Women’s Day Quotes In Marathi : आपल्या भारतीय संस्कृती मध्ये स्त्रियांना फार महत्व आहे.त्यांचे विशेष सन्मान आणि कौतुक केले जाते.आपल्याकडे महिलेला देवीचे रूप मानले जाते.
पुराणातील श्लोक मध्ये देखील स्त्रियांचा महत्वपूर्ण उल्लेख केला गेला आहे.जसे की “यस्य पूज्यंते नार्यस्तु तत्र रमन्ते देवता” या ओळींचा अर्थ असा आहे की ज्या ठिकाणी नारीचे पूजन केले जाते,त्या ठिकाणी भगवंत निवास करतात.
आजच्या आधुनिक काळात स्त्रियांबद्दल लोकांचे विचार हे बदलले आहेत.आजचे लोकं महिलांना सगळीकडे वाव मिळवा आणि ते सर्वत्र सक्षम व्हावे या साठी प्रयत्नशील आहेत.
स्त्रियांनी कुठेही कमी पडू नाही अशी सर्वांची भावना आहे.स्त्री ही फक्त घराची नाही तर आपल्या देशाचा अभिमान आहे.आजच्या महिला पूर्वीपेक्षा अधिक सक्षम आहेत.
आता महिलांना त्यांच्या अधिकारांचा योग्य वापर कसा करायचा हे माहित आहे.आज प्रत्येक क्षेत्रात महिलांच्या कामगिरीची गणना करता येईल. विविध क्षेत्रात महिलांनी केलेली प्रगती हे अजून वाढावी आणि महिला अजून सक्षम व्हाव्या या प्रबळ भावनेने जगभरात जागतिक महिला दिन साजरा केला जातो.

Women’s Day Quotes In Marathi | जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा
महिला दिनाचा इतिहास खूप जुना आहे. जागतिक महिला दिन दरवर्षी ८ मार्च रोजी जगभरात साजरा केला जातो.
या वर्षीच्या जागतिक महिला दिन 2023 दिनाची theme आहे – डिजिटॉल (DigitALL) : स्त्री-पुरुष समानतेसाठी इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजीचा वापर.
जगभरातील महिला आणि मुली हवामान बदल,त्याचे आपल्या पृथ्वीवर होणारे दुष्परिणाम व ह्याला आपण कमी करून शाश्वत उद्याचे भविष्य कसे बनवू यावर संशोधन करून आपले मौल्यवान योगदान देत आहेत.त्यांचे कौतुक करण्यासाठी यंदा ही थीम ठेवण्यात आली आहे.
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त, तुम्ही देखील महिला दिनाचे quotes, महिला दिनाचे सूविचार आणि जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा शेअर करा.
Mahila Din Quotes In Marathi | आंतरराष्ट्रीय महिला दिन कोट्स
जागतिक महिला दिन (mahila din quotes in marathi) दरवर्षी 8 मार्च रोजी साजरा केला जातो. या दिवशी सर्व महिला एकमेकांना महिला दिनाच्या शुभेच्छा देतात आणि आपण एक स्त्री असल्याचा त्यांना अभिमान वाटतो.
आम्ही तुमच्यासाठी महिला दिनानिमित्त काही उत्तमोत्तम कोट्स (women’s day quotes in Marathi), शायरी आणि कवितांचा संग्रह घेऊन आलो आहोत, जे तुम्ही फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि मेसेजद्वारे एकमेकांना पाठवून अभिनंदन करू शकता.

स्त्री असते एक आई, स्त्री असते एक ताई, स्त्री असते एक पत्नी, स्त्री असते एक मैत्रिण, प्रत्येक भूमिकेतील 'ती'चा करा सन्मान. महिला दिनाच्या शुभेच्छा.
नारी हीच शक्ती आहे नराची, नारी हीच शोभा आहे घराची, तिला द्या आदर, प्रेम, माया, घरामध्ये आपोआप निर्माण होईल जिव्हाळा. जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
तू आदिशक्ती तुच महाशक्ती वरदायिनी कालिका, तुझ्या कृपेने सजला नटला संसार हा जगाचा. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा.
