Mudra Yojana in Marathi : लघु उद्योजकांना सुवर्णसंधी मुद्रा मार्गदर्शक

Mudra Yojana Loan in Marathi : प्रधान मंत्री मुद्रा योजना (PMMY) नेमकी काय आहे ? आपल्याला सहज कर्ज उपलब्ध होईल का?

तुम्ही mudra loan mahiti शोधत असाल,तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात.आज मी तुम्हाला pm mudra loan yojana 2022 ची संपूर्ण माहिती,details या लेखात देणार आहे.

Pradhan Mantri MUDRA Yojana (PMMY) ही देशातील लघु आणि सूक्ष्म-उद्योगांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी भारत सरकारने सुरू केलेली एक प्रमुख योजना आहे.

देशातील तरुण आणि महिलांमध्ये उद्योजकता आणि स्वयंरोजगाराला चालना देण्याच्या उद्देशाने एप्रिल 2015 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही योजना सुरू केली होती.

ही योजना मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट अँड रिफायनान्स एजन्सी (मुद्रा) च्या अंतर्गत चालते. एजन्सी आपल्या भागीदार वित्तीय संस्थांद्वारे देशातील सूक्ष्म आणि लघु उद्योगांना आर्थिक सहाय्य प्रदान करण्यासाठी जबाबदार आहे.

छोटे उद्योजक,महिला उद्योजक किंवा ज्यांना स्वतःच्या व्यवसाय सुरू करायचं असतो आशा लोकांना मोठ्या bank मार्फत कर्ज मिळणे अवघड असते. त्यामुळे त्यांचे व्यवसाय सुरू किंवा वाढवण्याचे स्वप्न अपुरे राहते. 

आशा या लोकांसाठी कर्ज सहज मिळावे व त्यांचा प्रगती सोबत देशाची प्रगती व्हावी या साठी pantpradhan mudra yojana फायदेशीर ठरत आहे. 

Mudra yojana loan in marathi
Mudra loan Marathi mahiti

Mudra Loan Marathi Information – मुद्रा योजना मराठी माहिती

मुद्राचा अर्थ आहे Micro Units Development and Refinance Agency Ltd.(MUDRA).ही एक Non banking सरकारी वित्तीय कंपनी आहे. 

ही कंपनी देशातील लघु उद्योग क्षेत्राचा विकासा साठी काम करते.कर्जाची आवश्यकता असलेल्या लघु उद्योगांना लघु व्यवसायासाठी कर्ज देण्यासाठी MUDRA हे banks आणि इतर वित्तीय संस्थेला आर्थिक सहाय्य प्रदान करते.

पुढे मग हेच banks आणि इतर वित्तीय संस्था प्रधान मंत्री मुद्रा योजना अंतर्गत गरजू व होतकरू उद्योजकांना सहज कर्ज उपलब्ध करून देतात.

Prime minister mudra yojana मध्ये 50000 ते 10 लाख रुपया पर्यंत कर्ज मिळू शकते.

प्रधानमंत्री मुद्रा योजना ही भारत सरकारच्या गरिबांना सशक्त करणे, त्यांची वित्त उपलब्धता वाढवणे आणि ग्रामीण भागात आर्थिक समावेशनाला प्रोत्साहन देण्याच्या ध्येयाचा एक भाग आहे. 

मुद्रा लोन योजना काही प्रमुख मुद्दे  – Importance of Mudra Loan Scheme in Marathi

 1. अत्यंत सवलतीच्या दरात कमी व्याजदराची कर्जे उपलब्ध करून देणे.
 2. कर्ज वाटपाची प्रक्रिया पारदर्शक आणि सुलभ करणे.
 3. बँका आणि इतर कर्ज देणाऱ्या संस्थांची पारदर्शकता आणि जबाबदारी वाढवणे.

