Pasaydan Lyrics In Marathi With Meaning | पसायदान मराठी अर्थ

आज आपण जाणून घेणार आहोत Pasaydan lyrics in Marathi with meaning म्हणजेच पसायदान चे संपूर्ण मराठी अर्थ अगदी साध्या आणि सोप्या भाषेत.

ज्यांच्या नावातच ज्ञान आणि ईश्वर वसलेला आहे.असे संत ज्ञानेश्वर यांना शिरसाष्टांग नमस्कार.आपल्या पेकी बऱ्याच जणांना पसायदान हे तोंडपाठ असेल.

लहानपणापासून आपण लता मंगेशकर यांच्या आवाजातील सुमधुर पसायदान ऐकले असेल.शाळेतल्या प्रार्थनेमध्ये सुद्धा पसायदानचा समावेश असायचा.पण कधी आपल्याला त्याचा अर्थ सांगितला गेला नाही हे आपले दुर्दैव आहे.

तुम्ही जेव्हा पसायदान मराठी अर्थ वाचाल तर खरच थक्क व्हाल.आयुष्यात इतके मोठे कार्य करून संत ज्ञानेश्वरांनी ईश्वराकडे स्वतःसाठी काहीच मागितले नाही.

पसायदानाचे महत्व आणि संत ज्ञानेश्वर ही जगाची माऊली का होती? हे तुम्हाला पसायदानचे मराठी अर्थ वाचून नक्कीच लक्षात येईल.

पसायदान म्हणजे काय? | Pasaydan in Marathi

मित्रांनो सारांशाने एखाद्या ग्रंथातील विचार जसा समजतो तसा ज्ञानेश्वरीतील विचार सारांश रूपाने पसायदानात मांडलेला आहे.पसायदान ही प्रार्थना आहे.

या प्रार्थनेचे वैशिष्ट्ये हे की ती धर्म, पंथ, काळ या सर्वांच्या पलीकडे आहे.सर्व आणि सर्वकालीन मानवांसाठी केली गेलेली ती प्रार्थना आहे.

पसायदान मधे संत ज्ञानेश्वर यांनी चराचर व्यापलेल्या परमेश्वराकडे लोक कल्याणासाठी मागणे मागितले आहे.

Pasaydan lyrics in Marathi with meaning
Pasaydan lyrics in Marathi with meaning

Pasaydan Lyrics in Marathi with Meaning | पसायदान मराठी अर्थ

पसायदान मध्ये ९ ओव्या आहेत.या ९ ओवयांचा अर्थ आता आपण समजून घेणार आहोत.

चला तर मग Pasaydan lyrics in Marathi with meaning समजून घेऊयात.

Pasaydan lyrics in marathi

आता विश्चात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे  ।
तोषोनि मज द्यावे, पसायदान हे  ।।१।।

अर्थ – माऊली म्हणतात या विश्वात्मक विश्वाचा कणा कणा मध्ये भरून राहिलेल्या माझ्या भगवंता. माझ्या वाणीचा यज्ञ तुझ्या कृपेमुळे अखंड चालू आहे.

या यज्ञाला आपण प्रसन्न व्हावे.आणि मला हे प्रसादाचे या पसायदानाचे दान द्यावे.

जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो  ।
भूता परस्परे जडो, मैत्र जीवांचे  ।।२।।

अर्थ – माऊली ईश्वराकडे मागतात हे ईश्वरा एक माझे मागणे या जगामध्ये जे काही वाईट प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांच्या त्या वाईट प्रवृत्तीचा नाश कर.कारण कुठलाही मनुष्य हा कधीच वाईट नसतो त्याचे गुण वाईट असू शकतात फक्त तेच काढून टाक.

दुष्प्रवृत्ती काढून टाकल्यावर त्यांच्या सत्कर्मामध्ये वाढ कर.हे जर केले तर नक्कीच या पृथ्वीवरील सर्व जीव प्रेमळ होऊन जातील.

भगवंताकडे मागणे मागताना माऊलींना आपल्या वाईट म्हणवल्या जाणाऱ्या मुलांची जास्त काळजी वाटते.कारण प्रत्येक मनुष्य सत्प्रवृत्ती मधून दैवत्वकडे वाटचाल सुरू करू शकतो हा त्यांना विश्वास आहे.

दुरितांचे  तिमीर जावो, विश्व स्वधर्मसूर्ये पाहो ।
जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात  ।।३।।

अर्थ – जगामध्ये पाप हे फक्त अज्ञानरूपी अंधारामुळे आहे.हा अंधार नाहीसा होण्यासाठी जगात स्वधर्मी रुपी सूर्याचा उदय होवो.प्राणिमात्रांच्या मंगल इच्छा पूर्ण होवोत.

इथे स्वधर्म म्हणजे हिंदू, मुस्लिम, सिख, बौद्ध इत्यादी धर्म नव्हे तर माणुसकी हा धर्म प्रतीत आहे. हा धर्म जर आचरणात आणला तर प्राणिमात्रास इच्छे प्रमाणे सर्वकाही मिळेल.

