‘तौक्ते’ म्हणजे काय आणि चक्रीवादळाला नाव कसे दिले गेले? जाणून घ्या

१८ मे रोजी चक्रीवादळ ‘तौक्ते’ गुजरात किनाऱ्यावर येण्याची शक्यता असल्याने या नावाची सगळीकडे चर्चा होत आहे . ‘तौक्ते’ हे नाव म्यानमारने सुचविले आहे . या नावाचा अर्थ बर्मी भाषेतील एका सरड्याचे नाव आहे.हा वैशिष्ट्यपूर्ण सरडा आवाजासाठी ओळखला जातो.अनेकांना प्रश्न पडले असतील.वादळाचे नामकरण कोण करत असेल ?आपण त्याचा बद्दल जाणून घेणारच आहोत. पण आदि समजून घेऊ चक्रीवादळ म्हणजे नेमका काय ते.

तौक्ते चक्रवादळ
Image – ANI

चक्रीवादळ म्हणजे काय?

चक्रीवादळ महणजेच सायक्लोन. या शब्दाची निर्मिती सायक्लोस या ग्रीक भाषेतील शब्दापासून झाली आहे. या शब्दाचा अर्थ सापाचे वेटोळे असा आहे.कमी-दाबाच्या क्षेत्राभोवती फिरणारी वारा ही एक प्रणाली आहे. जमिनीवर कमी दाबाचा पट्टा तयार झाला तर वादळ तयार होते व समुद्रात झाला तर चक्रीवादळ निर्माण होते. वातावरणातील उष्ण आणि आर्द्र हवेच्या सतत होणाऱ्या पुरव‌ठ्यामुळे वादळाला पोषक वातावरण मिळते. चक्रीवादळे समुद्रातील पाण्याच्या उष्ण भागातील गरम वाफेमुळे निर्माण होतात. समुद्रावर जिथे २६ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान असते, तो भाग वादळांच्या निर्मितीसाठी पोषक ठरतो.

चक्रीवादळला नाव कधी दिले जाते ?

जेव्हा वादळ वाऱ्याचा वेग ७४ मैल प्रतितास पोहोचतो किंवा तो ओलांडतो तेव्हा त्यास चक्रीवादळ मानले जाते. जेव्हा वादळ चक्रीवादळ होते तेव्हाच त्याला एक नाव दिले जाते.

चक्रीवादळांची नावे कशी ठरतात ?

जगभरात वादळांची नावे समान नसतात. महासागरांच्या विभागानुसार समिती स्थापन झाल्या असून, त्या त्यांच्या भागात आलेल्या वादळांची नावे ठरवतात. उदाहरणार्थ, अटलांटिक आणि दक्षिण गोलार्धात ज्यात भारतीय महासागर आणि दक्षिण प्रशांत चा समावेश आहे ,तिथे इंग्रजीतील बाराखडीनुसार हे नावे ठेवली जातात.तसेच यामध्ये सम विषम फॉर्मूला वापरला जातो. विषम वर्षी वादळांची नावे महिलांच्या नावे तर सम तारखेला पुरुषांच्या नावे वादळांची नावे ठरतात.
आपल्याकडे साधारणत २००४ पासून वादळांच्या नामकरणाला सुरुवात झाली.वादळांची नावे दिल्लीतील विभागीय विशेष हवामान केंद्र (रिजनल स्पेशलाइज्ड मेटिअरोलॉजिकल सेंटर) ठरवते. भारत, पाकिस्तान,मालदीव, बांग्लादेश,ओमान, म्यानमार,थायलंड, श्रीलंका या देशांनी सुचविलेल्या नावांची आठ गटात यादी केली जाते. क्रमवारीने नावे जाहीर केली जातात. तसेच WMO सदस्यांच्या राष्ट्रीय हवामान व जलविज्ञान सेवा (NMHS)ने प्रस्तावित केलेल्या नावांचाही विचार केलं जातो.

चक्रीवादळांना नावे का दिली गेली आहेत?

चेतावणी संदेशातील वादळ ओळखण्यासाठी चक्रीवादळांच्या नावाची प्रथा सुरू झाली. लोकांसाठी चक्रीवादळातील तांत्रिक माहिती आणि अटी लक्षात ठेवणे कठीण आहे.आपत्कालीन परिस्थितीत जनसामान्यांची तयारी वाढविण्यासाठी आणि प्रसारित होणार्‍या चक्रीवादळच्या बातम्यांना सोपे करण्यासाठी नावे देण्यात आली आहेत.

चक्रीवादळांच्या नावासाठी जबाबदार असलेली संस्था कोणती?

  • इस्‍केप (ESCAP/WMO) टाइफून कमेटी
  • इस्‍केप (WMO/ESCAP) पैनल ऑफ ट्रॉपिकल साइक्‍लोन
  • आरए 1 ट्रॉपिकल साइक्‍लोन कमेटी
  • आरए- 4 ट्रॉपिकल साइक्‍लोन कमेटी
  • आरए- 5 ट्रॉपिकल साइक्‍लोन कमेटी

चक्रीवादळाला तुम्हीही सुचवू शकता नाव

सामान्य जनता सुद्धा चक्रीवादळाला नाव सुचवू शकतात . ही सुविधा भारतीय हवामान खात्याने दिली आहे. तुम्हाला डायरेक्टर जनरल ऑफ मेटेरोलॉजी, इंडिया मेटेरोलॉजिकल डिपार्टमेंट, मौसम विभाग, लोधी रोड, नवी दिल्ली – ११०००३ या पत्त्यावर चक्रीवादळासाठी सुचलेले नाव पाठवावे लागेल . यातील काही ठराविक नावाची निवड केली जाते.

या आरोग्यदायी फायद्यांसाठी बडीशेप खा | Benefits Of Badishep In Marathi

प्रतिक्रिया द्या