प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना 2023 | Pradhan Mantri kaushalya Vikas Yojana (PMKVY) In Marathi

भारतीय तरुण पिढीला कौशल्य प्रशिक्षण मिळावे या साठी भारत सरकारने प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना 2023 ,Pradhan Mantri Kaushalya Vikas Yojana (PMKVY) In Marathi ही योजना सुरू केली आहे.

ही योजना जुलै २०१५ मध्ये सुरु करण्यात आली होती.तरुणांना विविध कामांमध्ये कौशल्य प्रशिक्षण देऊन त्यांना सक्षम बनवणे हे या योजनेचे मुख्य उद्दीष्ट आहे.कौशल्य विकास व उद्योग मंत्रालय राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाच्या (NSDC) यांच्या माध्यमातून या योजनेची आंमलबजावणी करण्यात येते.

या मंत्रालयाचे मुख्य कार्य म्हणजे तरुणांसाठी संधी निर्माण करणे,जेणेकरून या संधींमध्ये ते रोजगारासाठी उपयुक्त कौशल्य प्राप्त करून आपले जीवन सुधारतील तसेच दुसऱ्यांच्या आयुष्यात देखील हे तरुण आमुलाग्र बदल घडवून आणू शकतील.

या योजनेंतर्गत तरुणांना विविध तांत्रिक क्षेत्रात प्रशिक्षण दिले जाईल. या योजने बद्दल सखोल माहिती जाणून घेऊयात.

Pradhan Mantri Kaushal Vikas Yojana In Marathi

अनुक्रमणिका

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना 2023

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना प्रमुख उद्देश | Pradhan Mantri Kaushalya Vikas Yojana (PMKVY) Objectives In Marathi

देशातील युवा पिढी साठी प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना 2023 सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत, तरुणांना रोजगाराच्या दृष्टीने कौशल्ये प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या योजनेचे काही उद्देश खालील प्रमाणे.

  • या योजनेअंतर्गत, देशातील किमान २४ लाख तरुणांना विविध तांत्रिक क्षेत्रात प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
  • आपल्या देशातील युवा पिढी ही अत्यंत प्रतिभावंत आहे.बऱ्याच तरूणांकडे विशेष गुण,कल्पना ,विचार आहेत. तरुणांच्या या प्रतिभेला,गुणांना व कल्पना शकतील वाव देना हे पण या योजनेचं एक मुख्य उद्देश आहे.तसेच तरुणांना आपली प्रतिभा राष्ट्रीय पातळीवर प्रदर्शित करता यावी या साठी सुद्धा ही योजना काम करणार आहे.
  • जेव्हा तरुण या योजनेअंतर्गत,कोणत्याही क्षेत्रातील विशेष कौशल्य शिकून प्राप्त करतो तेव्हा त्याला सर्टीफिकेट दिलं जातं. हे सर्टीफिकेट संपूर्ण देशभरासाठी वैध असतं. या सर्टीफिकेटतेचा उपयोग त्यांना खासगी किंवा सरकारी क्षेत्रात नोकरी मिळून देण्यास फायदेशीर ठरेल.
  • या योजनेत उच्च दर्जाचे प्रशिक्षित शिक्षकांवर जास्त लक्ष देण्यात येणार आहे. जेणेकरून तरुणांना मिळणारे कौशल्ये प्रशिक्षण हे सर्वोत्तम असेल.

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना विशेषता | Pradhan Mantri Kaushalya Vikas Yojana (PMKVY) Features In Marathi

पंतप्रधान कौशल्य विकास योजनेची ठळक वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत.

  • या योजनेंतर्गत दिले जाणारे सर्व प्रकारचे प्रशिक्षण हे अत्यंत गांभीर्याने दिले जाईल. वेगवेगळ्या क्षेत्रात प्रशिक्षण घेण्यासाठी वेगवेगळ्या पात्रता निकष असतील.म्हणून, कोणत्याही तांत्रिक क्षेत्रात प्रशिक्षण घेण्यापूर्वी पात्रता तपासली जाणार आहे.
  • सर्व प्रशिक्षण कार्यक्रम सेक्टर स्किल कौन्सिल (SSC)घेतील. या परिषदेअंतर्गत प्रशिक्षण घेणारे सर्व लोक एनओएस आणि क्यूपीएसच्या नियमांचे पालन करतील.या परिषदेअंतर्गत प्रशिक्षण घेणारे सर्व लोक NOS आणि QPS च्या नियमांचे पालन करतील.
  • या योजनेंतर्गत भारत सरकारच्या विविध योजनांमधील आवश्यक कामगारांच्या दृष्टीने प्रशिक्षण दिले जाईल.प्रशिक्षणानंतर तरुणांना मेक इन इंडिया योजना , डिजिटल इंडिया प्रकल्प , स्वच्छ भारत अभियान इत्यादी विविध सरकारी योजनांतर्गत नोकर्‍या दिल्या जातील .
  • प्रशिक्षण संपल्यानंतर प्रशिक्षित तरूणांना ८००० रुपये आणि कोर्स पूर्ण प्रमाणपत्र दिले जाईल. हे प्रमाणपत्र सर्वत्र वैध असेल, परंतु ते मिळविण्यासाठी प्रशिक्षणाच्या शेवटी परीक्षा घ्यावी लागेल.
  • या योजनेचे एक वैशिष्ट्य म्हणजे या योजनेचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर सचिन तेंडुलकर आहेत . सचिन तेंडुलकर भारतीय तरुणांसाठी एक आदर्श आहे. त्यामुळे तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी महान क्रिकेटपटू सचिनची निवड करण्यात आली आहे.