वर्षत सकळमंगळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी  ।
अनवरत भूमंडळी, भेटतु भूतां  ।।४।।

अर्थ – या विश्वामध्ये ईश्वरनिष्ठ लोकांची सदैव उत्पत्ती होत राहो.सध्या नश्वर गोष्टींवर प्रेम असणारी प्रवृत्ती वाढत आहे.

धनसंपत्तीलाच सुख मानणारे लोक नकोत तर आत्म्यास चिरंतन सुख मागणारे लोक जन्मास यावे असे माऊली मागतात.

Pasaydan in Marathi written

चला कल्पतरूंचे आरव, चेतनाचिंतामणींचे गांव ।
बोलते जे अर्णव, पीयूषाचे ।।५।।

अर्थ – ईश्वरनिष्ठ लोक म्हणजे संत. संत हे कल्पतरूंचे उद्यान आहे.संत जेथे राहतात ते जणू चिंतामणींचे गावच आहे.त्यांची वाणी जणू अमृताचे समुद्र आहे.

जर ईश्वरनिष्ठ लोकांशी संग ठेवला तर आपल्याला काहीच कमी पडणार नाही असा या ओवीचा मतितार्थ आहे.

चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन  ।
ते सर्वांही सदा सज्जन, सोयरे होतु  ।।६।।

अर्थ – जो मनुष्य चारित्र्यावर कोणताही डाग नसलेला चंद्रच आहे.अंधारामध्ये सुद्धा दुसऱ्याला साथ देणारा आहे.रागीट स्वभाव नसणारा ज्ञानरूपी प्रकाशाचा सूर्यच आहे.

अश्या व्यक्तीला सदैव सज्जन लोकांची साथ लाभते.व त्याचे सोयरे ही अगदी त्यांच्या सारखेच असतात.

किंबहुना सर्वसुखी, पूर्ण होऊनि तिहींलोकीं ।
भजि जो आदिपुरुखी, अखंडित  ।।७।।

अर्थ – विश्वामध्ये तिन्ही लोकांतील लोक सर्व सुखी होऊन अखंड या आदि पुरुषाची भक्ती करत राहोत.

तसे पाहता सर्व सुख मिळाल्यानंतर भगवंताकडे जाण्याची लोकांची इच्छा कमी होत जाते आणि तसे  न होण्याची मागणी माऊली इथे करत आहे.

आणि ग्रंथोपजीविये, विशेषी लोकी इये  ।
दृष्टादृष्ट विजये, होआवे जी  ।।८।।

अर्थ – आद्य भगवंताने जे वेद आणि ग्रंथांची निर्मिती केली आहे.या ग्रंथांचा अभ्यास हेच लोकांच्या जीवनाचे लक्ष्य व्हावे.त्याच ग्रंथामध्ये दिलेल्या मार्गदर्शनानुसार आयुष्य व्यतीत करावे.

ग्रंथाना गुरु माना आणि आपले जीवन सुखकर करा.

येथ म्हणे श्रीविश्वेशरावो, हा होईल दानपसावो  ।
येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला  ।।९।।

अर्थ – हे विश्वेश्वरा , हे जगाच्या मायबापा तू जेव्हा म्हणशील ना की हे दान मी तुला दिले तेव्हाच हा ज्ञानदेव चिरंतन सुखी होईल.

तर मित्रांनो असा आहे या विश्वप्रार्थनेचा मराठी संपूर्ण अर्थ.ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या(ज्ञानेश्वरी) नऊ हजार ओवयांचे हे सार आहे.

एका आदर्श समाज व्यवस्थेचे स्वप्न या जगत माऊलीने आठशे वर्षापूर्वी पहिले होते. ज्ञानेश्वरांनी आपल्या सगळ्यांच्या कल्याणासाठी मागितलेली हि प्रार्थना खरोखरच खूप सुंदर आहे.

Meaning of Pasaydan in Marathi | Pasaydan Lyrics in Marathi

मला आशा आहे Pasaydan lyrics in Marathi with meaning हा अर्थ लेख तुम्हाला आवडला असेल.आवडला असल्यास त्याचे सर्व श्रेय ज्ञानेश्वर चरणी अर्पण. व यात काही चुका असल्यास त्या मात्र निसंशय माझ्या.

या लेखात पसायदान मराठी अर्थ या मध्ये आपल्याला काही शंका असल्यास किंवा त्यामध्ये काही सुधारणा झाली पाहिजे असे आपल्याला वाटत असल्यास, यासाठी आपण आम्हाला ईमेल लिहून सांगू शकता.

यातून काही नवीन शिकायला मिळाले असेल तर कृपया ही माहिती जास्तीत जास्त इतरांपर्यन्त पोहचवा.फेसबुक,ट्विटर आणि इतर सोशल मीडिया साइट्स वर हे शेअर करा.धन्यवाद.

हे पण वाचा :

3 thoughts on “Pasaydan Lyrics In Marathi With Meaning | पसायदान मराठी अर्थ”

प्रतिक्रिया द्या