Software Engineering Information In Marathi | सॉफ्टवेअर इंजीनीरिंग म्हणजे काय

Software Engineering Information In Marathi : आजच्या काळात, तंत्रज्ञानाचा वापर खूप वाढला आहे.आज प्रत्येकाला लॅपटॉप, संगणक, अँड्रॉइड मोबाईल बद्दल माहिती आहे.अनेक विद्यार्थ्यांना तांत्रिक अभियांत्रिकी (Technical Engineering) मध्ये आपले करिअर करायचे आहे.आपल्याकडे अनेक प्रकारचे अभियांत्रिकी(Engineering)अभ्यासक्रम आहेत.त्यापैकी एक सॉफ्टवेअर अभियांत्रिकी(software engineering in marathi) हा आहे.

जर तुम्हाला संगणक किंवा तंत्रज्ञानात रस असेल किंवा सॉफ्टवेअर अभियांत्रिकी(software engineering) क्षेत्रात करिअर करायचे असेल तर तुम्ही योग्य लेख वाचत आहात.येथे मी तुम्हाला software engineering information in marathi मध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे.

बरेच विद्यार्थी सॉफ्टवेअर इंजिनिअर बनू इच्छित आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे सॉफ्टवेअर कक्षेत्रातले उज्ज्वल भविष्य.संगणक, मोबाईल, स्मार्टवॉचे व इतर सर्व स्मार्ट इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स हे सगळं सॉफ्टवेअर च्या मदतीने कार्य करतात.

या सर्व गोष्टींचा आताच्या काळात वापर आणि नवनवीन तंत्रज्ञानाचा शोध पाहता सॉफ्टवेअर अभियंत्यांची मागणी खूपच वाढली आहे.वाढत्या मागणी मुळे संधि आणि पगार देखील वाढले आहेत.

सॉफ्टवेअर इंजीनीरिंग म्हणजे काय ? सॉफ्टवेअर इंजीनियर कसे बनावे ? तसेच सॉफ्टवेअर इंजीनीरिंग बद्दल इतर माहिती जाणून घेण्यासाठी software engineering information in marathi हा लेख संपूर्ण वाचा.

software engineering information in marathi
software engineering information in marathi

सॉफ्टवेअर इंजीनीरिंग म्हणजे काय ? | Software Engineering Information In Marathi

सॉफ्टवेअर इंजीनीरिंग ही इंजीनीरिंग मधली एक शाखा (Branch) आहे. या इंजीनीरिंग अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या सॉफ्टवेअरचे डिझायनिंग, उपयोजन (deployment), देखभाल (maintenance) व चाचणी (testing) कशी करायची ते शिकवले जाते.

सॉफ्टवेअर किंवा कम्प्युटर प्रोग्राम बनवण्यासाठी वेग वेगळ्या कम्प्युटर भाषेचा (computer languages) वापर केला जातो. या भाषा सॉफ्टवेअर इंजीनीरिंग (software engineering information in marathi) अभ्यासक्रमात शिकवल्या जातात.

कम्प्युटर भाषा | Computer Languages In marathi

  • Java
  • C Language
  • C++ Language
  • SQL
  • MATLAB
  • Python
  • (.)Net
  • Ruby
  • PHP
  • Binary

या संगणक भाषांद्वारे कोडिंग (प्रोग्रामिंग) करून सॉफ्टवेअर तयार केले जाते.या संगणक भाषांशिवाय कोणतेही सॉफ्टवेअर बनवता येत नाही.कोणतीही कम्प्युटर भाषा शिकण्यास फार मेहनत घ्यावी लागते.सराव करून शिकणे हे फायदेशीर ठरते.कोडिंग मध्ये छोटीशी चूकही संपूर्ण सॉफ्टवेअर वर परिणाम करू शकते.

सॉफ्टवेअर इंजीनियर म्हणजे काय ? | Software Engineer In Marathi

आपण सगळे गेले अनेक वर्षापासून मोबाइल,कम्प्युटर व इतर स्मार्ट इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स वापरत आहोत.तसेच याचा मध्य आपण वेग वेगळे सॉफ्टवेअर,प्रोग्राम किंवा अॅप्लिकेशन चा देखील वापर करतो.काहींना कदाचित प्रश्न देखील पडले असतील की हे सर्व सॉफ्टवेअर,अॅप्लिकेशन कोण बनवत असेल?

