Ramraksha stotra lyrics in Marathi with meaning : आज आपण जाणून घेणार आहोत रामरक्षा स्तोत्र चे संपूर्ण मराठी अर्थ अगदी साध्या आणि सोप्या भाषेत.
आपल्यापेकी बऱ्याच जणांनी रामरक्षा स्तोत्र अनुराधा पौडवाल यांच्या सुमधुर आवाजात ऐकले असेल.या स्तोत्र मध्ये श्री रामाची स्तुति करण्यात आली आहे. तसेच हे स्तोत्र पठण केल्याने कोणते लाभ होतात हे सुद्धा सांगितले गेले आहे.
रामरक्षा स्तोत्र हे बुधकौशिक ऋषींनी रचले आहे.Ramraksha stotra हे बुधकौशिक ऋषींना कसे सुचले आणि त्यांनी ते कसे लिहिले,या मागे एक पौराणिक मान्यता आहे.ही मान्यता देखील रामरक्षा स्तोत्र मध्ये सांगण्यात आली आहे.
राम नामाचे महत्व तसेच राम रक्षा पठण केल्याचे फायदे (ram raksha stotra benefits in marathi) हे तुम्हाला रामरक्षा स्तोत्र मराठी अर्थ वाचून नक्कीच लक्षात येईल.

अनुक्रमणिका
Ram Raksha stotra meaning in marathi | रामरक्षा स्तोत्र मराठी अर्थ
Rram raksha stotra in marathi हे अतिशय प्रभावी असे स्तोत्र आहे.रामरक्षा स्तोत्रचे नियमित पठण केल्याने आपले मन शांत राहते. जीवन निरोगी,समृद्ध व संपन्न होते.
आशा या प्रभावी रामरक्षा स्तोत्राचा आपल्या मायबोलीत म्हणजेच मराठीत अर्थ जाणून घेऊयात.
।। श्रीगणेशायनमः ।। अस्य श्रीरामरक्षास्तोत्रमंत्रस्य। बुधकौशिकऋषिः। श्रीसीतारामचन्द्रो देवता। अनुष्टुप् छन्दः। सीताशक्तिः। श्रीमद्हनुमान कीलकम्। श्रीरामचन्द्रप्रीत्यर्थे जपे विनियोगः।।
अर्थ : श्री गणेशाला नमस्कार असो. श्री रामरक्षा स्तोत्र हा बुधकौशिक ऋषिने लिहिलेला मंत्र आहे. या मंत्राची सीता आणि रामचंद्र ह्या देवता आहेत.
या मंत्राची रचना अनुष्टुप छंदा मध्ये केलेली आहे.या मंत्राची शक्ती कोण तर सीता.या मंत्राचा बीज मंत्र जो आहे तो हनुमान आहे.अशा या मंत्र जपाचा विनियोग मी प्रभू रामचंद्रांच्या उपासनेसाठी करत आहे.
।। अथ ध्यानम् ।।
अर्थ : आता राम रक्षा म्हणण्यापूर्वी आपल्याला प्रभू रामचंद्रांचे ध्यान करायचं आहे.पण हे ध्यान करण्यासाठी प्रभू रामचंद्रांची मूर्ती आपल्या डोळ्यासमोर कशी असावी त्याचे वर्णन इथे केलेले आहे.
ध्यायेदाजानुबाहुं धृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थं।
पीतं वासो वसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नम्॥
वामाङ्कारूढसीतामुखकमलमिललोचनं नीरदाभं।
नानालङ्कारदीप्तं दधतमुरुजटामण्डनं रामचंद्रम् ॥
अर्थ : ज्याचे हात गुडघ्यापर्यंत लांब आहे.ज्याने आपल्या हातामध्ये धनुष्यबान धारण केलेला आहे.शिवाय तो बध्यपद्मासना मध्ये बसलेला आहे.
ज्याने पिवळे वस्त्र म्हणजे पितांबर परिधान केलेला आहे म्हणजे नेसलेला आहे.ज्याचे डोळे ताज्या कमळाच्या पाकळी प्रमाणे सुंदर आहे आणि त्यामुळे तो प्रसन्न दिसत आहे.
प्रभु रामचंद्रांचा डाव्या मांडीवर सीता बसलेली आहे.प्रभू रामचंद्र सीतेच्या मुखाकडे एकटक बघत आहे.प्रभू रामचंद्रांची कांती ही पाण्याने भरलेल्या मेघाप्रमाणे शामळ वरणाची दिसत आहे.
