —— च्या गळ्यात मंगलसूत्र बांधतो प्रेमाने.
 7. पंचपक्वांनाच्या ताटात वाढली जिलेबी पेढे —— चे नाव घ्यायला कशाला आढेवेढे.
 8. ताजमहल बांधायला कारागीर होते कुशल —— चे नाव घेतो तुमच्यासाठी स्पेशल.

Best Ukhane in Marathi for Male | मराठी लग्नातील उखाणे नवरदेवासाठी

आम्हाला आशा आहे की Marathi Ukhane For male हा लेख तुम्हाला आवडला असेल.या लेखात नवीन मराठी उखाणे नवरदेवासाठी या मध्ये आपल्याला काही शंका असल्यास किंवा त्यामध्ये काही सुधारणा झाली पाहिजे असे आपल्याला वाटत असल्यास, यासाठी आपण कमेन्ट लिहून आम्हाला सांगू शकता.

आपल्याला हा लेख आवडला असेल किंवा यातून काही नवीन शिकायला मिळाले असेल तर कृपया ही माहिती जास्तीत जास्त इतरांकडे पोहचवा. फेसबुक , ट्विटर आणि इतर सोशल मीडिया साइट्स वर हे शेअर करा.धन्यवाद !!

हे पण वाचा :

5 thoughts on “Marathi Ukhane For Male | बहारदार नवे उखाणे नवरदेव💞”

 1. खूप दिवसापासून मी उखाणे शोधात होते, आज google वरती मला आपली ही वेबसाइट सापडली. मी सगळे उखाणे वाचले. मला हे उखाणे खूप आवडले. मी अजून तुमच्या वेबसाईट वरचे दुसरे उखाणे पण वाचणार आहे. या मध्ये अजून उखाणे please add करा.

  उत्तर

प्रतिक्रिया द्या