मारुती स्तोत्र मराठी अर्थासहित | Maruti Stotra in Marathi

Maruti stotra in Marathi : बरेच लोक दररोज मारुती स्तोत्र बोलतात.त्यांना वाटते की मारुती त्यांची प्रार्थना ऐकतो आणि त्यांना अपेक्षित फळ देतो.

तुम्हाला काय वाटत? मारुती स्तोत्रचे पठण केल्याने खरोखरच गोष्टी बदलू शकतात का?

जो भक्त मारुतीची पूजा करेल त्यांस त्रास,आप्तकालीन संकटे,साडेसती या सारख्या अडचणींपासून संरक्षण मिळेल असे म्हणतात.

शनिवारी मारुतीची पूजा करून मारुती स्तोत्र,हनुमान चालीसा वाचल्यानेही शनीची पीडा होत नाही अशी मान्यता आहे.

Bhimarupi maharudra maruti stotra ह्या प्रभावशाली स्तोत्राचा अर्थ काय असेल? कोणत्याही स्तोत्राचा किंवा मंत्राचा योग्य अर्थ समजून पठण केल्यास ते सर्वात उत्तम समजले जाते.

या साठीच आज या लेखात मी तुम्हाला Maruti stotra in marathi मध्ये सांगणार आहे.सोबत त्याचा योग्य अर्थ (meaning),फायदे (benefits) हे देखील आपण जाणून घेणार आहोत.

Maruti Stotra In Marathi – मारुती स्तोत्र मराठी

समर्थ रामदासांनी ‘मारुती स्तोत्र’ सोप्या मराठी भाषेत लिहिले आहे.रामदासांनी हे १७व्या शतकात लिहिले असावे असे जाणकार सांगतात.

मारुती स्तोत्र मराठी मध्ये आरंभीचे 13 श्लोक स्तुतीपर आणि वर्णनपर आहेत.शेवटचे 4 श्लोक हे फलश्रुती आहेत.

पालक हे स्तोत्र आपल्या मुलांना चांगल्या संस्कारासाठी शिकवतात.चला तर मग Maruti Stotra In Marathi वाचुया.

श्री मारुती स्तोत्र

भीमरूपी महारुद्रा, वज्रहनुमान मारुती | वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना ||१||

महाबळी प्राणदाता, सकळां उठवी बळें | सौख्यकारी दुःखहारी, दुत वैष्णव गायका ||२||

दीनानाथा हरीरूपा, सुंदरा जगदांतरा | पाताळदेवताहंता, भव्यसिंदूरलेपना ||३||

लोकनाथा जगन्नाथा, प्राणनाथा पुरातना | पुण्यवंता पुण्यशीला, पावना परितोषका ||४||

ध्वजांगे उचली बाहो, आवेशें लोटला पुढें | काळाग्नी काळरुद्राग्नी, देखतां कांपती भयें ||५||

ब्रह्मांडे माईलें नेणों, आवळे दंतपंगती | नेत्राग्नीं चालिल्या ज्वाळा, भ्रुकुटी ताठिल्या बळें ||६||

पुच्छ ते मुरडिले माथा, किरीटी कुंडले बरीं | सुवर्ण कटी कांसोटी, घंटा किंकिणी नागरा ||७||

ठकारे पर्वता ऐसा, नेटका सडपातळू | चपळांग पाहतां मोठे, महाविद्युल्लतेपरी ||८||

कोटिच्या कोटि उड्डाणें, झेपावे उत्तरेकडे | मंद्राद्रीसारिखा द्रोणू, क्रोधें उत्पाटिला बळें ||९||

आणिला मागुतीं नेला, आला गेला मनोगती | मनासी टाकिलें मागें, गतीसी तुळणा नसे ||१०||

अणुपासोनि ब्रह्मांडाएवढा होत जातसे | तयासी तुळणा कोठे, मेरू मंदार धाकुटे ||११||

ब्रह्मांडाभोवतें वेढें, वज्रपुच्छें करू शकें | तयासी तुळणा कैची, ब्रह्मांडी पाहता नसे ||१२||

आरक्त देखिलें डोळा, ग्रासिलें सूर्यमंडळा | वाढतां वाढतां वाढें, भेदिलें शून्यमंडळा ||१३||

धनधान्य पशूवृद्धि, पुत्रपौत्र समग्रही | पावती रूपविद्यादी, स्तोत्रपाठें करूनियां ||१४||

भूतप्रेतसमंधादी, रोगव्याधी समस्तही | नासती तूटती चिंता, आनंदे भीमदर्शनें ||१५||

हे धरा पंधरा श्लोकी, लाभली शोभली बरी | दृढदेहो निसंदेहो, संख्या चन्द्रकळागुणें ||१६||

