Navagraha Stotra With Meaning In Marathi : अवकाशातील आपल्या सूर्यमालेतल्या नऊ ग्रहांना हिंदू धर्मात देवता मानले गेले आहे. नवग्रह स्तोत्र हे हिंदू धर्मातील एक स्तोत्र आहे.हे स्तोत्र श्री व्यास ऋषींनी रचिले आहे.
नवग्रह स्तोत्र हे सूर्यमालेतील नऊ ग्रहांना उद्देशून केलेली प्रार्थना आहे.श्री नवग्रह स्तोत्रात नऊ ग्रहांसाठी नऊ मंत्र आहेत. यावरून आपल्याला प्राचीन भारतीय खगोलशात्राच्या प्रगतीचा अंदाज येतो.
अनेक धार्मिक विधीच्या वेळी या स्तोत्राचे पठण केले जाते.दररोज नियमितपणे हे स्तोत्र म्हटल्याने सर्व प्रकारच्या ग्रह पीडांच्या त्रासांपासून मुक्ती मिळते.
नवग्रह स्तोत्र हे आपल्या पत्रिकेतील दोषांवर मात करण्यासाठी उपयोगी मानले गेले आहे.चला तर मग जाणून घेऊयात navagraha stotra in marathi with meaning.

Navagraha Stotra Marathi Meaning | नवग्रह स्तोत्र मराठी अर्थ
नवग्रहांना प्रसन्न करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे नवग्रह स्तोत्र पठण.आपणही या स्तोत्रचे पठण नियमित केले पाहिजे.
आपण जे नवग्रह स्तोत्र पठण करणार आहोत त्याचा अर्थ काय आहे? ते पठण केल्यावर त्याचे फायदे काय आहेत? हे आता आपण समजून घेऊयात.
II श्री नवग्रह स्तोत्र II
जपाकुसुम संकासं काश्यपेयं महद्युतिम् I तमोरिंसर्वपाघ्नं प्रणतो स स्मी दिवाकरम् II १ II
अर्थ – ज्याची जास्वंदीच्या फुलाप्रमाणे लाल अंगकांती आहे.जो कश्यप ऋषींच्या वंशात जन्मलेला आहे. जो अत्यंत तेजस्वी आहे.अंधाराचा शत्रू व सर्व प्रकारची पापे नष्ट करणारा आहे. अशा या दिवसाच्या राजाला म्हणजे सूर्याला मी साष्टांग नमस्कार करतो.
दधिशंखतुषारभम् क्षीरोदर्णव सम्भवम् I नमामि शशिनम सोमण शम्भोरमुकुट भूषणम II २ II
अर्थ – जो दही आणि शंक यांच्या तुषार प्रमाणेच शोभून दिसतो.जो क्षीरसागरातून निर्माण झालेला आहे. जो भगवान शंकराच्या डोक्यावर दागिन्या प्रमाणे शोभातो.अशा या चंद्राला मी साष्टांग नमस्कार करतो.
धरणीगर्भ सम्भूतं विद्युतकांति सम्प्रभम् कुमारं शक्तिहस्तं तं मंगलं प्रणाम्यहम् II ३ II
अर्थ – ज्यानेभूमी देवीच्या पोटातून जन्म घेतला.ज्याची अंगकांती विजेसारखी आहे.ज्याने हातात शक्ती हे शस्त्र धारण केले आहे. अशा या कुमार स्वरूप मंगळाला मी साष्टांग नमस्कार करतो.
प्रियंगकुलिकाश्यामं रुपेणाप्रतिमं बुधम् I सौम्यं सौम्यगुणोपेतं तं बुधं प्रणमाम्यहम् II ४ II
अर्थ – जो अशोकाच्या फुलाप्रमाणे लाल शाम रंगाचा आहे.जो अति रूपवान बुद्धिवंत सोज्वळ आहे.जो सरळ मार्गे चालणार आहे. अशा या सुस्वभावी बुद्धाला मी साष्टांग नमस्कार करतो.
