UPSC Full Form In Marathi | UPSC म्हणजे काय

UPSC Full Form In Marathi : UPSC चा फूल फॉर्म यूनियन पब्लिक सर्विस कमिशन असा आहे.यालाच आपण मराठी मध्ये संघ लोक सेवा आयोग म्हणून ओळखतो.

यूपीएससी अखिल भारतीय सेवा, केंद्रीय सेवा आणि केडर तसेच भारतीय संघाच्या सशस्त्र दलांसाठी भरती प्रक्रिया आयोजित करते.यूपीएससी ही राष्ट्रीय स्तरावरील(National Level) परीक्षा आहे.केंद्र आणि राज्य सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या २४ सेवांमध्ये यूपीएससी द्वारे भरती केली जाते.यूपीएससी परीक्षा ही भारतातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक आहे.

UPSC Full Form In Marathi
UPSC Full Form In Marathi

UPSC Information In Marathi | UPSC म्हणजे काय?

यूपीएससी ही एक स्वतंत्र संस्था आहे. ही संस्था केंद्रात आणि राज्यात लेव्हल अ आणि लेव्हल बी चे कर्मचारी भरती करण्याचे काम करते.UPSC म्हणजेच संघ लोक सेवा आयोग याची स्थापना १ ऑक्टोबर १९२६ रोजी झाली.यूपीएससीचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. यूपीएससी दरवर्षी राष्ट्रीय स्तरावर सिविल सर्विस परीक्षा घेते.या लेखात आपण UPSC द्वारे भरली जात असलेली पदे तसेच त्यांची माहिती जाऊन घेणार आहोत.

UPSC पदांची माहिती | UPSC Full Form In Marathi

UPSC म्हणजेच संघ लोक सेवा आयोग हे दरवर्षी नागरी सेवा परीक्षा घेते.दरवर्षी लाखों मुले ही परीक्षा देतात.आयोग यातील योग्य ते उमेदवार निवडतात.निवडण्यात आलेले उमेदवार खालील सेवेत भारती केले जातात.

  • भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस/IAS)
  • भारतीय पोलिस सेवा (आयपीएस/IPS)
  • भारतीय महसूल सेवा (आयआरएस/IRS)
  • भारतीय परराष्ट्र सेवा (आयएफएस/IFS)

यूपीएससी विविध क्षेत्रात लेव्हल अ आणि लेव्हल बी चे अधिकारी भरतीसाठी परीक्षा घेते.ही परीक्षा राष्ट्रीय स्तरावर घेतली जाते.केंद्र आणि राज्य सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या २४ सेवांमध्ये भारती करण्यासाठी ही परीक्षा आयोजित केली जाते.

हे पण माहीत करून घ्या – CRPF Full Form In Marathi

यूपीएससीचे कार्ये काय आहेत | UPSC Work In Marathi

भारतीय घटना कलम ३२० च्या अंतर्गत नागरी सेवा आणि पदांवर भरती संबंधित सर्व जबाबदारी ही यूपीएससी कडे आहे.यूपीएससी चे कार्य खालील प्रकारे

  1. यूपीएससी अंतर्गत येणाऱ्या सेवांमध्ये नियुक्तीसाठी परीक्षा घेणे.
  2. मुलाखतीद्वारे थेट भरती प्रक्रिया राभवणे.
  3. पदोन्नती / प्रतिनियुक्ती करून अधिकाऱ्यांची नेमणूक करणे.
  4. शासनाच्या अधीन असलेल्या विविध सेवा व पदांसाठी भरती नियमांची तयारी व दुरुस्ती करणे.
  5. विविध नागरी सेवांशी संबंधित शिस्तविषयक बाबी सांभाळणे.
  6. आयोग संदर्भात राष्ट्रपति द्वारे सरकारला सल्ला देणे.

IAS Full Form In Marathi | यूपीएससी पदांचे फूल फॉर्म

पदाचे नावफूल फॉर्म
IASIndian Administrative Service
भारतीय प्रशासकीय सेवा
IPSIndian Police Service
भारतीय पोलिस सेवा
IFSIndian Foreign Service
भारतीय परराष्ट्र सेवा
IRSIndian Revenue Service
भारतीय महसूल सेवा

यूपीएससी तर्फे घेण्यात आलेल्या काही परीक्षा

  • एकत्रित वैद्यकीय सेवा परीक्षा (Combined Medical Services Examination)
  • केंद्रीय सशस्त्र पोलिस दल (सहाय्यक कमांडंट) [Central Armed Police Forces (Assistant Commandant)]
  • भारतीय वन सेवा परीक्षा (Indian Forest Service examination)
  • अभियांत्रिकी सेवा परीक्षा (Engineering Services Examination)
  • नौदल अकादमी परीक्षा (Naval Academy Examination)
  • विशेष वर्ग रेल्वे परीक्षा (Special Class Railway Apprentice)
  • एकत्रित भू-वैज्ञानिक आणि भूगर्भशास्त्रज्ञ परीक्षा (Combined Geoscientist and Geologist Examination)
  • एकत्रित संरक्षण सेवा परीक्षा (Combined Defence Services Examination)
  • राष्ट्रीय संरक्षण अकादमी परीक्षा (National Defence Academy Examination)
  • भारतीय आर्थिक सेवा / भारतीय सांख्यिकी सेवा परीक्षा (Indian Economic Service/Indian Statistical Service Examination)

दरवर्षी लाखो उमेदवार यूपीएससी परीक्षा देतात.चांगला पगार आणि सर्वाधिक प्रतिष्ठेचे पद म्हणून विद्यार्थ्यांमध्ये यूपीएससी ही एक अतिशय लोकप्रिय परीक्षा आहे.

