पांडुरंग अष्टक मराठी | Pandurangashtakam Meaning In Marathi

Pandurangashtakam Meaning in Marathi : पांडुरंग अष्टक मराठी याची रचना श्री आदि शंकराचार्य यांनी केली आहे. श्री पांडुरंग अष्टकम हे पूर्णपणे संस्कृत भाषेत लिहिले गेले आहे. 

Pandurangashtakam lyrics मध्ये भगवान पांडुरंगाची स्तुती केली गेली आहे.भगवान पांडुरंगाला भगवान विष्णूचा अवतार मानले जाते.

श्री पांडुरंग अष्टक हे श्री आदि शंकराचार्यांची अतिशय सुंदर लिखित निर्मिती आहे. हे देव पांडुरंगाच्या स्तुतीमध्ये गायले गेले आहे.भगवान विठ्ठल किंवा पांडुरंगा विठ्ठल हे भगवान विष्णूचे अवतार आहेत.

महाराष्ट्रातील पंढरपूर येथील जगप्रसिद्ध विठ्ठल रुक्मिणी मंदिरात त्यांची पूजा केली जाते. जो पांडुरंगाष्टक चा जप करतो तो वर्तमान आणि भूतकाळातील सर्व पापांपासून मुक्त होतो. आणि विष्णूलोक मध्ये स्थान मिळवतो अशी मान्यता आहे.

बरीच अशी लोक आहे ज्याना pandurangashtakam meaning in marathi माहीत नाही.लोकांना फक्त pandurangashtakam lyrics माहीत आहे.

आज या लेखात श्री आदि शंकराचार्य पांडुरंग अष्टक लिखित अर्थासहित सांगणार आहोत.

Pandurangashtakam meaning in Marathi
Pandurangashtakam meaning in Marathi

Pandurangashtakam Meaning In Marathi | पांडुरंग अष्टकम मराठी अर्थ

महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुंडरीकाय दातुं मुनीद्रैः ।
समागत्य तिष्टंतमानंदकदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं ॥ १ ॥

अर्थ – भीमा नदीच्या तीरावर महायोगाचे अधिष्ठान असलेल्या पंढरपूर क्षेत्रांत पुंडरीकाला वर देण्याकरीता श्रेष्ठ मुनींनसह येऊन तिष्टत असलेल्या आनंदकंद परब्रह्मरुप पांडुरंगास मी भजतो.

तडिद्वाससं नीलमेघावभासं रमामंदिरं सुंदरं चित्प्रकाशम् ।
वरं त्विष्टिकायां समन्यस्तपादं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं ॥ २ ॥

अर्थ – ज्याची वस्त्रे विद्दुलते प्रमाणे पिवळ्या रंगाची आहेत, ज्याची अंगकांती नीळ्या मेघा प्रमाणे शोभत आहे, जो लक्ष्मीचे निवासस्थान आहे, जो चित्प्रकाश आहे, जो सर्वश्रेष्ठ व भक्तांना दर्शन देण्यासाठी विटेवर उभा आहे अशा आनंदकंद परब्रह्मरुप पांडुरंगास मी भजतो.

प्रमाणं भवाब्धेरिदं मामकानां नितंबः कराभ्यां धृतो येन तस्मात् ।
विधातुर्वसत्यै धृतो नाभिकोशः परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं ॥ ३ ॥

अर्थ – त्याला अनन्य भावाने शरण येणार्‍या भक्तांना भव सागर हा फक्त कमरे इतकाच खोल आहे. तो सहज पार करता येतो. हे सांगण्याकरता त्याने कमरेवर हात ठेवले आहेत. ब्रह्मदेवाचा सत्यलोक हा कमरेपासून नाभिस्थान जितके उंच आहे त्यापेक्षा अधिक दूर नाही हे दाखवण्यासाठी त्याने आपली बोटे नाभिस्थानाकडे वळवली आहेत अशा आनंदकंद परब्रह्मरुप पांडुरंगास मी भजतो.

स्फुरत्कौस्तुभालंकृतं कंठदेशे श्रिया जुष्टकेयूरकं श्रीनिवासम् ।
शिवं शान्तमीड्यं वरं लोकपालं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं ॥ ४ ॥

अर्थ – आपल्या गळ्यांत कौस्तुभ मणी घातल्याने जो अतिशय शोभून दिसत आहे. ज्याच्या बाहूंवर केयूर म्हणजे बाजुबंद शोभत आहेत. ज्याच्याजवळ श्री म्हणजे लक्ष्मीचा निवास आहे. जो लोकांचा पालनकर्ता आहे. अशा त्या परम शांत मंगलमय सर्वश्रेष्ठ व स्तुति करण्यास योग्य असलेल्या आनंदकंद परब्रह्मरुप पांडुरंगास मी भजतो.