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना पात्रता निकष | PMKVY Eligibility Criteria In Marathi

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना पात्रता निकष खालील प्रमाणे

  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे. त्यामुळे भारतातील कोणत्याही राज्यातील नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
  • या योजनेअंतर्गत अर्जदारास सुरू करण्यात आलेल्या कोणत्याही एका स्कीम मधे एक वर्षासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. अर्जदारास त्याच्याद्वारे निवडलेल्या तांत्रिक क्षेत्राविषयी माहिती असणे आवश्यक आहे.
  • या व्यतिरिक्त, अर्जदाराने उर्वरित एका स्कीम मधे नोंदणी करणे देखील आवश्यक आहे.
  • एकदा प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर शासनाने ठरविल्याप्रमाणे बक्षीस दिले जाईल. सर्व पुरस्कार एकाच वेळी दिले जातील.

हे पण वाचा : Mudra Yojana In Marathi

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना नोंदणी | Pradhan Mantri Kaushalya Vikas Yojana Apply Online In Marathi

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी नाव नोंदणी करणे आवश्यक आहे.

  • अर्जदारला कौशल विकास योजनेच्या https://www.pmkvyofficial.org/ या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज भरावा लागेल. अर्ज भरताना अर्जदाराला नाव, पत्ता, ईमेल इत्यादी माहिती भरावे लागेल. आधार कार्ड, व्होटर आयडी किंवा ड्रायव्हिंग लायसन्स इ. सारख्या निवासी पत्त्याचा पुरावा आपल्याकडे असणे आवश्यक आहे. सर्व आवश्यक माहिती काळजीपूर्वक भरावी.
  • एकदा फॉर्म भरला की अर्जदाराला त्याच्या आवडीचे तांत्रिक क्षेत्र निवडता येईल. वेबसाइटवर ३५ ते ४० तांत्रिक क्षेत्रे देण्यात आली आहेत, त्यापैकी आपल्याला आपल्या आवडीचे क्षेत्र निवडायचे आहे. अर्जदारला आपल्या आवडत्या तांत्रिक क्षेत्र व्यतिरिक्त आणखी एक तांत्रिक क्षेत्र निवडणे आवश्यक आहे.
  • ही सर्व माहिती भरल्यानंतर अर्जदाराला प्रशिक्षण केंद्र निवडावे लागेल. आपल्या निवासस्थानाजवळील प्रशिक्षण केंद्र निवडा. त्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करुन फॉर्म सबमिट करा.

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना प्रक्रिया | Pradhan Mantri Kaushalya Vikas Yojana Process In Marathi

या योजनेअंतर्गत प्रमाणपत्र व बक्षीस रक्कम मिळवण्याकरीत खालील प्रक्रिया पूर्ण करावी लागेल

  • ज्या विद्यार्थ्यानी योजेनेअंतर्गत नाव नोंदणी केली आहे ,त्यांना मान्यताप्राप्त प्रशिक्षण केंद्राअंतर्गत कोर्स करण्याची संधी दिली जाईल.
  • या योजनेत जी सरकारी संस्था कार्यरत असेल,ती या विद्यार्थ्याची माहिती एसडीएमएस (SDMS)कडे पाठवेल.
  • या प्रक्रियेनंतर विद्यार्थ्याची ट्रेनिंग प्रशिक्षण केंद्रा वर सुरू करण्यात येईल. प्रशिक्षण केंद्रातील शिक्षक युवकांना प्रत्यक टप्प्यात मदत करण्यास तत्पर असतील.
  • प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या कौशल्याच्या मूल्यांकनसह त्यांच्या कार्यक्षेत्रातील सरकारी विभागाकडून अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र मिळेल.
  • हे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर एनएसडीसी (NSDC)तर्फे कोणत्याही सरकारी एजन्सीद्वारे विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात रोख बक्षीस रक्कम जमा करण्यात येईल.