ती आई आहे, ती ताई आहे, ती मुलगी आहे, ती मैत्रिण आहे, ती पत्नी आहे, ती सून आहे, ती सासू आहे, ती आजी आहे. पण याआधी ती एक स्त्री आहे. जिचा आम्हा सर्वांना अभिमान आहे. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा.
स्मरण त्यागाचे, स्मरण शौर्याचे, स्मरण कर्तृत्त्वाचे, स्मरण स्त्री पर्वाचे. जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
Women’s Day Wishes in Marathi | आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या शुभेच्छा
स्त्रियांचा आदर हा फक्त १ दिवस नाही तर तो दररोज केला गेला पाहिजे. स्त्रिया कोणत्याही दिवशी सुट्टी घेत नाहीत.कधी ऑफिस किंवा घरी त्या दिवसभर काम करत असतात.
महिलांना प्रत्येक क्षेत्रात समानता आणि समान अधिकार मिळावेत म्हणून आंतरराष्ट्रीय महिला दिन (happy women’s day wishes in Marathi) साजरा केला जातो. या दिवशी जगातील सर्व देश, मग ते विकसित असोत वा विकसनशील, एकत्रितपणे महिलांच्या हक्कांबद्दल बोलतात.
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त तुम्ही देखील हे अभिनंदन संदेश (happy women’s day wishes in Marathi) पाठवा.

ती प्रत्येक वेदना विसरणारी, नात्यामध्ये तिची बंदिस्त दुनिया सारी, प्रत्येक वाट प्रकाशमान करणारी, ती शक्ती आहे एक नारी.
स्री म्हणजे वास्तव्य, स्री म्हणजे मांगल्य, स्री म्हणजे मातृत्व, स्री म्हणजे कतृत्व जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा.
स्त्री मध्ये असते शक्ती अपार, स्त्री आहे या सृष्टीचा आधार, करा स्त्रीचा नेहमीच सन्मान, कारण तिच प्रत्येकाच्या जीवनाचे सार.
स्री म्हणजे अडथळ्यांवर मात, स्त्री म्हणजे क्षणा क्षणांची साथ, तुझ्या कतृत्वाला सर्वांचा सलाम. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा.
रात्री रस्त्यावरुन जाणारी प्रत्येक मुलगी, ही संधी नसून जबाबदारी आहे. माझ्या आयुष्यातील प्रत्येक स्त्रीला, जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
Women’s Day Message in Marathi | महिला दिनाचे संदेश
या महिला दिनानिमित्त (international women’s day wishes in Marathi) असे काहीतरी करा ज्यामुळे तुमच्या आजूबाजूच्या सर्व महिलांना स्वतःचा अभिमान वाटेल.हा दिवस साजरा करण्यासाठी, महिला दिनाविषयीचे सूविचार शेअर करा (world women’s day wishes in Marathi).
जर तुम्हाला कोणत्याही स्त्रीबद्दल आदर वाटत असेल तर ही संधी सोडू नका आणि तिला तुमच्या मनातल्या भावना सांगा.
जी नेहमी करते केवळ त्याग, दुसऱ्यांसाठी करते ती कष्ट फार, मग तिलाच का केवळ त्रास, जगू द्या तिलाही अधिकाराने, करा तिचा सन्मान. महिला दिनाच्या शुभेच्छा.
स्त्रियांना चढू द्या शिक्षणाची पायरी, शिकून सावरतील दुनिया सारी.
ती आहे म्हणून हे विश्व आहे. ती आहे म्हणून घराला घरपण आह. ती आहे म्हणून नात्यांत जिवंतपणा आहे. तिचा सन्मान करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा.
विधात्याच्या नवनिर्माणाची कलाकृती तू एक दिवस साजरा कर स्वतःच्या अस्तित्वाचा तू जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर, आपली भूमिका योग्य पद्धतीने साकारणाऱ्या, आई, बहीण, पत्नी, लेकीस महिला दिनाच्या शुभेच्छा.
Women’s Day Thoughts in Marathi | महिला दिन सुविचार
स्त्री ही कोणापेक्षा कमी नाही यात टिळमात्र शंका नाही.आजच्या स्त्रिया सर्वकाही करू शकतात.मात्र काही लोकांच्या मागासलेल्या विचारसरणीमुळे आजही महिलांना कमी लेखले जाते.