रामदासी अग्रगण्यू, कपिकुळासि मंडणू | रामरूपी अंतरात्मा, दर्शनें दोष नासती ||१७||

॥ इति श्रीरामदासकृतं संकटनिरसनं मारुतिस्तोत्रं संपूर्णम् ।।

आशा प्रकारे आपण maruti stotra marathi lyrics संपूर्ण वाचले आहे.आता पुढे त्याचा अर्थ जाणून घेऊ

Maruti Stotra Meaning In Marathi – मारुती स्तोत्र मराठी अर्थ

maruti stotra in marathi
Maruti stotra in marathi

स्तोत्र किंवा मंत्र असो त्याचा योग्य अर्थ समजून घेणे फार महत्वाचे आहे. अर्थ समजून पठण केल्यास त्याचा आपल्याला नक्कीच लाभ मिळतो.

चला मग जाणून घेऊयात Maruti Stotra Meaning In Marathi.

श्री मारुती स्तोत्र

भीमरूपी महारुद्रा, वज्रहनुमान मारुती | वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना ||१||

अर्थ – भीम रूप म्हणजे प्रचंड महाकाय शरीर असलेला.रुद्रा ची संख्या अकरा आहे. मारुती या रुद्रा पैकी एक आहे. याकरता मारुती ला भीम रूपी महा रुद्रा असे म्हटले आहे.

मारुती जन्मल्या वर उगवत्या सूर्य बिम्बाला फळ समजून त्याने ते गिळण्यासाठि उड्डाण केले. त्या वेळी इंद्राने त्याचे वज्र मारुतीला फेकून मारले. ते मारले असता त्याच्या हनुवटीला लागले आणि ती छाटली गेली तेव्हापासून मारुतीला हनुमान म्हणू लागले.या करता येथे समर्थांनी वज्र हनुमान असे संबोधले आहे.

वायुचा म्हणजे मरुताचा पुत्र असल्याने त्याला मारुती हे नमाभिमान प्राप्त झाले.

लंकेत सीतेचा शोध घेत असताना मारुतीची अशोक वनात तिच्याशी भेट झाली. त्यानंतर रावणाला अतिशय प्रिय असलेल्या अशोक वनाचा मारुतीने पूर्ण विध्वंस केला,म्हणून त्याला वनारी (वनाचा अरि) म्हणजे शत्रू नाश करणारा असे म्हटले आहे.

मारुती हा अंजनी या वानरीचा पुत्र असल्याने अंजनी सुत असे म्हटले आहे.

मारुती रामाच्या दूत बनून सीतेचा शोध घ्याला लंकेत गेला.रामाने दिलेली खुणेची मुद्रिका तिला दाखवून धीर दिला.यासाठी त्याला राम दूत म्हटले आहे. प्रभंजन हे वायूचे एक नाव आहे. तसेच सोसाट्याचा वादळी वारा असा ही प्रभंजन या शब्दाचा एक अर्थ आहे. मारुती वादळी वारा प्रमाणे वेगाने जाणारा आणि शत्रूला छिन्न विच्छिन्न करणारा असल्याने त्याला प्रभंजन म्हटले आहे.

महाबळी प्राणदाता, सकळां उठवी बळें | सौख्यकारी दुःखहारी, दुत वैष्णव गायका ||२||

अर्थ – मारुती हा महा सामर्थ्यवान आहे. त्याने अंगच्या शक्ती ने अचाट साहसी कृत्य केले आहे. म्हणून त्याला महाबली म्हटले आहे.

तो प्राण दाता म्हणजे जीवन देणार आहे. हृदयस्थ वायूला प्राण म्हटले जाते. तसेच इंद्रजिताने सोडलेल्या शक्ती लागून लक्ष्मण मूर्च्छित झाला असता. मारुती ने द्रोणागिरी आणून त्याचे प्राण वाचवले होते. प्राण आणि शक्ती देऊन सर्वांना कार्यासाठी उद्युक्त करणारा असल्याने सकळां ऊठवी बळें असे म्हटले आहे.

मारूती त्याची भक्ती करणाऱ्याला सौख्य प्राप्त करून देतो आणि वाईट शक्तींचा नाश करून शोक दुःख नाहीसा करतो. या करता त्याला सौख्यकारी शोकहर्ता असे म्हटले आहे.

मारुती अतिशय बुद्धिमान आणि राजकारण पटु असल्याने काही प्रसंगी रामानेही त्याचा समादेश म्हणजेच सल्ला घेतलेला आहे. म्हणूनच त्याला धूर्त म्हटले आहे.