मुद्रा योजनेचा उद्देश्य – Objectives of Mudra Yojana in Marathi

PMMY चे प्राथमिक उद्दिष्ट देशातील लहान आणि सूक्ष्म-उद्योगांना त्यांच्या वाढीसाठी आणि विकासासाठी आर्थिक सहाय्य प्रदान करणे आहे.

Pradhan mantri mudra yojana चे काही महत्वपूर्ण उद्देश्य आहेत. ते आपण जाणून घेऊयात. 

 1. लघु उद्योजकांना व लोकांना सहज व सुलब कर्ज मिळवून देणे.
 2. सहज कर्ज देऊन लोकांना स्वंयरोजगार करण्यासाठी प्रेरित करणे.
 3. लघु उद्योगांच्या माध्यमातून रोजगार निर्मिती करणे.
 4. लहान कर्जदारांना तारण मुक्त कर्ज देणे.
 5. लघु उद्योग व स्वतः व्यवसाय करणाऱ्या लोकांना मुख्य आर्थिक प्रवाहात आणणे. 
 6. लघु उद्योग क्षेत्राला एकात्मिक आर्थिक सहाय्य प्रदान करणे.
 7. अर्थ व्यवस्थेतील असंघटित घटकाला संघटित करणे.
 8. MSMEs ला परवडणाऱ्या credit चा  विस्तार करणे.
 9. लघु वित्त संस्थांवर लक्ष ठेवणे.

तरुण आणि महिलांमध्ये उद्योजकता आणि स्वयंरोजगाराला चालना देऊन देशात रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचाही या योजनेचा उद्देश आहे.

हे पण वाचा : Pradhan Mantri kaushalya Vikas Yojana (PMKVY) In Marathi

Mudra loan Details In Marathi – मुद्रा योजनेतील कर्जाचे प्रकार

व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवलाची गरज असेल तर तुम्ही PM Mudra yojana मधून कर्ज घेऊ शकता.या योजने मुळे तुम्ही फक्त 25% खर्चात आपला व्यवसाय सुरू करू शकता.राहिलेले 75% निधी हा या योजनेतून सरकारकडून मिळतो.

प्रधान मंत्री मुद्रा योजना अंतर्गत मुद्रा 3 प्रकारचे कर्ज देते.उद्योगाची वाढ,विकासाचा टप्पा व निधीची गरज या गोष्टी मिळून कर्जाचे प्रकार ठरले गेले आहेत.

शिशु(Shishu), किशोर(Kishor) आणि तरुण(Tarun) हे तीन कर्जाचे प्रकार आहेत. 

कर्ज प्रकारकर्ज रक्कम 
शिशु कर्ज५० हजार रुपया पर्यंत
किशोर कर्ज५० हजार ते ५ लाख पर्यंत
तरुण कर्ज५ लाख  ते १० लाख पर्यंत
Mudra yojana loan types

या योजने अंतर्गत personal loan दिले जात नाही.MUDRA योजनेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, किमान 60% रक्कम ही शिशू कर्ज देण्यात जाईल.

PMMY अंतर्गत दिलेल्या कर्जासाठी कोणतेही अनुदान दिले जाणार नाही.

मुद्रा योजना व्याज दर – PM Mudra Loan Interest Rate in Marathi

MUDRA योजना मधून मिळणाऱ्या कर्जावर निश्चित व्याज दर नाही.वेगवेगळ्या bank मुद्रा कर्जासाठी वेगवेगळा interest rate आकारतात.

MUDRA कर्ज हे कोणतेही तारण न ठेवता दिले जाते,म्हणून हे कर्ज देणे बँकांसाठी जोखमीचे असते.हेच एक मुख्य कारण आहे की व्याज दर bank नुसार बदलतात कारण प्रत्येक बँक आपल्या नियमानुसार जोखीम घटकाची गणना करते आणि त्यानुसार व्याज दर निश्चित करते.

हे mudra loan rate of interest कर्जदाराच्या उद्योगाचे स्वरुप व त्याच्याशी संबंधित जोखीम या बाबींवर ठरले जाते.

