Quinoa In Marathi : आरोग्यदायी फायदे, तोटे आणि पोषण

Quinoa in Marathi म्हणजे काय? Quinoa (उच्चार कीनवा) हा नक्की काय प्रकार आहे? ह्याची जर तुम्ही माहिती शोधात असाल तर आजचा लेख हा खास तुमचासाठी आहे.

आज आपल्यापेकी बहुतेक लोकं ही डायट कॉनशिअस आहेत.मला खात्री आहे आपण अश्याच लोकांकडून क्विनोआ बद्दल ऐकलं असेल.

क्विनोआ हे नक्की काय आहे? त्याचे फायदे व तोटे कोणते ? व इतर महत्वपूर्ण माहिती मी आज तुम्हाला या लेखात देणार आहे.

quinoa in marathi
Quinoa in marathi

Quinoa Meaning in Marathi

क्विनोआ (उच्चार कीनवा) हा एक धान्याचा प्रकार आहे.दक्षिण अमेरिकेतील हे मुख्य धान्य (grain) आहे.परंतु आज quinoa plant ची शेती सर्वत्र केली जाते.

बरीच लोकं विचारतात quinoa meaning in Marathi,त्याचे Marathi name काय आहे? जसे आधी सांगितले की हे धान्य आपल्याकडे परदेशातून आले आहे. त्यामुळे याला भारतीय नाव नाही.

काहीजण Quinoa ला राजगीरा समजतात,पण तसे नाही दोघे समान दिसतात पण ते वेगळे आहेत. राजगीराला English मध्ये Amarant असे म्हणतात.

क्विनोआ बद्दल थोडक्यात

 • असे म्हणतात क्विनोआ हे मानवाने घेतलेले पहिले पीक होते.क्विनोआ मध्ये प्रथिने (protein), फायबर, जीवनसत्त्वे (vitamin), खनिजे (minerals) आणि अँटिऑक्सिडंट्स हे भरपूर प्रमाणात असतात.
 • क्विनोआ मध्ये आहारातील फायबर, लोह, मॅग्नेशियम, मॅंगनीज, फॉस्फरस, पोटॅशियम, तांबे, जस्त, कॅल्शियम, फोलेट, व्हिटॅमिन B6, रिबोफ्लेविन, नियासिन, पॅन्टोथेनिक ऍसिड, थायामिन, बायोटिन आणि व्हिटॅमिन E हे भरपूर प्रमाणात असतात.
 • क्विनोआ ग्लूटेन मुक्त आहे. हे तांदूळ, पास्ता, कुसकुस, बल्गुर गहू आणि इतर धान्यांसाठी पर्याय म्हणून वापरले जाऊ शकते.
 • Kinova हे संपूर्ण प्रोटीन food आहे.म्हणजेच आपल्या पोषणासाठी आवश्यक असलेले सर्व नऊ अमीनो ऍसिड क्विनोआमध्ये असतात.
 • क्विनोआ हा ऊर्जेचा चांगला स्रोत आहे. एक कप शिजवलेल्या क्विनोआमध्ये सुमारे २०० कॅलरीज असतात.
 • क्विनोआ मध्ये चरबी (fats) कमी असते. एक कप शिजवलेल्या क्विनोआमध्ये फक्त २ ग्रॅम चरबी (fats) असते.

Types Of Quinoas | Quinoa Seeds in Marathi

क्विनोआचे तीन मुख्य प्रकार आहेत – पांढरा, लाल आणि काळा.