मारूती शिवाचा अवतार असून तो प्रखर रामभक्त असल्यामुळे. त्याला वैष्णव असे ही म्हटले आहे.

मारूतीला गायन कला उत्तम प्रकारे येत असल्याने आणि तो रामनामाचे सतत गायन जप करत असल्याने गायक असे ही म्हटले आहे.

दीनानाथा हरीरूपा, सुंदरा जगदांतरा | पाताळदेवताहंता, भव्यसिंदूरलेपना ||३||

अर्थ – दीनांचा नाथ यार्थी मारुतीला दीनानाथ म्हटले आहे.

हरी या शब्दाचे अर्थ आहेत. वायु,वानर,शिव, विष्णु इत्यादि .मारुती वायु देवाचा मुलगा वानर रूप शिवाचा अवतार आणि राम भक्ती मुळे त्याच्या तील विष्णु तत्त्व जास्त असलेला आहे. या कारणामुळे मारुतीला हरीरूपा म्हटले आहे.

तो रूपाने देखणा सुंदर असल्याने सुंदरा असेही म्हटले आहे.

सर्व जगताच्या अंतरांत वास करणारा म्हणून जगदंतरा असे ही म्हटले आहे.

अहिरावण आणि महिरावण यांच्याशी रामाचे युद्ध झाले असता मारुतीने आपल्या पराक्रमाने रामाचे रक्षण केले. या करता त्याला पाताल देवता हंता असेही म्हटले आहे.

रामाचे आयुष्य वाढावे म्हणून मारुतीने सर्वांगाला शेंदूर फासून घेतला अशी कथा आहे. मारुतीच्या संपूर्ण मूर्तीला शेंदूर वहण्याची प्रथा आहे. याकरिता त्याला भव्य शेंदूरलेपना असे म्हटले आहे.

लोकनाथा जगन्नाथा, प्राणनाथा पुरातना | पुण्यवंता पुण्यशीला, पावना परितोषका ||४||

अर्थ – मारुती हा तिन्ही लोकांचा नाथ लोकनाथ आहे.

तो साऱ्या जगताचा म्हणजे विश्वाचा नाथ जगन्नाथ आहे.

मारुती हृदयास्त, वायूचा प्राण, पंच प्राणांपेकी प्रथम नियंता म्हणून प्राण नाथ आहे.

मारुती राम स्वरूप ईश्वररूप असल्याने अनादी असल्याने त्याला पुरातन असे संबोधले आहे.

संत संगती लाभणे हेच खरे पुण्य होय. प्रत्यक्ष रामप्रभूचा सहवास त्यांना लाभला म्हणून पुण्यवंत म्हटले आहे.

पुण्याने सन्मार्गाने वागणे हे ज्याचे शील आहे असा मारुती होता म्हणून त्याला पुण्यशीला म्हटले आहे.

अनेक कसोटीच्या प्रसंगी ही त्याच्या मनात वाईट विचार डोकावले नाही. रामाच्या कृपेने तो पावन झाला असल्याने पावना म्हटले आहे.

मारुती च्या उपासनेने भक्तांना आनंद प्राप्त होतो. यासाठी दुसऱ्याना आनंद देणारा म्हणून त्याला परतोषका म्हटले आहे.

ध्वजांगे उचली बाहो, आवेशें लोटला पुढें | काळाग्नी काळरुद्राग्नी, देखतां कांपती भयें ||५||

अर्थ – हातात ध्वज घेतल्यावर जसा शरीराचा आकार होतो तशा रीतीनें हातात गदा उगारून मारुती आवेशाने शत्रूंवर चालून जातो.त्याचे रौद्र रूप बघून प्रत्यक्ष काळ मृत्यु हे सुद्धा भयाने थरथर कापू लागतात.

ब्रह्मांडे माईलें नेणों, आवळे दंतपंगती | नेत्राग्नीं चालिल्या ज्वाळा, भ्रुकुटी ताठिल्या बळें ||६||

अर्थ – अशा वेळी सारे ब्रम्हांड जबड्यात मावेल एवढे त्याचे तोंड आणि दंत पंगती वासलेली असते. डोळे आग ओकतात आणि भुवया वक्र झालेले असतात.

पुच्छ ते मुरडिले माथा, किरीटी कुंडले बरीं | सुवर्ण कटी कांसोटी, घंटा किंकिणी नागरा ||७||

अर्थ – शेपूट वर उभारलेले असते असे त्याचे रौद्र रूप असते.मारुतीच्या मस्तकी शोभिवंत मुकुट आहे. सुंदर कुंडलें त्याने धारण केलेली आहे. त्याचा कटीला म्हणजेच कमरेला सोन्याची लंगोट आहे.त्याच्या कटीला बांधलेल्या घंटांचा मंजूळ असा नाद होतो.