मुद्रा योजना कर्ज परतफेड कालावधी – Mudra Yojana Loan Repayment Period

या योजनेतून मिळालेले कर्ज आपल्या कोणत्याही वैयक्तिक गरजांसाठी वापरले जाऊ शकत नाही.त्याचा उपयोग फक्त उद्योग धंद्यासाठीच करता येईल. 

मुद्रा योजना कर्जाची परतफेड कालावधी ही जास्तीत जास्त ५ वर्षा आहे.कर्ज घेताना हा कालावधी आपण कमी देखील करू शकतो.

पंतप्रधान मुद्रा योजनेचा लाभ कोणाला मिळतो – Beneficiary For Mudra Yojana

PM मुद्रा योजनेच्या अंतर्गत खालील क्षेत्रातील लोकांना कर्ज मिळू शकते. 

Mudra loan information in marathi

 1. अन्न उत्पादने क्षेत्र – जसे की पापड बनवणे, लोणच बनवणे, जाम/जेली बनवणे, ग्रामीण स्तरावर कृषी उत्पादनांचे कार्य, मिठाईची दुकाने, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स आणि दैनंदिन केटरिंग/कॅन्टीन सेवा, cold chain वाहने, शीतगृहे, बर्फ बनवण्याचे कारखाना, आइस्क्रीम बनवण्याचे उद्योग, बिस्किट, bread बनवणे इ.
 2. सेवा उपक्रम – जसे की फळे भाजी विक्रेते,saloons, beauty parlour, व्यायामशाळा,boutiques, टेलरिंग शॉप, dry cleaning, सायकल व मोटरसायकल दुरुस्तीचे दुकान, DTP,Xerox आणि Photocopy सुविधा, औषध दुकाने, कुरिअर एजंट इ. (Mudra yojana loan in marathi)
 3. कापड उत्पादने क्षेत्र – जसे की हातमाग, यंत्रमाग, जरी आणि जरदोजी work, पारंपारिक भरतकाम आणि हातकाम, पारंपारिक रंग आणि छपाई, कपडे design, विणकाम, कापूस ginning, संगणकीकृत भरतकाम, शिलाई आणि इतर कापड non-garment उत्पादने जसे की पिशव्या, वाहनाचे सामान, furnishing सामान इ.
 4. वाहतूक क्षेत्र – वाहन खरीदी जसे की ऑटो रिक्षा, लहान वस्तू /माल वाहतूक वाहन, 3 चाकी वाहन, E-रिक्षा, प्रवासी car, taxi इ.

Mudra Loan Eligibility in Marathi – मुद्रा योजने साठी पात्रता

कोणताही व्यक्ती जो आपला स्वतःचा उद्योग सुरू करण्यास इच्छुक असेल किंवा आपला आधीच्या उद्योगाचा विस्तार करणार असेल तर तो हे कर्ज घेण्यास पात्र (eligible) आहे.

PMMY अंतर्गत कर्ज मिळविण्यासाठी पात्रता निकष खालीलप्रमाणे आहेत:

 • कर्जदार हा भारतीय नागरिक असावा
 • कर्जदाराकडे व्यवसाय योजना असावी
 • कर्जदाराचा क्रेडिट स्कोअर चांगला असावा
 • कर्जदाराचा व्यवसाय फायदेशीर आणि टिकाऊ असा असावा

पूर्वी घेतलेल्या कोणत्याही कर्जाच्या परतफेडीवर defaulter नसाल, तर कोणतीही व्यक्ति आपल्या उद्योगासाठी मुद्रा कर्जासाठी अर्ज करू शकते.

How To Apply Mudra Loan in Marathi – मुद्रा योजनेत अर्ज कसा कराल

कर्जदारांना त्यांच्या विभागातील कोणत्याही राष्ट्रीयकृत bank किंवा वित्तीय संस्थेच्या स्थानिक शाखेशी संपर्क साधावा.तिथे मुद्रा योजने अंतर्गत लोन साठी अर्ज केला जाऊ शकतो.