अनेक प्रकारच्या अलंकारांनी प्रभू रामचंद्र सुशोभित आहे.त्यांनी मोठे जटा मंडळ धारण केलेले आहे.
।। इति ध्यानम् ।।
अर्थ : अशा या प्रभू रामचंद्रांचे ध्यान,राम रक्षा स्तोत्र म्हणण्यापूर्वी आपण करायचे आहे.
चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम्।
एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम् ॥१॥
अर्थ : श्री रामरायच म्हणजेच प्रभू रामचंद्रचे चरित्र हे शंभर कोटी श्लोक इतकं विस्तृत आहे.
या चरित्रातिल एकेक अक्षर सुद्धा मनुष्याच्या मोठ मोठ्या पापांचा नाश करतं म्हणजे इतकं सामर्थ त्याच्या एकेक अक्षरांमध्ये आहे.
ध्यात्वा नीलोत्पलश्यामं रामं राजीवलोचनम्।
जानकीलक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितम् ॥२॥
अर्थ : नीलकमला प्रमाणे म्हणजे निळ्या रंगाच्या कमळाप्रमाणे ज्याचा वर्ण शामळ आहे.कमळासारखे दीर्घ म्हणजे कमळाच्या पाकळी प्रमाणे दीर्घ आणि प्रफुल्ल असे ज्याचे डोळे आहेत.
ज्याच्या समोर भाऱ्या म्हणजे त्यांची पत्नी सीता आणि बंधू म्हणजे भाऊ लक्ष्मणा आहे.जटांच्या मुकूटामुळे जो शोभून दिसत आहे.
सासितूणधनुर्बाणपाणिं नक्तं चरांतकम्।
स्वलीलया जगत् त्रातुमाविर्भूतमजं विभुम् ॥३॥
अर्थ : ज्याच्या एका हाती तलवार,पाटीला बाणांचा भाता.दुसरे हातामध्ये धनुष्यबाण आहे.त्या धनुष्य बाणणे तो रक्षसांचा नाश करणारा आहे.
खरोखर परमेश्वर हा जन्म रहित आहे आणि तो व्यापकही आहे. तरीसुद्धा जगाचे रक्षण करण्याकरता प्रभू रामचंद्रांनी लिलेने हा मनुष्य रूपी अवतार घेतलेला आहे.
रामरक्षां पठेत्प्राज्ञ: पापघ्नीं सर्वकामदाम्।
शिरो मे राघव: पातु भालं दशरथात्मज: ॥४॥
अर्थ : अशा या प्रभुचे ध्यान करून पापांचा नाश करणाऱ्या आणि आपल्या सर्व इच्छा पुरविणाऱ्य या राम रक्षा स्तोत्र चे सुज्ञ माणसाने नियमित पठण करावं.
सुविख्यात आशा रघू राजाच्या वंशात जन्मलेला राम जो आहे.हा राम माझ्या मस्तकाचे रक्षण करो. दशरथाचा पुत्र हा जो रामा आहे हा माझ्या कपाळाचे रक्षण करो.
कौसल्येयो दृशौ पातु विश्वामित्रप्रिय: श्रुती।
घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रिवत्सल: ॥५॥
अर्थ : कौसल्या राणीचा लाडका पुत्र राम हा माझ्या दोन्ही डोळ्यांचे रक्षण करो.विश्वामित्र ऋषींचा आवडता शिष्य जो आहे राम तो माझ्या दोन्ही कानांचे रक्षण करो.
मख म्हणजे यज्ञ.यज्ञाचा रक्षण करणारा अर्थात विश्वामित्रांनी प्रभू रामचंद्रांना आपल्या यज्ञाचे रक्षण करण्यासाठीच नेलेलं होतं त्यामुळे विश्वामित्रांच्या यज्ञाचा रक्षण करणारा जो राम तो माझ्या नाकाचं रक्षण करो.बंधु लक्ष्मणावर प्रेम करणारा राम माझ्या मुखाचे रक्षण करो.
जिव्हां विद्यानिधि: पातु कण्ठं भरतवंदित:।
स्कन्धौ दिव्यायुध: पातु भुजौ भग्नेशकार्मुक: ॥६॥
अर्थ : सर्व विद्या धारण करणारा राम, माझ्या जिभेचे रक्षण करो. भरताने ज्याला वंदन केलेले आहे. असा राम माझा कंठाचा रक्षण करो.
दिव्य अशी शस्त्र ज्याच्याजवळ आहे आसा राम माझा दोन्ही खांद्यांच रक्षण करो.सीता स्वयंवराच्या वेळेला शिवधनुष्यचा श्री रामाने लिलिया भंग केलेला होता तेव्हा आशा शिवधनुष्यचा भंग करनारा राम माझ्या दोन्ही बाहूंचे रक्षण करो.