ही विचारसरणी बदलावी या साठी कार्य करा.या जागतिक महिला दिनी, महान प्रेरणादायी लोकांचे सूविचार शेअर करा.
एक असा राजकीय संघर्ष ज्याच्या केंद्रस्थानी स्त्रिया नसतात, त्यामध्ये अजिबात संघर्ष नाही. - अरुंधती रॉय, लेखिका

आम्ही मात करू आणि भविष्यात यश आमचेच असेल.भविष्य आपले आहे. - सावित्रीबाई फुले, समाजसुधारक
कोणत्याही समाजाची प्रगती त्या समाजातील महिलांच्या प्रगतीवरून मोजता येते. - बी. आर. आंबेडकर
देशाची महानता वंशातील मातांना प्रेरणा देणारे प्रेम आणि त्यागाच्या अमर्याद आदर्शांमध्ये असते. - सरोजिनी नायडू
स्त्रिया टी बॅग सारख्या असतात. जोपर्यंत आपण गरम पाण्यात जात नाही तोपर्यंत आपल्याला आपली खरी ताकद कळत नाही. - एलेनॉर रुझवेल्ट
एक सशक्त स्त्री अशी स्त्री आहे जी काहीतरी करण्याचा निर्धार करते जे इतरांनी केले नाही. - मार्ग पियर्सी, कवी
राणीसारखा विचार कर. राणी अपयशी होण्यास घाबरत नाही. अपयश ही महानतेची आणखी एक पायरी आहे. - ओप्रा, टीव्ही होस्ट आणि निर्माता
पुरुषाच्या जगात वर्चस्व गाजवणाऱ्या स्त्रीमध्ये काहीतरी खास आहे. हे मिळवण्यासाठी त्यांचात एक विशिष्ट सामर्थ्य, बुद्धिमत्ता आणि निर्भयपणा असतो. - रिहाना, संगीत कलाकार
तुम्हाला काही बोलायचे असेल तर एखाद्या माणसाला विचारा.तुम्हाला काही करायचे असेल तर स्त्रीला विचारा. - मार्गारेट थॅचर, युनायटेड किंगडमच्या माजी पंतप्रधान
जर एक माणूस सर्वकाही नष्ट करू शकतो, तर एक मुलगी ते का बदलू शकत नाही ? - मलाला युसुफझाई
Women’s Day Shayari in Marathi | आंतरराष्ट्रीय महिला दिन शायरी
समाजाला सुसंस्कृत बनवण्यापासून देशाच्या विकासात स्त्रिया महत्त्वाची भूमिका बजावतात. आज महिलांनी प्रत्येक क्षेत्रात स्वत:ला सिद्ध केले आहे.
हा उत्साह आणि जोश दरवर्षी आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी जागतिक स्तरावर महिलांना त्यांच्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक अधिकारांबद्दल सांगितले जाते.
या दिवशी महिलांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देऊन, त्यांच्यात आत्मविश्वास जागृत करून आणि समाजात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करून त्यांचे मनोबल उंचावले जाते.
या प्रसंगी, तुम्ही देखील तुमच्या आयुष्यातील सर्व महिलांना विशेष वाटेल असे काहीतरी करा.आंतरराष्ट्रीय महिला दिन शायरी (Women’s Day Quotes in Marathi) पाठवा.

प्रतिभेला तुझ्या नवे पंख मिळू दे, स्वप्नांना तुझ्या नवी क्षितिजं लाभू दे. महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
इंग्रजीत म्हणतात लेडी,मराठीत म्हणतात महिला जिच्यामुळे आपण या जगात श्वास घेतो पहिला, अशा स्त्रीचा प्रत्येकाला वाटतो अभिमान, कायम करा अशा स्त्रीचा सन्मान.
कन्यारत्न तू, तू गृहलक्ष्मी, बहीण तू, तू सरती सोबती, अर्धागिनी तू ,तू आयुष्याची सारथी, आईत तूच मायेची माऊली, पूर्ण होवोत तुझ्या साऱ्या इच्छा. महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
आदिशक्ती तू, प्रभूची भक्ती तू, झाशीची राणी तू, मावळ्यांची भवानी तू, प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू, आजच्या युगाची प्रगती तू. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा.
