Vibes Meaning In Marathi | वाइब्स मराठी अर्थ आणि उदाहरण

Vibes meaning in Marathi : VIBES चा अर्थ काय आहे? आपण काळजी करावी असे काहीतरी आहे का?

VIBE हा शब्द गेल्या दशकात खूप लोकप्रिय झाला आहे. आज, बर्याच लोकांसाठी याचा अर्थ वेगवेगळा आहे.

काही म्हणतात की ही एक भावना आहे. काहींना वाटत की ही जीवनशैली आहे. तर काही लोकं याकडे मनाची स्थिती म्हणून पाहतात.

Vibes meaning in marathi
Vibes Meaning In Marathi

आपण Positive Vibes आणि Negative Vibes हे शब्द सुद्धा वाचली किंवा ऐकली असतीलच. हे दोनी शब्द vibes या शब्दाशी निघडत आहे.

चला तर मग Vibes in Marathi काय आहे ते जाणून घेऊया. नंतर मग त्याचा बद्दल आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया.

Vibes Meaning In Marathi

Vibe ही एक संज्ञा आहे जी एखाद्या व्यक्ती किंवा वस्तूभोवती असलेल्या उर्जेचे वर्णन करते.

उदाहरणार्थ, सकारात्मक भावना म्हणजे उत्साह. दुसरीकडे, नकारात्मक भावना म्हणजे चिंता आणि अस्वस्थतेची भावना.या vibesचा परिणाम थेट आपल्या मनस्थिती वर होत असतो.

अ. क्र.संज्ञा (Noun)
भावनिक संकेत
कंपन
वृत्ती
कल्पना
Table For Vibes Meaning In Marathi

उच्चारण (Pronounciation)

  • वाईब – एकवचन
  • वाइब्स – अनेकवचन

वरती आपण vibes या शब्दाचे संज्ञा वाचल्या. या वरुण आपल्याला या शब्दाचा अर्थ थोडा थोडा स्पष्ट झाला असेल.वाचताना आणि ऐकताना या शब्दाचा अर्थ हा वेग- वेगळा होतो. आता तो कसं हे आपण बघणार आहोत.

आता तुम्ही असा विचार करत असाल की या Vibesचा मराठी अर्थ काय आहे ? धीर धरा सांगतो.

उदाहरणार्थ, Angryचा अर्थ म्हणजे क्रोधित, Happy म्हणजे आनंदी हे आपण ठामपणे सांगू शकतो. परंतु vibes चा अर्थ कोणत्याही एक किंवा दोन शब्दांमध्ये नाही सांगू शकत. त्यासाठी त्याचा बद्दल आपल्याला सविस्तर जाणून घ्यायला हवे.

Vibes चा मराठी अर्थ

असे मानले जाते की मनुष्य हा देखील कंपन ऊर्जा (Vibrational energy) निर्मित करतो. प्रतेक मनुष्य त्याच्या वर्तमान भावनेनुसार त्या त्या प्रकारचे कंपन निर्मित करतो.

समजा एक व्यक्ति आनंदी आहे,तर तो आनंदी कंपन निर्मित करेल. तसेच दुखी असेल तर दुखी कंपन निर्मित करेल. वर्तमान भावनेनुसार हर्ष,उल्लास,उत्साही किंवा भीतीदायी कंपन सुद्धा व्यक्ति निर्मित करतो.

ह्याचा अनुभव तुम्हाला देखील आला असेलच. जेव्हा तुम्ही एकाद्या व्यक्तीला भेटतात.तेव्हा त्याला भेटल्यावर तुमचा मूड वेगळा होतो. तुम्ही त्या व्यक्तीच्या कंपन संपर्कात येतात आणि त्याचा परिणाम थेट तुमच्या मनस्थिती वर होतो.

उदाहरणार्थ, जर कोणी रडत असेल. त्याला फार दुख झाला असेल. तर त्याला पाहून आपल्याला देखील दुख वाटत. हे अस का होतं? तो व्यक्ति आपला जवळच नसला तरी आपण दुखी होतो. याच कारण म्हणजे कंपन.

आधी सांगितल्याप्रमाणे ती व्यक्ति आपल्या आजूबाजूला दुखी भावनांचे कंपन निर्मित करते. आपण जेव्हा आशा व्यक्तींच्या आजूबाजूला असतो, तेव्हा त्याचा परिणाम हा आपल्यावर होत असतो. याच भावनिक संकेत,विचार यांना vibes म्हणतात.

खरंतर vibes म्हणजे दुसऱ्यांकडून आपल्याकडे आलेली भावना. हे भावनिक संकेत आपण दुसऱ्यांकडून घेतो किंवा आपण दुसऱ्यांना देत असतो.

Positive Vibes And Negative Vibes Meaning in Marathi

हे समजण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊयात

समजा तुम्ही तुमच्या दोन जुन्या मित्रांना भेटलात.

१) पहिल्या मित्राने तुम्हाला त्याच्या कर्तृत्वाने प्रभावित केले. त्याने त्याच्या यशाबद्दल सांगितले.हे यश तुम्हाला देखील मिळू शकते अशी प्रेरणा त्याने तुम्हाला दिली.

परिश्रम करण्याचा सल्ला दिला. आयुष्य कसे जगावं हे सांगितले. आपले व्यक्तिमत्व कसे सुधरावे हे त्यानी तुम्हाला सांगितले.