करौ सीतापति: पातु हृदयं जामदग्न्यजित्।
मध्यं पातु खरध्वंसी नाभिं जाम्बवदाश्रय: ॥७॥
अर्थ : सीतेचा पती राम जो आहे हा माझ्या हातांचे रक्षण करो.परशूरामाला जिंकणारा राम माझ्या हृदयाचे रक्षण करो.
खर नावाच्या राक्षसाचा वध ज्याने केला असा राम माझ्या शरीराच्या मध्यभागाचं रक्षण करो.जाम्बवनाला आश्रय देणारा राम माझ्या नाभिचा म्हणजेच बेंबीचं रक्षण करो.
सुग्रीवेश: कटी पातु सक्थिनी हनुमत्प्रभु:।
ऊरु रघूत्तम: पातु रक्ष:कुलविनाशकृत् ॥८॥
अर्थ : सुग्रीवाचा स्वामी राम माझ्या कमरेचं रक्षण करो.हनुमंताचा प्रभू राम माझ्या दोन्ही जांघांचा रक्षण करो.
राक्षस कुळाचा विनाश करणारा आणि रघु कलांमध्ये श्रेष्ठ असलेला राम माझ्या दोन्ही मांड्यांचे रक्षण करो.
जानुनी सेतुकृत्पातु जंघे दशमुखांतक:।
पादौ बिभीषणश्रीद: पातु रामोSखिलं वपु: ॥९॥
अर्थ : समुद्रावर सेतू बांधणारा जो राम आहे तो माझ्या दोन्ही गुडघ्यांचे रक्षण करो.आपल्याला माहिती रावणा हा दहा तोंडांचा होता या दशमुखी रावणाचा नाश करणारा राम माझ्या दोन्ही पायांच्या पोटऱ्यांच रक्षण करो.
बिभीषणाला राजलक्ष्मी देणारा राम, राजलक्ष्मी म्हणजे सगळे लंकेचे राज्य आहे.हे रावण वधानंतर रामाने बिभीषणाला दिलेले आहे.हे राजा पद म्हणजे राजलक्ष्मी देणारा राम माझ्या दोन्ही पाउलांचे रक्षण करो.
सर्वांना आनंद देणारा आनंदकंद त्याला म्हटलेला आहे.असा जो राम आहे हा प्रभू श्रीराम माझ्या सर्व शरीराचे रक्षण करो.
संपूर्ण शरीराचे रक्षण करण्याची जबाबदारी आपण प्रभू श्री रामचंद्रावर सोपवून टाकलेली आहे.आता या राम रक्षा स्तोत्रची किंबहुना रामरक्षा मंत्राची फलश्रुती सांगितलेली आहे म्हणजे हे राम रक्षा स्तोत्र किंवा हा मंत्र आपण नियमित म्हटल्यामुळे आपल्याला कोणते फायदे होतात किंवा ते का म्हणावं हे खाली सांगितलेला आहे.
एतां रामबलोपेतां रक्षां य: सुकृती पठेत्।
स चिरायु: सुखी पुत्री विजयी विनयी भवेत् ॥१०॥
अर्थ : याप्रमाणे म्हणजे आधी सांगितल्याप्रमाणे रामाच्या सामर्थ्याने युक्त असलेल्या या रामरक्षेचे जो मनुष्य पठण करेल त्याचे काय बरं चांगलं होईल?
तो दीर्घायुष्य होईल.तो सुखी होईल.तो पुत्रवानही होईल आणि सर्व कार्यात विजय मिळवणारा होईल.म्हणजे सर्व कार्यामध्ये तो यशस्वी होईल आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एवढे सगळे मिळून सुद्धा तो विनय संपन्न राहील म्हणजे तो नम्र राहील.
पाताल-भूतल-व्योम-चारिणश्छद्मचारिण:।
न द्र्ष्टुमपि शक्तास्ते रक्षितं रामनामभि: ॥११॥
अर्थ : या राम नामाने म्हणजे बघा जेव्हा आपल्या शरीराच्या प्रत्येक अवयवाचे रक्षण करावं असा आपण म्हटलेल आहे.तेव्हा प्रत्येक अवयवाचे रक्षण करण्यासाठी आपण रामाची वेगवेगळी नावं घेतलेली आहे.