प्रत्येक प्रकाराची स्वतःची विशिष्ट चव आणि पोत (texture) असते, त्याप्रमाणे ते वेगवेगळ्या प्रकारच्या पदार्थांसाठी वापरले जातात.

types of quinoa marathi
Types of quinoa marathi
 1. पांढरा क्विनोआ – पांढरा क्विनोआ हा लोकप्रिय प्रकार आहे. हा तुम्हाला सर्वत्र भेटेल. पांढरा क्विनोआ मऊ आणि हलका असतो.हा प्रकार चवीला गोड असल्यामुळे आपण गोड व चवदार पदार्थां पांढरा क्विनोआ पासून बनवू शकता.
 2. लाल क्विनोआ – लाल क्विनोआ हा दूसरा लोकप्रिय प्रकार आहे. हा क्विनोआ पांढरा क्विनोआ पेक्षा कमी गोड असतो. हा प्रकार कमी गोड असल्यामुळे आपण सॅलड्स आणि फ्राईज लाल क्विनोआ पासून बनवू शकता.
 3. काळा क्विनोआ – काळा क्विनोआचा वापर खूप कमी केला जातो.हा क्विनोआ मऊ नसतो. याची चव काहीशी कडवट असते. काळा क्विनोआचा उपयोग तांदूळ किंवा इतर गोड धान्ये असलेल्या पाककृतींमध्ये पर्याय म्हणून योग्य ठरू शकतो.

क्विनोआचे तीनही प्रकार प्रथिने, फायबर आणि लोह यासह पोषक तत्वांनी भरलेले असतात.kinova मध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि कॅल्शियमचा हे देखील चांगला प्रमाणात उपलब्ध आहे.

क्विनोआ हे शाकाहारी आणि vegan लोकांसाठी एक परिपूर्ण अन्न आहे, कारण त्यात आपल्या शरीराला आवश्यक असलेले सर्व अमीनो ऍसिड मिळतात.

मग, तुम्ही कोणत्या प्रकारचे क्विनोआ घेणार? हे खरं तर आपल्या वैयक्तिक प्राधान्यांवर अवलंबून आहे.

जर तुम्हाला हलका, मऊ क्विनोआ हवा असेल तर पांढरा क्विनोआ घ्या. तुम्हाला कमी गोड क्विनोआ हवा असल्यास, लाल क्विनोआ निवडा. आणि जर तुम्हाला किंचित कडू चव असलेला क्विनोआ हवा असेल तर, ब्लॅक क्विनोआ ही तुमची सर्वोत्तम निवड ठरेल.

Nutritional Value in Quinoa | क्विनोआ पोषण तत्व

क्विनोआला Superfood म्हणतात.याचं कारण ह्यात असलेले पौष्टिक घटक आहेत.

मला वाटत नाही असे कोणते एक धन्य किंवा फळ असेल,ज्यात सगळे जीवनावश्यक पोषकतत्व असतात.तुम्हाला जर असं कोणतं फळ व धान्य माहिती असेल तर मला नक्की comment मध्ये सांगा.

100g क्विनोआ मध्ये किती पोषण मूल्य आहे? यावर एक नजर टाका.

पोषण तत्वप्रमाण
Calories120
Water72%
Protein4.4 grams
Carbs21.3 grams
Sugar0.9 grams
Fiber2.8 grams
Fat1.9 grams
Calcium17 mg
Iron1.49 mg
Magnesium64 mg
Phosphorus152 mg
Potassium172 mg
Sodium7 mg
Zinc1.09 mg
Copper0.192 mg
Manganese0.631 mg
Vitamin B-60.123 mg
Folate42 µg
Fatty acids, total saturated0.231 g
Fatty acids, total monounsaturated0.528 g
Fatty acids, total polyunsaturated1.08 g
Aspartic acid0.353 g
Glutamic acid0.58 g
Source – USDA

Benefits Of Quinoa In Marathi | क्विनोआचे आरोग्य फायदे

आज बाजारात सर्वात ट्रेंडी पदार्थांपैकी एक म्हणजे क्विनोआ आहे. हे “Superfood” केवळ स्वादिष्टच नाही तर त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे देखील आहेत.

तुम्ही देखील तुमच्या आहारात क्विनोआ समाविष्ट का करावा ? हे जाणून घ्या.