देवानांच ऋषीनांच गुरुं कांचन सन्निभम् I बुद्धिभूतम् त्रिलोकेशम् तम नमामि बृहस्पतिम II ५ II
अर्थ – जो देवांचा आणि ऋषींचा गुरु आहे.ज्यांची अंगकांती सोन्यासारखी आहे.जो अतिशय बुद्धिवंत आहे.जो त्रिलोकात श्रेष्ठ आहे.अशा बृहस्पतीला म्हणजेच गुरूला मी साष्टांग नमस्कार करतो.
हिमकुंड मृणालभम् दैत्यनाम परमम गुरुम I सर्वशास्त्र प्रवर्तकं भार्गवम् प्रणमम्यहम् II ६ II
अर्थ – ज्याची प्रभा हिमकुळातील देठाप्रमाणे आहे. जो दैत्यांचा गुरू आहे. ज्याला सर्व शास्त्रांचे ज्ञान आहे.अशा या रघूकुळात जन्मलेल्या शुक्राला मी साष्टांग नमस्कार करतो.
नीलांजन समभसं रविपुत्रम् यमग्रजम् छायामार्तंड सम्भूतम् तम नमामि शनैश्चरम् II ७ II
अर्थ – ज्याची प्रभा ही निळ्या रंगाची आहे.जो सूर्य पुत्र आहे. जो यमाचा मोठा भाऊ आहे.जो छाया व सूर्य यांच्या पोटी जन्मलेला आहे.अशा या शनेश्वराला मी साष्टांग नमस्कार करतो.
अर्धकायं महावीर्यं चंद्रादित्य विमर्दनम् I सिंहकागर्भसंभूतं तन राहूं प्रणमयहम् II ८ II
अर्थ – ज्याने अर्धे शरीर धारण केले आहे.जो पराक्रमाने भरलेला आहे.जो चंद्र आणि सूर्य यांचा निर्भयपणे विरोध करतो.जो सिंहिकेच्या पोटी जन्माला आला आहे,आशा या राहुला मी साष्टांग नमस्कार करतो.
पलाशपुष्पसंकसम तारकाग्रह मस्तकम् I रौद्रंरौद्रटकं घोरं तन केतुम् प्रणममयम् II ९ II
अर्थ – जो पळसाच्या फुलाप्रमाणे लाल आहे. जो तारका आणि ग्रहांमध्ये प्रमुख आहे. जो भीती निर्माण करणाऱ्या रुद्रा प्रमाणे तापदायक आहे.अशा या केतुला मी साष्टांग नमस्कार करतो.
इति श्रीव्यासमुखोग्दीतम्य पठेत् सुसमाहितः I दिवा वा यदि वा रात्रौ विघ्न शांतिर्भविष्यति II १० II
अर्थ – हे स्तोत्र श्री व्यास ऋषींनी रचले आहे. जो व्यक्ती दिवसा किंवा रात्री या स्तोत्राचा जप करतो तो सर्व संकटांपासून मुक्त होतो.
नरनारी नृपाणांच भवेत् दुःस्वप्ननाशनम् I ऐश्वर्यमतुलं तेषां आरोग्यं पुष्टिवर्धनम् II ११ II
अर्थ – या स्तोत्राचा जप केल्याने स्त्री, पुरुष, राजे इत्यादींच्या वाईट स्वप्नांचा प्रभाव नष्ट होतो.प्रत्येकाला चांगले आरोग्य, संपत्ती आणि ऊर्जा मिळते.
ग्रहणक्षत्रजः पिदस्तस्करग्निसमुभद्वाः I ता सर्वाःप्रशमं यान्ति व्यासोब्रुते न संशयः II १२ II
अर्थ – या स्तोत्राचा जप करणार्या व्यक्तीला ग्रह, नक्षत्र, चोर, अग्नी इत्यादी त्रासांपासून मुक्ती मिळते. व्यास ऋषी म्हणतात की या स्तोत्राचा जप केल्याने फळ मिळेल यात शंका नाही.