या सगळ्या राम नामाने रक्षण ज्याचे केलेले आहे.अशा मनुष्याला पाताळ,भूमी किंवा आकाश कुठेही संचार करत असताना कपटी लोक डोळ्यांनीही पाहू शकणार नाही.म्हणजे इतकं प्रभू रामचंद्र आपले रक्षण करतील.
रामेति रामभद्रेति रामचन्द्रेति वा स्मरन्।
नरो न लिप्यते पापै: भुक्तिं मुक्तिं च विंदति ॥१२॥
अर्थ : राम,रामभद्र किंवा रामचंद्र अशा विविध नावांनी श्रीरामाचे स्मरण करणारा माणूस केव्हाही पापांनी लिप्त होत नाही.म्हणजे त्याला पापाची बाधा होत नाही.
पाप त्याच्याजवळ फिरकत सुद्धा नाही. त्याला अनेक सुखांचा उपभोग घेता येतो आणि शेवटी तो मोक्ष पदाला जातो.
जगज्जेत्रैकमन्त्रेण रामनाम्नाऽभिरक्षितम्।
य: कण्ठे धारयेत्तस्य करस्था: सर्वसिद्धय: ॥१३॥
अर्थ : सर्व जगाला जिंकणारा मुख्यमंत्र जो आहे तो राम नाम आहे.त्या मंत्राने अभिरक्षित म्हणजे मंतरलेला पदार्थ म्हणजे आपण गळ्यामध्ये किंवा हातामध्ये जो ताईत बांधतो तो.
तो गळ्यात ज्याने धारण केलेला आहे.त्याला सर्व सिद्धी सहजपणे प्राप्त होतात.म्हणजे त्याची सर्व कामही यशस्वी होतात.
वज्रपञ्जरनामेदं यो रामकवचं स्मरेत्।
अव्याहताज्ञ: सर्वत्र लभते जयमंगलम् ॥१४॥
अर्थ : इंद्राचे वज्र हे आपल्याला माहिती आहे.या इंद्राच्या वज्राचा पिंजरा जो आहे हा अत्यंत संरक्षक असतो.त्याप्रमाणे हे राम रक्षा स्तोत्र हे राम कवच आहे.त्यामुळे यालाही वज्रपंज्र असे या ठिकाणी म्हटले आहे.
त्यामुळे याच म्हणजे जो राम नामाचं स्मरण करतो त्याची आज्ञा किंवा त्याचा शब्द हा सर्वत्र मानला जातो.त्याला सर्व ठिकाणी जय मिळतो.त्याचं नेहमीच कल्याण होतं.
आदिष्टवान् यथा स्वप्ने रामरक्षामिमां हर:।
तथा लिखितवान् प्रात: प्रबुद्धो बुधकौशिक: ॥१५॥
अर्थ : अशी ही रामरक्षा किंवा असा हा राम मंत्र भगवान शंकरांनी बुधकौशिक ऋषींनी स्वप्नात येऊन सांगितला.
सकाळी उठल्यानंतर बुधकौशिक ऋषींनी तो जसाच्या तसा लिहून काढला.आपण किती भाग्यवान आहोत की हा मंत्र बुधकौशिक ऋषींनी लिहिल्यामुळे आज आपल्याला तो म्हणता येतो.
आराम: कल्पवृक्षाणां विराम: सकलापदाम्।
अभिरामस्त्रिलोकानां राम: श्रीमान् स न: प्रभु: ॥१६॥
अर्थ : आता याच्या मध्ये रामाची स्तुती केलेली आहे.राम कसा आहे ते सांगितलेल आहे.तर श्री राम हा कल्पवृक्षांचा जणू सुंदर बगीचा आहे.एक कल्पवृक्ष आपल्याला दिसता दिसता पुरेवाट होते इथे तर राम म्हणजे कल्पवृक्षांचा जणू सुंदर बगीचा आहे असे या ठिकाणी म्हटले आहे.
शिवाय हा रामचंद्र कसा आहे.सर्व आपत्ती म्हणजे संकट घालविणारा म्हणजे संकटांचा नाश करणारा आहे.त्रयलोकयामधे म्हणजे तिन्ही लोकामध्ये अतिशय सुंदर असलेला असा हा आमचा प्रभुराम आहे.
तरुणौ रूपसंपन्नौ सुकुमारौ महाबलौ। पुण्डरीकविशालाक्षौ चीरकृष्णाजिनांबरौ ॥१७॥
अर्थ : हा राम कसा आहे.तो वयाने तरुण आहे.रूपसंपन्न म्हणजे रूपवान तर आहेच शिवाय तो अतिशय कोमल आहे.महाबली आहे म्हणजे अतिशय बलवान आहे म्हणूनच तर तो राक्षसांचा नाश करू शकला.