शरीराची दुरुस्ती व स्नायू मजबूत करणे

क्विनोआ हे संपूर्ण प्रोटीन आहे. याचा अर्थ असा की त्यामध्ये तुमच्या शरीराला योग्यरित्या कार्य करण्यासाठी आवश्यक असलेले सर्व अमीनो ऍसिड असतात.

एमिनो अॅसिड हे प्रथिने तयार करतात. प्रथिनेचा संबंध थेट आपल्या शरीराच्या तंदुरुषतीशी येतो.त्यामुळे क्विनोआ तुमच्या शरीराची दुरुस्ती आणि स्नायू मजबूत करण्यात मदत करू शकतात.

पचनक्रिया सुधारते

क्विनोआ मध्ये फायबरचे प्रमाण देखील चांगले असते.फायबरमुळे तुमची पचनक्रिया योग्यरित्या कार्यरत राहण्यास मदत होते.सोबतच कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास देखील मदत होते.

रोगप्रतिकारकशक्ति वाढवण्यासाठी

क्विनोआ मध्ये मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि मॅंगनीजसह इतर जीवनसत्त्वे आणि खनिजे मुबलक प्रमाणात आहेत. निरोगी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी हे पोषक घटक आवश्यक आहेत.या व्यतिरिक्त हे पोषक तत्व हाडांचे आरोग्य सुधारण्यास देखील मदत करू शकतात.

पेशींच्या आरोग्यासाठी

क्विनोआमध्ये भरपूर मात्रेत अँटिऑक्सिडेंट असतात. हे अँटिऑक्सिडंट्स तुमच्या पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण करण्यास मदत करतात.तसेच ते काही गंभीर आजारांचा धोका कमी करण्यास देखील मदत करतात.

अशक्तपणा कमी होतो

क्विनोआ मध्ये लोह मुबलक प्रमाणात असते. लोह शरीरातील रक्ताची कमतरता वेगाने पूर्ण करते. ज्यांना अ‍ॅनिमियाची समस्या आहे. अशा लोकांनी क्विनोआचे नियमित सेवन करावे. त्यामुळे अशक्तपणा कमी होतो.

ग्लूटेन-मुक्त धान्य

क्विनोआ हे ग्लूटेन-मुक्त धान्य आहे.हे उदर रोग किंवा ज्याना ग्लूटेन सहन होत नाही अश्या लोकांसाठी क्विनोआ हा एक उत्तम पौष्टिक धान्याचा पर्याय आहे.

जर तुम्ही तुमच्या आहारात पौष्टिक आणि रुचकर पदार्थ शोधत असाल तर क्विनोआ हा एक उत्तम पर्याय आहे.

क्विनोआचा उपमा, खिचडी, सॅलड किंवा इतर मस्त रेसिपी बनवा व खाऊन बघा.तुम्हाला त्याची चव आणि आरोग्य फायदे हे नक्कीच आवडतील !!

How To Store Quinoa For Long Time | क्विनोआ दीर्घकाळ कसे ठेवावे

क्विनोआ बरीच दिवस टिकून ताजे राहतील याची खात्री करण्यासाठी तुम्ही काही गोष्टी नक्की करू शकता.

 • सर्वात प्रथम,क्विनोआ हे हवाबंद कंटेनरमध्ये ठेवा. असे केल्याने क्विनोआ कोरडे पडत नाही.
 • क्विनोआ अधिक काळ टिकण्यासाठी तुम्ही ते फ्रीज किंवा फ्रीजरमध्ये देखील ठेवू शकता.
 • ठेवलेले क्विनोआ हे ताजे आहेत की नाही हे नियमितपणे तपासत रहा.
 • ठेवलेले क्विनोआ जर खूप कोरडे दिसू लागले असतील किंवा वास येत असेल तर कदाचित क्विनोआ खराब झाले असे समजावे.