बँक अधिकारी आपल्या कागदपत्रांची पडताळणी करतील व संबंधित कर्ज देणाऱ्या संस्थांच्या पात्रता निकषांनुसार, सहाय्य म्हणून कर्जाची रक्कम लाभार्थ्यांना मंजूर केली जाईल.

मुद्रा लोन कागदपत्रे – Mudra Loan Documents in Marathi

 1. ओळखीचा पुरावा– मतदार ओळखपत्र / Driving license / Pan card / आधार card / पासपोर्ट / सरकारी फोटो आयडी.इ.
 2. रहिवासाचा पुरावा–  टेलिफोन बिल / वीज बिल / मालमत्ता कर पावती (2 महिन्यांपेक्षा जुनी नाही) / मतदार ओळखपत्र / आधार कार्ड / वैयक्तिक / मालक / भागीदार बँक पासबुक किंवा Bank स्टेटमेंट बँकेच्या अधिका-यांनी प्रमाणित केलेले / अधिवास प्रमाणपत्र / शासनाने जारी केलेले प्रमाणपत्र. प्राधिकरण / स्थानिक पंचायत / नगरपालिका इ.
 3. अर्जदाराची अलीकडील छायाचित्रे (2 प्रती) 6 महिन्यांपेक्षा जुनी नाहीत.
 4. यंत्रसामग्री / इतर वस्तूंचे खरेदी करायच्या quotation.
 5. जिथून यंत्रसामग्री घेणार त्या पुरवठादाराचे नाव,तपशील व इतर माहिती.
 6. ओळखीचा पुरावा / व्यवसाय Enterprise चा पत्ता – संबंधित परवान्यांच्या प्रती / नोंदणी प्रमाणपत्रे / मालकीशी संबंधित इतर कागदपत्रे, व्यवसाय युनिटच्या पत्त्याची ओळख,इ..
 7. SC/ST/OBC/अल्पसंख्याक इत्यादी प्रवर्गाचा पुरावा.

मुद्रा योजने साठी कोणत्याही प्रकारची processing fee अथवा guarantee fee द्यावी लागत नाही.

Mudra Loan Schemes in Marathi

Mudra योजने अंतर्गत सरकारने विविध घटकांसाठी विविध schemes सुरू केल्या आहेत.ह्या mudra schemes बद्दल थोडक्यात जाणून घेऊयात.

 1. Bank साठी पुनर्वित्त योजना  – जर कोणतीही बँक लघु उद्योग किंवा वर दिल्याप्रमाणे छोटा व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज देत असेल, तर  MUDRA योजना अंतर्गत बँकांना कर्जाच्या रकमेचे पुनर्वित्त सरकार तर्फे सहज दिले जाते.या मार्फत अनुसूचित सहकारी बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका आणि व्यावसायिक बँकांचा ह्या योजनेत समावेश केला गेला आहे.
 2. Credit गॅरंटी फंड  – या मध्ये पात्र लघु उद्योगाला सहज छोट्या रकमेचे कर्ज दिले जाते. वयात विशेष म्हणजे हे कर्ज तारण मुक्त असते.
 3. महिला उद्यमी scheme – ह्या मार्फत महिला उद्योजकांसाठी कर्ज दिले जाते. वैयक्तिक महिला उद्योजक, महिलांचे बचत गट आणि स्वयं-सहायता गट यांना प्रोत्साहन देण्यासाठी ही scheme आखण्यात आली आहे.
 4. Micro क्रेडिट योजना  – या scheme अंतर्गत, छोट्या वित्तीय संस्थांना आर्थिक सहाय्य दिले जाते.जेणेकरून ह्या संस्था पुढे लघु उद्याजकांना सहज १ लाख रु. पर्यंत कर्ज देऊ शकतील.
 5. मुद्रा कार्ड  – MUDRA कर्ज मिळाल्यावर,उद्योजकला mudra card दिले जाते.हे कार्ड आपल्या कर्ज खात्याशी जोडलेले असते. या कार्डचा वापर आपण credit व debit कार्ड सारखा करू शकतो.व्यवसायात भांडवल गरजेचं असतं,तेव्हा आपण या कार्ड मार्फत ATM मधून पैसे कडू शकतो.
 6. उपकरणे खरीदे कर्ज – ह्या scheme मार्फत पात्र लघु उद्योजक आणि छोटे कारखाने यांना उपकरणे खरेदी व सुधार करण्यासाठी कर्ज पुरवठा केला जातो.असे केल्याने उद्योगांना त्यांच्या व्यवसायाची एकूण उत्पादकता आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी त्यांचे प्रोत्साहित मिळते.