कमळ पत्राप्रमाणे त्याचे नेत्र हे विस्तृत आहे.त्याने वल्कले आणि कृष्णाजीन परिधान केलेली आहेत.हीच त्याची वस्त्रे आहेत.
फलमूलशिनौ दान्तौ तापसौ ब्रह्मचारिणौ। पुत्रौ दशरथस्यैतौ भ्रातरौ रामलक्ष्मणौ ॥१८॥ शरण्यौ सर्वसत्वानां श्रेष्ठौ सर्वधनुष्मताम्। रक्ष:कुलनिहन्तारौ त्रायेतां नो रघूत्तमौ ॥१९॥
अर्थ : हा राम काय भक्षण करतो? तर कंदमुळे आणि फळे भक्षण करणारा आहे.तो जितेंद्रिय आहे म्हणजे त्याने सगळ्या इंद्रियांवर विजय मिळवलेला आहे.तो तपस्वी आहे.ब्रह्मचारी आहे.सर्व प्राण्यांचे रक्षण करणारे आहे.
सर्व धनुर्धर मध्ये श्रेष्ठ असलेले.राक्षसांच्या कुळांचा संहार करणारे.रघुकुळातील प्रमुख असे हे दशरथाचे दोन पुत्र म्हणजे हे दोन बंधू राम आणि लक्ष्मण हे आमचे रक्षण करो.
आत्तसज्जधनुषा विषुस्पृशा वक्षया शुगनिषङ्ग सङिगनौ।
रक्षणाय मम रामलक्ष्मणावग्रत: पथि सदैव गच्छताम् ॥२०॥
अर्थ : धनुष्यबाण घेऊन नेहमी सज्ज असणारे म्हणजे ज्यांच्या हातामध्ये नेहमी धनुष्यबाण घेतलेला आहे.ज्यांचा बाणांचा भाता हा अक्षय आहे म्हणजे त्यांच्या भातातील बाण कधीही संपत नाही.
असे हे राम लक्ष्मण माझ्या रक्षणाकरता माझ्या मार्गामध्ये नेहमी माझ्या पुढे चालतील.कशासाठी, तर माझ्यावर जे संकट येणार आहे त्या संकटांचा निर्दालन किंवा पारिपत्य ते आधी करतील म्हणजे माझा मार्ग पुढे मला मोकळा होईल.
संनद्ध: कवची खड्गी चापबाणधरो युवा। गच्छन् मनोरथान नश्च रामः पातु सलक्ष्मणः ॥२१॥
अर्थ : निरंतर सज्ज असलेला.अंगात कवच घातलेला आणि हाती खड्ग आणि धनुष्यबाण धारण करणारा आमचा मूर्तिमंत मनोरथ असलेला असा हा लक्ष्मणासह गमन करणारा राम आमचं रक्षण करो.
रामो दाशरथि: शूरो लक्ष्मणानुचरो बली।
काकुत्स्थ: पुरुष: पूर्ण: कौसल्येयो रघूत्तम: ॥२२॥
अर्थ : असा हा आनंद देणारा दशरथाचा पुत्र शूर लक्ष्मण ज्याचा सेवक आहे.असा राम बलवान आणि कपुत सकल उत्पन्न ,महापुरुष ,पूर्णब्रम्ह कौसल्येचा पुत्र रघुकुळामध्ये श्रेष्ठ आहे.
वेदान्तवेद्यो यज्ञेश: पुराणपुरुषोत्तम:। जानकीवल्लभ: श्रीमानप्रमेयपराक्रम: ॥२३॥ इत्येतानि जपेन्नित्यं मद्भक्त: श्रद्धयान्वित:। अश्वमेधाधिकं पुण्यं सम्प्राप्नोति न संशय: ॥२४॥
अर्थ : ज्याला वेदांत शास्त्रांचे ज्ञान आहे असा.शिवाय यज्ञांचा स्वामी.पुराणांमध्ये पुरुषोत्तम.जानकीचा प्रिय जानकी म्हणजे सीता या सीतेला प्रिय असलेला वैभवसंपन्न अतुल पराक्रमी म्हणजे ज्याच्या पराक्रमाची कोणाशीही तुलना करता येत नाही.
तो अतुल पराक्रमी अशा या विविध नावांचा श्रद्धापूर्वक नेहमी जप करणाऱ्या माझ्या भक्ताला अश्वमेध यज्ञाचा पुण्याहून अधिक पुण्य लागतं यात संशय नाही. म्हणजे बघा अश्वमेध यज्ञ करण्याची आपल्याला गरज नाही.