ठकारे पर्वता ऐसा, नेटका सडपातळू | चपळांग पाहतां मोठे, महाविद्युल्लतेपरी ||८||

अर्थ – एखाद्या पर्वता सारखा तो भक्कमपणे उभा ठाकला आहे. त्याची शरीरयष्टी, सडपातळ आणि बांधेसूद आहे. आकाशात चमकणाऱ्या विजे प्रमाणे तो चपळ आहे.

कोटिच्या कोटि उड्डाणें, झेपावे उत्तरेकडे | मंद्राद्रीसारिखा द्रोणू, क्रोधें उत्पाटिला बळें ||९|

अर्थ – इंद्रजिताने सोडलेल्या शक्तीने लक्ष्मण मूर्च्छित झाला असता. सुषेण वैद्या ने द्रोणागिरी वरून संजीवनी वनस्पती आणायला सांगितली. ती आणण्यास मारुतीने उत्तरेला कोटी योजने दूर उड्डाण केले.

मारुतीला संजीवनी वनस्पती ओळखता येईना. वास्तव त्याने मंदार पर्वता प्रमाणे विशाल असा द्रोणागिरीच रागाने जागचा उपटला.

आणिला मागुतीं नेला, आला गेला मनोगती | मनासी टाकिलें मागें, गतीसी तुळणा नसे ||१०||

अर्थ – तो विशाल पर्वत त्याने हातावर उचलून आणला. औषधीच्या प्रयोगाने लक्ष्मण शुद्धी वर आल्यावर तो पर्वत पुन्हा त्या ठिकाणी नेऊन ठेवला हे सारे त्याने मनोवेगाने केले.किंबहुना मना पेक्षाही त्याचा वेग जास्त होता. त्याची गति अतुलनीय अशी आहे.

अणुपासोनि ब्रह्मांडाएवढा होत जातसे | तयासी तुळणा कोठे, मेरू मंदार धाकुटे ||११||

अर्थ – मारुती सीतेला अशोकवनात भेटल्या वर मारुतिला आपल्या समवेत येण्याची सीतेने प्रार्थना केली. त्यावेळी त्याचे लहान रूप पाहून सीतेने त्याच्या बळा विषयी शंका व्यक्त केल्या वर मारुतीने सारे ब्रह्मांड छोटे पडेल एवढे महाविशाल रूप धारण केले.

ते एवढे प्रचंड होते की मेरू, स्वर्ग,  मृत्यु आणि पाताळ या लोकांस आधारभूत असा सोन्याचा पर्वत आणि मंदार समुद्रमंथना साठी वापरलेला पर्वत हे सुद्धा त्याच्या पुढे लहान वाटू लागले.

ब्रह्मांडाभोवतें वेढें, वज्रपुच्छें करू शकें | तयासी तुळणा कैची, ब्रह्मांडी पाहता नसे ||१२||

अर्थ – सीतेच्या शोधा प्रसंगी समुद्र ओलांडून जाण्याकरिता वानरांनी मारुतीची स्तुती करून त्याला स्वसामर्थ्याची जाणीव करून दिली. त्यावेळी मारुती ने आपल्या वज्रा समान शेपटीने साऱ्या ब्रह्मांडाला विळखा पडेल एवढे विशाल रूप धारण केले.त्याच्या तोडीस या ब्रह्मांडात कोणीही नाही.

आरक्त देखिलें डोळा, ग्रासिलें सूर्यमंडळा | वाढतां वाढतां वाढें, भेदिलें शून्यमंडळा ||१३||

अर्थ – नुकताच जन्मलेल्या मारुतीने उगवत्या लाल भडक सूर्यबिंबला फळ समजून ते घेण्यासाठी आकाशात झेप घेतली.अनंत आकाशाला भेदून जाईल एवढे विराट रूप धारण केले.

धनधान्य पशूवृद्धि, पुत्रपौत्र समग्रही | पावती रूपविद्यादी, स्तोत्रपाठें करूनियां ||१४||

अर्थ – हे स्तोत्र पठण करणाऱ्याला धनधान्य, पशुधन, पुत्रं पोत्र, संतती या साऱ्याच आणि उत्तम रुप याचा लाभ होतो.

