2024 Post office schemes in Marathi | पोस्ट ऑफिस बचत योजना

Post office schemes in Marathi : पोस्ट ऑफिसच्या बचत योजना ह्या केंद्र सरकार च्या सहयाने तयार केल्या जातात.

त्यांचा मुख्य हेतु हा ग्राहकांना जास्तीत जास्त फायदा करून देणे असतो. त्याच अनुषंगाने यातील काही योजनांना भारतीय आयकर कायद्याच्या कलम ८० सी अंतर्गत आयकरात सूट देखील मिळते.

पोस्ट ऑफिस आपल्या ग्राहकांना काही लहान बचत योजनांमध्ये गुंतवणूक करण्याची संधी देत असते. या ठेव योजना सुरक्षित, चांगल्या आणि हमी परताव्यासाठी प्रसिद्ध आहेत.

या बचत योजनांमुळे लोकांना पैशाची बचत करणे सुलभ होते. या ठेव योजनांचा व्याजदर दर तीन महिन्यांनी सरकार ठरवते. या बचत योजनांवरील सध्याच्या व्याजदराबद्दल माहिती जाणून घेऊयात.

Post office schemes in Marathi
Post office schemes in Marathi

Post Office Schemes In Marathi Interest Rates | पोस्ट ऑफिस बचत योजनांवरील व्याज दर

सुरक्षित भविष्यासाठी योग्य ठिकाणी पैसे गुंतवण्याचा विचार जर आपण करत असाल तर पोस्ट ऑफिसच्या योजना फायदेशीर ठरू शकतात.यामध्ये आपण लहान बचतीत मोठा फायदा मिळूवू शकतो.

पोस्ट ऑफिस बचत योजना व्याज दर

योजनाव्याज दर (%)चक्रवाढ व्याज मोजणी
बचत खातेवार्षिक
१ वर्ष मुदत ठेव६.८तिमाही
२ वर्ष मुदत ठेव६.९तिमाही
३ वर्ष मुदत ठेवतिमाही
५ वर्ष मुदत ठेव७.५तिमाही
५ वर्ष रिकरींग ठेव
५.८तिमाही
५ वर्षांची ज्येष्ठ नागरिक बचत योजना८.२तिमाही (सशुल्क)
५ वर्षांचे मासिक उत्पन्न खाते७.४मासिक (सशुल्क)
 ५ वर्षांचे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र७.७वार्षिक
सार्वजनिक भविष्य निधी७.१वार्षिक
किसान विकास पत्र७.५वार्षिक
सुकन्या समृद्धी योजनावार्षिक

पोस्ट ऑफिस बचत खाते | Post office schemes in Marathi

कोणतीही व्यक्ती पोस्ट ऑफिसमध्ये त्यांचे बचत खाते उघडू शकते. हे बँकेत उघडलेल्या बचत खात्यासारखे आहे.

हे खाते पोस्ट ऑफिस मध्ये उघडण्यासाठी तुम्हाला किमान पाचशे रुपये जमा करावे लागतील.सध्या या खात्यावर ४ टक्के दराने व्याज जमा केले जात आहे. त्यानुसार आपले पैसे दुप्पट करण्यास किमान अठरा वर्षे लागतील.

हे खाते पूर्णपणे करपात्र असेल.पोस्ट ऑफिसच्या बचत खात्यात किमान ५० रुपये ठेवणे बंधनकारक आहे.

पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना

ही योजना केवळ गुंतवणूकदारांना मासिक स्वरूपात व्याज देते. या योजनेतील किमान गुंतवणुकीची मर्यादा १००० रुपये आहे.

एका खातेदारसाठी जास्तीत जास्त गुंतवणुकीची मर्यादा ९ लाख रुपये आणि संयुक्त खातेदारसाठी १५ लाख रुपये मर्यादा ठेवण्यात आली आहे. या योजनेचा कालावधी पाच वर्षांचा आहे.

सध्या या योजनेतील व्याज ७.४ टक्के आहे. व्याज वार्षिक आधारावर मोजले जाते.आपले पैसे दुप्पट करण्यास सुमारे दहा वर्षे लागतील.

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पी. पी. एफ) | PPF Information In Marathi

पीपीएफ ही दीर्घ मुदतीची गुंतवणूक योजना आहे.या योजनेत गुंतवणुकीची रक्कम, मिळवलेली व्याज रक्कम आणि मॅच्युरिटी रक्कम या तिन्हीमध्ये आयकरात सूट आहे.

या योजनेचा लॉक-इन कालावधी १५ वर्षांचा आहे, परंतु सात वर्षांनंतर अंशतः पैसे काढू शकतो.