आपण जर भक्तिपूर्वक हे स्तोत्र किंवा ह्या मंत्राचा जप केला तर आपल्याला अश्वमेध यज्ञाच्या पुण्याहून अधिक पुण्य लागतं हे निसंशय सांगितलेला आहे.
रामं दूर्वादलश्यामं पद्माक्षं पीतवाससम्।
स्तुवन्ति नामभिर्दिव्यैर्न ते संसारिणो नर: ॥२५॥
अर्थ : श्याम वर्ण हा या स्तोत्रात विविध ठिकाणी आलेला आहे.पण प्रत्येक ठिकाणी तो शाम रंग हा वेगळा आहे.कधी तो आकाशातील मेघाप्रमाणे श्याम आहे.कधी तो दुर्वेचा पानाप्रमाणे श्याम आहे.
कमल नेत्र म्हणजे कमलाप्रमाणे ज्याचे नेत्र आहे.पितांबर म्हणजे पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेला आहे.अशा या रामाची विविध नावांनी जे मनुष्य स्तुती करतात ते जन्ममरणाच्या संसारातून सुटता.म्हणजेच त्यांना मोक्ष मिळतो.
रामं लक्ष्मणपूर्वजं रघुवरं सीतापतिं सुंदरं ।
काकुत्स्थं करुणार्णवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकम्।
राजेन्द्रं सत्यसंधं दशरथतनयं श्यामलं शांतमूर्तिं ।
वंदे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावणारिम् ॥२६॥
अर्थ : लक्ष्मणाचा मोठा भाऊ रघुकुला मध्ये श्रेष्ठ आहे.सीतेचा पती सुंदर आहे.तो दयेचा सागर आहे.त्याच्याकडे सगळे सद्गुण एकवटलेले आहेत.त्याला ब्राह्मण प्रिय आहेत.तो धार्मिक वृत्तीचा आहे.
तो सावळ्या वर्णाचा आहे.तो शांत मूर्ती आहे.तो लोकांना आनंद देणारा आहे.रघुकुळाला तीळका प्रमाणे शोभणारा आहे.
रावणाचा शत्रू असा जो राघवन म्हणजे रघुकुळामधे जन्माला आलेला असा हा श्रीराम त्याला मी वंदन करतो.
रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे।
रघुनाथाय नाथाय सीताया: पतये नम: ॥२७॥
अर्थ : राम, रामभद्र, रामचंद्र, वेदास, रघुनाथ, नाथ अशी ज्याची नवे आहेत.त्या सीता पतीला म्हणजे सीतेच्या पतीला अर्थात रामचंद्रांना माझा नमस्कार असो.
श्रीराम राम रघुनंदन राम राम।
श्रीराम राम भरताग्रज राम राम।
श्रीराम राम रणकर्कश राम राम।
श्रीराम राम शरणं भव राम राम ॥२८॥
अर्थ : हे रघुकुळनंदना श्रीरामा.हे भरताच्या ज्येष्ठ बंधु श्रीरामा.हे रणांगणात कठोरपणा करणाऱ्या श्री राम.हे राम तू आमचा रक्षण करता हो.
श्रीरामचन्द्रचरणौ मनसा स्मरामि। श्रीरामचन्द्रचरणौ वचसा गृणामि। श्रीरामचन्द्रचरणौ शिरसा नमामि। श्रीरामचन्द्रचरणौ शरणं प्रपद्ये ॥२९॥
अर्थ : मी श्रीरामचंद्राच्या चरणांचे मनाने स्मरण करतो.मी श्रीरामचंद्राच्या चरणांचे वाणीने स्तवन करतो.मी श्रीरामचंद्राच्या चरणांना मस्तकाने नमन करतो.
मी श्रीरामचंद्राच्या चरणी शरण येत आहे.अन्य कुणालाही मी शरण नाही त्या प्रभू रामचंद्रांच्या पुढे मी शरण आहे.
माता रामो मत्पिता रामचंद्र:।
स्वामी रामो मत्सखा रामचंद्र:।
सर्वस्वं मे रामचन्द्रो दयालुर्नान्यं।
जाने नैव जाने न जाने ॥३०॥
अर्थ : माझी माता माझा पिता हा रामचंद्रच चाहे.माझा स्वामी इतकच काय माझा मित्र देखील हा रामचंद्रच आहे.माझं सर्वस्व हा दयाळू रामचंद्रच आहे.
