Patent Meaning In Marathi : आपल्या पेकी काही जणांना प्रश्न पडला असेल. पेटंट म्हणजे काय ? पेटंट कसे मिळेल? आजच्या लेखात आपण या प्रश्नांची उत्तरे वाचू.
सर्वात आधी पेटंट म्हणजे काय ते वाचू .तर पेटंट हा एक कायदेशीर अधिकार आहे. या अधिकारांतर्गत एखाद्या व्यक्तीला किंवा संस्थेला त्यांच्या विशिष्ट उत्पादनावर, आविष्कारावर , डिझाईनवर , प्रक्रियावर किंवा सेवेवर मक्तेदारी (एक अधिकार) भेटतो.
पेटंट धारकला त्याच्या पेटंटचा सर्व हक्क प्रदान असतात.इतर कोणतीही व्यक्ती किंवा संस्था त्याच्या पेटंट असलेल्या उत्पादनाचा,आविष्काराचा किंवा इतर गोष्टीचा वापर करू शकत नाही.
वापर करायचं असल्यास त्यांना पेटंट धारकाची परवानगी घेणे बंधनकारक आहे.जर कोणी पेटंट धारकाच्या परवानगीशिवाय त्याचा वापर केला तर तो कायद्याने गुन्हा मानला जातो.
भारतात ऑफिस ऑफ कंट्रोलर जनरल ऑफ पटेंटस,डिझाईनस अँड ट्रेड मार्क्स (CGPDTM) ह्यांच्या मार्फत इंडियन पेटंट दिले जाते.
पेटंट कार्यालयाचे मुख्य कार्यालय हे कोलकाता मध्ये आहे.तसेच त्यांची शाखा कार्यालये चेन्नई, नवी दिल्ली आणि मुंबई येथे आहेत.पेटंट कार्यालय हे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या आदेशानुसार काम करतं.

Patent Meaning In Marathi | Patent Information In Marathi
पेटंट हा एक अधिकारी आहे जो एका व्यक्ति किंवा संस्थेला दिला जातो.हा अधिकार त्यांनी निर्माण केलेल्या नवीन सेवा, तंत्रज्ञान, प्रक्रिया, उत्पादन किंवा डिझाइनसाठी दिला जातो.याला आपण कायदेशीर हक्क देखील बोलू शकतो.
हा अधिकार ज्यांचा कडे असेल त्यांच्या वस्तूचे ,सेवेचे,डिझाईनचे कोणी इतर कॉपी किंवा नक्कल करू शकत नाही. पेटंट यासाठी खूप महत्वाचे आहे.Patent meaning in marathi याची माहिती असणे म्हणूनच गरजेच आहे.
जर पेटंट धारक व्यतिरिक्त कोणतीही व्यक्ती किंवा संस्था समान उत्पादन करत असेल तर ते बेकायदेशीर असतं.पेटंट धारक त्याविरुद्ध तक्रार दाखल करू शकतो.तक्रार दाखल झाल्यावर पेटंट उल्लंघन करणार्यास कायदेशीर कारवाई केली जाते.
जर कोणला पेटंट वस्तूचे किंवा सेवेचा वापर करायचं असेल तर त्याला पेटंट धारकाची परवानगी घ्यावी लागेल. याच बरोबर पेटंट धारकास रॉयल्टी देखील द्यावी लागेल.
पेटंट प्रकार | Types Of Patent In Marathi
पेटंट चे मुख्यता २ प्रकार आहेत. पहिलं म्हणजे उत्पादन पेटंट अनू दूसर प्रक्रिया पेटंट.
उत्पादन पेटंट (Product Patent)
या पेटंट चा अर्थ असा होतो की कोणीही एक प्रकारचे हुबेहूब दिसणारे उत्पादन करू शकत नाही. कोणत्याही दोन उत्पादानाची रचना किंवा डिझाईन सारखी असू शकत नाही.
प्रत्यक उत्पादना मध्ये फरक असला पाहिजे.त्यांच्या नावामद्धे,पॅकिंग मधे ,रांगा मधे ,आकार आणि चवी मध्ये सुद्धा फरक असू शकतो.
आपण बाजरा मधे अनेक प्रकारच्या वस्तु बघतो जसे की कार ,बाइक,टीव्ही,मोबाइल असे अनेक इतर त्यांचा मधे बराच फरक असतो.
प्रत्यक कंपनी कडे आप आपले पेटंट असते,त्यामुळे साहजिकच प्रत्यकाची वस्तु ही वेगळीच असणार. हे सगळं होत ते उत्पादन पेटंट(patent meaning in marathi) मुळे.
प्रक्रिया पेटंट (Process Patent)
हा पेटंट नवीन तंत्रज्ञानाचा संदर्भात आहे.पेटंट कोणत्याही नवीन तंत्रज्ञानावर देखील घेतला जाऊ शकतो.
या पेटंटचा अर्थ असा आहे की कोणतीही व्यक्ति किंवा संस्था इतर दुसऱ्या व्यक्तीचे किंवा संस्थेचे उत्पादन बनवण्याची प्रक्रिया किंवा तंत्रज्ञान वापरू शकत नाही.
या पेटंट मुळे एकाद्या उत्पादन बनवण्याची पद्धत चोरीला जाऊ शकत नाही.
पेटंट कसे मिळते | How To Get Patent In Marathi
प्रत्यक देशाचे पेटंट कार्यालय असतं.आपल्याला ज्या गोष्टी साठी पेटंट हवा आहे,त्याचा अर्ज करावा.अर्ज दिल्यानंतर पेटंट कार्यालय याची तपासणी करेल.
तपासणी मधे तुमचे उत्पादन,तंत्रज्ञान किंवा कल्पना ही नवीन आहे असा निर्णय झाला तर तुम्हाला पेटंट ऑर्डर मिळणार.
पेटंट बद्दल ही महत्वाची माहिती तुम्हाला असणे गरजेची आहे.पेटंट हा फक्त त्याच देशात लागू असतो ज्या देशात तो दिला गेला आहे.
जर अमेरिकेत किंवा इतर कोणत्याही देशातील एखाद्या व्यक्तीने भारतात पेटंट केलेल्या उत्पादनाची किंवा सेवेची नक्कल बनवली तर ते पेटंट उल्लंघन मानले जात नाही.
जर भारतातील पेटंट देणाऱ्या कंपनीला अमेरिका किंवा अन्य कोणत्याही देशात एकाच उत्पादनाची किंवा सेवेचे पेटंट हवे असेल, तर त्याला त्या देशाच्या पेटंट कार्यालयाकडे स्वतंत्र अर्ज करावा लागेल.
तात्पर्य – Patent Information In Marathi
पेटंट असणे नव नवीन शोध लावणाऱ्या शोधकर्त्यांसाठी अतिशय महत्वाचे आहे. पेटंट त्यांच्या अधिकारचे रक्षण करते.
मला आशा आहे की Patent Meaning In Marathi हा लेख तुम्हाला आवडला असेल.या लेखात आपल्याला काही शंका असल्यास किंवा त्यामध्ये काही सुधारणा झाली पाहिजे असे आपल्याला वाटत असल्यास, यासाठी आपण कमेन्ट अथवा ईमेल लिहून आम्हाला सांगू शकता.
आपल्याला हा लेख आवडला असेल किंवा यातून काही नवीन शिकायला मिळाले असेल तर कृपया ही माहिती जास्तीत जास्त इतरांकडे पोहचवा. फेसबुक , ट्विटर आणि इतर सोशल मीडिया साइट्स वर हे शेअर करा.धन्यवाद !!
हे पण वाचा – Vibes Meaning In Marathi