हे सगळं काम सॉफ्टवेअर इंजीनियर करत असतो.जो व्यक्ति कम्प्युटर,मोबाइल किंवा इतर कामासाठी सॉफ्टवेअर ,प्रोग्राम किंवा अॅप्लिकेशन बनवतो त्याला आपण सॉफ्टवेअर इंजीनियर म्हणतो.

आपण आधुनिक जगात राहतो जे सॉफ्टवेअर शिवाय सुरळीत चालू शकत नाही. सॉफ्टवेअर इंजीनियर अनेक व्यवसायांच्या कार्यात महत्वाची भूमिका बजावतात.

सॉफ्टवेअर इंजिनिअर्सच्या उच्च करिअरच्या संभाव्यतेमुळे, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगमधील बी.टेक हा करियरच्या सर्वाधिक मागणी असलेल्या पर्यायांपैकी एक बनला आहे.B.Tech सॉफ्टवेअर अभियांत्रिकी(software engineering information in marathi) अभ्यासक्रमाचा कालावधी ४ वर्षे आहे.

सॉफ्टवेअर इंजिनिअर कसे व्हावे ? | How To Become Software Engineer In Marathi

Software Engineer In Marathi – सॉफ्टवेअर इंजीनीरिंग मधे २ डिग्री येतात.पहिली कम्प्युटर सायन्स (CS) आणि दुसरी इन्फॉर्मेशन टेक्नॉलजी (IT).या पेकी तुम्ही कोणतीही एक डिग्री मिळवून सॉफ्टवेअर इंजीनियर बनू शकता.

सॉफ्टवेअर इंजिनिअर होयचे मार्ग | Software Engineering Information In Marathi

  1. १० वी नंतर तुम्ही पॉलिटेक्निक कॉलेज मध्ये डिप्लोमा इन सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग करू शकता.याचा कालावधी ३ वर्षे आहे.यात तुम्हाला डिप्लोमाची पदवी मिळेल (B.E नाही ).
  2. जर तुम्हाला बॅचलर ऑफ इंजीनीरिंग म्हणजेच B.E इन सॉफ्टवेअर इंजिनीरिंग करायची असेल तर ते तुम्हाला १२ वी सायन्स नंतर करता येईल.
  3. या शिवाय १२ वी मध्ये फिज़िक्स,केमिस्ट्रि आणि मॅथ्स (PCM) हे विषय घेऊन तुम्ही उत्तीर्ण झाले असावे.या पात्रता च्या आधारे तुम्ही प्रवेश परीक्षा (entrance exam) द्यावी व आपल्या ranking नुसार कॉलेज मध्ये प्रवेश घ्यावा.B.E चा कालावधी हा ४ वर्षांचा असतो. पुढे तुम्ही M.E म्हणजेच मास्टर्स इन सॉफ्टवेअर इंजीनीरिंग देखील करू शकता.
  4. १० वी नंतर ३ वर्षांचा डिप्लोमा इन कम्प्युटर इंजीनीरिंग झाल्यानंतर तुम्ही B.E इन सॉफ्टवेअर इंजिनीरिंग च्या थेट दुसऱ्या (2nd year)वर्षात प्रवेश घेऊ शकता.
  5. B.E व्यतिरिक्त BCA किंवा BSC इन सॉफ्टवेअर इंजीनीरिंग देखील तुम्ही करू शकता.

सॉफ्टवेअर इंजिनिअर काम | Software Engineer Work In Marathi

सॉफ्टवेअर इंजिनिअर होण्यासाठी तुम्हाला C, C ++, Python, JAVA, CSS, PHP इत्यादी संगणक प्रोग्रामिंग भाषांचे ज्ञान असणे आवश्यक आहे.सॉफ्टवेअर इंजिनिअर या संगणक प्रोग्रामिंग भाषेच्या मदतीने सॉफ्टवेअर विकसित करतो.

सॉफ्टवेअर इंजिनिअरची कार्ये | Software Engineer In Marathi

  • कोडिंग,प्रोग्रामिंग करणे हे सॉफ्टवेअर इंजिनिअरचे मुख्य काम आहे.
  • सॉफ्टवेअर विकसित करणे.
  • मोबाईल अॅप्स तयार करणे.
  • लॅपटॉप आणि संगणकासाठी सॉफ्टवेअर बनवणे.
  • अॅप्स आणि प्रोग्राम विकसित करताना येणाऱ्या समस्यांचे निराकर करणे .
  • सॉफ्टवेअरची चाचणी करणे .
  • सॉफ्टवेअरला मेंटेन ठेवणे .
  • वापरकर्त्याच्या गरजेनुसार सॉफ्टवेअर बनवणे.