या योजनेतील गुंतवणुकीची किमान गुंतवणूक रक्कम आर्थिक वर्षात ५०० रुपये आणि कमाल गुंतवणुकीची रक्कम एक लाख ५० हजार रुपये आहे. या योजनेवर व्याजदर सध्या वार्षिक ७.१ टक्के आहे.त्यानुसार आपले पैसे दुप्पट करण्यास किमान दहा वर्षे लागतील.

ज्येष्ठ नागरिक बचत योजना | Post office schemes in Marathi

नियमित व्याज उत्पन्न मिळविण्यासाठी ६० वर्ष किंवा त्याहून अधिक वयाचे ज्येष्ठ नागरिक या योजनेत गुंतवणूक करू शकतात.

या योजनेतील किमान गुंतवणुकीची रक्कम १००० रुपये आणि जास्तीत जास्त गुंतवणुकीची रक्कम १५ लाख रुपये आहे. या योजनेत सध्या ग्राहकांना ८.२ टक्के व्याज मिळत आहे.

आपण या योजनेत गुंतवणूक करत असाल तर आपले पैसे दुप्पट करण्यास किमान नऊ वर्षे लागतील.

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र | National Savings Certificate In Marathi

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजनेत पाच वर्षांचा लॉक-इन कालावधी असतो. कलम ८० सी अंतर्गत प्राप्तिकरात सूट देखील उपलब्ध आहे.

या योजनेत किमान गुंतवणूक रक्कम १००० रुपये आहे. तसेच जास्तीत जास्त गुंतवणुकीला मर्यादा नाही .

ही योजना सध्या वार्षिक ७.७ टक्के व्याजदर देत आहे.त्यानुसार जर आपण दहा लाख रुपये जमा केले असतील, तर पाच वर्षानंतर तुम्हाला अंदाजे १५ लाख रुपये मिळतील.जर तुम्हाला गुंतवणुकीची रक्कम दुप्पट करायची असेल तर तुम्हाला किमान दहा वर्षे प्रतीक्षा करावी लागेल.

पोस्ट ऑफिस आरडी | Post Office RD Scheme In Marathi

नियमित अंतराने काही प्रमाणात गुंतवणूक करण्यासाठी ही योजना आखली गेली आहे. ग्राहक पोस्ट ऑफिसमध्ये पाच वर्षांचे आरडी खाते उघडू शकतात.

या योजनेत गुंतवणुकीची किमान मर्यादा १०० रुपये मासिक आणि जास्तीत जास्त गुंतवणूक रकमेला कोणतीही मर्यादा नाही. या योजनेवर सध्या वार्षिक ६.५ टक्के व्याज मिळते. या योजनेत आपले पैसे दुप्पट करण्यास किमान अकरा वर्षे लागतील.

किसान विकास पत्र | Kisan Vikas Patra In Marathi (KVP)

किसान विकास पत्र या योजनेत गुंतवणूक करून गुंतवणूकदार त्यांच्या गुंतवणुकीची रक्कम दुप्पट करू शकतात. या योजनेत व्याजदर आणि गुंतवणुकीच्या रकमेवरील परतावा तिमाही आधारावर निश्चित केला जातो.

या योजनेत किमान गुंतवणुकीची मर्यादा १००० रुपये आहे. जास्तीत जास्त गुंतवणुकीची कोणतीही मर्यादा नाही. या योजनेचा व्याजदर सध्या ७.५ टक्के आहे. व्याज वार्षिक आधारावर मोजले जाते. त्यानुसार आपली गुंतवणुकीची रक्कम ११५ महिन्यांत दुप्पट होईल.

सुकन्या समृद्धी योजना | Sukanya Samriddhi Yojana Information In Marathi

या योजनेत गुंतवणुकीची रक्कम, मिळवलेली व्याज रक्कम आणि मॅच्युरिटी रक्कम या तिन्हीमध्ये आयकरात सूट मिळते.

पालक किंवा कायदेशीर पालक त्यांच्या सुकन्या समृद्धी योजनेत जास्तीत जास्त दोन मुलींसाठी खाते उघडू शकतात.

या योजनेत आपण किमान २५० रुपये आणि जास्तीत जास्त एक लाख ५० हजार रुपये आर्थिक वर्षात जमा करू शकतो. मुलींसाठी तयार केलेली सुकन्या समृद्धी योजना सध्या ८ टक्के व्याज देते.त्यानुसार गुंतवणुकीच्या दुप्पट रकमेसाठी किमान नऊ वर्षे लागतील.या योजनेचा लाभ दहा वर्षाखालील मुली घेऊ शकतात.