कर्तृत्व विशाल, ऊर्जेची मशाल. जागतिक महिला दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
जागतिक महिला दिन कविता मराठी | Mahila Din Kavita
देशाच्या प्रगतीत सर्वच क्षेत्रातील महिलांचे योगदान वाढत आहे.प्राचीन काळापासून महिलांना देश, समाज, घर, कुटुंब व इतर गोष्टींचा आधार मानले जाते. म्हणूनच म्हटलं जातं की स्त्री शिकली तर संपूर्ण कुटुंब शिक्षित होतं.
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिलांना समर्पित ही खास महिला दिवस कविता मराठी तुम्हीही शेअर करा.
Mahila Din Kavita
जिच्या उदरातून जन्म घेते ही दुनिया सारी, जिच्या उदरातून जन्म घेते ही दुनिया सारी, या अशा विश्वशक्ती चे नाव आहे नारी. ती आहे शेती आणि सृजणाची निर्माती, तिच्यामुळे तिवतात दिव्या मधील वाती, चहूकडे प्रकाश देऊनी जगास ती उद्धारी, या अशा विश्वशक्ती चे नाव आहे नारी. क्रांतीबांची सावित्री भीमरावांची रमाई, शौर्याचे त्यागाचे प्रतिक झाली ती आमची जिजाई, रणांगणावर लढते जसी देवी झलकारी, या अशा विश्वशक्ती चे नाव आहे नारी. शक्ती पीठ नवदुर्गाचे ती भक्तीचे ऊर्जा स्थान, तिच्यामुळेच मिळते आम्हाला जगण्याचे आत्मभान, ती विठूची ती आषाढीची वारी, या अशा विश्वशक्ती चे नाव आहे नारी. नारी मुळे माणसांची आहे जगभर कीर्ती, ती जन्मभर असते त्यागाची जिवंत मूर्ती, घडवत गेली पिढ्या स्वतः झिजली दरी, या अशा विश्वशक्ती चे नाव आहे नारी. जिच्या उदरातून जन्म घेते ही दुनिया सारी, जिच्या उदरातून जन्म घेते ही दुनिया सारी, या अशा विश्वशक्ती चे नाव आहे नारी.
Stree Shakti Quotes in Marathi | Women’s Day Quotes in Marathi
आंतरराष्ट्रीय महिला दिन (stri quotes in marathi) हा महिलांसाठी अतिशय खास दिवस मानला जातो. या दिवशी जगभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
अनेक देश या दिवशी नोकरदार महिलांना सुट्टी देतात.चीन मध्येही या दिवशी काही ठिकाणी अर्धा दिवस सुट्टी दिली जाते. इटलीमध्ये महिला दिन ला फेस्टा डेला डोना म्हणून साजरा केला जातो.
८ मार्च रोजीच्या या महिला दिनानिमित्त, तुम्ही तुमच्या सर्व मित्रांना आणि नातेवाईकांना, महिलांनाही या दिवशी शुभेच्छा द्याव्यात (stree shakti in marathi).
दया नको आदर हवा….! माणूस म्हणून सन्मान हवा…..! जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा…!
तुझ्या उत्तुंग भरारीपुढे, गगनही ठेंगणे भासावे, तुझ्या विशाल पंखाखाली, विश्व सारे वसावे, महिला दिनाच्या शुभेच्छा.
तू भार्या, तू भगिनी, तू दुहिता, प्रत्येक वीराची माता, तू नवयुगाची प्रेरणा या जगताची भाग्यविधाता. महिला दिनाच्या शुभेच्छा…!!
सर्व जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडत, प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या नारी शक्तीस सलाम! जागतिक महिला दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
प्रत्येक घरात साडेतीन शक्तिपीठ आहेत. आई,बहिण,बायको व अर्धे शक्तिपीठ मुलगी.. करुया स्त्रीशक्तीचा जागर.. फक्त एका दिवसपुरता नाही दररोज… जागतिक महिला दिनाच्या हादिक शुभेच्छा.