सॉफ्टवेअर इंजीनियर पगार | Software Engineer Salary In Marathi

सॉफ्टवेअर कंपन्या आणि आयटी क्षेत्रात सॉफ्टवेअर इंजिनिअर्सना खूप मागणी आहे.काही कंपन्या अशाही आहेत ज्या सॉफ्टवेअर इंजिनिअर्सना लाखोंचा पगार देतात.

शिक्षण, अनुभव, स्थान इत्यादीनुसार नोकरी आणि पगार उपलब्ध आहे.सॉफ्टवेअर इंजिनिअरला सुरुवातीला किमान २०,००० ते ४०,००० ची नोकरी मिळू शकते.एक्स्पर्ट सॉफ्टवेअर इंजिनिअरला वर्षाला किमान २५ -३० तर कमाल ७०-८० लाखांपर्यंत पगार मिळतो.

सॉफ्टवेअर इंजिनिअरचा पगार मुख्यत्वे त्याच्या अनुभवावर अवलंबून असतो. त्याला जितका जास्त अनुभव तितका त्याचा पगार जास्त असतो.अनुभवासह पगार देखील वाढत जातो.

गुगल, मायक्रोसॉफ्ट सारख्या कंपन्या अनुभवी आणि कुशल सॉफ्टवेअर अभियंत्यांना करोडो किमतीची पॅकेजेस देतात.

हेही वाचा : Digital Marketing In Marathi मध्ये आपले आधुनिक करियर घडवा.

Software Engineering Information In Marathi

मला आशा आहे की Software Engineering Information In Marathi हा लेख तुम्हाला आवडला असेल.या लेखात सॉफ्टवेअर इंजीनीरिंग म्हणजे काय ? बद्दल आपल्याला काही शंका असल्यास किंवा त्यामध्ये काही सुधारणा झाली पाहिजे असे आपल्याला वाटत असल्यास, यासाठी आपण कमेन्ट अथवा ईमेल लिहून आम्हाला सांगू शकता.

आपल्याला हा लेख आवडला असेल किंवा यातून काही नवीन शिकायला मिळाले असेल तर कृपया ही माहिती जास्तीत जास्त इतरांकडे पोहचवा. फेसबुक , ट्विटर आणि इतर सोशल मीडिया साइट्स वर हे शेअर करा.धन्यवाद !!

सॉफ्टवेअर इंजीनीरिंग बद्दल काही प्रश्न (FAQs)

सॉफ्टवेअर इंजीनीरिंग म्हणजे काय ?

सॉफ्टवेअर इंजीनीरिंग ही इंजीनीरिंग मधली एक शाखा (Branch) आहे. या इंजीनीरिंग अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या सॉफ्टवेअरचे डिझायनिंग, उपयोजन (deployment), देखभाल (maintenance) व चाचणी (testing) कशी करायची ते शिकवले जाते.

सॉफ्टवेअर इंजीनियर कसे वह्याचे ?

सॉफ्टवेअर इंजीनियर हे सॉफ्टवेअर शाखेतील इंजीनीरिंग,डिप्लोमा किंवा BCA,BSC(IT) या पदवी मिळवून होता येते.

सॉफ्टवेअर इंजीनीरिंग शिक्षण किती कालावधीचे असते?

सॉफ्टवेअर इंजीनीरिंगचे शिक्षण हे ४ वर्षाचे असते.

सॉफ्टवेअर इंजीनियर कोणते काम करतात ?

सॉफ्टवेअर इंजीनियर प्रोग्रामिंग, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, सॉफ्टवेअर टेस्टिंग, अल्गोरिदमिक डिझाईन आणि विश्लेषण, मोबाईल अॅप डेव्हलपमेंट इ. काम करतात.

5 thoughts on “Software Engineering Information In Marathi | सॉफ्टवेअर इंजीनीरिंग म्हणजे काय”

    • हो,तुम्ही करू शकता सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग.दहावी नंतर डिप्लोमा इन कॉम्प्युटर(CS)/इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी(IT)करून ,मग डिग्री करावी किंवा बारावी नंतर कॉम्प्यूटर(CS)/इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी(IT) डिग्री करावी.

      उत्तर

प्रतिक्रिया द्या