मी इतर कोणालाही जाणत नाही.मुळी सुद्धा जाणत नाही.असे या ठिकाणी पुन्हा पुन्हा सांगितलेला आहे.
दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे च जनकात्मजा।
पुरतो मारुतिर्यस्य तं वंदे रघुनंदनम् ॥३१॥
अर्थ : ज्याच्या उजव्या बाजूला लक्ष्मण आहे.डाव्या बाजूला जनक कन्या म्हणजे जनक राजाची कन्या सीतादेवी आहे.
आपण कोणत्याही रामाच्या मंदिरात गेलो.तरी आपल्याला या मूर्ती अशाच दिसतात की रामाच्या उजव्या बाजूला लक्ष्मण आणि डाव्या बाजूला सीतामाई.
ह्या सगळ्यांच्या पुढे असलेला जो मारुती असतो तो उभा असतो कारण तो दास आहे.आशा त्या रघुनंदनाला मी वंदन करतो.
लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथम्।
कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचंद्र शरणं प्रपद्ये ॥३२॥
अर्थ : लोकांना आनंद देणारा.रणांगणात धैर्य धरणारा.कमळाप्रमाणे नेत्र असलेला.रघु वंशाचा अधिपती आणि दयेची मूर्ती,करूणाचा सागर असा श्री रामचंद्र त्याला मी शरण आलो आहे.
मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम्।
वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ॥३३॥
अर्थ : आता या ठिकाणी प्रभुरामचंद्रांचा सेवक जो मारुती आहे त्याचीही स्तुती या ठिकाणी केलेली आहे.तो कसा आहे ?तर मनाप्रमाणे गमन करणारा.वाऱ्याप्रमाणे वेगवान.आपली इंद्रिये जिंकून आधीन न ठेवणारा.
बुद्धिवंतांन मध्ये श्रेष्ठ आणि वानर समुदायाचा मुख्य.असा हा जो वायूचा पुत्र श्री रामाचा दूत.जो हनुमान आहे त्याला देखील मी शरण आलो आहे.
कूजंतं रामरामेति मधुरं मधुराक्षरम्।
आरुह्य कविताशाखां वन्दे वाल्मीकिकोकिलम् ॥३४॥
अर्थ : आता या ठिकाणी वाल्मिकी ऋषींना देखील वंदन केलेला आहे.कवितेच्या फांदीवर बसून रामराम अशा गोड गोड अक्षरांच मधुर गुंजन करणाऱ्या वाल्मिकी रुपी कोकिळाला मी वंदन करतो.
आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदाम्।
लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् ॥३५॥
अर्थ : आपत्तीचा म्हणजे संकटांचा नाश करणारा शिवाय सर्व संपत्ती देणारा.लोकांना आनंद देणारा असा जो श्री राम आहे त्याला मी पुन्हा पुन्हा नमस्कार करतो.
भर्जनं भवबीजानामर्जनं सुखसंपदाम्।
तर्जनं यमदूतानां रामरामेति गर्जनम् ॥३६॥
अर्थ : राम राम अशी राम नामाची गर्जना ही संसाराची बीजे भरजरा करणारी आहे म्हणजे भाजून टाकणारी आहे.सुख संपत्ती प्राप्त करून देणारी आहे.
यमाच्या दूतांना तर्जन म्हणजे भय देणारी आहे.अशी राम नामाचे महत्त्व आपल्याला या ठिकाणी पुन्हा पुन्हा सांगितलेल आहे.
रामो राजमणि: सदा विजयते रामं रमेशं भजे।
रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नम:।
रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहम्।
रामे चित्तलय: सदा भवतु मे भो राम मामुद्धर ॥३७॥
अर्थ : राजश्रेष्ठ राम नेहमीच विजय पावतो.त्या रमापती या ठिकाणी रमा म्हणजे सीतापती श्री रामाला मी भजतो.
रामाने राक्षसांची सेना मारली त्या रामाला माझा नमस्कार असो.मला रामहून दुसरा कुणीही श्रेष्ठ वाटत नाही.मी रामाचा दास आहे रामाचा दास म्हणून घेण्यात मला कृतार्थता वाटते.
मी धन्य होतो.माझे चित्त नेहमी रामाच्या ठिकाणी जाऊन पोहोचते.माझं मन नेहमी तुझ्या चरणी लागो म्हणून हे रामा तू माझा उद्धार कर.
राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे।
सहस्रनाम तत्तुल्यं रामनाम वरानने॥३८॥
अर्थ : आता या ठिकाणी शंकर पार्वतीला सांगत आहेत.हे सुबोधने राम-राम राम-राम अशा नामोच्चाराणे मी मनाला आनंद देणाऱ्या श्रीरामाच्या ठिकाणी रममाण होतो.श्रीरामाचे नाम हे विष्णूच्या सहस्रनामाशी बरोबरी करणार आहे.
॥ इति श्रीबुधकौशिकविरचितं श्रीरामरक्षास्तोत्रं संपूर्णम्॥
अर्थ : याप्रमाणे बुधकौशिक ऋषींनी रचलेले हे राम रक्षा स्तोत्र या ठिकाणी समाप्त झाले.
॥ श्री सीतारामचंद्रार्पणमस्तु॥
अर्थ : हे स्तोत्र श्री रामचंद्रांच्या चरणी अर्पण असो.
हे पण वाचा : Hanuman Chalisa Meaning In Marathi
Ram Raksha Stotra Benefits In Marathi | रामरक्षा स्तोत्राचे फायदे
श्री रामरक्षा स्तोत्र हे रामाची स्तुती करणारे स्तोत्र आहे.श्रीरामांचे संरक्षण मिळावे,यासाठी हे स्तोत्र प्रार्थना म्हणून म्हटले जाते.मनाला शांती देणाऱ्या, सकारात्मक वातावरण तयार करणाऱ्या आणि संरक्षण करणाऱ्या या स्तोत्राचे पठण दररोज करावे, असे म्हटले जाते.
- रामरक्षा स्तोत्राच्या पठणामुळे व्यक्तीचे सर्व प्रकारच्या संकटांपासून रक्षण होते.
- रामरक्षा स्तोत्राचे पठण केल्याने व्यक्ति निर्भय होतो.
- रामरक्षा नियमित पठण केल्याने दुःख दूर होते.
- जो दररोज रामरक्षाचे पठण करतो त्याला दीर्घायुष्य, सुख, संतती, विजय आणि नम्रता प्राप्त होते.
- रामरक्षा स्तोत्राच्या पठणामुळे मंगळाचा अशुभ प्रभाव संपतो.त्याच्या शुभ प्रभावामुळे व्यक्तीभोवती एक संरक्षक कवच तयार होते, जे सर्व प्रकारच्या संकटांपासून संरक्षण करते.
- असे म्हणतात की रामरक्षा स्तोत्राच्या पठणाने भगवान रामासह पवनपुत्र हनुमान देखील प्रसन्न होतात.
Ramraksha Sotra In Marathi PDF | रामरक्षा स्तोत्र मराठी PDF
रामरक्षा स्तोत्र पठण करण्याचे अनेक फायदे आहे.म्हणूनच आपण देखील ह्याचे नियमित पठण करायला हवे.
जर आपल्याला रामरक्षा स्तोत्र मराठी pdf किंवा ramraksha stotra in marathi pdf हवी असेल,तर आपण खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून free download करू शकता.
Ramraksha Stotra Lyrics In Marathi With Meaning
मला आशा आहे Ram raksha stotra meaning in marathi हा लेख तुम्हाला आवडला असेल.आवडला असल्यास त्याचे सर्व श्रेय श्रीराम चरणी अर्पण.व यात काही चुका असल्यास त्या मात्र निसंशय माझ्या.
या लेखात रामरक्षा स्तोत्र मराठी अर्थ या मध्ये आपल्याला काही शंका असल्यास किंवा त्यामध्ये काही सुधारणा झाली पाहिजे असे आपल्याला वाटत असल्यास, यासाठी आपण आम्हाला कमेन्ट किंवा ईमेल लिहून सांगू शकता.
यातून काही नवीन शिकायला मिळाले असेल तर कृपया ही माहिती जास्तीत जास्त इतरांपर्यन्त पोहचवा.फेसबुक,ट्विटर आणि इतर सोशल मीडिया साइट्स वर हे शेअर करा.धन्यवाद
हे पण वाचा :
Thank you 🙏
Now I am connected to god shriram
My guru my friend my god one and only shriram
Jai shri ram 🙏
खूप सुंदर भावार्थ दिलेला आहे. मला वाचून अत्यंत छान वाटले. लहानपणापासून पाठ असूनही प्रत्येक ओळी चा अर्थ पूर्णपणे माहित न्हवता. रामचंद्रांची स्तुती आहे ह्यात एवढे च माहित होते.आता हे स्तोत्र संपूर्ण अर्थासह म्हंटले जातील. तुमच्या ह्या विशेष कामगिरी साठी मनापासून आभार व शुभेच्छा !!
मनापासून धन्यवाद निलम ताई.