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना कोर्सेस | Pradhan Mantri Kaushalya Vikas Yojana Courses In Marathi

सर्वांची आवड ही वेगळी असते. त्याच प्रमाणे त्यांना वेग वेगळे तांत्रिक क्षेत्र आवडते. हाच विचार घेऊन सरकारने या योजनेंतर्गत विविध अभ्यासक्रमांचा समावेश केला आहे.

या योजनेंतर्गत आतापर्यंत ३3 विविध क्षेत्रांची निवड करण्यात आली आहे. या विविध क्षेत्रांची या योजनेंतर्गत प्रशिक्षण दिले जाणार आहे. विविध क्षेत्र खाली दिल्या प्रमाणे.

क्रमांक अभ्यासक्रम /कोर्स
आयटी
मीडिया आणि मनोरंजन
3सौंदर्य आणि निरोगीपणा
लॉजिस्टिक
शेती
बीएफएसआय (BFSI)
इलेक्ट्रॉनिक्स आणि हार्डवेअर
हस्तकला
जीवशास्त्र
१०लाइन पाईप
११ग्रीन जॉब
१२पर्यटन
१३गृह सजावट
१४अन्न प्रक्रिया
१५आरोग्य सेवा
१६उर्जा उद्योग
१७वस्त्र व हातमाग
१८मोटर गाडी
१९भांडवली वस्तू
२०बांधकाम
२१लोह आणि स्टील संबंधित
२२खनिजे
२३किरकोळ
२४दूरसंचार
२५घरगुती कामगार
२६फर्निचर आणि फिटिंग्ज
२७पेंट आणि कोटिंग
२८लेदर
२९रबर
३०पायाभूत सुविधा बांधकाम
३१रत्ने आणि दागिने
३२सुरक्षा सेवा
३३खेळ

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना फी | Pradhan Mantri Kaushalya Vikas Yojana Fees In Marathi

पंतप्रधान कौशल्य विकास योजनेच्या मदतीने सरकार युवकांना सक्षम बनवून त्यांचे भविष्य उज्ज्वल बनवू इच्छित आहे. पैशांच्या अभावामुळे अनेक युवकांना आपला इच्छित मार्ग अवलंबता येत नाही आणि यामुळे त्यांना रोजगार मिळू शकत नाही.

बरीच खाजगी प्रशिक्षण केंद्रे असली तरी त्यांची फी इतकी जास्त आहे की गरीब तरुणांना तिथे जाणे अवघड आहे. या सर्व बाबी लक्षात घेऊन सरकारने या प्रशिक्षण योजनेसाठी कोणत्याही प्रकारची फी ठेवली नाही.

या योजनेंतर्गत सर्व प्रशिक्षण पूर्णपणे मोफत दिले जाणार आहे . यामुळे बर्‍याच दुर्बल घटकांमधील तरुणांना मोठ्या प्रमाणात फायदा होईल आणि ते स्वत: ला सक्षम करण्यात यशशवी होतील.


प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना प्रशिक्षण कालावधी | Pradhan Mantri Kaushalya Vikas Yojana Training Period In Marathi

पंतप्रधान कौशल्य विकास योजनेंतर्गत अनेक लहान व महत्त्वपूर्ण अभ्यासक्रमांचा समावेश करण्यात आला आहे. जसे अभ्यासक्रम हे विविध आहेत तसेच त्यांना पूर्ण करण्यासाठी लागणार हा कालावधी देखील वेगळा असेल .

म्हणूनच, या योजनेंतर्गतही सरकारने वेगवेगळ्या अभ्यासक्रमांसाठी वेगवेगळ्या कालावधी निश्चित केल्या आहेत. साधारणत: असे अनेक अभ्यासक्रम आहेत ज्यांचा कालावधी ३ ते ६ महिने ठेवण्यात आला आहे .

याशिवाय काही कठीण अभ्यासक्रमांसाठी जास्तीत जास्त १ वर्षाची मुदत निश्चित केली गेली आहे. १ वर्षापेक्षा जास्त कालावधीचा कोणताही कोर्स समाविष्ट केलेला नाही.

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना 2023 विषयी संपूर्ण मराठी माहिती

आम्हाला आशा आहे की प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना काय आहे Pradhan Mantri Kaushalya Vikas Yojana In Marathi हा लेख तुम्हाला आवडला असेल.

या लेखात आपल्याला काही शंका असल्यास किंवा त्यामध्ये काही सुधारणा झाली पाहिजे असे आपल्याला वाटत असल्यास, यासाठी आपण ईमेल लिहून आम्हाला सांगू शकता.

आपल्याला हा लेख PMKVY In Marathi आवडला असेल किंवा काही शिकायला मिळाले असेल तर कृपया ही माहिती जास्तीत जास्त इतरांकडे पोहचवा. फेसबुक , ट्विटर आणि इतर सोशल मीडिया साइट्स वर हे शेअर करा. धन्यवाद !!

प्रतिक्रिया द्या