भूतप्रेतसमंधादी, रोगव्याधी समस्तही | नासती तूटती चिंता, आनंदे भीमदर्शनें ||१५||

अर्थ – भूत,प्रेत संबंध आधीची बाधा, सगळे रोग,व्याधी त्रिविध ताप नष्ट होतात. मारुतीच्या दर्शनाने सारी चिंता दूर होते आणि आनंद होतो.

हे धरा पंधरा श्लोकी, लाभली शोभली बरी | दृढदेहो निसंदेहो, संख्या चन्द्रकळागुणें ||१६||

अर्थ – हे पंधरा श्लोकीं स्तोत्र मारुतीच्याच कृपेने आपणाला लाभले आहेत. याच्या पठणाने वाढत्या चंद्र कले प्रमाणे उत्तरोत्तर वाढते फळ मिळते. यात मुळीच शंका नाही.

रामदासी अग्रगण्यू, कपिकुळासि मंडणू | रामरूपी अंतरात्मा, दर्शनें दोष नासती ||१७||

अर्थ – मारुती साऱ्या रामाच्या दासांमध्ये भक्तांमध्ये श्रेष्ठ आहे. तो वानर कुळाला भूषण रूप आहे. अशा राम रूप झालेल्या अंतरात्म्याच्या दर्शनाने आत्मज्ञाना ने सर्व दोष विविध ताप नष्ट होतात.

॥ इति श्रीरामदासकृतं संकटनिरसनं मारुतिस्तोत्रं संपूर्णम् ।।

अर्थ – अशा प्रकारे सर्व संकटांचे निरासन करणारे समर्थ रामदास स्वामी रचित मारुती स्तोत्र समाप्त झाले आहे.

आशा प्रकारे मारुती स्तोत्र मराठी अर्थ संपूर्ण आपण समजून घेतलं आहे.

हे पण वाचा : Venkatesh Stotra in Marathi

Maruti Stotra Benefits in Marathi – मारुती स्तोत्र मराठी फायदे

Bhimrupi maharudra maruti stotra च्या पठणाने काय फायदा होतात ते ह्या स्तोत्राच्या फलश्रुतीतच आपल्याला सांगितले आहे.प्रत्येक स्तोत्राच्या शेवटी फलश्रुती असते.

त्यानुसार मारुती स्तोत्र पठण केल्याने काय फायदे होतील ते जाणून घेऊ.

  • धनधान्याची वृद्धी होते.
  • आपल्या मनात जी काही भीती असेल ती भीती नष्ट होते.
  • रोग व कष्टांचे निवारण होते.
  • नकारात्मक शक्तींचा, विचारांचा नाश होऊन सर्व बाजूने सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो.
  • सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपले मानसिक बल वाढते.
  • सुख, शांती आणि उत्तम आरोग्य आपल्याला मिळते.

फलश्रुती साध्य होण्यासाठी स्तोत्र सिद्ध करावे लागते. रोज ११ वेळा म्हटल्यानेच स्तोत्र पचनी पडते. त्यानंतर सर्व तहेचा विकास होऊ लागतो.नेहमी सूयोदयापूर्वी स्तोत्र म्हटल्यास माणूस निर्भय, सर्वविद्यासंपन्न व कीर्तिमान होतो.

Maruti Stotra Marathi PDF – मारुती स्तोत्र मराठी pdf

तुम्हाला मारुती स्तोत्र pdf download फाईल कशी मिळवू शकतो?

तुम्हाला Maruti Stotra in Marathi PDF फाईल इथे मिळवू शकते. फक्त खालील बटणावर क्लिक करा.

तात्पर्य – Maruti Stotra with Meaning in Marathi

मला आशा आहे Maruti stotra in Marathi with meaning हा लेख तुम्हाला आवडला असेल.आवडला असल्यास त्याचे सर्व श्रेय मारुती चरणी अर्पण व यात काही चुका असल्यास त्या मात्र निसंशय माझ्या.

या लेखात मारुती स्तोत्र मराठी अर्थ या मध्ये आपल्याला काही शंका असल्यास किंवा त्यामध्ये काही सुधारणा झाली पाहिजे असे आपल्याला वाटत असल्यास, यासाठी आपण आम्हाला ईमेल लिहून सांगू शकता.

यातून काही नवीन शिकायला मिळाले असेल तर कृपया ही माहिती जास्तीत जास्त इतरांपर्यन्त पोहचवा.फेसबुक,ट्विटर आणि इतर सोशल मीडिया साइट्स वर हे शेअर करा.धन्यवाद.

हे पण वाचा :

1 thought on “मारुती स्तोत्र मराठी अर्थासहित | Maruti Stotra in Marathi”

प्रतिक्रिया द्या