पोस्ट ऑफिसची टाइम डिपॉजिट | Post office schemes in Marathi

पोस्ट ऑफिस देखील बँक एफडीप्रमाणेच ग्राहकांकडून टाइम डिपॉजिटची सुविधा देते. हे एक, दोन, तीन किंवा पाच वर्षांसाठी असते.

या योजनेतील किमान गुंतवणुकीची रक्कम १००० रुपये आहे आणि जास्तीत जास्त गुंतवणुकीवर मर्यादा नाही.

एका वर्षाच्या मुदत ठेवींवर ६.९ टक्के व्याज मिळणार आहे. तर, दोन वर्षे, तीन वर्षे आणि पाच वर्षांच्या मुदत ठेवींवर अनुक्रमे ७ टक्के, ७ टक्के आणि ७.५ टक्के व्याज मिळणार आहे. योजनेतील व्याज तिमाही आधारावर मोजले जाते, परंतु परतावा वार्षिक आधारावर दिला जातो.

जर आपण पाच वर्षांची मर्यादा निवडली तर आपले पैसे सुमारे ९.५ वर्षांमध्ये दुप्पट होतील. जर आपण तीन वर्षांसाठी गुंतवणूक केली तर १०.२ वर्षात आपले पैसे दुप्पट होतील.

हे पण वाचा : Mutual Funds in Marathi

पोस्ट ऑफिस बचत योजनेचे फायदे आणि वैशिष्ट्ये

 • पोस्ट ऑफिस बचत योजनेत पैसे गुंतवून लोकांमध्ये बचत करण्याच्या भावनेला चालना देणे.
 • पैशाची बचत केल्यास गुंतवणूकदारांची आर्थिक परिस्थिती सुधारेल.
 • पोस्ट ऑफिस सेव्हिंग स्कीममध्ये अर्ज करणे खूप सोपे आहे.
 • पोस्ट ऑफिस बचत योजना मध्ये अर्ज करण्यासाठी खूप कमी कागदपत्रांची आवश्यकता लागते.
 • पोस्ट ऑफिस बचत योजना ही एक दीर्घ मुदतीची गुंतवणूक योजना आहे.
 • पोस्ट ऑफिस बचत योजनेचे व्याज ४ ते ९ टक्के पर्यंत आहे.
 • पोस्ट ऑफिस बचत योजना ही एक  सरकारी योजना आहे जी पूर्णपणे जोखीम मुक्त आहे.
 • पोस्ट ऑफिस बचत योजनेत गुंतवणूक केल्यास आयकर कायद्याच्या कलम ८० सी अंतर्गत गुंतवणूकदारास करात सूट मिळते.
 • सर्व वर्गासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना ठेवल्या आहेत.

पोस्ट ऑफिस बचत योजना २०२मध्ये अर्ज करण्याची प्रक्रिया

 • प्रथम आपल्याला जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जावे.
 • तिथे तुम्हाला ज्या कोणत्या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तो फॉर्म पोस्ट ऑफिसमधून घ्यावा.
 • फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती जसे नाव, पत्ता इत्यादी काळजीपूर्वक भरावी.
 • सर्व आवश्यक कागदपत्रे जोडावी.
 • भरलेला फॉर्म व आवश्यक कागदपत्रे पोस्ट ऑफिसमध्ये परत जमा करावा.

आशा प्रकारे तुमची अर्ज प्रक्रिया असेल.

हे पण वाचा : Mudra Loan In Marathi

पोस्ट ऑफिस बचत योजना २०२

सरकारने लागू केलेल्या या योजना अनेकांसाठी फायद्याच्या आहेत. मात्र या योजनांचा लाभ घेण्या आधी तुम्ही तज्ज्ञांकडून माहिती नक्की घ्या.

आम्हाला आशा आहे की Post office schemes in Marathi हा लेख तुम्हाला आवडला असेल.या लेखात पोस्ट ऑफिस बचत योजना बद्दल आपल्याला काही शंका असल्यास किंवा त्यामध्ये काही सुधारणा झाली पाहिजे असे आपल्याला वाटत असल्यास, यासाठी आपण कमेन्ट लिहून आम्हाला सांगू शकता.

आपल्याला हा लेख आवडला असेल किंवा यातून काही नवीन शिकायला मिळाले असेल तर कृपया ही माहिती जास्तीत जास्त इतरांपर्यन्त पोहचवा. फेसबुक,ट्विटर आणि इतर सोशल मीडिया साइट्स वर हे शेअर करा.धन्यवाद !!

Post office schemes in Marathi : संपूर्ण तपशील इथे पहा

हे पण वाचा : शेअर बाजारातून पैसे कसे कमवायचे ? यासाठी Share market in marathi वाचा.

1 thought on “2024 Post office schemes in Marathi | पोस्ट ऑफिस बचत योजना”

प्रतिक्रिया द्या