PMMY अंतर्गत कर्ज वाटप

Mudra yojana loan अंतर्गत आर्थिक वर्ष २०२१-२०२२ मध्ये किती कर्ज दिले गेले ते खाली दिले गेले आहे. ही माहिती 31/03/2022 पर्यंत आहे.

आर्थिक वर्ष२०२१-२०२२
मंजूर कर्जांची संख्या53795526*
मंजूर रक्कम339110.35 कोटी*
वितरित केलेली रक्कम331402.20 कोटी*
Source – Mudra

तात्पर्य – Mudra Loan Marathi Information

जर तुम्हाला स्वतचा व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा तुमचा लघु उद्योग तुम्हाला वाढवायचा असेल,तर तुम्ही या मुद्रा योजनेचा नक्कीच लाभ घेतला पाहिजे.

ही योजना देशातील तरुण आणि महिलांमध्ये उद्योजकता आणि स्वयंरोजगाराला प्रोत्साहन देते, ज्यामुळे देशाच्या आर्थिक वाढीला हातभार लागेल अशी अपेक्षा आहे.

मला खात्री आहे की प्रधानमंत्री मुद्रा योजना काय आहे Mudra Yojana loan In Marathi या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला मिळाले असेल.

जर तुम्हाला PMMY loan In Marathi लेख आवडला असेल तर कृपया शक्य तितका शेअर करा.आपल्या होतकरू उद्योजक मित्राला ही mudra loan mahiti नक्की द्या.

या लेखात आपल्याला काही शंका असल्यास किंवा त्यामध्ये काही सुधारणा झाली पाहिजे असे आपल्याला वाटत असल्यास, यासाठी आपण आम्हाला comment  किंवा ईमेल लिहून सांगू शकता.धन्यवाद !!

Mudra Loan बद्दल सतत विचारले जाणारे प्रश्न (FAQ’s)

मुद्रा योजना काय आहे?

मुद्रा योजना अंतर्गत लघु उद्योजक,छोटे दुकानदार,व्यवसाईक यांना सहज १० लाख रु. पर्यंत कर्ज देण्यात येते.

मुद्रा लोन कुठे मिळेल?

मुद्रा लोन तुम्हाला कोणत्याही राष्ट्रीयकृत बँक आणि नेमलेल्या वित्तीय संस्था मध्ये मिळेल.

मुद्रा योजना लोन कसे मिळेल?

तुमच्या जवळच्या राष्ट्रीयकृत bank किंवा वित्तीय संस्थेच्या स्थानिक शाखेशी संपर्क साधून तिथे लोन साठी अर्ज भरावा.

मुद्रा लोनला किती व्याज द्यावे लागते?

या योजनेत व्यज दर निश्चित नाही. 

मुद्रा लोन किती दिवसात मिळेल?

आपण दिलेला अर्ज आणि कागदपत्र यांची पडताळणी करून १ आठवडा ते १० दिवस मुद्रा लोन मिळायला लागु शकतात.

प्रतिक्रिया द्या