Side Effects of Quinoa | क्विनोआचे तोटे

क्विनोआ हे आज एक लोकप्रिय सुपरफूड आहे.परंतु त्याचे काही दुष्परिणा देखील आहेत. क्विनोआचे काही सामान्य दुष्परिणाम पाहू.

गॅस्ट्रोइंटेस्टाइनल अस्वस्थ

क्विनोआ मध्ये फायबर मुबलक प्रमाणात आढळते.त्यामुळे काही लोकांसाठी यामुळे अतिसार, सूज येणे आणि गॅससह इतर गॅस्ट्रोइंटेस्टाइनल अस्वस्थता येऊ शकते. तुम्हाला जर ह्या समस्या असल्यास, तुम्ही क्विनोआचे सेवन मर्यादित करू शकता.

ऍलर्जी होऊ शकते

क्विनोआ मध्ये काही ऍलर्जीक पदार्थ असतात. जर क्विनोआ सेवन करून आपल्याला ऍलर्जी जाणवू लागली तर तुम्ही क्विनोआचे सेवन मर्यादित करा.

अतिसेवण टाळा

कोणत्याही गोष्टीचे अतिसेवण हे धोकादायक असते.ते इथेही लागू होते.म्हणून क्विनोआचे सेवन आवश्यक तितकेच करा.

जर आपण आपल्या आहारात क्विनोआचा समावेश करत असाल तर आपण त्याच्या संभाव्य दुष्परिणामांबद्दल जागरूक असणे महत्वाचे आहे.

क्विनोआ तुमच्यासाठी योग्य आहे की नाही? याची खात्री करण्यासाठी तुमच्या डॉक्टरांशी किंवा नोंदणीकृत आहारतज्ञांशी नक्की बोलून घ्या.

हेही वाचाAvocado Fruit in Marathi

तात्पर्य – Quinoa in Marathi

क्विनोआ हे प्रथिने आणि इतर पोषक तत्व मुबलक असणारे एक उत्तम धान्य आहे.ज्यामुळे ते निरोगी आहारासाठी नक्कीच एक योग्य पर्याय आहे.

मला खात्री आहे की Quinoa meaning in Marathi म्हणजे काय? या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला मिळाले असेल.

मला आशा आहे की हा लेख निरोगी जीवनशैली ठेवण्यासाठी तुम्हाला खूप फायदेशीर ठरेल. जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर कृपया शक्य तितका शेअर करा.

या लेखात आपल्याला काही शंका असल्यास किंवा त्यामध्ये काही सुधारणा झाली पाहिजे असे आपल्याला वाटत असल्यास, यासाठी आपण आम्हाला कमेन्ट किंवा ईमेल लिहून सांगू शकता.

हेही वाचाGrapefruit In Marathi

Quinoa बद्दल सतत विचारले जाणारे प्रश्न (FAQ’s)

What is the Marathi name of Quinoa seeds?

क्विनोआ धान्य आपल्याकडे परदेशातून आले आहे. त्यामुळे याला भारतीय किंवा मराठी नाव नाही.

क्विनोआला मराठी मध्ये राजगीरा म्हणतात का?

नाही.दोघे समान दिसतात पण ते वेगळे आहेत.

क्विनोआचे सेवन कसे करता येईल?

क्विनोआचे सेवन आपण उपमा,खिचडी व सॅलड बनवून करू शकतो. अजून इतरही रेसिपी बनवू शकतो.

क्विनोआ कुठे खरीदी करता येईल?

हल्ली क्विनोआ सर्वत्र उपलब्ध आहे.मोठे किराणा दुकान,सुपेरमार्केट,मॉल किंवा ऑनलाइन तुम्ही खरीदी करू शकतात.

टीप : वरील सर्व बाबी मराठी डिजिटल केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून मराठी डिजिटल कोणताही दावा करत नाही.त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

1 thought on “Quinoa In Marathi : आरोग्यदायी फायदे, तोटे आणि पोषण”

प्रतिक्रिया द्या