II इति श्रीव्यास विरचितम् आदित्यादी नवग्रह स्तोत्रं संपूर्णं II
अर्थ – अशा रीतीने श्री व्यास ऋषींनी रचलेले हे नवग्रह स्तोत्र संपूर्ण झाले आहे.
Navagraha Stotram Benefits In Marathi | नवग्रह स्तोत्र पठण फायदे
नवग्रह स्तोत्र या नवग्रह प्रार्थनेचा अर्थ तुम्हाला समजला असेल. आधी संगीतल्याप्रमणे या स्तोत्रचे नियमित पठण करणे अतिशय उपयोगी आहे.काही विशेष नवग्रह स्तोत्र पठण फायदे माहीत करून घेऊयात.
- नवग्रह स्तोत्र जप करणे व्यक्तीच्या सर्वांगीण कल्याणासाठी अत्यंत फायदेशीर आहे.
- नवग्रह स्तोत्रचे नियमित जप केल्याने तुम्ही तुमच्या कुंडलीतील नऊ ग्रहांचे अशुभ प्रभाव कमी करू शकता.
- तुमच्या कुंडलीनुसार निवडलेला नवग्रह मंत्र त्या ग्रहाचा सकारात्मक प्रभाव मजबूत करण्यास आणि नकारात्मक प्रभावांना कमी करण्यास मदत करतो.
- हे स्तोत्र नवग्रह दोषांवर मात करण्यास व जीवनात शांती आणि आनंद मिळविण्यास मदत करते.
- हे स्तोत्र दुर्दैव दूर ठेवते,तसेच रोग आणि आजारांना प्रतिबंधित करते.
- नवग्रह स्तोत्रचे नियमित जप केल्याने वैयक्तिक तसेच व्यावसायिक जीवनाची गुणवत्ता लक्षणीयरीत्या सुधारते.
निष्कर्ष – Navagraha Stotra In Marathi With Meaning
मला आशा आहे की जर तुम्ही श्री नवग्रह स्तोत्र नियमित श्रद्धेने पठण केले तर तुम्हाला याचा नक्कीच चांगला फायदा होईल. तुमचे बरीच कष्ट दूर होतील.आपल्या सगळ्यांचे जीवन निरोगी आणि आनंदायी राहो हीच नावग्रहांकाडे मी प्रार्थना करतो.
या लेखात Navagraha stotra meaning in Marathi या मध्ये आपल्याला काही शंका असल्यास किंवा त्यामध्ये काही सुधारणा झाली पाहिजे असे आपल्याला वाटत असल्यास, यासाठी आपण आम्हाला कमेन्ट किंवा ईमेल लिहून सांगू शकता.
यातून काही नवीन शिकायला मिळाले असेल तर कृपया ही माहिती जास्तीत जास्त इतरांपर्यन्त पोहचवा.फेसबुक,ट्विटर आणि इतर सोशल मीडिया साइट्स वर हे शेअर करा.धन्यवाद
हे पण वाचा :
- Maruti stotra in marathi with meaning
- Ghalin Lotangan Lyrics Meaning In Marathi
- Pasaydan Lyrics In Marathi With Meaning
- Mahishasura Mardini Stotram Meaning In Marathi
- Pandurangashtakam Meaning In Marathi
नवग्रह स्तोत्राबद्दल सतत विचारले जाणारे प्रश्न (FAQ’s)
नवग्रह स्तोत्र हे शक्तिशाली स्तोत्र आहे. या स्तोत्रचा जप केल्याने नऊ ग्रहांचा शुभ आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो.
इच्छित परिणाम प्राप्त करण्यासाठी, सकाळी लवकर स्नान केल्यानंतर नवग्रह स्तोत्राचे पठण भगवान नवग्रहाच्या चित्रा समोर बसून करावे.
ग्रह दोषाच्या वाईट प्रभावापासून मुक्त होण्यासाठी नवग्रह स्तोत्राचे दररोज १०८ वेळा पठण केले जाऊ शकते.
नवग्रह स्तोत्र हे हिंदू धर्मातील एक स्तोत्र आहे.हे स्तोत्र श्री व्यास ऋषींनी रचिले आहे.