शरचंद्रबिबाननं चारुहासं लसत्कुंडलक्रान्तगंडस्थलांगम् ।
जपारागबिंबाधरं कंजनेत्रम् परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं ॥ ५ ॥

अर्थ – शरद ऋतूंतील चंद्रबिम्बा प्रमाणे अत्यंत रमणीय मुख असलेल्या, मुखावर सुंदर हास्य विलसत असलेल्या, कानांत कुंडले घातल्याने त्यांची शोभा गालावर झळकत असलेल्या, आोठ जास्वंदीच्या फुलाप्रमाणे आरक्त वर्ण असलेल्या व कमळाप्रमाणे सुंदर नेत्र असलेल्या आनंदकंद परब्रह्मरुप पांडुरंगास मी भजतो.

किरीटोज्ज्वलत्सर्वदिक् प्रान्तभागं सुरैरर्चितं दिव्यरत्नैरमर्घ्यैः ।
त्रिभंगाकृतिं बर्हमाल्यावतंसं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं ॥ ६ ॥

अर्थ – ज्याच्या मस्तकावर असलेल्या मुकुटाच्या प्रभेने मुखाभोवतालच्या सर्व दिशा उजळून निघाल्या आहेत. दिव्य आणि अमूल्य रत्ने अर्पण करुन देव ज्याची पूजा करतात. बाळ कृष्णरुपाने जो तीन ठिकाणी वाकून उभा आहे. ज्याच्या गळ्यात वनमाला व मस्तकावर मोरपिसांचा तुरा शोभत आहे. त्या आनंदकंद परब्रह्मरुप पांडुरंगास मी भजतो.

विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेषं दधानम् ।
गवां वृंदकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं ॥ ७ ॥

अर्थ – सर्व विश्र्व व्यापून राहणार्‍या, वेणु वाजवीत वृन्दावनात फिरणार्‍या, ज्याचा कोणाला अतं लागत नाही, लीलेने गोपवेष धारण केलेल्या, गायींच्या कळपाला आनंद देणार्‍या मधुर हास्य करणार्‍या अशा आनंदकंद परब्रह्मरुप पांडुरंगास मी भजतो.

अजं रुक्मिणीप्राणसंजीवनं तं परं धाम कैवल्यमेकं तुरीयम् ।
प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं ॥ ८ ॥

अर्थ – ज्याला जन्म नाही. जो रुक्मीणीचा प्राणाधार आहे. भक्तांसाठी परम विश्रामधाम व शुद्ध कैवल्य असलेल्या, जागृति, स्वप्न व सुषुप्ति किंवा बाल्य, तारुण्य व वार्धक्य ह्या तीनही अवस्थांच्या पलीकडे असलेल्या, नेहमी प्रसन्न, शरणागतांचे दुःख हरण करणारा व देवांचाही देव असलेल्या अशा आनंदकंद परब्रह्मरुप पांडुरंगास मी भजतो.

स्तवं पांडुरंगस्य वै पुण्यदं ये पठन्त्येकचित्तेन भक्त्या च नित्यम् ।
भवांबोनिधिं तेऽपि तीर्त्वाऽन्तकाले हरेरालयं शाश्र्वतं प्राप्नुवन्ति ॥ ९ ॥

अर्थ – अत्यंत पुण्यदायक असलेले, पांडुरंगाचे हे स्तोत्र जे कोणी एकाग्र चित्ताने प्रेमपूर्वक नित्य पठण करतील ते सर्वजण अन्तकाळी भवसागर सहजपणे तरुन जातील आणि त्यांना परब्रह्मस्वरुप श्रीहरीच्या-पांडुरंगाच्या शाश्र्वत स्वरुपाची प्राप्ती होईल.

॥ इति श्री परम पूज्य शंकराचार्यविरचितं श्रीपांडुरंगाष्टकं संपूर्णं ॥

अर्थ – अशा रीतीने परम पूज्य शंकराचार्यांनी रचिलेले हे पांडुरंगाष्टकं पुरे झाले.

Pandurangashtakam Pdf | पांडुरंग अष्टक Pdf

जर तुम्हाला pandurangashtakam pdf किंवा पांडुरंग अष्टक Pdf डाउनलोड करायची असेल तर तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून ते करू शकता.

इथे PDF डाउनलोड करा

Pandurangashtakam Meaning in Marathi | पांडुरंगाष्टक मराठी अर्थ

आम्हाला आशा आहे की Pandurangashtakam meaning in marathi हा लेख तुम्हाला आवडला असेल.या लेखात पांडुरंगाष्टक मराठी आणि त्याचा अर्थ या मध्ये आपल्याला काही शंका असल्यास किंवा त्यामध्ये काही सुधारणा झाली पाहिजे असे आपल्याला वाटत असल्यास, यासाठी आपण आम्हाला ईमेल लिहून सांगू शकता.

आपल्याला हा लेख आवडला असेल किंवा यातून काही नवीन शिकायला मिळाले असेल तर कृपया ही माहिती जास्तीत जास्त इतरांपर्यन्त पोहचवा.फेसबुक,ट्विटर आणि इतर सोशल मीडिया साइट्स वर हे शेअर करा.धन्यवाद.

हे पण वाचा :

2 thoughts on “पांडुरंग अष्टक मराठी | Pandurangashtakam Meaning In Marathi”

प्रतिक्रिया द्या