Women’s Day Quotes for Mother in Marathi | आईसाठी महिला दिनाच्या शुभेच्छा संदेश
जेव्हा आपण महिलांबद्दल बोलतो तेव्हा आपल्याला सर्वात पहिला शब्द आठवतो तो म्हणजे आई. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात आईचे स्थान सर्वात विशेष असते.
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आईला शुभेच्छा द्या.सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय महिला दिवस शुभेच्छा संदेश (Womens Day Quotes in Marathi) आईला पाठवा आणि तिचा दिवस खास बनवा.
पूर्वजनमाची पुण्याई असावी, जन्म तो तुझ्या गर्भात घेतला, जग पाहिला नव्हतं तरी, नऊ महिने श्वास स्वर्गात घेतला.
आई ही एकच व्यक्ती आहे, जी तुम्हाला इतरान पेक्षा, ९ महिने जास्त ओळखत असते. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा.

तुझ्यामुळे जन्म माझा, पाहिले हे जग मी, कसे फेडू ऋण तुझे, अनंत जन्मांचा कृतज्ञ मी. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा आई.
देव दिसला आई मज तुझ्या अंतरात, मग सांग मी का जाऊ मंदिरात. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा
ज्याला स्त्री ,आई म्हणून कळली तो जिजाऊचा शिवबा झाला. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा.
Women’s Day message for Wife in Marathi | महिला दिनाच्या शुभेच्छा संदेश पत्नीसाठी
आंतरराष्ट्रीय महिला दिन हा महिलांच्या संघर्षाचा आणि मुक्त विचारांचा उत्सव साजरा करण्याचा दिवस आहे.
हा असा दिवस आहे जेव्हा महिलांना जाणीव करून दिली जाते की त्या देखील त्यांच्या इच्छेनुसार हवे तसे आयुष्यात पुढे जाऊ शकतात.
तुम्ही देखील आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या शुभेच्छा (Womens Day Quotes in Marathi) शेअर करा.प्रत्येक महिलेचा दिवस स्पेशल बनवा.
ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळली, तो सीतेचा राम झाला. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा बायको.
तुझ्या किर्तीची पताका, दिवसेंदिवस अशीच उंचावर राहो. जागतिक महिला दिनाच्या खूप मनापासून शुभेच्छा बायको.

जबाबदारीसह घेते भरारी, न थके ना तक्रार करी. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा बायको.
जेव्हा तु माझा हात हातात घेऊन उभी असतेच, मला जग जिंकल्याचा भास होतो. तुझ्या असण्याने माझं अस्तित्व बहरून निघतं. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा बायको.
यशस्वी आणि मनमिळावू पत्नी घराचा स्वर्ग करते, हे तुझ्याकडे पाहून मला समजले. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा बायको.
Women’s Day Wishes In Marathi | Women’s Day Quotes In Marathi
मला आशा आहे आज या लेखात सांगितलेले Women’s Day Wishes In Marathi तुम्हाला आवडले असतील.
या लेखात जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा या मध्ये आपल्याला काही शंका असल्यास किंवा त्यामध्ये काही सुधारणा झाली पाहिजे असे आपल्याला वाटत असल्यास, यासाठी आपण आम्हाला कमेन्ट किंवा ईमेल लिहून सांगू शकता.
यातून काही नवीन शिकायला मिळाले असेल तर कृपया ही माहिती जास्तीत जास्त इतरांपर्यन्त पोहचवा.फेसबुक,ट्विटर आणि इतर सोशल मीडिया साइट्स वर हे शेअर करा.धन्यवाद
जागतिक महिला दिनबद्दल सतत विचारले जाणारे प्रश्न (FAQ’s)
जागतिक महिला दिन दरवर्षी ८ मार्च रोजी जगभरात साजरा केला जातो.
महिलांना प्रत्येक क्षेत्रात समानता आणि समान अधिकार मिळावेत म्हणून आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. या दिवशी जागतिक स्तरावर महिलांना त्यांच्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक अधिकारांबद्दल सांगितले जाते.
17 ऑगस्ट 1907 रोजी जर्मनीतील स्टुटगार्ट येथे पहिली आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषद झाली.
या वर्षीच्या जागतिक महिला दिन 2022 दिनाची theme आहे – शाश्वत उद्यासाठी आजपासून स्त्री पुरूष समानता.
हे पण वाचा :