तुमचा मध्ये असलेला आत्मविश्वास त्याने जागा केला. आता हे सगळं सांगितल्यावर नक्कीच तुमची जिद्ध ही वाढली असेल. तुम्हाला सकारात्मक राहायला आवडेल. कोणत्याही संकटाला तुम्ही धेरयाने सामोरे जाल.

२) दुसऱ्या मित्राने तुमचे मनोबल खाली आणले. तुम्हाला सांगितले की तुम्ही तुमच्या जीवनात काहीही करू शकत नाही. तुम्ही काहीही साध्य करू शकत नाही.

तुम्ही तुमचे ध्येय गाठू शकत नाही. त्याने तुमची निराशा केली आणि तुमचा अपमान केला.याने तुमचा मनस्थिती वर गंभीर परिणाम होईल.

तुम्ही गोष्टींचा द्वेष करण्यास सुरू कराल.आपला स्वतःवरील आत्मविश्वास गमवाल.निराश व्हाल, स्वतःचा द्वेष कराल.

याचा निष्कर्ष काय

पहिल्या मित्राने तुम्हाला सकारात्मक vibes दिले. त्याने तुम्हाला जगायला,शिकायला आणि ध्येय साध्य करण्यासाठी प्रोत्साहित केले. हे सकारात्मक आहे कारण तुमचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोण बद्दलला.तुम्ही खूप सकारात्मक व आशावाधी झालात.

दुसर्‍या मित्राने तुम्हाला नकारात्मक vibes दिले.त्याने तुम्हाला इतकं हताश केले की तुम्ही स्वतःवरील आत्मविश्वास गमावला.हे नकारात्मक आहे कारण याचामुळे तुम्ही जीवनात नेहमी उदासीन राहाल.एकही काम चांगले होताना दिसणार नाही. तुम्ही ध्येय साध्य करण्याचा प्रयत्न देखील करणार नाही.तुमचं जगणं हे निराशादाई होऊन जाईल.

या वरुण आपण लक्षात घेऊयात की आपण नेहमी आशा लोकांची संगत करावी जे आपल्याला सकारात्मक vibes देतील न की नकारात्मक vibes.

हे तर झाले व्यक्ती विशेष. पण एकधी वस्तु,जागा,वातावरण,गाणं ,चित्रपट किंवा इतर गोष्टी सुद्धा आपल्याला vibes देत असतात. तर तिथे सुद्धा तुम्हाला जी गोष्ट सकारात्मक vibes देते तीचाच उपयोग करा.

उदाहरण Vibes या शब्दाचा वापर इंग्रजी-मराठीमधे

इंग्रजीमराठी
You are funny, charming, and full of good vibes.तुम्ही मजेदार, मोहक आणि सकारात्मक vibesने भरलेले आहात.
He has been able to pick up vibes, both good and bad since he was a child.तो लहान असल्यापासून त्याला चांगले किंवा वाईट दोन्ही प्रकारचे vibes लक्षात येतात.
Bad vibes in this place.या ठिकाणी नकारात्मक vibes आहेत.
The town has a relaxed vibe.या गावाला विरंगुळेपणाची vibe(भावना) आहे.
Vibes Meaning In Marathi Example

तात्पर्य – Vibes Marathi Mahiti

आम्हाला आशा आहे की Vibes म्हणजे काय ? हा लेख तुम्हाला आवडला असेल.या लेखात Vibesचा मराठी अर्था बद्दल आपल्याला काही शंका असल्यास किंवा त्यामध्ये काही सुधारणा झाली पाहिजे असे आपल्याला वाटत असल्यास, यासाठी आपण कमेन्ट लिहून आम्हाला सांगू शकता.

आपल्याला हा लेख आवडला असेल किंवा यातून काही नवीन शिकायला मिळाले असेल तर कृपया ही माहिती जास्तीत जास्त इतरांकडे पोहचवा. फेसबुक , ट्विटर आणि इतर सोशल मीडिया साइट्स वर हे शेअर करा.धन्यवाद !!

Vibes बद्दल सतत विचारले जाणारे प्रश्न (FAQ’s)

Vibes meaning in marathi काय आहे ?

Vibes हे भावनिक संकेत आहेत जे तुम्हाला एकध्या व्यक्ती,ठिकाण,वस्तु,परिस्थिती किंवा संगीतातून अनुभवायला मिळते.हे Vibes सकारात्मक किंवा नकारात्मक असू शकतात.या Vibesचा परिणाम थेट आपल्या मनस्थिती वर होत असतो.

Postive Vibes आणि Negative Vibes काय आहेत ?

Postive Vibes मधून तुम्हाला सकारात्मक अनुभव(Feelings)येतो ,तर Negative Vibes म्हणजे तुम्हाला नकारात्मक अनुभव येतो.

Vibes कुठे कुठे असतात ?

Vibes हे सर्वत्र असतात. व्यक्ति,ठिकाण,शहर,वस्तु,गाणं ,चित्रपट,खेळ व इतेर ही प्रत्येक गोष्ट वेग-वेगळ्या Vibe देत असतात.

Vibes चे समानार्थी शब्द कोणते ?

भावना,विचार,वृत्ती ,कंपन,कल्पना हे काही समानार्थी शब्द आहेत.

Good Vibes/Postive Vibes कशा मिळणार ?

जी व्यक्ति,ठिकाण,शहर,वस्तु,गाणं ,चित्रपट,खेळ व इतर गोष्टी आपल्याला सकारात्मक,चांगला अनुभव देतात त्याच गोष्टी आपल्याला Good Vibes/Postive Vibes देतात.

हे पण वाचा : Share Market In Marathi

प्रतिक्रिया द्या