यूपीएससी भरती प्रक्रिया | UPSC Recruitment In Marathi

यूपीएससी परीक्षेत तीन टप्पे असतात

  1. प्रीलिम्स
  2. मेन्स
  3. व्यक्तिमत्त्व चाचणी / मुलाखत

यूपीएससी प्रीलिम परीक्षा पॅटर्न

पेपरप्रश्न प्रकारप्रश्नांची संख्यागुणकालावधी
सामान्य अभ्यास Iवस्तुनिष्ठ१००२००२ तास
सामान्य अभ्यास II (CSAT)वस्तुनिष्ठ८०२००२ तास

प्रिलिम्सची परीक्षा ही पात्रता परीक्षा असते.प्रिलिम्स मध्ये मिळालेले गुण अंतिम गुणवत्तेच्या यादीमध्ये मोजले जात नाहीत. प्रिलिम्स परीक्षेतील दोन्ही पेपर वस्तुनिष्ठ प्रकाराचे असतात. सामान्य अभ्यास II (CSAT) हा पेपर पात्रता ठरवतो. दुसऱ्या पेपर मधे उत्तीर्ण होण्यासाठी ३३ % गुण मिळवावे लागतात. प्रीमल्स परीक्षेत नेगेटिव मार्किंग असते.प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी,प्राप्त केलेल्या गुणांमधून १/३ गुण कमी केले जातात.

यूपीएससी मेन्स परीक्षा पॅटर्न

यूपीएससी मेन्स परीक्षेत ९ पेपर असतात. जे विद्यार्थ्यांनी प्रिलिम्सची परीक्षा उत्तीर्ण होतात,ते मेन्स ची परीक्षा देऊ शकतात. मेन्स परीक्षेचे सर्व पेपर वर्णनात्मक(Descriptive) प्रकाराचे असतात.दोन भाषेचे पेपर हे पात्रता ठरवतात.यूपीएससी मेन्सची परीक्षा ५ ते ७ दिवसांच्या कालावधीत घेतली जाते. पेपर ए आणि बी पात्रता ठरवतात.उमेदवारांना त्यांच्या पेपर १ ते पेपर ७ पर्यंत प्रत्येकी किमान २५ % गुण मिळवणे आवश्यक आहे.

यूपीएससी मुलाखत

मुलाखत म्हणजे यूपीएससी परीक्षेचा शेवटचा टप्पा. मुलाखत / व्यक्तिमत्त्व चाचणी आणि मुख्य परीक्षेच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाते.मुलाखत चाचणी ही २७५ गुणांची असते.अशा प्रकारे गुणवत्ता यादीसाठी एकूण गुण २०२५ असतात.मुलाखत घेणारे सामान्य ज्ञान/इंटरेस्ट चे प्रश्न विचारून विद्यार्थ्यांच्या मानसिक आणि सामाजिक वैशिष्ट्यांचा न्यायनिवाडा करतात.

काही गुण मुलाखत घेणारे आवर्जून विद्यार्थ्यांमध्ये शोधतात.जसे की मानसिक सतर्कता, कोणतीही गोष्ट आत्मसात करण्याच्या शक्ती, स्पष्ट आणि तार्किक विचार,निर्णय घेण्याची क्षमता ,नेतृत्व गुण , बौद्धिक गुण आणि नैतिक अखंडता असणे.

यूपीएससीची अधिकृत वेबसाइट

यूपीएससीची अधिकृत वेबसाइट https://www.upsc.gov.in/ आहे.

UPSC Information In Marathi | UPSC Meaning In Marathi

आम्हाला आशा आहे की  UPSC Full Form In Marathi हा लेख तुम्हाला आवडला असेल.या लेखात UPSC Long Form In Marathi  बद्दल आपल्याला काही शंका असल्यास किंवा त्यामध्ये काही सुधारणा झाली पाहिजे असे आपल्याला वाटत असल्यास, यासाठी आपण कमेन्ट लिहून आम्हाला सांगू शकता.

आपल्याला हा लेख आवडला असेल किंवा यातून काही नवीन शिकायला मिळाले असेल तर कृपया ही माहिती जास्तीत जास्त इतरांकडे पोहचवा. फेसबुक , ट्विटर आणि इतर सोशल मीडिया साइट्स वर हे शेअर करा.धन्यवाद !!

मराठी व्याकरणासाठी ही Marathi Barakhadi आता चौदाखडी अवश्य वाचा.

प्रतिक्रिया द्या